केशवस्वामी - पद १

केशवस्वामींचे संपूर्ण नाव केशव आत्माराम कुलकर्णी. ते लातूरच्या दक्षिणेस असलेल्या कल्याणी नावाच्या इतिहासप्रसिद्ध गावचे. ते आध्यात्मिक विचाराचे होते.


मुळीं प्रपंच झाला नाहीं । पुढें होईल लटिका पाही ।
ऐसें जाणुनिया स्थिर राहीं । मग करणें नलगे तुज कांहीं ॥ध्रुवपद.॥
एक प्रपंच झाला होता । हे स्वरुपी नाहीं वार्ता ।
पुढें होईल हा मागुता । हें न घडे गा ! तत्वता ॥ मुळीं०॥१॥
हें मिथ्याची प्रपंचाचें भान । हें ज्ञानाचें मुख्य निजज्ञान ।
येणें ज्ञान जें समाधान । त्यासी कैंचें भवबंधन गा ! ॥मुळीं०॥२॥
जो स्वप्रिं मरुनि जाळिला । तो जाग्रतीसि राख नाहीं झाला ।
ऐसा प्रपंच जेणे देखिला । तोचि जीवन्मुक्त भला गा ! ॥मुळीं०॥३॥
रज्जु सर्पाचें जें भासणें । भासताही लटिकेपणें ।
ऐसा प्रपंच देखिला जेणें । त्यासी कैंचें येणें जाणें? ॥।मुळीं०॥४॥
गुरुकृपे केशवीं भाव । जेथें देहभावा नाहीं ठाव ।
जन्ममरण झालें वाव । आतां कैवा संदेह गा !मुळी०॥५॥
काय तें गुज? सांगों नयें लांगतां कोणा ।
वृत्तीसीं ठाव नाहीं कैची दखवूं खुना? ॥ध्रुवपद.॥
वाचेसी नाम बोलों । बोल ग्रासुनीं डोलों ।
डोलासि निरसुनि तृप्त होऊनी ठेलों ॥काय०॥१॥
अपार सुख दाटे । तेथें संसार आटे ।
देहींच देह नाहीं देह नाहीं थोर कौतुक वाटॆ ॥काय०॥२॥
यापरी संतपायीं । बोध फावला पाहीं ।
बोधासी ठाव कैंचा भेद केशवीं नाहीं ॥काय०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 15, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP