मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
जो जो जो रे जो जो जो । तू...

दत्ताचा पाळणा - जो जो जो रे जो जो जो । तू...

दत्ताचा पाळणा


जो जो जो रे जो जो जो । तू मी ऎसे उमजो ॥धृ॥

प्रेम पालख दत्तात्रय । हालविते अनसुया ।

बोधुनि निजरुप समजाया । भवभ्रम हा उडवाया ॥१॥

रजोगुणी तू ब्रह्माया । श्रमलासी तान्हया ।

सुखे निज आता अरे सखया । धरी स्वरुपी लया ॥२॥

तमोरुपे तू सदाशिवा । विश्रांति घे देवा ।

धरि रे स्वरुपी तू भावा । संहारिता विश्‍वा ॥३॥

विष्णू सात्त्विक तू अहंकार । दैत्यांचा संहार ।

करिता श्रमलासी अपार । आता समजे सार ॥४॥

ऎसा आनंदे पाळणा । मालो गातसे जाणा ।

सदगुरुकृपेने आपणा । दत्ता निरंजना ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP