नागनाथ माहात्म्य - आनंदलहरी

नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.


गुरुराया सिद्धा सहज सुखदाता सुरवरा ।

परमायातीता परमगुरुवर्या दिनकरा ।

दिनानाथा देवा निशिदिन सदा पूर्ण उदया

म्हणे सिद्धलिंग मजवरि किजे सिद्ध सुदया ॥१॥

गुरु नागनाथा निरसि भवबाधा अतित्वरे

कृपा कीजे वेगी धरूनि कुरवाळी निजकरे ।

समर्था सर्वज्ञा निगम वदती नित्य वदनी

म्हणे सिद्धलिम्ग मज बसविजे सिद्ध सदनी ॥२॥

कृपाळा कृपाळा भुवनभवकाळांतक शिवा

दयाळा स्नेहाळा निजसुख सुखाळा अनुभवा ।

सुधा सिंधू सिद्धा सहज सुखदाता महात्मया

अकाळी आनाश्री वर्षति गगनाहूनि गहन

रवीविणे भानू प्रखर तपती कोटि किरण ।

चिदाकाशी चित्त प्रचलितचि होचित नेहिन

म्हणे सिद्धलिंग म्हणवुनि गुरू गम्य गहन ॥४॥

अनूहाते भेरी अनुदिनि सदा गर्जति ध्वनी ।

मनोरम्य होय म्हणुनि श्रवणी ऐकति मुनी ।

तया नादातीत तमविरहित तेज प्रगट

म्हणे सिद्धलिंग मन उन्मनी नित्यनिकट ॥५॥

त्रिकूटाचे माथा द्विदळ वौता ह्म्स विचरे

नभाशुन्यातीत निखळ निजमुक्ता फळचरे ।

जराजन्मातीत परमगति पावे परतेरे

म्हणे सिद्धलिंग अजपजपता जीव विसरे ॥६॥

जिवाशीवा माझी परम पर वस्तूचि भरली

तिथे विश्वमाया मृगजळवत्‌ सर्व सरली ।

पदा पिंडती स्वजनन मरण विश्रांति तेथे

म्हणे सिद्धलिंग पहा तुम्हि परेहूनि परते ॥७॥

आनंत ब्रह्मांड अनुभव जया माजि दिसती ।

पुन्हा पाहू जाता परतुनि तया ठायि नसती ।

जसी आभ्रछाया दिसति लपती होति नव्हती

म्हणे सिद्धलिंग अनुभव करावा अवधुती ॥८॥

अनादिचे आदी अरुण उदयो पूर्ण जहला ।

अपारू असंख्य अगणित शशी कोटि वहिला ।

अणुक्षेत्रीतारा अनुपम प्रभा फाकति मुद्रा ।

म्हणे सिद्धलिंग गुरुमुख पहा हो तुम्हि सदा ॥९॥

नभाचे मंदीरी दिपेवीण दिसे दीप्ति विमळ

अविद्या अंधारू हरुनि निरसे द्वंद समुळ ।

इंदुज्वाला माळा लखलखित तेज पूर्ण पसरे ।

म्हणे सिद्धलिंग निगुरुजेते नेणति बरे ॥१०॥

तिमीरांधातीत त्रिगुण रहित तेज चमके ।

अपोरक्ष दृष्टी अनुदिनी असंख्यात झळके ।

सुधा धारा वर्षे स्ववदनि ऋषी वैखरि वदे

म्हणे सिद्धलिंग शिव शिव म्हणा हो असिपदे ॥११॥

ब्रह्माहमस्मीते म्हणवुनि स्वमुखी वेद वदती

परब्रह्मी माया परिमळ फुली ऐक्य वसती ।

सुवर्णाचेनीया बहुवि अलंकार घडती

म्हणे सिद्धलिंग पुनरपि स्वरुपी बिघडती ॥१२॥

रजुः सर्पाकारे अवचित दिसे दृश्य सबळ

तिथे लक्ष्यालक्ष्य दिखुनि निवळ शुद्ध निखिळ ।

मृषा सर्व भ्रांती भ्रमविरहित भेद गळते

म्हने सिद्धलिंग सकळ भवभया विरहित ते ॥१३॥

अलक्ष्य अवाच्य अनुभव पहा हो गुरुमुखे ।

सुलक्ष्य सुवाच्य सुगम श्रीगुरुनाम स्वमुखे ।

वदा हो वाच्यार्थ वरद गुरुनागेश्वर स्मरा

म्हणे सिद्धलिंग सकळ सखयानो भवतरा ॥१४॥

अण्वाग्री माणिक्ये अभिनव कळा फाकति क्षिती

अमोलिक्ये रत्‍ने जडित भुवनी सर्व दिसती ।

हिरे गोमेदादी बहुत पुष्करादि सकळा

म्हणे सिद्धलिंग दिखत दिखता वृत्ति विकळा ॥१५॥

महासिद्धस्वामी महिजळतळातीत परमा

अनीळा आकाशा विचरति तुम्हा माजि विमळा ।

वभूतू विश्वाचा विपरति लिळा काहि न कळे

म्हणे सिद्धलिंग गहन गुरुनाम हि न कळे ॥१६॥

भुजंगा सत्संगा भुवन भव भंगा भव हरा

कृपा पारा वारा शरण जन तारा अतित्वरा ।

खगातीता नागा नयन भर पाहीन तुजला

म्हणे सिद्धलिंग आणिक नलगे काहि मजला ॥१७॥

परेशा विश्वेशा परम प्रभुशेषा शिवगुरु

सुरेशा सर्वेशा सकल भुवनीशा परतरु ।

अवीनाशा देवा अरुप सरुपा अंग विहिना ।

म्हणे सिद्धलिम्ग करि मजवरी पूर्ण करुणा ॥१८॥

अगाधा अनंता अगुण गुण तू निर्गुण परा

निराकारा कारा विरहित विकारीगुरुवरा ।

गुरो वर्णवेना प्रसवित वचा हो विगलित

म्हणे सिद्धलिंग स्वरुप निजमौन्ये सलोलित ॥१९॥

बिसावा विश्वाचा मुनिजन सदा ध्याति ह्रदयी

गणा गंधर्वादी स्तवन करिती तत्व विषयी ।

तया ते प्रत्यक्ष अनुभव कळा दावि नयनी

म्हणे सिद्धलिंग सुर वर्षिति मुदा हेम सुमनी ॥२०॥

कलीचे कर्तारा कमल नयना कर्म दहना

तुला पाहू जाता स्वरुप नुमजे गुप्त गहना ।

जगनाथा त्राता निजपद दाता तू सुखनिधि

म्हणे सिद्धलिंग मनबांधिसि गा मंगलविधी ॥२१॥

पटत्वे विस्तरु विविध पर तंतूच बनला

घटत्वे ही पृथ्वी धन कनकादि रत्‍न विपुला ।

धृताचीया धारा बहुत दिसती एक असती

म्हणे सिद्धलिंग अकळ गुरुराया तव गती ॥२२॥

नरेंद्रा देवेन्द्रा सुरवर फणींद्रा पशुपती

मुनीन्द्रा सिद्धेन्द्रा मनोन्मन महेंद्रा महिपती ।

गजेन्द्रा योगेंद्रा यमनियम प्राणा यमपरा

म्हणे सिद्धलिंग गुरुविण नेणेचि दुसरा ॥२३॥

वडेवाळासिद्धा खडतर तुझा बोध अढळ

अनुदीनी ज्याते स्मरण करता प्राप्ति सुढळ ।

दृढेनिष्ठे बाणे झडकरि जडत्व उडतसे

म्हणे सिद्धलिंग गहन गुरुनाम पढतसे ॥२४॥

नमोजी नागेशा परम प्रभु शेषा शिवगुरू

नमोजी सिद्धेशा अकळ अविनाशा परतरू ।

नमोंकारागम्या शरण अतिसौख्या अरुवरी

म्हणे सिद्धलिंग वदविसि महानंद लहरी ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP