मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
करुनी आरती । नामा आला घरा...

संत जनाबाई - करुनी आरती । नामा आला घरा...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


करुनी आरती । नामा आला घराप्रती ॥१॥

तेणें धरियेलें व्रता । अन्न न घ्यावें सर्वथा ॥२॥

ऐसा जाणोनिया नेम । अनुभवी पुरुषोत्तम ॥३॥

आषाढी एकादशी । विप्रवेषें ह्रुषिकेशी ॥४॥

आला नामयाचे सदनीं । नाम गाय दासी जनी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP