केशवस्वामी - पद २

केशवस्वामींचे संपूर्ण नाव केशव आत्माराम कुलकर्णी. ते लातूरच्या दक्षिणेस असलेल्या कल्याणी नावाच्या इतिहासप्रसिद्ध गावचे. ते आध्यात्मिक विचाराचे होते.


सांग पां माझॆं उपाणें रे ! ।
नकळे तरी तूं संतांसीं पुसें गुरुविणें खुण न बाणे रे ! ॥ध्रुवपद.॥
एकवीस स्वर्गावरी उडे एक घारी पाताळा खालें तिची छाया रे ! ।
चळेना ढळेना त्रिभुवनिं खळे मन भुली आली ते ठाया रे ! ॥१॥
गंगातिरीं एक सोवळा ब्राह्मण अनामिका घरीं राहे रे !।
याति ना कूळ परी शिखा मूत्र वागवी एकही वर्ण न साहे रे ! सांग॥२॥
वाघाच्या वाडां एक मिस्किन गाय ते ढवळया बैलाची माय रे ।
दातेंविणें तिनें  वाघासि गिळिलें तिचापाडा तिसीं खाय रे ! ॥सांग॥३॥
सूर्याचे गांवीं गडद घुंग पडिलें अंधळ्याने लाधिली वाती रे ! ।
काजळें डोळा धुवुनी सांडितां नुरेचि दिन ना राती रे ! ॥सांग॥४॥
मायेचा घो हो ! गाभणा झाला तो बाइलेस आपण व्याला रे !।
गुरुकृपे केशवीं नवलार पाहतां चांदणीनें डोहो गिळियेला रे! ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 15, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP