मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
जो जो जो जो रे सुखधामा । ...

पाळणा - जो जो जो जो रे सुखधामा । ...

पाळणे - Palane are the marathi lullby songs usually sung at Naming Ceremony called "Barase" (बारसे). These are also sung while putting child to sleep in a swing.


जो जो जो जो रे सुखधामा । भक्तपूर्ण कामा ॥ध्रु०॥

क्षत्रिय संहारी रणांगणीं । उग्र स्वभाव करणी ।

भारी श्रमलासी खेळणीं । उद्धरितां हे धरणी ॥

धेनु द्विजांचे पाळणा । करितां अवतारंणा ।

तुजला निजवितां पाळणा । दीनावरि करिं करुणा ॥जो०॥

देव अवतरले हृषिकेशी । भृगूऋषीच्या वंशीं ।

संगें घेउनियां विधि-हरिसी । रेणुकेचे कुशीं ॥

सागर सारुनियां बसवीले । कोंकण जन-पाळिले ।

दुष्‍टाचरणातें दवडीलें । यश हें प्रसिद्ध केलें ॥जो०॥

स्वस्थानीं जावें भार्गवा । अखंडित चिरंजीवा ।

योगमाया ते करि सेवा । परशुराम देवा ॥

हालवी रेणुका पाळणा । गाई त्या सगुणा ।

सखया रामाच्या आभरणा । चुकवीं जन्ममरणा ॥जो०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 03, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP