TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|दत्त उपासना|
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती द...

श्री दत्ताची आरती - त्रिगुणात्मक त्रैमूर्ती द...

श्री दत्ताची आरती

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.
Dattatrya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh.

श्री दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा । त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ॥

नेति नेति शब्दें न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ॥१॥

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता । आरति ओंवाळीतां हरली भवचिंता ॥ध्रु०॥

सबाह्य-अभ्यंतरीं तूं एक दत्त । अभाग्यासी कैंची कळेल ही मात ॥

पराही परतली तेथें कैंचा हेत । जन्ममरणाचा पुरलासे अंत ॥ जय० ॥२॥

दत्त येऊनीयां उभा ठाकला । सद्भावें साष्टांगें प्रणिपात केला ॥

प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥ जय० ॥३॥

दत्त दत्त ऐसें लागलें ध्यान । हारपलें मन झालें उन्मन ॥

मीतूंपणाची झाली बोळवण । एकाजनार्दनीं श्रीदत्तध्यान ॥

जय देव जय० ॥४॥

*

श्री दत्ताची आरती ( चाल- आरती भुवनसुंदराची०)

आरती दत्तात्रयप्रभुची । करावी सद्भावे साची ॥ आरती० ॥ध्रु०॥

श्रीपदकमळा लाजविती । वर्तुल गुल्फ रम्य दिसती ॥

कटिस्थित कौपिन ती वरती । छाटी अरुणोदय वरि ती ॥ चाल ॥

वर्णूं काय तिची लीला ॥ हीच प्रसवली । मिष्ट अन्न बहु । तुष्टचि झाले ।

ब्रह्म क्षत्र आणि । वैश्य शूद्रही । सेवुनिया जीची ॥ अभिरुची से० ॥ आरती० ॥१॥

गुरुवर सुंदर जगजेठी । याचे ब्रह्मांडें पोटीं ॥ माळा अवलंबित कंठीं । बिंबफळ रम्यावर्ण ओष्ठीं ॥ चाल ॥ अहा ती कुंदरदनशोभा ॥ दंड कमंडलु । शंख चक्र करि । गदा पद्म धरिं । जटा मुकुट परि । शोभतसे ज्याची ॥ आरती० ॥२॥

रुचिरा सौम्य युग्मदृष्टी । जिनें द्विज तारियला कुष्ठी ॥ दरिद्रें ब्राह्मण बहु कष्टी । केला तिनेंच संतुष्टी ॥ चाल ॥ दयाळा किती म्हणुनि वर्णूं ॥ वंध्या वृद्धा । तिची सुश्रद्धा । पाहुनि विबुधचि । पुत्ररत्‍न जिस । देउनियां सतिची ॥ इच्छा पुरवियली मनिंची ॥ आरती० ॥३॥

देवा अघटित तव लीला । रजकहि चक्रवर्ति केला ॥ दावुनि विश्वरूप मुनिला । द्विजोदरशूल पळें हरिला ॥ चाल ॥ दुभविली वाझं महिषि एक ॥ निमिषामाजीं ॥ श्रीशैल्याला । तंतुक नेला । पतिताकरवीं । वेद वदविला ॥ महिमा अशी ज्याची ॥ स्मरा हो महिमा अशी ज्याची ॥ आरती० ॥४॥

वळखुनी शूदभाव चित्तीं । दिधलें पीक अमित शेतीं ॥ भूसुर एक शुष्कवृत्ती । क्षणार्धें धनद तया करिती ॥ चाल ॥ ज्याची अतुल असे करणी ॥ नयन झांकुनी । सवें उघडितां । नेला काशिस । भक्त पाहतां । वार्ता अशी ज्याची । आरती० ॥५॥

दयाकुल औदुंबरिं मूर्ती । नमितां होय शांत वृत्ती ॥ न दे ती जनन मरण पुढती ।

सत्य हें धरा मनिं न भ्रांती ॥ चाल ॥ सनातन सर्वसाक्षि ऐसा ॥ दुस्तर हा भव । निस्तरावया । जाउनि सत्वर । आम्ही सविस्तर । पूजा करूं त्याची ॥ चला हो पूजा करूं त्यांची ॥ आरती० ॥६॥

तल्लिन हो‍उनि गुरुचरणीं । जोडुनि भक्तराज पाणी ॥ मागे हेंचि जनकजननी । अंती ठाव देई चरणीं ॥ चाल ॥ नको मज दुजें आणिक कांहीं ॥ भक्तवत्सला । दीनदयाळा । परमकृपाळा । श्रीपदकमळा । दास नित्य याची ॥ उपेक्षा करूं नको याची ॥ आरती दत्तात्रय प्रभुची । करावी सद्भावें० ॥७॥

*

श्रीदत्ताची आरती ( चाल- साधी )

जय देव जय देव जय अवधूता । अगम्य लीला स्वामी त्रिभुवनीं तुझी सत्ता ॥ध्रु०॥

तूझें दर्शन होतां जाती हीं पापें । स्पर्शनमात्रें विलया जाती भवदुरितें ॥ चरणीं मस्तक ठेवुनि मनिं समजा पुरतें । वैकुंठींचें सुख नाहीं यापरतें ॥ जय० ॥१॥

सुगंधकेशर भाळीं वर टोपी टीळा । कणीं कुंडलें शोभति वक्षःस्थळिं माळा ॥ शरणागत तुज होतां भय पडलें काळा । तूझे दास करिती सेवा सोहळा ॥ जय० ॥२॥

मानवरूपी काया दिससी आम्हांस । अक्कलकोटीं केला यतिवेषें वास ॥ पूर्णब्रह्म तोचि अवतरला खास । अज्ञानी जीवास विपरित हा भास ॥ जय० ॥३॥

निर्गुण निर्विकार विश्वव्यापक । स्थिरचर व्यापुनि अवघा उरलासी एक ॥ अनंत रूपें धरिसी करणें मायीक ॥ तूझे गुण वर्णितां थकले विधिलेख ॥ जय० ॥४॥

घडतां अनंत जन्मसुकृत हें गांठीं । त्याची ही फलप्राप्ती सद्गुरुची भेटी ॥ सुवर्णताटीं भरली अमृत रसवाटी । शरणागत दासावरि करिं कृपादृष्टी ॥ जय देव जय देव० ॥५॥

*

श्रीदत्ताची आरती

विधि हरिहर सुंदर दिगंबर जाले । अनुसूयेचें सत्त्व पहावया आले ॥

तेथें तीन बाल करूनि ठेविले । दत्त दत्त ऐसें नाम पावले ॥१॥

जयदेव जयदेव जय दत्तात्रेया । आरती ओंवाळूं तुज देवत्रया ॥ध्रु०॥

तिहीं देवांच्या युवती पति मागों आल्या ।

त्यांना म्हणे वळखुनि न्या आपुल्याला ।

कोमल शब्देंकरुनी करुणा भाकिल्या ।

त्यांसी समजाविल्या स्वस्थानीं गेल्या ॥२॥

काशी स्नान करविर क्षेत्रीं भोजन ।

मातापुरिं शयन होतें प्रतिदिन ।

तैसें हें अघटित सिद्ध महिमान ।

दास म्हणे हें तों नव्हे सामान्य ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2008-02-10T14:33:37.0470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तुडगुडे

  • न. लहान मुलांचे खेळणे ; खुळखुळा . [ ध्व . ] 
RANDOM WORD

Did you know?

Is there any reference in Vedas or puranas for eating non-veg food?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.