मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
जोग्याचा पाळणा

जोग्याचा पाळणा

जोग्याचा पाळणा Jogi Palana


जो जो जो जो रे घनशाश्‍या । निजबाळा गुणधामा ।

जोगी आलासे निश्रामा । स्वामी दाविन तुम्हां ॥ जो जो ॥धृ॥

जोगी दिसतो विचित्र । त्याल तीन नेत्र ।

चर्मावेगळे नसे वस्त्र । म्हणवी तुझ्या मित्र ॥ जो जो ॥१॥

आंगी लावुनियां विभूती । अर्धांगी पार्वती ।

वृषभारुढ तो पशुपती । त्रिशुळ डमरु हाती ॥ जो जो ॥२॥

आणिक एक नवल दयाळा । कंठ दिसतो निळा ।

मस्तकी जळ वाहे झुळझुळा । नेत्री अन्निज्वाळा ॥ जो जो ॥३॥

योगी आलासे अंगणी । तुळसीवृदांवनी ।

तुजला देखीले नयनी । घालीत लोटांगणी ॥ जो जो ॥४॥

आळ घेतली न राहे । जोगी दावी माये ।

सर्पभूषणी तो आहे । परब्रह्म पाहे ॥ जो जो ॥५॥

गोकुळीं जन्मले निधान । परब्रह्मा ते जाण ।

तयाचे चरणी शरण । एकाजनार्दन । जो जो ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP