रसवहस्त्रोतस् - आलस्य

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


सुखस्पर्शप्रसंगित्वं दु:खद्वेषणलोलता ।
शक्तस्यचाप्यनुत्साह: कर्मस्वालस्यमुच्यते ॥
सु. शा. ५-५२ पान ३०६

मृदु सुखकारक स्पर्श हवेसे वाटणें व त्यामुळें मऊ गाद्या गिरद्यावर लोळणें, कोणत्याहि प्रकारचें कष्ट वा थोडेसेही श्रम नकोसे वाटणें, शक्ति असूनहि काम करण्याचा कंटाळा असणें या विकारास `आळस' असें म्हणतात. हा विकार बहुधा सामरस व कफप्रधान व्याधी व मेदोरोग यांत लक्षण म्हणून असतो. कांहीं व्यक्ती स्वभावत:च या विकारानें युक्त असतात. तेथें तमोदोषाने मन व्याप्त आहे असे मानावें आमामुळें उत्पन्न झालेल्या विकारावर चिकित्सा करतां येते.

चिकित्सा

लंघन, आमपचन, शोधन, त्रिभुवनकीर्ति आमपाचकवटी, वातविध्वंस हरितकी, शिलाजतु, व्यायाम.

N/A

References : N/A
Last Updated : July 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP