केशवस्वामी - पद ४

केशवस्वामींचे संपूर्ण नाव केशव आत्माराम कुलकर्णी. ते लातूरच्या दक्षिणेस असलेल्या कल्याणी नावाच्या इतिहासप्रसिद्ध गावचे. ते आध्यात्मिक विचाराचे होते.


सांगता दिसे बहु कोडें रे !  कळेना तें जाहलें वेडे रे !
अनुभवी खुण जाणती तेथिची इतरांसि कां न कोडें रे ! ॥ध्रुवपद॥
मेरुचे शिखरीं उभि एक नारी पती तिचा ब्रह्मचारी रे ! ।
त्याचिता संगे ते प्रजांसि व्याली पति  ते कर्णकुमारी रे ! ॥सांगता०॥१॥
शून्याचे शेंडा एक तरुवर देखिला तयासी मूळ ना डाहाळ रे ! ।
शाखा पुष्प त्यासी नसोनि कांहीं सर्वागें निज सफळ रे ! ॥सांगता०॥२॥
नांदाचें दोंदावरी चांदणे पडिलें अवसेची झाली पुनाव रे ! ।
सतेज तेजें ढवळा उजळुनी अवघिच उखा केली रे !॥सांगतां० ॥३॥
वोस नगरीं राहणे दिवसा पडिलें चोरें चोरा नागविलें रे ! ।
संन्याशाचा कर्मबंध तुटला माशानें तरळा नेलें रे ! ॥सांगता०॥४॥
तीं खणावरी देउळ रचिलें देवासि ठावचि नाहिंच रे !।
गुरुकृपें केशवीं दर्शन घेतां देउळ उडालें  पाहीं रे ! ॥सांगता०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 15, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP