TransLiteral Foundation

नागनाथ माहात्म्य - बहिरट चरित्र

नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.


बहिरट चरित्र

बरवी संतचरित्रे हो! तारक परम पवित्रे हो ! ॥ध्रु॥

बहिरंभट एका प्रतिष्ठानी विद्या विनयो पुरता ।

मान्य लोकी असता त्याच्या ऐका कैसे चरिता ॥१॥

गंगास्नाना करुनी जपतप माध्यान्हीका सारी ।

गृहासि परतुनि येऊनि भोजन करिता सहपरिवारी ॥२॥

शाक आहे अलवणी ऐसा स्त्रीशी विनोद करिता ।

साठ वरुष वय, चवि ना गेली ? प्रतिउत्तर दे कांता ॥३॥

ऐसे ऐकुनि विरक्त चित्ता संचरला अविनाशी ।

सत्य मात बोलसी म्हणोनी वंदी नियभार्येसी ॥४॥

भिडेसि घालुनि गृहासि नेती यास्तव रागे रागे ।

यवन पुरोहोत याच्या गृहासि धावुन गेला वेगे ॥५॥

हिंदुस अविंध करिता पुण्य मिळेल तुमच्या धर्मी ।

याने अवश्य म्हणोनिया तो भ्रष्टविला निजकर्मी ॥६॥

अविंधासी भांडे माझे कानचि नाही बुजिले ।

व्यर्थ कातडे कापोनी मज अविंध कैसे केले ?॥७॥

सवेचि येऊनि ब्रह्मसभेसी साष्टांगे नमियेले ।

’भ्रम चित्ताचा’ काय करावे ? विपरित ऐसे झाले ॥८॥

नेत्री अश्रु कंठ दाटला अनुतापाने भरला ।

शास्त्र पाहुनी प्रायश्चित्ते पुनरपि ब्राह्मण केला ॥९॥

पाचासाता दिवसा येऊनि ब्रह्मसभेसी पुशिले ।

प्रायश्चिते लिंगावरुते आझुनि चर्म न आले ॥१०॥

पिसाचि होउनि नग्न बहिरापिसा नाव हे मिरवी ।

फिरत फिरत आला वडवाळे नागेशाची गावी ॥११॥

नागनाथ मठ बांधाया करि सनकाड्यांचे गाड ।

हस्ती ऐसे धोंडी वरुत्या जुंपियेले माकोडे ॥१२॥

त्याते छळुनी बहिरापीसा पुसतो मजला सांगा ।

हिंदु किंवा अविंध ? म्हणता सदगुरु आले रागा ॥१३॥

हाती काठी बळे घातली उचलुनि टाळूवरुते ।

घेरी येऊनि भूमिसि पडता नाठवे चित्तवृत्तीते ॥१४॥

मुसळ आणुनी शिष्या हाती कांडविला पिंडासी ।

अस्थिमांस कांडोनी गोळी केली मेणाऐशी ॥१५॥

त्याची पुनरपि मूर्ति निर्मिली भडाग्नि दिधला हाते ।

विझता अमृतदृष्टी अवलोकिले नागनाथे ॥१६॥

ब्रह्मरुप हा तनु ओतिव माजी चैतन्याचा वास ।

बहिर्‍यापीशा ! सावध ऐसे पाचारिले त्यास ॥१७॥

येऊ उठोनी चरण वंदिले, कोण तू? ऐसे पुसे ।

याति वर्ण ना नामरुपातित माझे रुप मजची भासे ॥१८॥

मस्तकि हस्तक ठेवुनि केला संकल्पाहुनि परता ।

भक्ता बहुत आणिक तारियेले जयजय नागनाथा ॥१९॥

ऐसे अपार संत वर्णिता संशय सर्वहि जातो ।

आठवले ते एक्या भावे उद्धवचिद्धन गातो ॥२०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-09-27T14:04:08.5500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

interfering

  • व्यतिकारी 
  • व्यतिकरण- 
RANDOM WORD

Did you know?

श्राद्धाचें प्रयोजन काय ? आणि श्राद्धाचे चार भेद कोणते आहेत ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.