मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|प्रकार १|
पूर्णाहुति

पूर्णाहुति

वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.


विधी - २३

पूर्णाहुति

ताम्हनात किंवा एका प्लेटमध्ये एक विडा घ्यावा. त्यावर एक फळ ठेवावे. खोबर्‍याची वाटी किंवा तुकडा ठेवावा. हळद-कुंकू, अक्षता, फुले वगैरे घालावे. पूर्णाहुतिचे मंत्र म्हणून झाल्यावर ताम्हनाची आपल्या अंगाकडील बाजू खाली करून आपल्या अंगावर पडेल अशा रीतीने आहुती द्यावी.

आचम्य-नेत्रोदक स्पर्षः । आचमन करून डोळ्यांना पाणी लावून घ्यावे.

संकल्प - मया कृतस्य आचार्यादि द्वारा सग्रहमख वास्तुशांति होम हवन कर्मणः सांगता सिद्ध्यर्थं तत्संपूर्ण

फल प्राप्त्यर्थं सर्व कर्म प्रपूरणीं भद्रद्रव्यदां पूर्णाहुति आज्येन होष्ये । पाणी सोडावे. अग्ने त्वं इळोनाम भावयामि ।

असे म्हणावे.

सप्तहस्तश्चतुः श्रृंगः सप्तजिव्हो द्विशीर्षकः । त्रिपात्प्रसन्न वदनः सुखासीनः शुचिस्मितः । स्वाहांतु दक्षिणे पार्श्वे देविं वामे स्वधां तथा ।

बिभ्रद्दक्षिण हस्तैस्तु शक्तिमन्नं स्रुचं स्रुवं । तोमर व्यंजनं वामैर्घृतपात्रं च धारयन्‌ । मेषारूढो जटाबद्धो गौरवर्णो महौजसः ।

धूम्रध्वजो लोहिताक्षः सप्तार्चिः सर्वकामदः । आत्माभिमुखमासीन एवं रूपो हुताशनः । अग्नये नमः । अग्नय इदं न मम । आहुती द्यावी.

तुपाची पूर्णाहुति

आपल्या समोरील दर्वीत १२ पळ्या तूप काढावे. यजमानासह आचार्यांनी उभे रहावे. यजमानाने हातात थोडे दर्भ घेऊन ते आचार्यांच्या हाताला लावून धरावे. आचार्यांनी दर्वीतील तुपाची आहुति द्यावी.

एह्येहि सर्वामर हव्यवाह मुनीप्रवर्यै रभितोभिजुष्ठ । तेजोवतां लोकगणेन सार्ध्दं ममाध्वरं पाहि कवे नमस्ते ।

भो अग्ने हव्यवाहन वैश्वानर सर्व देवमय सर्व देवतामुख जातवेदस्तनूनपात कृशानो हुतभुग्‌विभावसो बृहद्‌भानो

हिरण्यरेतः सप्तार्चिर्दमुनश्चिगभानो ज्वलन पावकेळाव्हयाय तुभ्यामिमां सर्वकर्म प्रपूरणीं पूर्णाहुतिं ददाम्येनां गृहाण गृ

हाणास्माक मनामय मनिशं कुरु कुर्विष्टं देहि देहि सर्वतोऽस्मान् दुरित दुरिष्टात् पाहि पाहि भगवान् नमस्ते नमस्ते ।

अग्नये नमः । अग्नय इदं न मम ।

यजमानासह खाली बसावे.

तुपाची संस्त्रावेण आहुति

आचार्यांनी तुपाची संस्त्रावेण आहुति द्यावी.

विश्वेभ्यो देवेभ्यो नमः । विश्वेभ्य देवेभ्य इदं न मम । हविः शेषेण उद्‌गुद्वास्य बर्हिषि पूर्णपात्रं निनयेत् ।

आता हवन संपलेले असल्यामुळे आपल्यासमोर घेतलेली दर्वी आज्यपात्र वगैरे सर्व पात्रे सुरुवातीस ठेवलेल्या जागी ठेवावीत. आज्यपात्राच्या जागी प्रणीता पात्र आपल्यासमोर घ्यावे. प्रणीतेतील जल दर्भाने खालील दिशांना सिंचन करावे.

१. पूर्वस्या दिशि ऋत्विग्भ्यो नमः ।

पूर्व दिशेला पाणी शिंपडावे.

२. दक्षिणस्या दिशि मासेभ्यो नमः । अपउपस्पृष्य ।

दक्षिण दिशेला पाणी शिंपडावे.

३. पश्चिमस्या दिशि ग्रहेभ्यो पशुभ्यो नमः ।

पश्चिम दिशेला पाणी शिंपडावे.

४. उत्तरस्या दिशि ग्रहेभ्यो पशुभ्यो नमः ।

उत्तर दिशेला पाणी शिंपडावे.

५. ऊर्ध्वायां दिशि यज्ञाय संवत्सराय प्रजापतये नमः ।

वरच्या दिशेला पाणी शिंपडावे.

६. स्वशिरसी -

आचार्यांनी आपल्या मस्तकावर पाणी शिंपडून घ्यावे. त्यानंतर इतरत्र शिंपडावे.

आपः स्वभावतो मेध्याः शुद्धाः सर्व विशोधनाः । ता अस्मान् पूर्णपात्रस्थं पूताः कुर्वंतु मार्जिताः ।

७. द्विशतो हन्मी ।

नैऋत्येस पाणी शिंपडावे. प्रणीतेतील पाणी उजव्या हातात घेऊन प्रणीतेच्या खालून घेऊन पुन्हा त्यातच टाकावी. त्यावेळी हे सर्व पाणी सागरास मिळाले अशी मनात भावना करावी व म्हणावे-

भागिरथी । भागिरथी । भागिरथी ।

आचार्यांनी प्रणितेतील पाणी यजमानाच्या मस्तकावर शिंपडावे.

अपवित्रः पवित्रोवा सर्वावस्थां गतोपि वा । यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतरः शुचिः ।

त्यानंतर आचार्यांनी अग्नीच्या वायव्येस उभे राहून हात जोडून अग्नीचे उपस्थान करावे. (म्हणजे विशेष प्रार्थना करावी.)

अग्ने त्वं नः शिवस्त्राता वसुदाता सदा भव । नमस्ते यज्ञपुरुष हुतभुग्‍हव्यवाहन ।

परिस्तरणानि विस्त्रस्य परिसमूनम् पर्युक्षणं कृत्वा अग्निं अर्चयेत् ।

आचार्यांनी खाली बसावे. स्थंडिलाच्या कडेचे परिस्तरण काढावे व ते उत्तर बाजूस ठेवावे. त्यानंतर अग्नीचे परिसमूहन पर्युक्षण करावे अग्निच्या वायव्येस एक विडा ठेवावा. प्रथम अग्नये जातवेदसे नमः । इ. मंत्रांनी पूर्वेपासून सूरू करून अग्निच्या आठही दिशांना अक्षता वहाव्यात. त्यानंतर वायव्येकडील विड्यावर अग्नीची पूजा करावी. अग्नीच्या पूजेला शक्यतो पांढरी फुले वहावीत.

अग्निं परिसमूहनम् । अग्निं परिसमूहनम् । अग्निं परिसमूहनम्‌ । अग्निं पर्युक्षणं । अग्निं पर्युक्षणं । अग्निं पर्युक्षणं । अग्नये जातवेदसे नमः ।

अग्नये सप्तजिव्हाय नमः । अग्नये हव्यवाहनाय नमः । अग्नयेऽश्वोदराय नमः । अग्नये वैश्वानराय नमः । अग्नये कौमारतेजसे नमः ।

अग्नये विश्वतोमुखाय नमः । अग्नये देवमुखाय नमः । अग्नये नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि । स्वाहायै नमः ।

स्वधायै नमः । हरिद्रां कुंकुमम् सौभाग्य द्रव्यं समर्पयामि । धूप दीपं समर्पयामि । नैवेद्यार्थे हुत आज्य नैवेद्यं समर्पयामि ।

आज्यपात्रातील तुपाचा नैवेद्य दाखवावा व ते सर्व तूप अग्नीवर द्यावे.

ॐ प्राणाय नमः । अपानाय नमः । व्यानाय नमः । उदानाय नमः । समानाय नमः । ब्रह्मणे नमः ।

त्यानंतर हातावरून तीन वेळा पाणी सोडावे.

उत्तरापोशनं समर्पयामि । हस्त प्रक्षालनं समर्पयामि । मुख प्रक्षालनं समर्पयामि । करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।

फुलाला गंध लावून ते फूल विड्यावर वहावे.

मुखवासार्थे पूगीफल तांबूलं दक्षिणां समर्पयामि ।

विड्यावर पाणी सोडावे.

फलार्थे नारीकेल फलं समर्पयामि । नमस्करोमि ।

नारळावर पाणी सोडावे. नमस्कार करावा.

आग्नेयः पुरुषोरक्तः सर्वदेव मयोव्ययः । धूम्रकेतू रजोध्यक्षस्तस्मै नित्यं नमो नमः । अग्नये नमः । मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि ।

एक फूल वहावे.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP