नागनाथ माहात्म्य - अज्ञानसिद्धकृत संकटहरणी - प्रसंग पहिला

नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.


श्री गणेशाय नमः ॥ श्री सद्‌गुरु नागनाथाय नमः ॥

नमो अनादि आदि नागेशा । त्रैलोक्य विलासी महापुरुषा । पुरवी अज्ञानमनोआशा ॥

प्रार्थना ही निज गणेशा ऐका सहजी ॥१॥

जय जय संकट हरणा ॥ परमात्मया सिंहासना ॥

बैसवी मजलागि या दिना ॥ सोहं स्वामी ॥२॥

अनादि भ्रम कोहं पोटी ॥ श्रमलो शिवसांब जगजेठी ॥

लक्ष चौर्‍यांशी योनि कोटी ॥ एक एक फेरा ॥३॥

नाना योनि नरक संकट ॥ जिवासी बहुत जाहले कष्ट ॥ तेणे कासाविस घनदाट ॥ नरक कोटी ॥४॥

हे सुख दुःख न बोलवे मज ॥ कैसे आहे ठाऊक तुज ॥ या लागी धावा करी काज ॥ येऊनिया ॥५॥

चुकोनि वेढोनिया धीवरी ॥ संकट ऐसे कळे अंतरी ॥ धाव पावगा त्रिपुरारी ॥ कर्पूर गौरा हरहरा ॥६॥

हरी हो संकट हरा ॥ म्हणोनि पार्थितो दातारा ॥ माझी इच्छा पुरी करा ॥ दाता स्वामी स्वअंगे ॥७॥

स्वांग निर्दाळीन ॥ तुझे नाम मदन दहन ॥ जाहलो अभिमान हीन ॥ बहु दीन संकटी ॥८॥

तू भूतांचा राजा ॥ म्हणोनि पतित नाम गर्जा ॥ एक अनेका माजा ॥ बाळ राजा कनवाळु ॥९॥

महद्भुती देवे ॥ भूतातची खावे ॥ आपण वेगळे राहावे ॥ नवल ठेव श्रीसांबा ॥१०॥

श्री सांब नाम दयाळ ॥ तोडी तोडी हे संकट सकळ ॥ ऐसे हे देही परब्रह्म केवळ ॥ अंग संग सदाकरी ॥११॥

सदा करीन तुझे भजन ॥ अखंड संतमूर्ति पूजन ॥ परि माझे संकट हरण ॥ सांगेन पुढलीया प्रसंगी ॥१२॥

तुम्ही समर्थ मूर्तिमंत ॥ ह्रदयी असोनिया न कळत ॥ प्रगटोनी अभय हस्त ॥ ठेवोनि माथा वर देई ॥१३॥

इति श्री संकटहरणी शिवग्रंथ ॥ भावे प्रार्थिला कैलासनाथ ।

श्रोता सावध चित्त । प्रसंग वडवाळसिद्ध नागेश ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP