रसवहस्त्रोतस् - ज्वर

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


व्याखा
ज्वरयति संतापयति शरीराणि इति ज्वर: ।
च. नि. १.४०

संतापहेतुत्वात् ज्वर: ।
च.चि. ३.१३ जेज्जट

ज्वरशब्देन देहमन:संतापकरत्वम् ।
च.नि.१.५ चक्रचणि

ज्या वयोहानौ इत्यस्य धातो: औणादिके वर प्रत्यये सति ज्वर:
वा.नि. १-१ अरुणदत्त

देह आणि मन यांचा संताप होतो, ते तापतात म्हणून तापणें अशा अर्थानें ज्वर शब्द रोगवाचक रुढ झाला आहे. त्याप्रमाणेंच ज्वरांतील ``ज्या'' धातूचा आयुष्याचा नाश होणें असा अर्थ आहे. त्यावरुन ज्वर शब्द साधला गेला आहे.

स्वभाव
ज्वरो रोगपति: पाप्मा मृत्युरोजोशनोऽन्तक: ॥
क्रोधो दक्षाध्वरध्वंसी रुद्रोर्ध्वनयनोद्भव: ॥
जन्मान्तयोमार्हेमय: सन्तापात्माऽपचारज: ।
विविधैर्नामभि: क्रूरो नानायोनिषु वर्तते ॥
रोगाणाम पती रोगपति: सर्वरोगप्रधान: । पाप्मापास्वभाव:
तथा, मृत्यु:-सर्वप्राणिनां हि मरणेनासावेव योजयति यथा
न तथाऽन्ये रोगा: । सर्वधात्वाप्यायकं यदोजस्तदशनं
भोजनं यस्येत्योजोशन: । अन्तको-मारणहेतुसामान्यात् ।
क्रोधो-भगवतो महेश्वरस्य दक्षापमानितस्य लोकान्निदिधक्षो-
र्ललाटान्निर्गत: । अत एवाह दक्षाध्वरध्वंसी रुद्रोर्ध्वनयोद्‍भव
इति । जन्मान्तयोर्मोहमय इति ज्वरस्य सन्तापात्मकत्वं
लिड्गम्, जन्मान्तयोश्च क्वचित्सन्तापानुपलब्धेर्मोहमय इत्य-
क्तम्, मोहस्वभावादेवान्यजन्मजं कर्म प्राणी न स्मरति ।
यश्चापचारज: तथाविधादाहारविहारादुद्‍भूत:, सन्ताप-
स्वभाव:, स च ज्वरो दुश्चिकित्स्य: । नानायोनिषु हस्त्यश्व-
गोपक्ष्यादिषु च, विविधैर्नामभिवर्तते । [यथा पाकलस्तद्यथे-
भानामभितापो हयेषु च । गवां गोकर्णकश्चैव पक्षिणां
मकरस्तथा ॥ वान्तादानामलर्क: स्यादब्जेष्विन्द्रमद: स्मृत: ।
ओषधीषु तथा ज्योतिश्चर्णको धान्यजातिषु । जलेषु
नीलिका भूमावूषो नृणां ज्वरो मत: । `ऋते देवमनुष्येभ्यो
नान्यो विषहते तु तम् । शेषा: सर्वे विपद्यन्ते तिर्यग्योन्यो
ज्वरार्दिता: । कर्मणा लभते जन्तुर्देवत्वं मानुषादपि ।
पुनश्चैवच्युत: स्वर्गान्मानुष्यमभिपद्यते । तस्मात्स देव-
भावाच्च सहते मानवो ज्वरम् (सु. उ. अ. ३९/११) इति ॥]
यथा दन्तिशरीरे पाकलो नाम ज्वर:, अश्वशरीरेऽभीतापक:,
गोशरीरे गोकर्णक:, पक्षिशरीरे मकर:, श्वरीरेऽलर्क:,
[मत्स्येष्विन्द्रमद:, ओषधीषु ज्योति: धान्येषु चूर्णक:]
अप्सु नीलिका [भूमावूष:] मानवेषु ज्वर: इति ।
ननु, यदि रुद्रोर्ध्वनयनोद्भव:, तर्ह्यपचारज इति कथमुक्तम् ?
ब्रुम: । पूर्वं कृतयुगे ललाटजलोचनादुत्पन्नो ज्वर: ।
त्रेतायुगे तु सम्प्राप्ते परिग्रहदोषाद्धर्मस्य पादोऽन्तर्हित
इत्यपचारेणासौ प्रथमं प्राणिषू द्‍भूतोऽपचारज इत्युच्यते ।
कलियुगेऽप्यन्नपान्नौषधाद्यपचारेण जात इत्यपचारज
उच्यते, इति न किञ्चिदत्रायुक्तम् ।
स. टीकेसह वा. नि. २-१ ते २ पान ४४७

देहेन्द्रियमनस्तापी सर्वरोगाग्रजो बली ।
ज्वर: प्रधानो रोगाणामुक्तो भगवता पुरा ॥
च. चि. २-४ पान ८६९

ज्वर हा सर्वव्याधींमध्यें प्रमुख असून त्याचा स्वभाव दारूण आहे. त्यामुळेंच त्याला पाप्मा (पातकें करणारा), मृत्यू, ओजोशन (शरीरांतील सारभाग जें ओज त्याचें भक्षण करणारा), अंतक (आयुष्याचा शेवट करणारा), क्रोध (मनाचें स्वास्थ्य नाहींसें करणारा) अशीं नांवें प्राप्त झालीं आहेत. दक्षयज्ञाचा विध्वंस करणारा आणि शंकराच्या कपाळावरील तिसर्‍या डोळ्यांतून उत्पन्न झालेला हीं दोन विशेषणें पुराणकथेच्या संदर्भामध्यें ज्वरव्याधीला प्राप्त झालीं आहेत. पुराणानें त्याच्या उग्रतेचें स्वरुप लक्षांत येण्यासाठीं त्याची मूर्त अशी आकृतीहि कल्पिली आहे.

``ज्वरस्त्रिपादस्त्रिशिरा: षड्‍भुजो नवलोचन: ।
भस्मप्रहरणो रौद्र: कालान्तकयमोपम:'' ॥
मा.नि. ज्वर १ म. टीका पान २९

प्राणीमात्रांच्या जन्ममृत्युच्या काळीं मोहरुपानें त्यांचें अस्तित्व असतें त्यामुळेंच पूर्वजन्म व पुनर्जन्म यांचें ज्ञान जीवाला होत नाहीं असें मानतात. ज्वर हा इतर प्राणीसृष्टीमध्येंहि होतो. त्यांचीं नांवेंहि अरुणदत्तानें व माधवाचा टीकाकार (मधुकोश) विजयरक्षित यांनीं सांगितलीं आहेत. त्यांच्या नांवामध्यें मात्र कांहीं ठिकाणीं मतभेद आहेत. इतर जीवसृष्टी त्यांच्या त्यांच्या जातींतील ज्वर व्याधीला सहन करुं शकत नाही. मनुष्य मात्र ज्वर सहन करुं शकतो. संताप होणें हें त्याचें स्वरुप असून अपचारामुळें, अपथ्यामुळें हा व्याधी उत्पन्न होतो.

मार्ग
अभ्यंतर

प्रकार
दक्षापमानसंक्रुद्धरुद्रनि: श्वाससंभव: ।
ज्वरोऽष्टधा पृथग्द्वन्द्वसंघातागन्तुज: स्मृत: ॥
मा. नि. ज्वर १ पान २८

ज्वर हा आठ प्रकारचा आहे. वातज, पित्तज, कफज, वातपित्तज, वात कफज, कफपित्तज, सान्निपातिक आणि आगंतु. चरकानें विधिभेदानें ज्वराचे अनेक प्रकारें वर्गीकरण केलें आहे.

द्विविधो विधिभेदेन ज्वर: शारीरमानस: ।
पुनश्च द्विविधो दृष्ट: सौम्यश्चाग्नेय एव वा ॥
अन्तर्वेगो बर्हिवेगो द्विविध: पुनरुच्यते ।
प्राकृतो वैकृतश्चैव साध्यश्चसाध्य एव च ॥
पुन: पञ्चविधो दृष्टो दोषकालबलाबलात् ।
संतत: सततोऽन्येद्यु:स्तृतीयकचतुर्थकौ ॥
पुनराश्रयभेदेन धातूनां सप्तधा मत: ।
भिन्नं कारणभेदेन च पुनरष्टविधो ज्वर: ॥
च.चि. ३-३२ ते ३५ पान ८७८

अधिष्ठानभेदानें दोन प्रकार-शारीर आणि मानस
स्वभावभेदानें दोन प्रकार-सौम्य व आग्नेय
गतिभेदानें दोन प्रकार-अंतर्वेगी व बहिर्वेगी
कालभेदानें दोन प्रकार-प्राकृत व वैकृत
परिणामभेदानें दोन प्रकार-साध्य व असाध्य
दोषकालबलाबलभेदानें पांच प्रकार -
संतत, सतत, अन्वेद्यु:, तृतीयक, चतुर्थक
आश्रयभेदानें सात प्रकार -
रसगत, रक्तगत, मांसगत, मेदोगत, अस्थिगत, मज्जागत, शुक्रगत उत्पत्तीकारणभेदानें आठ प्रकार -
वर सांगितल्याप्रमाणें दोषज सात व आगंतु.

दोषा: प्रकुपिता: स्वेषु कालेषु स्वै: प्रकोपणै: ।
व्याप्य देहमशेषेण: ज्वरमापादयन्ति हि ॥
सु.उ ३९-१५-१५ पान ६७२

मिथ्यातियुक्तैरपि च स्नेहाद्यै: कर्मभिर्नृणाम् ।
विविधादभिघाताच्च रोगोत्थानात् प्रपाकत: ॥
श्रमात् क्षयादजीर्णाच्च विषात्सात्साम्यर्तुपर्ययात ।
ओषधीपुष्पगन्धाच्च शोकान्नक्षत्रपीडया ॥
अभिचाराभिशापाभ्यां मनोभूताभिशड्कया ।
स्त्रीणामपप्रजातानां प्रजातानां तथाऽहितै: ॥
स्तन्यावतरणे चैव ज्वरो दोषै: प्रवर्तते ।
न केवलमेवं सप्रकोपणैर्व्रणप्रश्नोक्तै: प्रकुपिता दोषा ज्वर-
मापादयन्ति, अपि तु तेऽन्यैरपि कारणैरित्यत आह-मिथ्या-
तियुक्तैरित्यादि । मिथ्यातियुक्तै: अयथाविधियुक्तैरतियुक्तैश्च ।
स्नेहाद्यै: स्नेहस्वेदवमनविरेचनादिकै: । नृणां ज्वरो दोषै:
प्रर्वर्तते इति सम्बन्ध:, `प्रवर्तत' इत्यत्र `प्रकुप्यति'
इति केचित् । विविधादभिघातात् शस्त्रलोष्ठकाष्ठादिप्रहारात् ।
रोगोत्थानात् रोगा विद्रध्यादयस्तेषामुत्थानात् । श्रमात्
अतिव्यायामात् । प्रपाकस्तेषामेव । आमात् अजीर्णात् ।
क्षयात् राजयक्ष्मण: । सात्म्यर्तुपर्ययात् । सात्म्यविपर्यया-
दृतुविपर्ययाच्च । ओषधीशब्दस्यादौ विषशब्दो लुप्तो
द्रष्टव्य:, तेन विषौषधीपुष्पगन्धात् । नक्षत्रं जन्मनक्षत्रं,
तस्य पीडा तथा क्रूरग्रहाणां बाधा तया । अभिचारो
यन्त्रमन्त्राद्यभिपीडनम्, अभिशापो द्विजगुरुसिद्धानामभि-
शपनं ताभ्याम् । मनोभूताभ्यामभिशशड्काशब्द: संबध्यते,
अभिशड्काशब्देन अभिषड्गत्वं कथ्यते, तेन मनोऽभिषड्गेण
कामाद्यभिषड्गेणेत्यर्थ: भूतशब्देन देवादिग्रहा उच्यन्ते, तेन
देवादिग्रहाभिषेड्गेणत्यर्थ: । अपप्रजातानम् असम्यक्प्रसू-
तानां, प्रजातानां सम्यक‍ प्रसूतानाम्, अहितै: कृत्वा ।
स्तनस्य क्षीरस्य अवतरणे प्रथममुन्मुखीभवने ।
सटिक सु. उ. ३९-१९ ते २२ पान ६७२

स्नेहस्वेद व वमनादि पंचकर्मे यांचा वापर अयोग्यरीतीनें होणें, निरनिराळ्या प्रकारचा मार लागणें, आघात होणें, विद्रधीसारखे विकार होणें, शरीरामध्यें कोठेंतरी प्रपाक (पूयप्रवृत्ती) होणें, अतिश्रम करणें, धातूक्षय होणें, अजीर्ण, विषसेवन, असात्म्यसेवन, ऋतुविपर्यय, विषयुक्त औषधीगंध व विषयुक्त पुष्पांचे गंध, शोक, भय, कामक्रोधानें मनोदुष्टी, विषमप्रसूति, सूतिकेचे विषमोपचार स्तन्योत्पत्ती या कारणांनीं वा निरनिराळ्या प्रकारें दोषांना प्रकुपित करणार्‍या इतरहि कारणांनीं दोष प्रकुपित होऊन ज्वर उत्पन्न करतात. नक्षत्रग्रहादींची बाधा, अभिचार, अभिशाप, भूतबाधा या कारणांनींहि ज्वर उत्पन्न होतो असें कांहीं लोक मानतात.

संप्राप्ति

दुष्टा: स्वहेतुभिर्दोषा: प्राप्यामाशयमूष्मणा ।
सहिता रसमागत्य रसस्वेदप्रवाहिणाम् ॥
स्त्रोतसां मार्गमावृत्य मन्दीकृत्य हुताशनम् ।
निरस्य बहिरुष्माणं पक्तिस्थानाच्च केवलम् ॥
शरीरं समभिव्याप्य स्वकालेषु ज्वरागमम् ।
जनयन्त्यथ वृद्धिं वा स्ववर्णं च त्वगादिषु ॥
सु. उ. ३९-१६ ते १८ पान ६७२

स यदा प्रकुपित: प्रविश्यामाशयमूष्मण: स्थानमूष्मणा
सह मिश्रीभूत आद्यमाहार परिणामधातुं रसनामानमन्ववेत्य
रसस्वेदवहानि स्त्रोतांसि पिधायाग्निमुपहत्य पक्तिस्थानादू-
ष्माणं बहिर्निरस्य केवलं शरीरमनुप्रपद्यते, तदा ज्वरमाभि-
निर्वर्तयति ।
`स यदा' इत्यादिना सम्प्राप्तिमाह-`यदा' इति वचनात्,
एवं कुपितोऽपि वायुर्यदा आमाशय प्रवेशादिसम्प्राप्तियुक्तो
भवति, तदैव ज्वरं करोति नान्यदेति दर्शयति ।
`प्रविश्यामाशयम‍' इत्यनेन ज्वरकर्तुरोषस्यामाशयदूषकत्वं दर्शयति ।
अतएव सर्वज्वरे आमाशयविशुद्ध्यर्थ लड्घनमुत्सर्गतो वदन्ति ।
यद्यपि चामाशयप्रवेशादेवोष्मणापि मिश्रत्वं लभ्यतएव ।
यत:, आमाशयएव वह्निस्थानम्-`नाभिस्तनान्तरं जान्तोरामाशय
इति स्मृत:' (वि.अ.२)
इति वचनात्, तथापि वह्निस्थानस्यामाशयैकदेशत्वेनामाशय-
प्रवेशेऽपि नावश्यं ग्रहणीरुपवह्निस्थानदुर्ष्टीर्विशेषेण लभ्यत इति ।
अतएवोक्तम्-`उष्मणा सह मिश्रिभूत:' इति ।
`रसनामानम्' इत्युच्यमाने आहाररसेऽपि मधुररसादौ
प्रसक्ति: स्यात्, अत उक्तम्-आहारपरिणामधातुमिति'
आहार परिणामभवो दातुराहारपरिणामधातुस्तमिति ।
तेन, आहारपरिणामधातुत्वं च परम्परया रक्तादिष्यप्यस्ती-
त्याह-`आद्यम्' इति प्रथममित्यर्थ: । रसमिति वक्तव्ये
`रसनामानम्' इति, यत्करोति तेन रसतीति `रस:'
इति व्युत्पतिमात्रेण रक्तादिषु रससंज्ञां निषेधयति, यत्रैव
रससंज्ञा रुढा, तं ग्राहयति, एवमन्यत्रापि च यत्पदमधि-
कार्थमिह प्रतीयते तस्पष्टार्थमेव, यतस्त्रिविधशिष्यबुद्धि
हितमेव विस्पष्टार्थ तन्त्रं युज्यते । अन्विति-यथोक्तक्रमेण ।
अवेत्य-गत्वा । पिधायेत्यवरुध्य । पक्तिस्थानात्पाचकाग्नि-
स्थानात् । उष्माणमिति-पाचकवह्निम‍ । बहिरिति-पक्ति
स्थानव्यतिरिक्तशरीरे । यद्यपि चोष्माणं निरस्येतिवचनादेव
`पक्तिस्थानाद्‍' इति लभ्यते, तथापि `पक्तिस्थानाद'
इतिवचनेन पक्तिस्थानात् कृत्स्नस्य वह्नेर्निरसनं दर्शयति,
इह चोष्मशब्देन पाचकाग्नि व्यपदिशन् पाचकस्य वह्नेरुष्म-
रुपतां दर्शयति, बाह्यवह्निसदृशज्वालाकरं पित्तं निषेधयति ।
अतएव च वह्नेर्निरसनादग्निमान्द्यं ज्वरे दर्शितं भवति ।
वायुश्चात्रातिवृद्धेन वह्निनिरासकस्तेनाग्निदीप्तिं न करोति ।
यत्र हि प्रेरकमात्रो भवति वायु:, तत्र वह्नेर्वृद्धीं करोति ।
यथा मेदस्विन: कोष्ठे चरन्वायुरग्निवृद्धिकरो भवति ।
सटिक च.नि. १-२४ पान ४२४

मलास्तत्र स्वै: स्वैर्दुष्टा: प्रदूषणै: ।
आमाशयं प्रविश्याममनुगम्य पिधाय च ॥
स्त्रोतांसि पक्तिस्थानाच्च निरस्य ज्वलनं बहि: ।
सह तेनाभिसर्पन्तस्तपन्त: सकलं वपु: ॥
कुर्वन्तो गात्रमत्युष्णं ज्वरं निर्वर्तयन्ति ते ।
वा.नि. २-३ ते ५ पान ४४८

सकलं वपुरभिसर्पन्तस्तपन्तो गात्रमत्युष्णं कुर्वन्तो ज्वरं
निर्वर्तयन्ति । अत्य्ष्णग्रहणेनैवं प्रतिपादयति अतुष्णगात्र-
त्वेनैव ज्वरसम्भव: तोष्णगात्रमात्रेण । तथा च निरामय-
स्यापि हि प्राणिनो जीवतो गात्रमुष्णं भवत्येव । ननु वायु-
कृते ज्वरे वायोर्योगवाहित्वात् पित्तकृतेऽपि ज्वरे पित्तस्य
वह्निना समानगुणत्वात् सन्तापोपलब्धिर्युक्ता । श्लेष्मज्वरे
तु श्लेष्मणो वह्निप्रतिपक्षत्वात् कथमिव सन्तापकत्वं युक्तम् ?
इति केचित् । अत्रोच्यते । स्वभावादुपन्नमेतत् । ज्वरस्य
ह्ययमचिन्त्य: स्वभाव:, येनावश्यं सन्तापमुत्पादयति ।
एवं वातस्यामूर्तिमत्त्वेऽपि गुल्मादिषु श्यावारुणत्वोपलब्धि: ।
तस्माद्वयाधीनामेवं स्वभावविशेषाभ्याय्यमेवेदम् ।
टीका वा.नि. २-३ ते ५ पान ४४८

तैर्वेगवद्भिर्बहुधा समुद्‍भ्रान्तैर्विमार्गगै: ।
विक्षिप्यमाणोऽन्तरग्निर्भवत्याशु बहिश्चर: ॥
रुणद्धि चाप्यषांधातुं यस्मात्तस्माज्ज्वरातुर: ।
भवत्यत्युष्णगात्रश्च ज्वरतिस्तेन चोच्यते ॥
सु.उ. ३९-२३, २४ पान ६७२

प्रकुपित झालेले दोष आमाशयामध्यें येतात आणि ग्रहणीमधील अग्नीशीं मिसळून अग्निमांद्य उत्पन्न करता. अग्निमांद्यामुळें आहारांतून परिणत होणारा आहाररस आमस्वरुपामध्यें उत्पन्न होतो. दोष हे त्या आमरसासह शरीरांत प्रवेश करतात. ग्रहणीवर परिणाम होऊन तेथील पाचकाग्नीहि रसासह संचार करणार्‍या दोषांबरोबर आपल्या स्थानांतून बाहेर खेंचला जातो व तोहि दोषांसवे रसानुग होऊन सर्व शरीरांत संचार करतो, त्यामुळें शरीराचें उष्णतामान नेहमीं असतें त्यापेक्षां दोषदुष्टीच्या प्रमाणांत पुष्कळच अधिक वाढतें. या उष्णतेनें सर्व शरीर, इन्द्रियें व मन यांचा संताप होतो. साम दोषांमुळें रसवह व स्वेदवह स्त्रोतसांचा रोध होऊन कोंडलेल्या संतापाची तीव्रता अधिक होते आणि ज्वर हा व्याधि होतो. हारितानें रक्ताची दुष्टी ही ज्वराच्या-संप्राप्तीचें एक कारण मानलें असून दोष रक्ताश्रित होऊन ज्वर उत्पन्न करतात असें म्हटलें आहे.

वातदिपित्त कफशोणित सन्निधानात् ।
स्वेच्छान्नपान निरताद्‍ऋतुवैपरीत्यात् ॥
दोषा मलाशयगता जठराग्निबाह्या ॥
तं प्रेरयन्ति रुधिराश्रित वह्निपातम् ॥
तेषां ततोहि दधते ज्वरनाम सिद्धं ॥
हारित तृतीय १ ४१ पान १७८

पूर्वरुपें
तस्य प्राग्रुपमालस्यमरतिर्गात्रगौरवम् ।
आस्यवैरस्यमरुचिर्जृम्भा सास्त्राकुलाक्षिता ॥
अड्गमर्दोऽविपाकोऽल्पप्राणता बहुनिद्रता ।
रोमहर्षो विनमनं पिंडिकोद्वेष्टनं क्लम: ॥
हितोपदेशेष्वक्षान्ति: प्रीतिरम्लपटूषणे ।
द्वेष: स्वादुषु भक्ष्येषु तथा बालेषु तृड्‍ भृशम् ॥
शब्दाग्निशीतवाताम्बुछायोष्णेष्वनिमित्तत: ।
इच्छा द्वेषश्च ॥

तस्य-ज्वरस्य प्राग्रूपम् । आलस्यं-वाड्वन: कायकर्मस्वनुद्यम: ।
सुश्रुते चोक्तम् । यथा (शा. अ. ४-५२) ``सुखस्पर्शप्रसड्गित्व
दु:खद्वेषणलोलता । शक्तस्य चाप्यनुत्साह: कर्मण्यालस्यमुच्यते ।
इति अरति:-एकत्रनिवस्थितिश्चेतस: ।
तथा, अड्गगुरुत्वम् । आस्यवैरस्यं वक्त्रविरसता । अरुचि:-
अन्नाभिलाषाभाव: । जृम्भा-जृम्भणम् । सहात्स्त्रेण वर्तेत इति
सास्त्रे, आकुले अक्षिणी यस्य स एवम्, तस्य भाब: सास्त्रा-
कुलाक्षिता ।
अड्गमर्द:-अड्गभड्ग: । अविपाक: अन्नस्याविपक्ति: । अल्प-
प्राणता-स्तोकबलत्वम् । तथा, बहुनिद्रता । ``त्वतलोर्गुण-
वचनस्य पुंवद्भावो वक्तव्य:'' इत्यत्र पुंवद्भाव: । रोमहर्षो-
रोमाञ्च: । विनमनं-अड्गानां विनाम: । पिण्डिकयोरुद्वेष्टनं-
उद्वेष्ट: । क्लमो-ग्लानि: । हितस्य गुरुपित्रादे:, उपदेशास्तेषु,
अक्षान्ति:-असहनत्वम्, तदुपदिष्टं न क्षमते । प्रीतिरित्यादि ।
अम्लादिषु द्रव्येषु, द्वेषो भवति । तथा बालेषु-शिशुषु
सकललोकवल्लभेष्वपि, ज्वरस्वभावाद्‍द्वेषो भवति । तथा, तृड्‍
भृशं-तृष्णाऽत्यर्थम् । शब्दादिष्वनिमित्तत:-कारणं विना,
सज्वरस्य प्रीत्यप्रीती जायेते । कदाचिदप्रियमपि शब्दं न
द्वेष्टि, कदाचित् प्रियमपि वेणुवीणादिजनितं द्वेष्टि । एवं
शीतार्तोऽपि कदाचिदग्निंद्वेष्टि, कदाचिदशीतार्तोऽप्याग्निम-
भिलषति । एवं शीतादिष्वपि योज्यम् । एवं प्राग्रूपं अव्यक्त
लिड्गम् ।
सटिक वा. नि. २-६ ते ९ पान ४४८

वेपथु: श्रम भ्रम प्रलाप जागरण दंतहर्ष: दौर्बल्यं सदनं
दीर्घसूत्रता उचितस्य कर्मणो हानि: प्रतीपता स्वकार्येषु
माल्यालेपनभोजनपरिक्लेशनम् ॥
च.नि. १-८

तम: अप्रहर्षश्च शीतं च ।
सु.उ. ३९-२६

हानिश्च बलवर्णयो: शीलवैकृतम् अल्पम् ।
च.चि. ३-२९

आळस, अस्वस्थता, अंग जड होणें, तोंडाची चव जाणें, पदार्थाची चव न कळणें, डोळ्यांना पाणी येणें, डोळे व्याकुळ होणें (त्रासिक होणें, उजेड सहन न होणें, वाचूं नयेसें वाटणें), अंग दुखणें, अन्न न पचणें, श्वासोच्छ्‍वास कष्टानें होणें, झोंप फार येणें, अंगावर रोमांच उभें रहाणें, अंग वाकणें, पोटर्‍या वळणें, थकवा येणें, हिताचें सांगणेंहि सहन न होणें, आंबट, तिखट, खारट खावेसें वाटणें, गोड नकोसें वाटणें, लहान मुलांचा त्रास वाटणें, तहान फार लागणें, शब्द, अग्नि, शीत, वात, जल, छाया; उष्णता या गोष्टी कारणावाचून वरचेवर हव्याश्या किंवा नकोश्या वाटणें, अंग कापणें, चक्कर येणें, बडबडणें, झोंप न येणें, दांत आंबणें, अशक्तता वाटणें, अंग गळून जाणें, कोणत्याहि कामांत रेंगाळणें, केलीच पाहिजेत अशी कामेंहि न करणें, आपल्याच कार्यांना अडथळा आणणें, शरीरप्रसाधन वा जेवण यांचा त्रास वाटणें, अंधारी येणें, थंडी वाजणें, शरीराचा वर्ण निस्तेज होणें, स्वभावांत थोडा पालट होणें, हीं लक्षणें ज्वराच्या पूर्वरुपामध्यें दिसतात.

सामान्यतो, विशेषात्तु जृम्भाऽत्यर्थ समीरणात् ।
पित्तान्नयनोर्दाह:, कफान्नान्नाभिनन्दनम् ॥
सर्वलिड्गसमवाय: सर्वदोषप्रकोपजे ।
द्वयोर्द्वयोस्तु रुपेण संसृष्टं द्वन्द्वजं विदु: ॥
सु. उ. ३९-२७, २८ पान ६७३

वातज्वराच्या पूर्वी जांभया येणें, पित्तज्वरापूर्वी डोळ्यांची जळजळ होणें आणि कफज्वरापूर्वी अन्नाची अभिलाषा मुळींच नसणें अशीं विशेष स्वरुपाचीं `पूर्वरुपें' होतात. द्वंद्वज आणि सान्निपातिक ज्वरांमध्यें त्या त्या दोषांमुळें होणार्‍या लक्षणांचें मिश्रण असतें.

रुपें
संताप: सारुचिस्तृष्णा साड्गमर्दो हृदि व्यथा ।
च.चि. ३-२६ पान ८७५

देहेन्द्रियमनस्तापकर:, प्रज्ञाबलवर्णहर्षोत्साहह्नासकर:,
श्रमक्लममोहाहारोपरोधसंजनन: ।
च.चि. १-४० पान ४३१

ज्वरप्रत्यात्मिकं लिड्गं संतापो देहमानस: ।
ज्वरेणाविशता भूतं न हि किञ्चिन्न तप्यते ॥
च.चि. ३-३१ पान ८७७

वैचित्त्यमरतिर्ग्लानिर्मनसस्तापलक्षणम् ।
इन्द्रियाणां च वैकृत्यं ज्ञेयं संतापलक्षणम् ॥
च. चि. ३-२६ पान ८८०

स्वेदावरोध: संताप: सर्वाड्गग्रहणं तथा ।
युगपद्यत्र रोगे च स ज्वरो व्यपदिश्यते ॥
ज्वरलक्षणमाह-स्वेदावरोध इत्यादि । स्वेदावरोधो धर्मा-
निर्गम: । ताप इति वक्तव्ये संतापग्रहणाद्देहेन्द्रियमनसां
तापं लक्षयति । तदुक्तं चरके ``देहेन्द्रियमनस्तापी''
इति (च.चि.स्था.अ. ३); तथा-वैचित्यमरतिर्ग्लानि-
र्मन:सन्तापलक्षणम्'' इति (च.चि.स्था. अ. ३)
सर्वाड्गग्रहणं सर्वाड्गवेदना । युगपदिति मिलितमेतल्लक्षणं
प्रत्येकशो व्यभिचारात् । स्वेदावरोधो हि कुष्ठपूर्वरुपे, तथा
संतापो दाहाख्ये रोगे, सर्वाड्गग्रहणं सर्वाड्गवातरोगे, इति ।
ननु पैत्तिके स्वेदागमात्, वातिके विषमारम्भविसर्गित्वात्
सर्वाड्गग्रहनाव्यवस्थितेश्चाव्यापकं लक्षणमिति । अत्र जेज्जट-
कार्तिककुण्डादय: समादधु: उत्सर्गापवादभावेन व्यवस्थितिरिति ।
तन्न संगतमित्यन्ने, विधौ ह्युत्सर्गापवादभावो नतु लक्षणे,
अव्याप्ततिव्याप्त्योर्लक्षणदोषात्, तस्मात् स्वेदोऽग्नि:,
स्विद्यतेऽनेन, इति व्युत्पत्या; तस्यावरोधो दोषव्याप्ति: ।
वातज्वरे यद्यपि वायोश्चलत्वेनारम्भविसर्गयोर्वैषम्यं, तथाऽपि
सर्वदेहगतज्वराम्भकदोषदुष्टयनिवृत्तेरनुद्‍भूतसर्वाड्गग्रहणस्य
विद्यमानतैवेति न व्यभिचार: । चरके तु ज्वरलक्षणं
``ज्वरप्रत्यात्मिकं लिड्ग सन्तापो देहमानस:'' इति
(च.चि.स्था.अ.३) ।
ननु शारीरो जायते पूर्वे देहे मनसि मानस:'' इति
(च.चि.स्था.अ.३) ।
चरकवचनाद्देहमनसोरन्योन्यवय्भिचारादलक्षणमिति चेत्; तत्र, सूक्ष्म-
तरकालव्यवहितस्यान्यतररुपस्यावश्यंभावित्वात् । यथा
गुणवद्‍द्रव्यमिति द्रव्यलक्षणमिति ।
मा.नि. ज्वर ३ म. टीकेसह पान ३१

ज्वराच्या सामान्यलक्षणामध्यें देह, इन्द्रियें व मन यांच्या संतापाचीं लक्षणें दिसतात. घाम येत नाहीं. अंग तापतें, सगळें अंग कचकचतें, तोंडाची चव जाते, तहान लागते, हृदयामध्यें व्यथा होते (अस्वस्थपणा वाटणें व नाडीचा वेग वाढणें हीं लक्षणें हृदयाच्या व्यथेची द्योतक आहेत), वैचित्य (चित्त, मन चंचल होणें) अरति (स्वस्थता न वाटणें), गळून गेल्यासारखें वाटणें हीं मनाच्या संतापाचीं लक्षणें असतात. इंद्रियांचेंहि विषयग्रहणसामर्थ्य उणावतें. हीं लक्षणें असतात. पित्तज्वरामध्ये घाम येणें हें लक्षण दिसतें. वातज्वरामध्यें सगळें अंग एकदम न कचकचतां वेगवेगळ्या अवयवांत क्रमानेम वा वेगवेगळ्या वेळीं व्यथा जाणवते. त्यामुळें सर्व लक्षणें एकदम दिसणें या माधवाच्या वचनास बाध येतो असें वाटतें. पित्तज्वरामध्यें घाम येणें हें लक्षण जरी दिसत असलें तरी पित्ताच्या तीक्ष्ण गुणांमुळें स्वेदवहस्त्रोतसाचा अवरोध पूर्णपणें होत नाहीं. त्यामुळें थोडासा घाम येतो, अंग तापण्याच्या मानानें प्रकृत स्थितीमध्यें तेवढें अंग तापेपर्यंत शेकलें असतां जितका घाम येईल तेवढा घाम पित्तज्वरामध्यें येत नाहीं आणि त्यामुळें स्वेदावरोध हें लक्षण योग्यच आहे असें ठरतें. वातज्वरामध्येंहि आमानें रसवहस्त्रोतसांचा रोघ झाल्यामुळें उत्पन्न होणारें अंगमर्द हें लक्षण सर्वशरीरव्यापी असतेंच परंतु वाताच्या विषमतेनें एकाद्या अवयवांत विशेष पीडा जाणवते इतकेंच.

वातज ज्वर

रुक्षलघुशीतवमनविरेचनास्थापनशिरोविरेचनातियोगव्यायाम-
वेगसन्धारणानशनाऽभिघातव्यवायोद्वेगशोक शोणितातिषेक-
जागरणविषमशरीरन्यासेभ्योऽतिसेवितेभ्यो वायु: प्रकोप-
मापद्यते ।
च. नि. १-२३ पान ४२४

रुक्ष, लघु, शीत अशा द्रव्यांचें सेवन, वमन, विरेचन, आस्थापन (निरुहबस्ती) नस्य या उपचारांचा अतियोग, रक्तमोक्ष, व्यायाम, वेगविधारण, लंघन, अभिघात (मार लागणें, उंचावरुन पडणें), मैथुन, उद्‍वेग, शोक, जागरण, शरीर वेडयावाकडया स्थितींत पाहणें या अपथ्यांच्या अधिक सेवनामुळें वायु प्रकुपित होऊन ज्वर उत्पन्न करतो.

आगभापगमक्षोभमृदुतावेदनोष्मणाम् ।
वैषम्यं तत्रतत्राड्गे तास्ता: स्युर्वेदनाश्चला: ॥
पादयो: सुप्तता स्तम्भ: पिण्डिकोद्वेष्टेनं श्रम: ।
विश्लेष: इव सन्धीनां साद ऊर्वो: कटीग्रह: ॥
पृष्ठं क्षोदमिवाप्नोति निष्पीड्यत इवोदरम् ।
छिद्यन्त इव चास्थीनि पार्श्वगानि विशेषत: ॥
हृदयस्य ग्रहस्तोद: प्राजनेनेव वक्षस: ।
स्कन्धयोर्मथनं बाह्वोर्मेद: पीडनमंसयो: ॥
अशक्तिर्भक्षणे हन्वोर्जृम्भणं कर्णयो: स्वन: ।
निस्तोद: शड्खयोर्मूर्घ्नि वेदना विरसास्यता ॥
कषायास्यत्वमथवा मलानामप्रवर्तनम् ।
रुक्षारुणत्वगास्याक्षिनखमूत्रपुरीषता ॥
कण्ठौष्ठशोषस्तृद शुष्कौ छर्दिकासौ विषादिता ॥
हर्षो रोमाड्गदन्तेषु वेपथु: क्षवथोर्ग्रह: ।
भ्रम: प्रलापो घर्मेच्छा विनामश्च निलज्वरे ॥
वा.नि. २-१० ते १७ पान ४४९

तस्येमानि लिड्गानि भवन्ति । तद्यथा विषमारम्भविसर्गित्व-
मूष्मणो वैषम्यं तीव्रतनुभावानवस्थानानि ज्वरस्य । जरणान्ते
दिवसान्ते निशान्ते घर्मान्ते ज्वरस्याभ्यागमनमभिवृद्धिर्वा,
विशेषेण परुषारुणवर्णत्वं नखनयनवदनमूत्रपुरीषत्वचा-
मत्यर्थक्लृप्तीभावश्च, अनेकविधोपमाश्चलाचलाश्च वेदना-
स्तेषां तेषामड्गावयवानाम्, तद्यथा-पादयो: सुप्तता, पिण्डि-
कयोरुद्वेष्टनम्, जानुनो: केवलानां च सन्धीनां विश्लेषणम्,
उर्वो: साद: कटीपार्श्वपृष्ठस्कन्धबाह्वंसोरसां च भग्नरुग्ण-
मृदितमथितचटितावपीडितावनुन्नत्वमिव, हन्वोश्चाप्रसिद्धि:
स्वनश्च कर्णयो:, शड्खयोर्निस्तोद:, कषायास्यताऽऽस्यवैरस्यं
क्षवथूद्गारविनिग्रहोऽन्नरसखेद:, प्रसेकारोचकाविपाको:,
विषाद-जृम्भा-विनाम-वेपथु श्रम-भ्रम-प्रलाप-जागरण-रोमहर्ष
दन्तहर्षास्तथोष्णाभिप्रायता, निदानोक्तानामनुपशयो
विपरीतोपशयश्चेति वातज्वरस्य लिड्गानि भवन्ति ।
लिड्गान्याह-तद्यथा विषमेत्यादि । तदिति सामान्येन स्त्रीपुं-
नपुंसकलिड्गवक्ष्यमाणरुपप्रत्यवमर्शकम्, सर्व लिड्गप्रत्यवमर्शे
हि `तद्‍' इति सर्वनाम युक्तम् । यथेत्युदाहरणे । आरम्भ=
उत्पाद:, विसर्गो-मोक्ष:, तौ विषमौ यस्य स विषमरम्भविसर्गी ।
विषमत्वं च कदाचिच्छिरो, गृहीत्वा भवति, कदाचित्पृष्ठं
कदाचिज्जड्वेत्यादि । एवं मोक्षोऽपि कदाचिच्छिरोऽग्रे
मुच्यते इति । किंवा, ज्वरारम्भमोक्षकालानवस्थितत्वमेव
वैषम्यम् । उष्मणो वैषम्यमिति क्वचिच्छररीप्रदेशे
महानूष्मा क्वचिन्मन्द इत्यादि । तीव्रतनुभावानव-
स्थानानीति तीव्रभावस्तनुभावश्च ज्वरस्य कालाऽप्रति-
नियत इत्यर्थ: । एतत्सर्व वायोरनवस्थितत्वेनोपपन्नम् ।
यच्च वायोर्जरणान्तदिवसान्तादिषु बलवत्कार्यकर्तृत्वं
प्रोक्तम् तदपि प्रायिकत्वेन ज्ञेयम् । अन्यथा, एतदे-
वारम्भादिवैषम्यं न स्यात् । यदि कालविशेषेषु जरणान्तादौ
शरीरप्रदेशविशेषे च जड्घादौ प्रतिनियमेन वातप्रकोप: स्यात्,
तदा शरीरप्रदेशविशेषे वातस्थाने जड्घादौ कालविशेषे
जरणान्तादौ च वातप्रकोप: प्रायिको ज्ञेय: । एनमेव प्रायिक-
वातकालमाश्रित्याह-जराणान्त इत्यादि । घर्मान्त इति
प्रावृषि । मुक्तिभाववतो ज्वरस्य सततकादेरभ्यागमनं,
नित्यानुषक्तस्य त्वभिवृद्धिरिति व्यवस्था । परुषारुणत्वं च
नखादिष्वेव प्रव्यक्तमुपलभ्यत इति कृत्वा नखादय इत्युच्यते ।
त्वग्ग्रहणेणैव वदनग्रहणे लब्धेऽपि वदनग्रहणं वदनत्वचि
विशेषेण परुषत्वादिदर्शनार्थम् । क्लृप्तीभावोऽप्रवृत्ति: ।
सा च योग्यतया मूत्रपुरीषयोरेव नखादिषूक्तयोर्मन्तव्या ।
किंवा, क्लृप्तीभावो=भेद: स्फुटनमिति यावत्, स च
नखादीनाम् । चलाश्च काश्चिद्वेदना अचलाश्च काश्चिन्नि-
त्यानुषक्तत्वनेति चलाचला:, किंवा अत्यर्थ चलाश्च=
चलाचला: । पिण्डिका=जान्वधो जड्घामध्यमांसपिण्डिका ।
भग्नं=केचिदवशेषेण च्छिन्नम् । रुग्णं=किंञ्चिच्छिन्नम् ।
मृदितं=पार्श्वावमोटितम् । अवपाटितमेकदेशोत्पाटितम् ।
अवनुन्नं=प्रेरितम् । एषां च भग्नादीनां लोकत एवार्थागति: ।
यत: लौकिकैरेव एते शब्दा: प्रसिद्धत्वेन तत्र तत्र शास्त्रेऽ
भिधीयन्ते । हन्वोरप्रसिद्धिरिति-हन्वो: स्वव्यावाराकरणम् ।
आस्यस्य वैरस्यमिति=अरज्ञता । अन्नरसखेदोऽन्नरसे
मधुररसादौ खेद=अवसाद: । सर्वरसेष्वनिच्छेत्यर्थ; किंवा
अन्नरसस्य खेटो वमनमन्नरसखेट: । अरुचिर्वक्ष्यमाणा
वक्त्रे प्रविष्टस्यान्नस्यानभ्यवहरणाद्‍बोधव्या उष्मा
भिप्रायता=उष्णप्रियता । निदानोक्तानामनुपशय इति वचने-
नैव विपरीत उपशयोऽर्थ लब्धोऽपि स्पष्टार्थमुच्यते । किंवा
अर्थापत्ते नैकान्तिकत्वेन उच्यते । यथा-नवज्वरे दिवास्वप्ने
प्रतिषिद्धेऽर्थापत्या पुराणज्वरे दिवास्वाप: प्राप्नोति, अथच
तत्र दिवास्वप्नो न विहित इति अर्थापत्तेरनैकान्तिकत्वमस्ति ।
निदानोक्तानामित्यत्र `उक्त' ग्रहणाद, यदेव निदानत्वेनोक्तम्,
तस्यैवानुपशायित्व दर्शितं, न पुनर्यस्यापाततो निदानत्वं
प्रतिभाति । तेन, मदात्ययादौ मद्यादेर्निदानत्वेन
प्रतीयमानस्यापि उपशायित्वमेव ।
सटीक च. नि. १-२५ पान ४२५-२६

वायूच्या विषम स्वभावामुळें ज्वर येणें, उतरणें, चढणें, मंदावणें या स्थितींमध्यें विषमता असते. संध्याकाळीं, पहांटे, खाल्लेलें पचण्याचे वेंळी ज्वर येतो वा वाढतो. नख, नेत्र, मुख, मूत्र, पुरीष, त्वचा यांवर रुक्षपणा व अरुणवर्ण असतो. मूत्र,पुरीष यांची प्रवृत्ती होत नाहीं. नख, त्वचा यांच्यावर भेग पडल्यासारखें होतें. शरीरामध्यें उत्पन्न होणार्‍या वेदना निरनिराळ्या प्रकारच्या स्थिर वा चंचल स्वरुपाच्या असतात. पाय बधीर होतात. पोटर्‍या वळतात, दुखतात. विशेषत: गुढघे वा इतरहि सांधे ढिले झाल्यासारखे वाटतात. मांड्या गळून जातात. कंबर धरते, पाठ कुटल्यासारखी दुखते, पोटांत पिळवटल्यासारखे होतें, वेठ वळतात, हाडें विशेषत: बरगडयांचीं हाडें फ़ुटल्याप्रमाणें ठणकतात. डोकें दुखतें. घाम मुळींच येत नाही. कटी,पार्श्व, पृष्ठ,बाहु ,स्कंध (खांदा मानेपासून बाहुमूलापर्यंतचा भाग), अंस (बाहुमूलाचा संधी), उर या ठिकाणीं फ़ुटणें, दुखणें, तिंबणें, घुसळणें, चपाटी बसणें,पिळवटणें, ओढणे अशा वेदना होतात. जबडयाचा खालच्या भाग (हनुवटी) नीट हलविता येत नाही, अवघडल्यासारखा होतो. कानामध्यें आवाज होतो. शंखप्रदेशी टोचल्यासारखा वेदना होतात. तोंड तुरट होतें. चव कळेनाशीं होतें . तोंड, ताळु, घसा यांना कोरड पडते. ह्रुदयामध्यें, छातीमध्यें जखडल्यासारखें वाटतें कोरडा खोकला येतो. कोरडया ओका    येतात. शिंक व ढेंकर नीट येत नाही. कोणत्याहि प्रकारचे रस (मधुराम्लादि) नको वाटतात. तोंडाला पाणी सुटते. अरुचि असते. अन्न पचत नाहीं. जांभया येणें, अंग कापणें, वाकडें होणें, श्रम, भ्रम,प्रलाप, निद्रानाश, प्रलाप, निद्रानाश, विषण्णता, रोमहर्ष, दांत आंबणें, गरम हवेंसें वाटणें, थंडी वाजणें अशीं लक्षणें वातज्वरामध्यें असतात.

पित्तज ज्वर   

उष्णाम्ललवणक्षारकटुकाजीर्णभोजनेभ्योऽतिसेवितेभ्यसथाऽति
तीक्ष्णातपाग्निसन्तापश्रमक्रोधविषमाहारेभ्यश्च पित्तं
प्रकोपमापद्यते ।
च.नि. १-२६ पान ४२६

उष्ण, आंबट, खारट, क्षारयुक्त, तिखट असे पदार्थ अधिक प्रमाणांत खाणें, अजीर्ण झालें असतां जेवणें, तीक्ष्ण अशा उन्हामध्यें हिंडणें, अग्नीजवळ बसणें. श्रम करणें, क्रोध येणें, विषम आहार घेणें यामुळें पित्ताचा प्रकोप होतो. तें आपल्या द्रवगुणामुळें अग्नि मंद करुन ज्वर उत्पन्न करतें.

तस्येमानि लिड्गानि भवन्ति, तद्यथा-युगपदेव केवले शरीरे
ज्वरस्याभ्यागमनभिवृद्धिर्वा, भुक्तस्य विदाहकाले, मध्य-
न्दिनेऽर्धरात्रे शरदि वा विशेषेण, कतुकास्यकता, घ्राणमुख-
कण्ठौष्ठतालुपाक:, तृष्णा मदो भ्रमो मूर्च्छा पित्तच्छर्दन-
मतीसारोऽन्नद्वेष: सदनं संस्वेद: प्रलापो रक्तकोठाभिनिवृत्ति:
शरीरे, हरितहारिद्रत्वं नखनयनवदनमूत्रापुरीषत्वचामत्यर्थ-
मूष्मणस्तीव्रभावोऽतिमात्रं च दाह,: शीताभिप्रायता,
निदानोक्तानुपशयो विपरीतोपशयश्चेति पित्तज्वरलिड्गानि
भवन्ति ।
च.नि. १-२८ पान ४२६-२७

युगपद्‍व्याप्तिरड्गानां प्रलाप: कटुवक्रता ।
नासास्यपाक: शीतेच्छा भ्रमो मूर्च्छा मदोऽरति: ॥
विट्‍स्त्रंस: पित्तवमनं रक्तष्ठीवमननम्लक: ।
रक्तकोठोद्रम: पीतहरितत्वं त्वगादिषु ॥
स्वेदो नि:श्वासवैगन्ध्यमतितृष्णा च पित्तजे ।

पित्तज्वरे युगपत्-तुल्यकालं, अड्गानां व्याप्ति: शिर: प्रभृती-
न्यड्गानि सन्तापेनैककालं व्याप्यन्ते । न तु वातज्वर इवाग-
मादीनां वैषम्यमिति व्याप्तिग्रहणेन द्योतयति । प्रलाप:-
असम्बद्धवचनस्योक्ति: । कटुवक्रता-कटुकरसत्वमास्ये । तथा
नासायामास्ये च पाक: । तथा, शीतेच्छादयोऽत्र भवन्ति ।
मण्डलाकारा निर्मुखा: पिटिका: कोठा इत्युच्यन्ते । ननु,
दोषास्त्रयोऽपि ज्वरं निवर्तयन्तित्युक्तम् । पित्तज्वरे च पित्तेन
युक्तस्य कायाग्नेर्भूर्यो वृध्द्या भाव्यम्, नाग्निमान्द्येन ``वृद्धि:
समानै: सर्वेषां'' (हृ. सू. अ. १-१४) इति वचनात् ।
एवं चाग्निमाद्याभावात् ज्वरस्य सम्भवेऽप्युपत्तिरयुक्ता ।
नैवम् । स्वस्थानाच्चलनेनाग्नेर्मान्द्यापत्ते: । स्थानवशाद्वाऽ
न्यथात्मस्यापि क्रियासामर्थ्य दृष्टम् । तथा चाष्टांड्गसड्गहे (?)
(चरके) शोषनिदाने वक्ष्यति । (च.नि.अ.६/५) योऽश: [तस्य]
शरीरसन्धीनाविशति तेन [अस्य] जृम्भा ज्वरश्चोपजायते'' ।
इत्यादि । तस्मात्स एवाग्नि: क्वचिदेव देशे पक्तुं शक्तो
भवति, न सर्वत्र । उष्णगुणेन तु पित्तेन युक्त: पक्ता
भवत्येवोष्णतर: ।
अत एव सन्तापादीनधिकतरान् करोतीति न किञ्चिदत्रानुपपन्नम् ।
वा.नि. २-१८ ते २० स. टीकेसह पान ४४९-५०

पित्तज्वरांमध्यें ज्वरवेगाचें वैषम्य नसतें. सर्व शरीर एकदम तापतें. खाल्लेलें पचण्याच्या वेळीं, दुपारीं, मध्यरात्रीं ज्वर येतो वा वाढतो. तोंड कडू पडतें, नाक, तोंड, कंठ, ओठ, ताळू या ठिकाणीं पाक होतो. नख, नेत्र, मुख, त्वचा, मूत्र, पुरीष यांचा वर्ण पिवळा वा पिवळट हिरवा होतो. तृषा, मद, भ्रम, मूर्च्छा, प्रलाप, घाम येणें, अंग गळून जाणें, अन्न नको वाटणें, पित्ताची उलटी होणें, द्रवमलप्रवृत्ती असणें, अंगावर रक्तवर्ण कोठ (गांधी, पुरळ) उमटणें, ज्वरवेग तीव्र असणें, श्वासाला वास येणें, गार हवेसें वाटणें, आंबट घशाशीं येणें, थुंकींतून रक्त पडणें अशीं लक्षणें होतात.

कफज ज्वर

स्ग्धिगुरुमधुरपिच्छिलातिशीताम्ललशवणदिवास्वप्नप्रहर्षाऽ-
व्यायामे भ्योऽतिसेवितेभ्य: श्लेष्मा प्रकोपमापद्यते ।
च.नि. १-२९ पान ४२७

स्निग्ध, गुरु, मधुर, पिच्छिल, शीत, अम्ल, लवण असे पदार्थ अधिक प्रमाणांत खाणें, दिवसा झोपणें, व्यायाम न करणें या कारणांनीं कफाचा प्रकोप होतो व ज्वर उत्पन्न करतो.

तस्येमानि लिड्गानि भवन्ति, तद्यथा युगपदेव केवले शरीरे
ज्वरस्याभ्यागमनमभिवृद्धिर्वा पूर्वाह्णे पूर्वरात्रे वसन्तकाले
वा विशेषण, गुरुगात्रत्वमनन्नाभिलाष: श्लेष्मप्रसेको मुख
माधुर्य हृल्लासो हृदयोलेप: स्तिमितत्वं छर्दिर्मृद्वग्निता निद्रा
धिक्यं स्तम्भस्तन्द्रा कास: श्वास: प्रतिश्याय: शैत्यम्,
श्वैत्यं च नखनयनवदनमूत्रपुरीषत्वचामत्यर्थ च शीत-
पिडका भृशमड्गेभ्य उत्तिष्ठन्ति, उष्णाभिप्रायता, निदानो-
क्तानामनुपशयो विपरीतोपशयश्चेति श्लेष्मज्वरलिड्गानि
भवन्ति ।
च.नि. १-३१ पान ४२७-२८

विशेषादरुचिर्जाडयं स्त्रोतोरोधोऽल्पवेगता ।
प्रसेको मुखमाधुर्य हृल्लेपश्वासपीनसा: ॥
हृल्लासश्छर्दनं कास: स्तम्भ: श्वैत्यं त्वगादिषु ।
अड्गेषु शीतपिटिकास्तन्द्रोदर्द: कफोद्‍भवे ॥
सर्वज्वरेऽरुचिर्भवत्येर्व, अतिशयेन तु कफजे । तथा,
जाड्यादय: स्यु: । त्वगादिष्वित्यादिशब्द आस्याक्षिनखा-
दीनां ग्रहणार्य । [त्वगादिषु, श्वैत्यं-श्वेतता । अड्गेषु-शिर:
पाण्यादिषु, शीतपिटिका:-श्लेष्मपिटिका: । निद्रार्तस्येव
विषयाग्रहणं-तन्द्रा ।] उदर्दस्य लक्षणं तन्त्रान्तर उक्तम्-
``शीतपानीयसंस्पर्षाच्छीतकाले विशेषत: । श्वयथु:
शिशिरार्तानामुदर्द: कफसम्भव: । इति ।
वा. नि. २-२१, २२ स. टीकेसह पान २५०

कांहीं खाल्ले असतां लगेच, सकाळीं, पहिल्या रात्रीं कफामुळें उत्पन्न होणारा ज्वर येतो वा वाढतो. अंग जड होतें, अन्नावर वासना मुळींच नसते, कफ पडतो, तोंड गोड होतें, मळमळतें, छाती (कफानें) भरल्यासारखी वाटतें, अंगाला ओला कपडा गुंडाळल्यासारखें वाटतें. अग्नि मंद होतो, झोंप फार येते, शरीर जखडल्यासारखें वाटतें, तंद्रा, कास, श्वास, प्रतिश्याय, शैत्य, शीतपीडका, उदर्द अशीं लक्षणें असतात. नख, नेत्र, वदन, त्वचा, मूत्र, पुरीष यांचा वर्ण श्वेत असतो. ज्वरवेग मंद असतो. स्त्रोतोरोध अधिक असल्यामुळें घाम येत नाहीं. जडपणाहि जास्त वाटतो. हेमाद्रीनें उदर्द या शब्दाचा अर्थ उरोभिस्पंदन असा केला आहे. त्याचा अर्थ छातीजवळील पोटाचा भाग फार उडणें असा असावा. हें लक्षण कफज्वरांत लहान मुलांमध्यें स्पष्ट दिसतें. स्त्रोतोरोध असें विशेष लक्षण कफज्वरामध्यें बुध्द्या उल्लेखिलेंले आहे. माधवाच्या मधुकोशटीकेंत ``रसवाहिनां स्त्रोतसां रोध:'' असें त्याचें स्पष्टीकरण केलें आहे. त्यावरुन मुखावर किंचित् शोथ दिसणें हें लक्षण मानतां येईल. कफाच्या स्त्यान गुणामुळें दोषपाक होऊन लाघव येण्यास वेळ लागतो. त्यामुळें व्याधीला चिरकारिता असते असेंहि या लक्षणांवरुन म्हणावें लागतें.

वातपित्तज्वर

शिरोर्तिमूर्च्छावमिदाहमोह
कण्ठास्यशोषारतिपर्वभेदा: ।
उन्निद्रतातृड्भ्रमरोमहर्षा
जृम्भातिवाक्त्वं च चलात्सपित्तात् ॥
वा.नि. २.२४ पान ४५१

तृष्णा मूर्च्छा भ्रमो दाह: स्वप्ननाश: शिरोरुजा ।
कष्ठास्यशोषो वमथू रोमहर्षोऽरुचिस्तम: ॥
पर्वभेदश्च जृम्भा च वातपित्तज्वराकृति: ।

वातपित्तज्वरलक्षणमाह - तृष्णेत्यादि । पर्वाणि भिद्यन्त इव
वेदना पर्वभेद: । एतानि च लिड्गानि विकृतिविषमसमवा-
यारब्धस्य बोद्धव्यानि । विकृतिविषमसभवायांरब्धत्वं चैषां
केवलवातिकपैत्तिकज्वरलक्षणांनां मध्ये केषांचिदेव नियमेन
पाठात्तदतिरिक्तलक्षणपाठाच्च बोद्धव्यंम् यथा अत्रैव वात-
पैत्तिकेऽरुचिरोमहर्षौ वक्ष्यमाणवातश्लैष्मिके स्वेद: संतापश्च,
एवं सन्निपातजे सास्त्रकलुषादिनेत्रत्वशिरोलोठनादि । प्रकृति-
समसमवायारब्धे तु वातजादिज्वरलिड्गान्येव । समस्तानि
कतिपयानि वा भवन्ति । अत: एव चिकित्सिते चरको
विकृतिविषमसम्वायारब्धानां द्वन्द्वसन्निपातज्वराणां लक्षणानि
साक्षात्पठित्वा निदानस्थानोक्तवातादिज्वरलिड्गातिदेशेन
प्रकृतिसमसमवेतानां द्वन्द्वसन्निपातज्वराणां लक्षण मुक्तवान् ।
यदाह ``निदाने त्रिविधा प्रोक्ता या पृथग्जज्वराकृति: ।
संसर्गसन्निपातानां तथा चोक्तं स्वलक्षणम् '' इति ।
(च.चि.स्था, अ ३) ।
एवं वक्ष्यमाणं द्वन्द्वसन्निपातलक्षणं व्याख्येयम् ।
प्रकृतिसमसमवायाविकृतिविषम समवाययोश्चायमर्थ:
प्रकृत्या हेतुभूतया सम: कारणारुप: समवाय:
कार्यकारणभावसंबन्ध: प्रकृतिसमसमवाय: कारणा-
नुरुपं: कार्यमित्यर्थ :, यथा शुक्लतन्तुसमवायारसब्धस्य
पटस्य शुक्लत्वम् । विकृत्या हेतुभूतया विषम: कारणान-
नुरुप: समवायो विकृतिविषमसमवाय:, यथा हरिद्राचूर्ण-
संयोगे लौहित्यामिति ।
मा.नि. ज्वर १४ म. टीकेसह पान ३६

तृष्णा, मूर्च्छा, भ्रम, दाह, कंठशोष, मुखशोष, निद्रानाश, छर्दि, शिर:शूल, रोमहर्ष, अरुचि, अंधारी येणें, जांभया येणें, पेरी (संधी) फुटल्यासारखे वाटणें, बडबडणें, अस्वस्थता वाटणें, मोह असणें हीं लक्षणें वातपित्तज्वराची आहेत. द्वंद्वजव्याधीचे घटनाभेदानें दोन प्रकार होतात. एक प्रकृतिसमसमवायात्मक आणि दुसरा विकृतिविषमसमवायात्मक. द्वंद्वज व्याधी ज्या दोन दोषांमुळें उत्पन्न झाला असेल त्या दोषांच्या स्वभावाशीं वा प्रकृतीशी अनुरुप अशीं लक्षणें दोन दोष एकत्र मिळूनहि उत्पन्न होत असलीं म्हणजे या व्याधीस प्रकृतिसमसमवायात्मक द्वंद्वज व्याधी (प्रकृतीशीं सम, अनुरुप आहे समवाय ज्याचा असा) असें म्हणतात. कारणीभूत दोन वा अधिक दोषांच्या स्वभावापेक्षां वा प्रकृतींपेक्षां अगदीं वेगळींच भिन्न अशीं लक्षणें ज्यावेळीं त्यांच्या एकत्र येण्यामुळें उत्पन्न झालेल्या व्याधीमध्यें दिसतील त्यावेळीं त्यास विकृतिविषमसमवायात्मक व्याधी असें म्हणतात (कारणीभूत दोषांचा परस्परसंयोग विकृत होऊन कारणांच्या स्वभावाशीं विषम लक्षणें उत्पन्न होणें.) ग्रंथामध्यें द्वंद्वज वा सान्निपातिक व्याधी वर्णन केले जातात ते बहुधा विकृतिविषमसमवायात्मक असले तर सांगितले जातात. ज्या ठिकाणीं द्वंद्वज व्याधी वर्णन केलेले नाहींत ते व्याधी द्वंद्वज वा सान्निपातिक होतच नाहींत असें नाहीं. प्रकृतिसमसवायात्मकता असल्यामुळें वा द्वंद्वज वा सान्निपातिकांमध्यें एकदोषज प्रकारांतील लक्षणांचा समुच्चय केला म्हणजे स्वतंत्र वर्णनाचें प्रयोजन भागत असल्यामुळें वेगळा उल्लेख केलेला नाहीं. विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व्हावें म्हणून कांहीं ठिकाणीं प्रकृतिसमसमवायात्मक असे द्वंद्वज वा सान्निपातिक व्याधीहि वर्णन केलेल आहेत.

वातकफज्वर

स्तैमित्यं पर्वणां भेदो निद्रा गौरवमेव च ।
शिरोग्रह: प्रतिश्याय: कास: स्वेदाप्रवर्तनम् ॥
संतापो मध्यवेगश्च वातश्लेष्मज्वराकृति: ।
वातश्लेष्मज्वरलक्षणमाह स्तैमित्यमित्यादि । स्वेदाप्रवर्तनं
स्वेदस्य आसमन्तादकारणेन प्रवृत्ति:, विकृत्तिविषमसम-
वायारब्धत्वादितिकार्तिक: । युक्तं चैतत् । यदाह हारीत:
``शिरोग्रह: स्वेदभवश्च कासो ज्वरस्य लिड्गं कफवात-
जस्य'' इति । स्वेदभव: स्वेदोत्पत्ति: । मध्यवेगो नाति-
तीक्ष्णो नातिमृदुरिति ।
मा. नि. ज्वर १५, १६ म. टीकेसह पान ३७

तापहान्यरुचिपर्वशिरोरुक्
पीनसश्वसनकासविबन्धा: ।
शीतजाडयतिमिरभ्रमतन्द्रा:
श्लेष्मवातजनितज्वरलिड्गम‍ ॥
वा.नि. २-२५ पान ४५१

अंगाला ओला कपडा गुंडाळल्यासारखें वाटणें, पेरी दुखणें (सांधे), डोकें दुखणें, अंग जड होणें, थंडी वाजणे, ज्वराचा वेग मध्यम असणें (वाग्भटानें `तापहानि' असें पद वापरलें असून हेमाद्रीनें त्याचा अर्थ ज्वराचें अल्पत्व असा केला आहे), घाम येणें, शिर:शूल, प्रतिश्याय, श्वास, कास, मूत्रपुरीषांचा अवरोध, तम, भ्रम, निद्रा, तंद्रा अशीं लक्षणें वातकफज्वरामध्यें असतात. घाम येणें हें विकृतिविषमसमवायाचें लक्षण आहे.

कफपित्त ज्वर

लिप्ततिक्तास्यता तन्द्रा मोह: कासोऽरुचिस्तृषा ।
मुहुर्दाहो मुहु: शीतं श्लेष्मपित्तज्वराकृति: ॥
श्लेष्मपित्तज्वरमाह-लिप्तेत्यादि । श्लेष्मणा लिप्तं पित्तेन
तिक्तं च मुखं यस्य तस्य भावो लिप्ततिक्तास्यता, लिप्ता-
स्यता तिक्तास्यता चेत्यर्थ: । तन्द्रा निद्रावत्क्लान्ति: ।
तन्द्रालक्षणमाह - ``इन्द्रियार्थेष्वसंवित्तिर्गौरवं जृम्भणं क्लम: ।

निद्रार्तस्येव यस्येहा तस्य तन्द्रां विनिर्दिशेत्'' इति ।
मोहो मूर्च्छा । अन्यत्सुगमम् ।
मा.नि. ज्वर १७ आ टीकेसह पान ३७

शीतस्तम्भस्वेददाहाव्यवस्था तृष्णाकासश्लेष्मपित्तप्रवृत्ति: ।
मोहस्तन्द्रालिप्ततिक्तास्यता च ज्ञेयं रुपं श्लेष्मपित्तज्वरस्य ॥
शीतादिनामव्यवस्था-अनियम: । तथा तृष्णाप्रवृत्त्यादिकं
च श्लेष्मपित्तज्वरस्य रुपं ज्ञेयं-वेद्यम् । शालिनीवृत्तम् ।
अथ, द्विदोषजानां ज्वराणां किमागमापगमवैषम्यादीनां क्रमे-
णोत्पत्ति: ? युगपत्सर्वशरीरप्राप्त्या वा ? इत्यत्र संशय: ।
तत्र संसर्गजत्वादेककालं द्वयोरपि पक्षयो: सम्भवो युक्त: ।
किन्त्वेतयो: पक्षयोर्विरोधाद्युगपदसम्भव इति । अत्रोच्यते ।
यदि संसर्गजे ज्वरे बलवान् वायु: स्यात् तदा आगमापगम-
वैषम्यदिना क्रमेण, अथ पित्तस्य बलीयस्त्वं तदा युगप-
त्सर्वशरीरव्याप्तिक्रमेण ज्वरो भवति । समौ यदा द्वावपि
भवत:, तदाऽपि यस्य देशकालादिना बललाभस्तदा तस्यै-
वोत्पत्तिक्रमेण ज्वरो भवति । सन्निपाते तु युगपदेव
शरीरव्याप्ति: ।
वा.नि. २-२६ स. टीकेसह पान ४५१

तोंड चिकट होणें, तोंड कडू पडणें, शीत, दाह, स्वेद, स्तंभ (स्वेदाचा) हीं लक्षणें अनियमपितपणें वरचेवर प्रकत होणें, तहान लागणें, खोकला तोंडाला चव नसणें, थुंकीवाटे कफ वा पित्त पडणें (छर्दीतही), मोह, तंद्रा येणें, अशीं लक्षणें कफपित्तज्वरांत असतात.

विदग्धेऽन्नरसे देहे श्लेष्मपित्ते व्यवस्थिते ।
तेनार्ध शीतलं देहे चार्ध चोष्णं प्रजायते ॥
काये दुष्टं यदा पित्तं श्लेष्मा चान्ते व्यवस्थित: ।
तेनोष्णत्वं शरीरस्य शीतत्वं हस्तपादयो: ॥
काये श्लेष्मा यदा दुष्ट: पित्तं चान्ते व्यवस्थितम् ।
शीतत्वं तेन गात्राणामुष्णत्वं हस्तपादयो: ॥
मा.नि. ज्वर ४२ ते ४४ पृ. ५६

विषमज्वरविशेषानाह-विदग्ध इत्यादि । विदग्धेऽन्नरसे दुष्टे
आहाररसे तथा दुष्टे पित्ते दुष्टे श्लेष्मणि च व्यवस्थिते सति,
तेन हेतुना देहेऽर्ध शीतलं कफेनार्ध चोष्णं पित्तेन प्रजायते ।
अर्धत्वं चार्धनारीश्वराकारेण नरसिंहाकारेण वा, यथादोषं
व्यवस्थाननियमहेतोरभावादिति । काय इत्यादि । कायेऽ
न्तरग्नौ, कोष्ठ इति यावत् । अन्ते हस्तपादयो:' उक्तार्थस्य
विपर्ययेण ज्वरान्तरमाह काये श्लेष्मेत्यादि ।
म. टीका

अमिश्रीभूत पित्तकफांमुळें उत्पन्न होणारे, असे दोन प्रकारचे वा चार प्रकारचे द्वंद्वज ज्वर माधवनिदानानें उल्लेखलेले आहेत. कफपित्तांचा प्रकोप झाला असला तरी ते शरीरामध्यें वेगवेगळ्या भागाच्या आश्रयानें रहातात उभें अर्धांग (डावें उजवे), किंवा आडवे अर्धांग (नाभीच्या वर व खालीं) कफपित्तानें पृथकपणें व्यापलें जातें व त्यामुळें दोषानुरुप भाग उष्ण व अर्धा भाग शीत असतो हा एक प्रकार, दुसर्‍या प्रकारामध्यें पित्त कोष्ठामध्यें व कफ शाखांमध्यें राहतो किंवा कफ कोष्ठामध्यें व पित्त शाखांमध्यें राहातें. कफाच्या वा पित्ताच्या अवस्थितीप्रमाणें ते ते भाग शीत वा उष्ण असतात. या द्वंद्वज वा सान्निपातिक ज्वरामध्यें दोषांचें बलाबल असेल त्याप्रमाणें लक्षणें उण्या अधिक प्रमाणांत असतात. दोषप्रकोप अगदीं सारखा असेल तर देशकालभेदानें ज्या दोषांचें बल वाढेल त्याप्रमाणें ज्वरांतील लक्षणें उत्पन्न होतात.

सान्निपात ज्वर

विषमाशनादनशनादन्नपरिवर्तादृतुव्यापत्तेरसात्म्यगन्धोपघ्रा-
णाद्विषोपहतस्य चोदकस्योपयोगाद्‍ गिरीणां
चोपश्लेषात्, स्नेहस्वेदनमनविरेचनास्थापनानुवासनशिरो-
विरेचनानामयथावत्प्रयोगात्, मिथ्यासंसर्जनाद्वा, स्त्रीणां च
विषमप्रजननात्, प्रजातानां च मिथ्योपयोगात्, यथोक्तानां
च हेतूनां मिश्रीभावाद्यथानिदानं द्वन्द्वानामन्यतम: सर्वे वा
त्रयोदोषा युगत्प्रकोपमापद्यन्ते, ते प्रकुपितास्तयैवानुपूर्व्या
ज्वरमभिनिर्वर्तयन्ति ॥

विषमाशनादित्यादिना द्वान्द्विकसान्निपातिकज्वरानाह ।
अनशनं यद्यपि न पित्तश्लेष्मकरम्, तथापि, अग्निमान्द्य-
करत्वात् त्रिदोषकरमपि भवति, किंवा एषु विषमाशनादिषु
यथायोग्यतया द्वन्द्वकारणत्वं त्रिदोषकारणत्वम् चोन्नेयम् ।
तेन, अनशनं वातपित्तकरं बोध्यम् । यत्तु पित्तहरत्वमुक्त-
मनशनस्य, तत्तु द्रवांशक्षयात् । वचनं हि `कफपित्ते
द्रवे धातू सहेते लड्घनं महत् इति । अन्नपरिवर्तादिति
सहसैवाक्रमेण कृताभ्यस्तान्नपरिवर्त्तात् । असात्म्यगन्धोप-
द्रवश्च नासिकयान्त: । प्रवेशाद्यथा दोषकरो भवति, न तथा
असात्म्यरुपादय: । ते हि नावश्यं शरीरं विशन्ति । तेन
नेहासात्म्यरुपादय उक्ता: । यथानिदानमिति यदा द्वयो-
र्निदानं सेव्यते, तदा द्वन्द्व: यदा त्रयाणाम् तदात्रयो दोषा: ।
द्वन्द्वेऽपि यदा वातपित्तयेर्निदानं सेव्यते तदा वातपित्तरुपं
द्वन्द्वम् । एवामन्यदपि कुप्यईत्यर्थ: । सर्वे त्रयो दोषा
इत्यनेन लब्धेऽपि `युगपद्‍' इतिवचनं क्रमप्रकोपप्रतिषे-
धार्थम्, युगपदेव प्रकोमापद्यन्ते न क्रमेणेत्यर्थ: ।
सटिक च. नि. १-३२ पान ४२८

शीतोपचारात् सूतानां मैथुनाद्विषमाशनात् ।
प्रजागराद्दिवास्वप्नाच्चिन्तेर्ष्यालौल्यकर्शनात् ॥
तथा दु:खप्रजातानां व्यभिचारात् पृथग्विधात् ।
शिशोर्दुष्टपय:पानात्तथा संकीर्णभोजनात् ॥
काश्यप संहिता पान २१४

अम्लस्निग्धोष्णतीक्ष्णै: कटुमधुरसुरातापसेवाकषायै:
कामक्रोधातिरुक्षैर्गुरुतरपिशिताहारसौहित्यशीतै: ।
शोकव्यायामचिन्ताग्रहणवनित । त्यन्तसड्गप्रसड्गै:
प्राय: कुप्यन्ति पुसां मधुसमयशरद्वर्षणे सन्निपाता: ॥
योगरत्नाकर पान १६०

विषमासन, अनशन, अन्नपरिवर्तन, ऋतुव्यापत्, असात्म्यगंधसेवन, विषयुक्त जलपान, गरविषभक्षण, पंचकर्माचा मिथ्यायोग, पंचकर्मानंतर करावयाच्या संसर्जन क्रमांतील मिथ्यायोग, उंच पर्वतावर चढणे, विषमप्रसूति, सूतिकेचे मिथ्योपचार, संकीर्ण भोजन, दिवसा झोपणे, रात्रीं जागणें, अतिमैथुन, चिंता, ईर्ष्या, क्रोध, हावरेपणा, धातुक्षय या कारणांनीं तीनही दोष प्रकुपित होऊन ज्वर उत्पन्न करतात. वसंत वर्षां शरद्‍ हे काल संनिपातास अनुकूल असत.

आमो ह्याहारदोषात्प्रथममुपचितो हन्ति वह्निं शरीरे
श्लेष्मत्वं याति भुक्तं सकलमपि ततोऽसौ कफो वायुदुष्ट: ।
स्त्रोतांस्यापूर्य रुन्ध्यादनिलमथ मरुत्कोपयेत्पित्तमन्त:
संमूच्छर्यान्योन्यमेते प्रबलमिति नृणां कुर्वते सन्निपातम् ।
मा.नि. ज्वर आ. टीका पान ४३

भालुकीतंत्रामध्यें, सन्निपाताचा प्रकोप प्रथम कफदुष्टि, मग वातदुष्टि, मग पित्तदुष्टि अशा क्रमान सांगितला आहे. विरुद्धभोजनात् कालात् परिणामाच्च कर्मणाम् ।
प्रकुप्यत्यनिल: शीघ्रं सोऽस्याग्निमुपहन्त्यनु ॥
काश्यपहिता पान २१७

कश्यपानें सांगितलेल्या संप्राप्तींत क्रमानें अधिकाधिक अपथ्यें घडत जाता व त्यामुळें प्रथम वात, मग कफ व नंतर पित्त प्रकुपित होतें असे म्हटले आहे.

सर्वजो लक्षणै: सर्वैर्दाहोऽत्र च मुहुर्मुहु: ।
तद्वच्छीतं महानिद्रा दिवा जागरणं निशि ॥
सदा वा नैव वा निद्रा महास्वेदोऽति नैव वा ।
गीतनर्तनहास्यादि विकृते हाप्रवर्तनम् ॥
साश्रुणी कलुषे रक्ते भुग्ने लुलितपक्ष्मणि ।
अक्षिणी पिण्डिकापार्श्वमर्ध्वपर्वास्थिरुग्भ्रम: ॥
सस्वनौ सरुजौ कर्णौ कण्ठ: शूकैरिवाचित: ।
परिदग्धा खरा जिह्वा गुरु: स्त्रस्ताड्गसन्धिता ॥
रक्तपित्तकफष्टीवो लोलनं शिरसोऽतिरुक् ।
कोठानां श्यावरक्तानां मण्डलानां च दर्शनम् ॥
हृव्द्यथा मलसंसड्ग: प्रवृत्तिर्वाऽल्पशोऽति वा ।
स्निग्धास्यता बलभ्रंश: स्वरसाद: प्रलापिता ॥
दोषपाकश्चिरात्तन्द्रा प्रतत कष्ठकूजनम् ।

सर्वेभ्यो जातो वातपित्तकफसमुत्थ:-सर्वात:, सर्वैर्लक्षणै-
र्युतो भवति । यथा-अत्र च सन्निपातज्वरे, दाहो मुहुर्मुह:,
तद्वत-दाहवत् पुन: पुन:, शीतं भवति । अहनि महती निद्रा ।
रात्रौ तु जागरणम् ।
सदा वा दिवसे निशि च नैव वेति द्वयोरपि नक्तदिवसयोर्निद्रा
न भवति ।
तथा, बहूस्वेदोऽतिशयेन नैव वा स्वेद: । तथा गीतादिकाया
विकृताया ईहाया:-चेष्टाया:, प्रवर्तनम् । तथा नयने सास्त्रे भवत: ।
तथा कलुषे रक्ते तथा कुटिले । तथा लुलिते पक्ष्मणी ययोस्त
एवम् । तथा पिण्डिकादिरुक् । भ्रमोमोह: ।
कर्णौ सज्ञब्दौ सरुजौ-सपीडौ च । कण्ठ: शूकै:-
किशारु भिरिव, व्याप्त: । जिह्वा परिदग्धा, तथा खरा-
अमृदु:, तथा गुरु: । तथा, स्त्रताड्गसन्धित्वम् । रक्तादिष्ठीवनम् ।
मूर्ध्नो लोलनं-चलनम् । तथा अतिरुक् । कोठानां
श्यावरक्तानां मण्डलानां च दर्शनम् । नैव वेत्यत्रापि
योग्यम् । तथा, हृदि-पीडा । मलानां-मूत्रपरीषादीनां,
[संसड्ग:] अप्रवृत्ति: । अल्पशो वा प्रव्रत्तिरतिशयेनाथवा ।
तथा, स्निग्धास्यतादि भवति ।
सटिक वा नि. २-२७ ते ३२ पान ४५१-५२

मोह:, कास, श्वास:, अरुचि:, भ्रम:, कृशत्वं नाति
गात्रानां, मूकत्वं, स्त्रोतस्त्रां पाक ।, गुरुत्वं उदरस्य च, ।
मा.नि. ज्वर १८-२३

सुप्तांगता, स्तंभ:, उन्माद:, श्यावदंतता, चेतनाच्युति ।
सु. उ. ३९-३५ ते ३७

वातांगांत्राभिसंजनम् । काश्यप पृ. ३०९

सन्निपातिक ज्वरामध्यें तिनही दोषांची लक्षणे दिसतात. मधुनमधुन कधी दाह होतो तर कधी थंडी वाजते. दिवसा अतिशय झोप येते. रात्री जागरण होते, झोप अत्यंत येते वा मुळींच येत नाहीं, घाम फ़ार येतो वा मुळींच येत नाहीं. गावें, नाचावें, हासावें,अशा काहींशा विकृत गोष्टी कराव्याशा वाटतात. डोळे गढूळ, लाल झालेले, तारवटलेले, असे असतात. डोळ्यांना पाणी येते. पापण्या ढिल्या शिथिल अशा होतात. पोट‍र्या दुखतात; पार्श्र्व, शिर, अस्थि, संधि या शूल असतो, चक्कर येते. कानांतून आवाज होतात, कान दुखतात, घशामध्यें तुसें अडकल्यासारखें खवखवतें. जीभ सभोंवती जळल्याप्रमाणें लालसर काळी व खरखरीत होते. अंग गळून जाते. रक्त, पित्त, कफ़ हे थुंकीतून पडतात, डोके हालते, दुखते,अंगावर काळसर तांबडी अशी कोठ वा मंडले उमटतात. छातीमध्यें दुखते. मलमूत्रांची प्रवृत्ती मुळींच होत नाही, थोडी थोडी होते किंवा अति प्रमाणांत होते. तोंड चिकट असते. आतडयांचा क्षोभ होतो. दुर्बलपणा येतो. आवाज खोल गेल्यासारखा उमटतो. रोगी बडबडतो, सारखा कण्हतो. तंद्रा असते, स्रोतसांचा पाक होतो, दोषांचा पाक होण्यासाठीं फ़ार  उशीर होतो शरीराला फ़ारशी कृशता येत नाही. श्वास, कास, अरुचि ही लक्षणें असतात. मोह असतो. पोटामध्यें अतिशय जड वाटते. बोलतां न येणें, अंग बधिर होणें ताठणें, वेड लागल्याप्रमाणें बीभत्स चेष्टा करणे, मनाचे सामर्थ्य नष्ट होणे अशी लक्षणे होतात.

सन्निपातज्वरस्योर्ध्वं त्रयोदशविधस्य हि ।
प्राक्सूत्रितस्य वक्ष्यामि लक्षणं वै पृथक् पृथक् ॥
भ्रम: पिपासा दाहश्च गौरवं शिरसो॓  तिरुक ।
वातपित्तोल्बणे विद्याल्लिड्गं मन्दकफ़े ज्वरे ॥
शैल्यं कासोऽरुचिस्तन्द्रापिपांसादाहरुग्व्यथा:।
वातश्लेष्मोल्ब्णे व्याधौ लिड्गं पित्तावरे विदु: ॥
छर्दि: शैत्यं मुहुर्दाहस्तृष्णां मोहोऽस्थिवेदना ।
मन्दवाते व्यवस्यन्ति लिड्गं पित्तकफोल्बणे ॥
सन्ध्यास्थिशिरस: शूलं प्रकापो गौरवं भ्रम: ।
वातोल्बणे स्याद्‍ व्द्यनुगे तृष्णा कण्ठास्यशुष्कता ॥
रक्तविष्मूत्रता दाह: स्वेदस्सृड्ग बलसंक्षय: ।
मूर्च्छा चेति त्रिदोषे स्यालिड्गं पित्ते गरीयसि ॥
आलस्यारुचिहृल्लासदाहवम्यरतिभ्रमै: ।
कफोल्बणं सन्निपातं तन्द्राकासेन चादिशेत् ॥
प्रतिश्या छर्दिरालस्यं तन्द्राऽरुच्यग्निमार्दवम् ।
हीनवाते मध्यकफे लिड्ग पित्ताधिके मतम् ॥
शिरोरुग्वेपथु: श्वास: प्रलापश्चछर्द्यरोचकौ ।
हीनपित्ते मध्यकफे लिड्गं स्यान्मारुताधिके ॥
शीतको गौरवं तन्द्रा प्रलापोऽस्थिशिरोऽतिरुक् ।
हीनपित्ते वातमध्ये लिड्गं श्लेष्माधिके विदु: ॥
श्वास: कास: प्रतिश्यायो मुखशोषोऽतिपार्श्वरुक् ।
कफहीने पित्तमध्ये लिंड्गं वाताधिके मतम् ॥
वर्चोभेदोऽग्निदौर्बल्यं तृष्णा दाहोऽरुर्भ्रम: ।
कफहीने वातमध्ये लिड्ग पित्ताधिके विदु: ॥
च.चि. ३-९० ते १०२ पान ९०६ ९०७

सन्निपाताचे जे १३ प्रकार त्यांची विविध लक्षणें व नांवे निरनिराळ्या ग्रंथकारानी दिलेली आहेत. चरकानें या १३ प्रकारांचें वर्णन पुढील प्रकारे केले आहे.

(१) वात, पित्त, अधिक कफ मंद असतांना भ्रम तृष्णा, दाह, गौरव, अतिशिर:शूल अशी लक्षणे असतात.

(२) वात, कफांचे आधिक्य व पित्त मंद असतांना थंडी वाजणें, कास, अरुचि, तंद्रा, तृष्णा, दाह, आणि वेदना हीं लक्षणें असतात.

(३) कफ पित्तांचे आधिक्य व वात मंद असताना छर्दि, थंडी वाजणें, वरचेवर दाह होणे, तृष्णा, मोह व अस्थिवेदना हीं लक्षणें असतात.

(४) वाताचे आधिक्य व कफपित्त मंद असतानां सांधे अस्थि व शिर या ठिकाणी शूल, प्रलाप, गौरव, भ्रम, तृष्णा, मुखकंठशुष्कता ही लक्षणें असतात.

(५) पित्ताचे आधिक्य व वातकफ मंद असतांना सरक्त, मलमूत्रप्रवृत्ती दाह, घाम येणे, तृष्णा, बलक्षीण होणें, मूर्छा अशी लक्षणें असतात.

(६) कफाचे आधिक्य व वातपित्त मंद असतांना आलस्य, अरुचि, मळमळणें, दाह, छर्दी, अस्वस्थता तंद्रा, कास आणि भ्रम हीं लक्षणें असतात.

(७) कफाचे अधिक्य, पित्त मध्य व वात मंद स्थितीत असतांना प्रतिश्याय, छर्दी, आलस्य, तंद्रा, अरुचि, अग्निमांद्य ही लक्षणें असतात.

(८) पित्ताचें आधिक्य, कफ मध्य व वात मंद असतांना-नेत्र व मूत्र यांना पिवळेपणा असणें, दाह, तृष्णा, भ्रम आणि अरुचि, हीं लक्षणें होतात.

(९) वाताचें आधिक्य, कफ मध्य व पित्त मंद असतांना-डोळें दुखणें, कंप, श्वास, प्रलाप, छर्दी, अरोचक हीं लक्षणें असतात.

(१०) कफाचे आधिक्य, वात मध्य व पित्त मंद स्थितीत असतांना-थंडी वाजणें, तंद्रा, प्रलाप, अस्थिशूल, हीं लक्षणें असतात.

(११) वाताचे आधिक्य, पित्त मध्य व कफ मंद असतांना श्वास, कास, प्रतिश्याम, मुखशोष, पार्श्वशूल हीं लक्षणें असतात.

(१२) पित्ताचें आधिक्य, वात मध्य व कफ मंद असतांना-द्रवमल प्रवृत्ति अग्निमांद्य, तृष्णा, दाह, अरुचि आणि भ्रम अशी लक्षणें असतात.

(१३) सर्व दोष समस्थितींत असतांना सन्निपाताची आरंभीं वर्णन केलेलीं लक्षणें होतात.

भालुकी तंत्रामध्यें सन्निपाताच्या विविध प्रकारांतील लक्षण समुच्चा पुढीलप्रमाणें वर्णन केंलेला आहे.

वातपित्ताधिको यस्य सन्निपात: प्रकुप्यति । तस्य ज्वरो-
डड्गमर्दस्तृट्‍तालुशोषप्रमीलका: ॥ आध्मानतन्द्रारुचय:
श्वासकासभ्रमश्रमा: । पित्तश्लेष्माधिको यस्य सन्निपात:
प्रकुप्यति । अन्तर्दाहो बहि: शीत तस्य तन्द्रा च बाधते ।
तुद्यते दक्षिणं पार्श्वमुर: शीर्षगलग्रहा: । निष्ठीवेत्कफपित्तं
च तृष्णा कण्डूश्च जायते । विड्‍भेदश्वासहिक्काश्च बाधन्ते
सप्रमीलका: । विभुफल्गू च तौ नाम्ना सन्निपातावुदाहृतौ ।
श्लेष्मानिलाधिको यस्य संन्निपात: प्रकुप्यति । तस्य शीत-
ज्वरो निद्रा क्षुतृष्णा पार्श्वनिग्रह: । शिरोगौरवमालस्यमन्या-
स्तम्भप्रमीलका: । उदरं दह्यते चास्य कटिर्बस्तिश्च दूयते ।
सन्निपात: यस्य जन्तो: प्रकुप्यति । तस्य तृष्णाज्वरग्लानि-
पार्श्वरुग्दृष्टिसंक्षया: । पिण्डिकोद्वेष्टेन दाह ऊरुसादौ
बलक्षय: । सरक्तं चास्य विण्मूत्रं शूलं निद्राविपर्यय: ।
निर्भिद्यते गुदं चास्य बस्तिश्च परिकृत्यते । आयम्यते
भिद्यते च हिक्कते विलपत्यपि । मूर्च्छति स्फायते रोति
नाम्ना विस्फुरक: स्मृत: । पित्तोल्बण: सन्निपातो यस्य
जन्तो: प्रकुप्यति । तस्य दाहो ज्वरो घोरो बहिरन्तश्च
वर्धते । शीतं च सेवमानस्य कुप्यत: कफमारुतौ । ततश्चैन
प्रधान्वते हिक्काश्वास्सप्रमीलका: । विसूचिका पर्वभेद:
प्रलापो गौरव क्लम: । नाभिपार्श्वरुजा तस्य स्विन्नस्याशु
विवर्धते । स्विद्यमानस्य रक्तं च स्त्रोतोभ्य: संप्रवर्तते ।
शुलेन पीडयमानस्य तृष्णा दाहश्च वर्धते । असाध्य: सन्नि-
पातोऽयं शीघ्रकारिती कथ्यते । नहि जीवत्यहोरात्रमेंतेना-
विष्टविग्रह: । कफोल्बण: सन्निपातो यस्य जन्तो: प्रकुप्यति ।
तस्य शीतज्वरस्वप्नगौरवालस्यतन्द्रय: । छर्दिमूर्च्छातृषा-
दाहतृप्प्त्यरोचकहृद्‍ग्रहा: । ष्ठीवनं मुखमाधुर्य श्रोत्रवाग्दृष्टी-
निग्रह: । श्लेष्मणो निग्रह चास्य यदा प्रकुरुते भिषक ।
तदा तस्य भृशं वायु: प्रकुप्यति । निराहारस्य सोऽत्यर्थ
मेदोमज्जास्थि बाधते । अथात्र स्नाति भुक्ते वा त्रिरात्रं
नहि जीवति । मेदोगत: सन्निपात: कप्फण: स उदाहृत: ।
कामान्मोहाच्च लोभाच्च भयाच्चायं प्रपद्यते ।
मा.नि. ज्वर म. टीका पान ३९

वातपित्ताधिक सन्निपातामध्यें ज्वर, अंगमर्द, तृष्णा, तालुशोष, प्रमीलक (डोळे न उघडणें) आध्मान, तंद्रा, अरुचि, श्वास, कास भ्रम, श्रम अशी लक्षणें असतात. वंगसेनाने मद असें लक्षण अधिक दिले असून या प्रकारास `बभ्रू' म्हणतात. असें सांगितले आहे. पित्तकफाधिक सन्निपातामध्यें आंत दाह होणें बाहेर अंग गार असणें, उजव्या पार्श्वामध्ये दुखणें, उरोग्रह, गलग्रह, शिर:शूल, श्वास, हिक्का, प्रमीलक अशी लक्षणें असतात. या सन्निपाताला `विभू' व `फल्गु' अशीं दोन नांवे आहेत.
 
कफवाताधिक सन्निपातामधें-थंडी वाजून ताप येणें, झोंप येणें, क्षुधा, तृष्णा, पार्श्वग्रह, शिरोगौरव, आलस्य मन्यास्तंभ, प्रमीलक, उदरदाह, कटीशूल, बस्तिशूल अशी लक्षणें असतात. या सन्निपातास `मकरी' असे म्हणतात. वंगसेनानें भालूकीच्या, प्रार्श्वग्रहाच्या नंतरची लक्षणें याच प्रकाराखालीं वेगळी दिलेली आहेत. शूल होतो, (अस्विद्यमानस्य असा पाठ घेतला तर शेकलें नाहींतर) घाम येत नाही, हिक्का, श्वास, हीं लक्षणें उत्पन्न होतात. वंगसेन यासच `शीघ्रकारी' असें म्हणतो.

वातप्रधान सन्निपातामध्ये - तृष्णा, ज्वर, ग्लानी, पार्श्वशूल, दृष्टिमांद्य, पिडिज्कोष्टेन, दाह, उरुसाद, बलक्षय, सरक्त, मलमूत्रप्रवृत्ती, शूल निद्रानाश, गुदवेदना, बस्तिवेदना, शरीर ताणले गेल्यासारखे वाटणें, व फुटले गेल्यासारखे वाटणें, उचकी लागणे बडबडणे, मूर्च्छित होणें, थरथरणे रडणें, अशी लक्षणें होतात. या सन्निपाताला विस्फुरक असे नांव आहे. वाताधिक सन्निपातांत वंगसेनाने कास, श्वास, तम, मूर्छा, प्रलाप, मोह, कंप, पार्श्वशूल, जृंभा, कषायमुखता एवढीच लक्षणे दिली आहेत. - वंगसेन पृष्ठ ३७.

पित्तोल्बण सन्निपातामध्ये - दाह, ज्वराचा अंतर बाह्य वेग तीव्र असणें, ज्वराच्या तीव्र वेगामुळें जर शीतोपचार केले तर त्यामुळें वातकफांचा अधिक प्रकोप होऊन हिक्का श्वास, प्रमीलक हीं लक्षणें होतात. विसूचिका, पर्वभेद, प्रलाप, गौरव, क्लम, नाभिशूल पार्श्वशूल हीं लक्षणें असतात. या शूलामुळें शेकण्याचा उपचार केला तर रक्त दुष्ट होऊन स्त्रोतसांतून बाहेर पडतें शूल कमी होतच नाहीं. तृष्णा आणि दाह अशीं लक्षणें मात्र वाढतात. या लक्षणांनीं युक्त असा रोगी २४ तासांपेक्षां अधिक जगूं शकत नाहीं. या सन्निपातास शीघ्रकारी असें म्हणतात.

पित्ताधिक सन्निपातामध्यें वंगसेनानें अतिसार भ्रम, मूर्च्छा, मुखपाक, शरीरावर रक्तबिंदु दिसणे, तीव्र स्वरुपाचा दाह अशी लक्षणें दिली असून प्रकाराचे नांव आशुकारी असें सांगितले आहे. वंगसेन पृष्ठ ३७

कफोल्वण सन्निपातामध्यें थंडी वाजून ताप येणें, निद्रा, गौरव, आलस्य, तंद्रा, छर्दी, मूर्च्छा, तृष्णा, दाह, तृप्ती, अरुचि, हृदग्रह, कफष्ठीवन, मुखमाधुर्य, कानानें ऐकूं न येणें, बोलणें जड होणें, डोळ्याला कमी दिसणें अशी लक्षणें होतात. कफाचे शमन करण्याचा प्रयत्न केला तर पित्त प्रकुपित होऊन उपद्रव उत्पन्न करतो. पित्ताचें शमन करावें तर वायु प्रकुपित होतो, रोग्याला फार लंघन दिलें असेल तर प्रकुपित झालेला वायु प्रकुपित होतो, रोग्याला फार लंघन दिलें असेल तर प्रकुपित झालेला वायु मेद, मज्जा, अस्थि या धातूंना दुष्ट करुन लक्षणें उत्पन्न करतो. या सन्निपातामध्यें स्नान करणें, खाणें असें कांहीं अपथ्य झालें तर तीन दिवसांच्यावर त्याचें आयुष्य नाहीं असें समजावें हा सन्निपात मेदोगत असून त्यास `कफण' असें म्हणतात. (फप्फण असेंहि म्हणतात.) कम, मोह, लोभ, भय, या कारणांनीं हा उत्पन्न होतो.

वंगसेनानें कफाधिक सन्निपातांत जडपणा, गदगदवाणी, निद्राधिक्य, डोळे उघडे स्थिर रहाणें, तोंड गोड होणें, अशीं लक्षणें दिली असून या प्रकाराचें नांव `कंपन' असें दिलें आहे. वंगसेन पृष्ठ ३८

हीनमध्याधिकैर्यस्य वातपित्तकफै: क्रमात् । सन्निपात:
प्रभवति पीडयन्दोषदर्शनात् । अल्पशूलं कटीतोदो मध्ये
दाहो रुजा भ्रम: । भृशं क्लम: शिरोवक्रमन्याहृदयवाग्रुज: ।
प्रमीलिका: श्वासहिक्काकासजाडयविसंज्ञता: । प्रथमो-
त्पन्नमेतत्तु साधयेत्तु कदाचन । एतास्मिन्सन्निपाते तु कर्ण-
मूले सुदारुणा । पिटिका जायते जन्तुर्यया कृच्छ्रेण जीवति ।
स वैदारिकसंज्ञोऽयं सन्निपात: सुदारुण: । त्रिरात्रात्परमेतस्य
व्यर्थमौषधकल्पनम् ।
वंगसेन ३६४ ते ३६८ पान ३८

वात, पित्त, कफ, हे क्रमानें हीन, मध्य, अधिक असतांना अल्पशूल, कटिवेदना, मध्येदाह (केवळ कोष्ठाचा दाह), वेदना, भ्रम, क्लम, शिराशूल, तोंड दुखणें, मान दुखणें, ह्रुद्शूल, वाग्‍रुजा (बोलतांना त्रास होणें), प्रमीलक, श्वास, हिक्का, कास, जडता, संज्ञानाश अशीं लक्षणें होतात. या सन्निपातामध्यें कानाच्या मुळाशीं शोथ उत्पन्न उत्पन्न होते, या प्रकाराचें नांव वैदारिक असें आहे.

मध्यहीनाधिकैर्यस्य सन्निपातो यदा भवेत् । तस्य रोगास्त
एवोक्ता यथादोषबलाश्रया: । अन्तर्दाहो विशेषोऽत्र प्रवक्तुं
न च शक्यते । रक्तमालक्तकेनैव लक्ष्यते मुखमण्डलम् ।
यत्नेननाकर्षित: श्लेष्मा हृदयान्न प्रसिच्यते । इषुणेवाह्तं पार्श्व
तुद्यते खन्यते हृदि । प्रमीलिकाश्वासहिक्का वर्धन्ते तु दिने
दिने । जिह्वा दग्धा खरस्पर्शा गल: शूकैरिवावृत: । विसर्ग
नाभिजानाति कूजते च कपोतवत् । अतीव श्लेष्मणा पूर्ण:
शुष्कवक्त्रोष्टतालुक: । तन्द्रानिद्रातियोगार्त्तो हतवह्निर्हतद्युति: ।
न चाति भजतं ग्लानिं विपरीतानि यच्छति ।
आयम्यते च बहुश: सरक्तं ष्ठीवतेऽल्पश: । एष कर्कोटको
नाम्ना सन्निपात: सुदारुण: ।
वंगसेन ३६७ ते ३७५ पान ३८-३९

वात, पित्त, कफ, हें क्रमानें मध्यहीनाधिक असतांना विशेष स्वरुपाचा अंतर्दाह होणें, बोलता न येणें, आळता लावल्याप्रमाणें तोंड लाल होणें, प्रयत्नपूर्वक खाकरुन कफ बाहेर टाकण्याचा यत्न केला तरी कफ न सुटणें, पार्श्वभागीं बाण लावल्याप्रमाणें वेदना होणें, हृदय दुखणें (खन्वते), प्रमीलक, श्वास, हिक्का हीं लक्षणें वाढत जाणें, जीभ खरखरीत व जळल्यासारखी होणें, घशांत तूस अडकल्याप्रमाणें होणें, मलमूत्रप्रवृत्ती झालेली न समजणें, कबूतराप्रमाणें घुमणें, छाती कफानें भरलेलीं असणें, तोंड, ओठ, तालू कोरडी नसणें, विकृत चेष्टा करणें, शरीर ताणणें, वरचेवर थोडेंथोडें रक्त थुंकीतून पडणें अशी लक्षणें असतात. या प्रकारास `कर्कोटक' असें नांव आहे,

प्रवृद्धमध्यहीनैश्च सन्निपातो यदा भवेत् । तस्य रोगास्त
एवोक्ता यथादोषबलाश्रया: । प्रलापायाससंमोहकम्पमूर्छा-
रतिभ्रमा: । एकपक्षाभिधातस्तु तत्राप्येतद्विशेषत: ।
एष संमोहका नाम्ना सन्निपात: सुदारुण: ।
वंगसेन ३७६ ते ३७७ पान ३९

वात, पित्त, कफ हे क्रमानें अधिक, मध्य व हीन असतांना दोषाच्या बलाप्रमाणें लक्षणें होतात. विशेषत: प्रलाप, श्रम, संम्मोह कंप, मूर्च्छा, अरति, भ्रम, पक्षवध, हीं लक्षणें असतात. या प्रकारास `सम्मोहक' असें म्हणतात.

हीनातिवृद्धमध्यैस्तु सन्निपातो यदा भवेत् ।
तस्य रोगास्त एवोक्ता यथादोषबलाश्रयात् ॥
सर्वस्त्रोतोभवं त्वस्य रक्तापित्तं प्रकुप्यति ।
विस्फोटैरग्निदग्धाभैश्चीयते च समन्तत: ॥
हृदयोदरमन्त्रं च यकृत्प्लीहाऽथ फुप्फुसम् ।
पच्यतेऽन्त: शरीरस्थमूर्ध्वाध: पुयमेति च ॥
शीर्णदन्तश्च मृत्युश्च तस्याप्येतद्विशेषणम् ।
काश्यपसंहिता पान २१६

वात, पित्त कफ हे क्रमानें हीन अधिक व मध्य स्थितींत असतांना विशेषत: पुढील लक्षणें होतात. हृदयामध्यें दाह होतो, यकृत्, प्लीहा, अंत्र, फुफ्फुस यांचा पाक होतो.; मुखावाटें गुदातून (उर्ध्वध:) सपूय रक्तप्रवृत्ती होते. यास `याम्य' असें म्हणतात. कश्यपानें वंगसेनाने सांगितलेल्या कांहीं लक्षणें या प्रकारांत अधिक सांगितली आहेस. तीं अशीं सर्व स्त्रोतसांतून (सर्व मार्गांतून) रक्तपित्ताची प्रवृत्ती होते. सर्व अंगावर भाजल्याप्रमाणें फोड येतात. हृदय आणि उर याचाहि पाक होतो. (काश्यप पान २१६)

प्रवृद्धहीनमध्यैस्तु वातपित्तकफैश्च य: ।
तेन रोगास्त एवोक्ता यथारोगबलाश्रया: ॥
प्रलापायाससंमोहकम्पमूर्च्छारतिभ्रमा: ।
मन्यास्तम्भेन मृत्युश्च तत्राप्येतद्विशेषणम् ।
वंगसेन ३८० पान ३९

वात, पित्त, कफ अधिक हीन आणि मध्य स्थितींत असतांना विशेषत: प्रलाप, श्रम, संम्मोह, कंप, मूर्च्छा, अरति, भ्रम, मन्यास्तंभ, हीं लक्षणें असतात. याला `क्रकच' असें म्हणतात.

मध्यप्रवृद्धहीनैश्च सन्निपातो यदा भवेत् ।
तस्य रोगास्त एवोक्ता यथारोगबलाश्रया: ॥
मोहप्रलापमूर्च्छा: स्यु:स्तम्भकम्पशिरोग्रहा: ।
कासश्वासौ भ्रमरतन्द्रा संज्ञानाशो द्ददि ग्रह: ॥
खेभ्यो रक्तं विसृजति तत्राप्येतद्विशेषणम् ।
अर्वाक् त्रिरात्रान्मृत्युश्च तन्द्री वा स्तब्धलोचन: ॥
एषां त्रया नामानि याम्यक्रक्रचपाकला: ।
वंगसेन ३८१ ते ३८३ पान ३९, ४०

वात, पित्त, कफ, हे क्रमानें मध्य, अधिक, व हीन स्थितींत असतांना विशेषत: मोह, प्रलाप, मूर्छा, स्तंभ, कंप, शिरशूल, कास, श्वास, भ्रम, तंद्रा, संज्ञानाश, हृदगृह, रक्तपित्त, (रक्तप्रवृत्ती), डोळे भिजल्यासारखे होणें अशी लक्षणें असतात. या प्रकारास `पालक' असे नांव आहे. स्तब्धांगता, स्तब्धनेत्रता, स्त्रोतसांचा पाक आणि खाल्ले नसतांहि पुष्कळ प्रमाणांत द्रवमलप्रवृत्ती होणें, हीं लक्षणें कश्यपानें या प्रकारांत आहेत. कष्यप या प्रकाराला `क्रकंच' असें नांव देतो.
(कश्यप पान २१६)
सर्वैर्दोषै: प्रकुपितं सन्निपातं निबोध मे ।
त्रयाणामपि दोषाणां सर्वरुपाणिं लक्षयेत् ॥
यानि ज्वरचिकित्सायां रुपाण्युक्तानि कृत्स्नश: ।
तै: सर्वैरेव सम्पूर्णैर्विज्ञेय: कूटपाकल: ॥
व्याधिभ्यो दारुणेभ्यश्च वज्रशस्त्राग्निसन्निभ: ।
केवलोच्छ्‍वासपरम: स्तब्धाड्ग: स्तब्धलोचन: ॥
त्रिरात्रात्परमेतस्य जन्तोर्हरति जीवितम् ।
तदावश्यन्तु तं दृष्ट्‍वा मूढो व्याहरते यत: ॥
धर्षितो राक्षसैर्नूनमवेलायां चरन्ति ये ।
अम्बया ब्रुवते केचिद्यक्षिण्या ब्रह्मराक्षसै ॥
पिशाचैर्गुह्यकैश्चैव तथान्यैर्मस्तके हतम् ।
कुलदेवार्चनाद्धीनं धर्षितं कुलदैवतै: ॥
नक्षत्रपीडामपरे गरकर्मेति चापरे ।
वदन्ति सन्निपातन्तु भिषजा: कूटपाकलम् ॥
कूटस्थैजीयते दोषैर्बलिभि: कूटपाकलम् ।
वंगसेन ३८४ ते ३९१ पान ४०

वात, पित्त, कफ हे तीनहि दोष सारख्या प्रमाणांत उत्कटतेनें प्रकुपित असतांना रोग्याचीं लक्षणें अत्यंत दारुण अशीं असतात. लोक याला कांहीतरी देवग्रह भूतबाधा झाली आहे असें म्हणतात. रोगी केवळ श्वासोच्छास करीत असतो. सर्व शरीर ताठलेलें व डोळे थिजलेले असतात. या व्याधीमध्यें दोष जणूं जीवाच्या निवासस्थानापर्यंत जाऊन पोहोंचलेले असतात. (कूटस्थ) म्हणून या प्रकारास `कूट पाकल' असें नांव आहे. कश्यपानें या कूटपालकाचें वर्णन पुढील प्रमाणें वर्णन केलें आहे.

कूटपाकलविग्रस्तो न शृणोति न पश्यति न स्पंदते न
ब्रविति नाभिष्टौति न निंदति केवलोच्छसपरम: स्तब्धाड्ग:
स्तब्धलोचन: त्रिरात्रं परमं तस्य जन्तोभिवति जीवितम् ।
काश्यप पृ. २१७

वाग्भटानें सन्निपातालाच (वा. नि. २-२३) `अभिन्यास' व `हतौजस' अशीं दोन नावें दिलीं आहेत. कांहीं लोकांच्या मतें वाताधिकास सन्निपात म्हणावें. कफाधिकास अभिन्यास म्हणावें व पित्ताधिकास हृतौजस किंवा हतौजस म्हणावें असें आहे. अष्टांग हृदयाच्याच्या हेमाद्री या टीकाकारानें या मतांचा उल्लेख केलेला असून हीं मते योग्य नसल्याचें सांगितले आहे. त्यासाठीं त्यानें वंगसेनाचीं वचनें उद्‍धृत केली आहेत व हीं नांवें केवळ पर्यायवाचक मानावी असें सांगितलें आहे. हेमाद्रीनें उद्‍धृत केलेल्या वंगसेनाच्या वचनांत आणि आम्ही वापरलेल्या वंगसेनाच्या प्रतींतील पाठांत कांहीं मागेपुढें आहे वचनें नीट पाहिलीं असतां हेमाद्रीपुढें असलेल्या प्रतीपेक्षां आम्ही वापरलेल्या मुद्रित प्रतीची रचना अधिक योग्य आहे असें वाटतें. वंगसेनानें अभिन्यास ज्वराचीं लक्षणें पुढील प्रमाणें सांगितलीं आहेत.

त्रयश्च कुपिता दोषाउरस्त्रोतोऽनुगा भृशम् ।
आमा विबध्दा ग्रथिता बुद्धीन्द्रियमनोऽनुगा: ॥
जनयन्ति महाघोरमभिन्यासं ज्वरं नृणाम् ।
प्रस्तब्धगात्रस्त्ववाग्मी नष्टचेष्टो न कांक्षते ॥
न च दृष्टिर्भवेत्तस्य समर्था रुपदर्शने ।
न च गन्धरसस्पर्शशब्दान्प्राप्याथ बुध्यते ॥
शिरो लोठयतेऽभीक्ष्णमाहारं नाभिनन्दति ।
कूजते तुद्यते चैव प्रतिपत्तिश्च हीयते ॥
कलं प्रभाषते किञ्चिदीभन्यास: स उच्यते ।
प्रत्याख्येय: स भूयिष्ठं कश्चिदेवात्र सिध्यति ।
वंगसेन ४९६ ते ५०० पान ४९

निद्रोपेतमभिन्यासं क्षिप्रं विद्याद्धतौजसम् ।
वंगसेन ५०४ पान ४९

तीनहि दोष प्रकुपित होऊन उरांतील स्त्रोतसांचा आश्रय करतात. साम, स्त्यान व ग्रथित (घनीभूत) असे हे दोष बुद्धी, इंद्रिय व मन यांनाहि विकृत करतात. त्यामुळें अत्यंत घोर असा अभिन्यास उत्पन्न होतो. या व्याधींत सर्स अंग ताठतें (प्रस्तब्ध) वाणी उमटत नाहीं. हालचाल नष्ट होते. त्याला कशाचीहि इच्छा होत नाहीं. शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध या विषयांचें ज्ञान ग्रहण करण्यास ती ती इंद्रियें असमर्थ होतात. डोकें हालतें (अनिच्छेनें) अन्न गिळत नाहीं. रोगी कण्हतो. शरीरामध्यें टोंचल्याप्रमाणें वेदना होतात. संज्ञा नष्ट होते. घशांतल्याघशांत कांही शब्द उमटतात असे वाटतें. या व्याधीस `अभिन्यास' असें म्हणतात. `हतौजसं' असें त्याचें दुसरें नांव आहे. या व्याधींत निद्रा हें लक्षण उत्पन्न झालें असतां रिष्ट लक्षण उत्पन्न झालें असें मानावें. खोल पाण्यांत पडलेले भांडें बुडण्यापूर्वीच काढून घेतलें तरच हातीं लागतें. त्याप्रमाणें `अभिन्यास' सन्निपात ज्वराचें समजावें असें वंगसेनानें मार्मिकपणें सांगितलें आहे. सन्निपाताच्या सर्वच प्रकारांच्या बाबतींत उण्या अधिक प्रमाणानें हें सत्य आहे.

निद्रोपेतमभिन्यासं क्षीणमेनं हतौजसम् ।
संन्यस्तगात्रं संन्यासं विद्यात्सर्वात्मके ज्वरे ॥
सु. उ. ३९-४२ पान ६७४

सुश्रुतानें निद्रा हें लक्षण अधिक असतांना अभिन्यास, अतिशय क्षीणता आली असल्यास हतौजस आणि मूर्च्छित होऊन अंग ताठलें असल्यास त्या सन्निपाताला संन्यास म्हणावें असें सांगितलें आहे. अभिन्यास व हतौजस हे एकमेकांचें पर्याय असल्याचेंहि त्यानें उल्लेखिलें आहे.

नात्युष्णशीतोऽल्पसंज्ञो भ्रान्तप्रेक्षी हतस्वर: ।
खरजिह्व शुष्ककण्ठ: स्वेदविण्मूत्रवर्जित: ॥
सास्त्रो निर्भुग्रहृदयो भक्तद्वेषी हतप्रभ: ।
श्वसन्निपतित: शेते प्रलापोपद्रवायुत:
तमभिन्यासमित्याहुर्हुतौजसमथापरे ।
इदानीमभिन्यासादिसंज्ञाभि: सन्निपातभेदमाह विशेषमित्यादि:
विशेषं भेदम् । अत्र सन्निपातज्वरे । नात्युष्ण:शीत:
साधारणाड्गस्पर्श: । भ्रान्तप्रेक्षी सर्वपदार्थयथार्थदर्शी ।
सास्त्र: अश्रुपूर्णनेत्र: । निर्भग्नहृदय: कुटिलहृदय: । श्वसन्
श्वासं कुर्वन् । निपतित इव शेते, एतेन विकलाड्ग उक्त: ।
प्रलाप एवोपद्रवस्तेन आयुतोऽत्यर्थयुक्त: । तं सन्निपात-
भेदम् ।
सटीक सु. उ. ३९-३९, ४९ पान ६७३

हतौजस या प्रकारला वेगळें मानून त्याचीहि लक्षणें सुश्रुतानें वेगळीं सांगितलीं आहेत.

ओजो विस्त्रंसते यस्य पित्तानिलमुच्छ्रयात् ।
स गात्रस्तम्भशीताभ्यां शयनेप्सुरेचेतन: ॥
अपि जाग्रत् स्वपन् जन्तुस्तन्द्रालुश्च प्रलापवान् ।
संहृष्टरोमा स्त्रस्ताड्गो मन्दसन्ता पवेदन: ॥
ओजोनिरोधजं तस्य जानीयात् कुशलो भिषक् ।
सु. उ. ३९,४४ पान ६७४

पालक सन्निपातामध्यें तंद्रा हें घोर लक्षण उत्पन्न होतें असें सांगितलें आहे. तिचें स्वरुप वंगसेनानें वर्णन केलें आहे तें असें -

आचितामाशयकफे सन्निपातज्वरे दृढे ।
शान्तेऽप्यवश्यं तस्याशु तन्द्रा समुपजायते ॥
अभिद्रवरसक्षीरदिवास्वप्ननिषेवणात् ।
दुर्बलस्याल्पवातस्य जन्तो: श्लेष्मा प्रकुप्यति ॥
वायुमार्ग समावृत्य धमनीरनुसृत्य स: ।
तन्द्रां सुघोरां जनयेत्तस्या वक्ष्यामि लक्षणम् ॥
उन्मीलितविनिर्भुग्ने परिवर्तिततारके ।
भवतस्तस्य नयने लुलिते चलपक्ष्मणी ॥
निवृत्ताननदन्तौष्ठं मुहुरुत्तानशायिनम् ।
पिच्छिलोच्छिन्नतन्तुश्च कण्ठे श्लेष्मास्य गच्छति ॥
कण्ठमार्गविरोधश्च वैकृतं चोपजायते ।
सोऽर्वाक्त्रिरात्रं साध्य: स्यादसाध्यस्तु तत: परम् ॥
वंगसेन ४८४ ४८९ पान ४८

सन्निपातज्वरामध्यें आमाशयामध्यें संचित झालेला कफ (आम) हा ज्वर उतरल्यानंतरहि तंद्रा हें लक्षण उत्पन्न करुं शकतो. द्रव पदार्थ, फलरस, दूध, दिवसां झोपणें या कारणांनीं वाताचें बल अल्प असलेल्या दुर्बल रुग्णांत कफाचा प्रकोप होतो. वातवह दमनीचा रोध करुन हा कफ तंद्रा हें घोर स्वरुपाचें लक्षण उत्पन्न करतो. या तंद्रेच्या स्थितीमध्यें डोळे उघडे व तारवटलेले राहातात. बाहुल्या फिरतात. पापण्यांचे बल नाहींसे होऊन त्या शिथिल होतात. तोंड उघडें रहातें. ओठ वर सरकतात. त्यामुळें दांत दिसतात. रोगी बहुधा उताणा पसरलेला असतो. चिकट बुळबुळीत तंतुयुक्त असा कफ घशामध्यें अडकतो. घशामध्यें मार्गावरोध होऊन त्यामुळें अनेक विकार (घुरघुरक, कंठोध्वस) उत्पन्न होतात. या अवस्थेस तंद्रा हें नांव आहे. अर्थात् हें तंद्रेचें गंभीर व उग्र स्वरुप सन्निपातिक अवस्थेमध्येंच उत्पन्न होणारे आहे. योगरत्नाकर व भावप्रकाश या दोन ग्रंथकारांनीं विशिष्ट नावांनीं उल्लेखिलेले सन्निपाताचें १३ प्रकार वर्णिलेले आहेत. दोन्ही ग्रंथांतील नावें बरीचशीं सारखीं असली तरी लक्षण समुच्चयामध्यें कांहीं भेद आहे.

सन्धिकश्चान्तकश्चैव रुग्दाहश्चित्तविभ्रम: ।
शीताड्गस्तन्द्रिकश्चैव कण्ठकुब्जश्च कर्णक: ॥
विख्यातो भुग्ननेत्रश्च रक्तष्ठीवी प्रलापक: ।
जिह्वकश्चेत्यभिन्यास: सन्निपातास्त्रयोदश ॥
यो. र. पान १६०

शीतांगस्त्रिमलोद्भवज्वरगणे तन्द्री प्रलापी ततो
रक्तष्ठीवयिता च तत्र गणित: सम्भुग्ननेत्रस्तथा
साभिन्यासकजिह्वकश्च कथित: प्राक्सन्धिगोऽथान्तको
रुग्दाह: सहचित्तविभ्रम इह द्वौ कर्णकण्ठग्रहौ ।
भावप्रकाश पान ३६७

संधिक

पूर्वरुपकृतशूलसम्भवं शोषवात बहुवेदनान्वितम् श्लेष्मताप-
बलहानिजागरं सन्निपातमिति सन्धिकं वदेत् ।
यो. र. पान १६०

व्यथातिशयिता भवेच्छ्‍ वयथुसंयुता सन्धिषु
प्रभूतकफतामुखे विगतनिद्रता कासरुक् ।
समस्तमिति-कीर्तिते भवति लक्ष्म यत्र ज्वरे
त्रिदोषजनिते बुधै: स हि निगद्यते सन्धिग: ।
भावप्रकाश पान ३६९

या व्याधीच्या पूर्वरुपामध्यें शूल असतो. (विशेषत: संधीमध्यें) शोष, वायूमुळें उत्पन्न होणार्‍या निरनिराळ्या वेदना, कफबहुलता, संताप, दौर्बल्य, सांध्यामध्यें शोथ व वेदना, कास, निद्रानाश, तोंडामध्यें वरचेवर कफ सांचणें अशीं लक्षणें असतात.

अंतक

दाहं करोति परितापनमातनोति ।
मोहं ददाति विदधाति शिर:प्रकम्पम् ॥
हिक्कां तनोति कसनं च समाजुहोति ।
जानीहि तं बिबुधवर्जितमन्तकाख्यम् ॥
यो. र. पान १६०

यस्मिंल्लक्षणमेतदस्ति सकलैर्दौषैरुदीते ज्वरेऽ
जस्त्रं मूर्द्धविधूननं सकसनं सर्वागपीडाधिका
हिक्काश्वासकदाहमोहसहिता देहेऽतिसन्तप्तता
वैकल्यश्च वृथा वचांसि मुनिभि: संकीर्तित: सोऽन्तक: ।
भावप्रकाश पान ३६९

अंतक सन्निपातामध्यें डोकें सारखें हालणें, कास, अंगमर्द, हिक्का, श्वास, दाह, मोह, संतप्तता, इंद्रियवैकल्य किंवा अवयव वैकल्य, बडबडणें, अशीं लक्षणें असतात.

रुक्दाह

प्रलापपरितापनप्रबलमोहमान्द्यश्रम: ।
परिभ्रमणवेदनाव्यथितकण्ठमन्याहनु: ॥
निरन्तरतृषाकर: श्वसनकासहिक्काकुल: ।
स कष्टतरसाधनो भवति हन्ति रुग्दाहक: ॥
यो. र. पान १६१

दाहोऽधिको भवति यत्र तृषा च तीव्रा श्वासप्रलापाविरुचि-
भ्रममोहपीडा: ।
मन्याहनुव्यथकण्ठरुज: श्रमश्च रुग्दाहसंज्ञ उदितस्त्रिभवे
ज्वरोऽयम् ।
भावप्रकाश पान ३६९

प्रलाप, संताप, मोह (प्रबल), मांद्य (चेष्टांचे) श्रम, भ्रम, घसा मान हनुवटी याठिकाणीं वेदना, अतिशय तृष्णा, श्वास, कास, हिक्का, दाह, अरुचि अशीं लक्षणें रुक्दाहसन्निपातांत असतात.

चित्तभ्रम

यदि कथमपि पुंसां जायते कायपीडा ।
भ्रमगदपरितापो मोहवैकल्यभाव: ॥
विकलनयनहासो गीतनृत्यप्रलापोऽ
भिदधति तमसाध्यं केऽपि चित्तभ्रमाख्यम् ॥
यो.र. पान १६१

गायति नृत्यति हसति प्रलपति विकृतं निरीक्षते मुह्येत् ।
दाहव्यथाभयार्तो नरस्तु चित्तभ्रमे ज्वरे भवति ॥
भावप्रकाश पान ३६९

शरीराला अनेक प्रकारच्या पीडा होतात. भ्रम, मद, संताप, मोह वैकल्य, हीं लक्षणें असतात. रोगी गातो, नाचतो, बडबडतो, उगीचच हांसतो, कोठेंतरी पहात बसतो. यास चित्तभ्रम असें म्हणतात.

शीतांग (शीतगात्र)

हिमसदृशशरीरो वेपथुश्वासहिक्का ।
शिथिलितसकलाड्ग: खिन्ननादोग्रताप: ॥
क्लमथुदवथुकासच्छर्द्यतीसारयुक्त-
स्त्वरितमरणहेतु: शीतगात्र: प्रभावात् ॥
यो. र. पान १६१

हिमशिशिरशरीर: सन्निपातज्वरी य: श्वसन कसनहिक्का-
मोहकम्पप्रलापै: । क्लमबहुकफवातादाहवम्यंगपीडास्वर-
विकृतिभिरार्त: शीतगात्र: स उक्त: ।
भावप्रकाश पान ३६८

अंग बर्फासारखे गार पडतें, कंप, श्वास, हिक्का, शिथिलगात्रता, स्वर क्षीण होणें, (आंतून) उग्र स्वरुपाचा ताप होणें, थकवा, दाह, कास, छर्दी, अतिसार, प्रलाप, मोह ही लक्षणें शीतांग सन्निपातांत असतात.

तंद्रिक

प्रभूता तन्द्रार्तिर्ज्वरकफपिपासाकुलतरो, ।
भवेच्छ्‍यामा जिह्वा पृथुलकठिना कण्टकवृता ॥
अतीसारश्वासक्लमथुपरितापश्रुतिरुजो ।
भृशं कण्ठे जाडयं शयनमनिशं तन्द्रिकगदे ॥
यो. र. पान १६१

तन्द्रातीव ततस्तृषाऽतिसरणं श्वासोऽधिक: कासरुक्
सन्तप्तातितनुर्गल: श्वयथुना सार्द्धञ्च कण्डु: कफ: ।
सुश्यामां रसना क्लम; श्रवणयोर्मान्द्यञ्च दाहस्तथा
यत्र स्यात्स हि तन्द्रिको निगदितो दोषत्रयोत्थो ज्वर: ।
भावप्रकाश पान ३६८

अत्यंत तंद्रा, तीव्रवेगी ज्वर, कफाधिक्य, तृष्णा, जीभ काळसर होणें, जीभ रुंदावणें कठीण होणें तिच्यावर काटे दिसणें, अतिसार, श्वास, क्लम, संताप, कर्णशूल, घशामध्यें जडपणा वाटणें, सारखी झोंप येणें, गळ्याला आंतून सूज येणें, घसा खाजणें, कास, कमी ऐकूं येणें, दाह अशीं लक्षणें तंद्रिक सन्निपातात असतात.

कंठकुब्ज

शिरोर्तिकण्ठग्रहदाहमोह कम्पज्वरारक्तसमीरणार्ति: ।
हनुग्रहस्तापविलापमूर्च्छा: स्यात्कण्ठकुब्ज: खलु कष्टसाध्य: ॥
यो. र. पान १६१

कण्ठ: शूकशतावरुद्धवदतिश्वास: प्रलापोऽरुचि -
र्दाहोदेहरुजा तृषापि च हनुस्तम्भ: शिरोऽर्तिस्तथा ।
मोहो वेपथुना सहेति सकलं लिंगं त्रिदोषज्वरे
यत्र स्यात्स हि कण्ठकुब्ज उदित: प्राच्यैश्चिकित्साबुधै: ।
भावप्रकाश पान ३६९

घसा शेंकडो तुसांनीं भरल्यासारखा होऊन दुखणें, श्वास, प्रलाप, अरुचि, दाह, शरीर वेदना, तृष्णा, हनुस्तंभ, शिर:शूल, मोह, कंप, मूर्च्छा, रक्ताचे व वाताचे विकार अशीं लक्षणें कंठकुब्ज या सन्निपातात असतात.

कर्णक

प्रलापश्रुतिहासकण्ठग्रहाड्गव्यथाश्वासकासप्रसेकप्रभावम् ।
ज्वरं तापकर्णान्तयोर्गल्लपीडा बुधा कर्णकं कष्टसाध्यं वदन्ति ॥
यो. र. पान १६१

दोषयत्रेण जनित: किल कर्णमूले तीव्रा ज्वरे भवति तु
श्वयथुर्व्यथा च । कण्ठग्रहो बधिरता श्वसनं प्रलाप: प्रस्वेद-
मोहदहनानि च कर्णिकाख्ये ।
भा. प्र. पान ३६९

कानामध्येम तीव्र स्वरुपाचा शूल, शोथ, घसा दुखणें धरणें, ऐकूं न येणें श्वास, प्रलाप स्वेद येणें, मोह, दाह, प्रसेक, कास हीं लक्षणें कर्णक सन्निपातांत असतात.

सन्निपातज्वरस्यान्ते कर्णमूले सुदारुण: ।
शोथ; सञ्जायते तेन कश्चिदेव प्रमुच्यते ॥
ज्वरस्य पूर्वज्वरमध्यतो वा ज्वरान्ततो वा श्रुतिमूलशोथ: ।
क्रमादसाध्य: खलु कष्टसाध्य: सुखेन साध्यो मुनिभि: प्रदिष्ट: ॥
यो. र. पान १६१

सन्निपात ज्वराच्या शेवटी (कर्णक) कर्णमूलाशीं (मागच्या बाजूला जो अस्थिप्रदेश आहे तेथे) तीव्र स्वरुपाचा (शूलयुक्त) शोथ येतो, त्यामुळें रोगी सहसा वाचत नाहीं. बरा होण्याची शक्यता क्वचित् असते. त्यादृष्टीनें शोथ ज्वराच्या शेवटीं येणें, मध्यें येणें, व आरंभीं येणें या स्थितींतील उग्रता वाढत्या क्रमानें समजावी.

भुग्ननेत्र

ज्वरबलापचय: स्मृतिशून्यता, श्वसनभुग्नविलोचनमोहिता: ।
प्रलपनभ्रमकम्पनशोफवांत्स्यजति जीवितमाशु स भुग्नदृक् ॥
यो. र. पान १६१

भृशं नयनवक्रता श्वसनकासतन्द्रा भृशं ।
प्रलाप्मदेवपथुश्रवणहानिमोहस्तथा ॥
पुरो निखिलदोषजे भवति यत्र लिंगं ज्वरे ।
पुरातनचिकित्सकै: स इह भुग्ननेत्रो मत: ॥
भा. प्र. पान ३६८

नेत्र तारवटणें व वाकडे होणे, श्वास, कास, तंद्रा, प्रलाप, मद, कंप, ऐकूं न येणें, मोह, स्मृतिभ्रंश, भ्रम, शोथ, अशीं लक्षणें भुग्ननेत्र सन्निपाताची असतात.

रक्तष्ठीवी

रक्तष्ठीवी ज्वरवमितृषामोहशूलातिसारा ।
हिक्काध्मान भ्रमणदवथुश्वाससञ्ज्ञाप्रणाशा: ॥
श्यामा रक्ता विकृतरसना मण्डलोत्थानरुपा ।
रक्तष्ठीवी निगदित इह प्राणहन्ता प्रसिद्ध: ॥
यो. र. पान १६२

निष्ठीवो रुधिरस्य रक्तसदृशं कृष्णं तनौ मण्डलं
लौहित्यं नयने तृषारुचिवमिश्वासातिसारभ्रमा:
आध्मानञ्च विसंज्ञिता च पतनं हिक्काड्गपीडा भृशं
रक्तष्ठीविनि सन्निपातजनिते लिंगं ज्वरं जायते ।
भा. प्र. पान ३६८

थुंकीवाटे वरचेवर रक्त पडतें, शरीरावर तांबडीं काळीं मंडलें उमटतात, डोळे रक्ताळतात, लाल होतात. तृष्णा, अरुचि, छर्दी, श्वास, अतिसार, भ्रम, आध्मान, संज्ञानाश, हिक्का, अंगमर्द, मोह, दाह, जीभ तांबडी काळी मंडळ युक्त विकृत होते. हीं लक्षणें रक्तष्ठीवी सन्निपातामध्यें असतात.

प्रलापक

कम्पप्रलाप परितापनशीर्षपीडा ।
प्रौढप्रभावपवमानपरोऽन्याचिन्ता ॥
प्रज्ञाप्रणाशविकल: प्रचुरप्रवाद: ।
क्षिप्रं प्रयाति पितृपालपदं प्रलापी ॥
यो. र. पान १६२

यत्र ज्वरे निखिलदोषनितान्तरोषजाते प्रलापबहुला:
सहसौत्थिताश्च ।
कम्पव्यथापतनदाहविसंज्ञता: स्युर्नाम्ना
प्रलापक इति प्रथित: पृथिव्याम् ।
भा. प्र. पान ३६८

अत्यंत बडबडणें, कंप वेदना, पडणें (उठून बसतांना), दाह, संज्ञानाश शिर:शूल:, श्रेष्ठतेच्या वा पवित्रतेच्या प्रौढी मिरवणें, (वाताचा प्रकोप अति होणें) दुसर्‍यांची काळजी असल्याचें दाखविणें, बुद्धीची विवेकशक्ति नाहींशी झाल्यामुळें व्याकुळ होणें, वादविवाद करणें अशीं लक्षणें प्रलापक सन्निपातात असतात.

जिह्वक

श्वसनकासपरितापविह्वल: कठिनकण्टकवृतातिजिह्वक: ।
बधिरमूकबलहानिलक्षणो भवति कष्टतरसाध्यजिह्वक: ॥
यो. र. पान १६२

त्रिदोषजनिते ज्वरे भवति यत्र जिह्वा भृशं वृता कठिणकंट-
कैस्तदनु निर्भरं मूकता ।
श्रुतिक्षतिबलक्षतिश्वसनकाससन्तप्तय: पुरातनभिषग्वरास्तमिह
जिह्वकं चक्षते ।
भा. प्र. पान ३६८

जीभ कठिण, कंटकयुक्त (वाकडी) होते, होलतां येत नाहीं, ऐकू येत नाहीं, दौर्बल्य, श्वास, कास, संताप, ही लक्षणें जिह्वक सन्निपातांत असतात.

अभिन्यास

दोषत्रयस्स्निग्धमुख त्वनिद्रावैकल्यनिश्चेतनकष्टवाग्मी ।
बलप्रणाश: श्वसनादिनिग्रहोऽभिन्यास उक्तो ननु मृत्युकल्प: ॥
यो. र. पान १६२

दोषास्तीव्रतरां भवन्ति बलिन: सर्वेऽपि यत्र ज्वरे
मोहोऽ तीव्र विचेष्टता विकलता श्वासो भृशं मूकता ।
दाहचिक्कणमाननं च दहनो मन्दो बलस्य क्षय:
सोऽभिन्यास इति प्रकीर्तित इह प्राज्ञैर्भिषग्भि: पुरा ।
भा. प्र. पान ३६८

तीनहि दोषांचा प्रकोप अतिशय असतो. त्यामुळें मुखावर स्निग्धता दिसते, निद्रा अधिक असते, अवयवांना विकलता येते, रोगी निश्चेष्ट पडतो, त्याला बोलवत नाहीं, बल नष्ट होतें. श्वासाचा अवरोध होतो, मोह, मूकता. दाह (अंग मुख चिकट होणें) हीं लक्षणें अभिन्यास सन्निपातामध्यें असतात.

भावप्रकाशकारानें निरनिराळ्या नांवानें भिन्न लक्षण समुच्चयाचे १३ प्रकारचे सन्निपातज्वर योगरत्नाकरापेक्षां अधिक उल्लेखिलेले आहेत. ते असें -

कुंभीपाक

घोणाविवरझरद्वहुशोणासितलोहितं सान्द्रम् ।
विलुठन्मस्तकमभित: कुम्भीपाकेन पीडितं विद्यात्
भा. प्र. पान ३७०

नाकांतून काळसर व घट्ट असें रक्त पुष्कळ प्रमाणांत पडतें. रोगी डोकें सारखें हालवतो.

प्रोणुर्नाव

उत्क्षिष्य: य; स्वमंगं क्षिपत्यधस्तन्नितान्तमुच्छसिति ।
तं प्रोर्णुनावजुष्टं विचित्रकष्टं विजानीयात् ।
भा. प्र+. पान ३७०

रोगी आपलें अंग वरचेवर उचलून आदळतो व मोठयानें उच्छ्‍वास टाकतो.

प्रलापी

स्वेदभ्रमांगभेदा: कम्पो दवथुर्वमिर्व्यथा कण्ठे ।
गात्रञ्च गुर्वतीव प्रलापिजुष्टस्य जायते लिंगम् ॥
भा. प्र. ३७०

घाम येणें, भ्रम, अंग फुटल्यासारख्या वेदना होणें, कंप, दाह, छर्दी, घसा दुखणें, अंग जड होणें (बडबड करणें)

अंतर्दाह

अन्तर्दाह: शैत्यं बहि:श्वयथुररतिरपि तथा श्वास: ।
अंगमपि दग्धकल्पं सोऽन्तर्दाहार्दित: कथित: ।
भा. प्र. ३७०

आत दाह होणे, बाहेरून थंडी वाजणे, शोथ, अस्वस्थता, श्वास, अंग जळल्यासारखें काळवंडणें.

दंडपात

नक्तन्दिवा न निद्रामुपैति गृह्वाति मूढधीर्नभस: ।
उत्थाय दण्डपाती भ्रमातुर: सर्वतो भ्रमति ॥
भ्रा.प्र. पान ३७०

रात्रीं व दिवसा मुळींच झोप येत नाहीं, आकाशांतून कांहींतरी घेतो आहे असें हातवारे करतो, रोगी शुद्धींत नसतो, भ्रमिष्टासारखे करतो, उठला असतां चक्कर येऊन काठीसारखा पडतो.

अंतक

संपूर्यते शरीरं ग्रन्थिभिरभितस्तथोदरं मरुता ।
श्वासातुरस्य सततं विचेतनस्यान्तकार्तस्य ॥
भा. प्र. पान ३७०

पोट वायूनें भरल्यासारखें होतें (आध्मान), सर्व शरीरावर गांठी येतात. श्वास लागतो. रोगी निश्चेष्ट असतो.

एणीदाह

परिधावतीवगात्रे रुक्पात्रे भुजंगपतंगहरिणगण: ।
वेपथुमत: सदाहस्यैणीदाहज्वरितस्य ।
भा. प्र. पान ३७०

कंप, दाह, शरीर वेदना ही लक्षणें असतात. रोग्याला आपल्या अंगावर हरणें, साप, पतंग (किडे) धावून आल्यासारखें वाटते.

हारिद्रक

यस्याऽतिपीतमंगं नयने सुतरां मलस्ततोऽप्यधिकम् ।
दाहोऽतिपीतता बहिरस्य स हारिद्रको ज्ञेय: ।
भा. प्र. पान ३७०

हारिद्रा भेकवर्णाभं तद्‍वर्णं य: प्रमेहति ।
स वै हारिद्रको नाम ज्वरभेदोन्तक: स्मृत: ॥
अ. सं. नि. २ पान २२

अंग व डोळे फार पिवळे होतात, त्वचा बेडकाच्या पोटासारखी होते, मलमूत्रांचा रंग अधिकच पिवळा असतो, आंतून आग होते, बाहेरुन थंडी वाजते.

अजघोष्ट

छगलसमानगंध: स्कंधरुजावान्निरुद्धगलरन्ध्र:
अजघोषसन्निपातादाताम्राक्ष: पुमान्भवति ।
भा. प्र. पान ३७१

अंगाला बोकडासारखी घाण येते, खांदे ठणकतात, गळा (गलमार्ग) आवळल्यासारखा होतो, डोळे तांबडे होतात.

भूतहास

शब्दादीनधिगच्छति न स्वान्विषयान्यदीन्द्रियग्रामै: ।
हसति प्रलपति परुषं स ज्ञेयो भूतहास इति: ।
भा. प्र. पान ३७१

इंद्रियांना आपापल्या शब्दस्पर्शादि विषयांचें ज्ञान होत नाहीं. रोगी बडबडतो, हांसतो, कठोर वागतो (कर्कश आवाजांत ओरडतो).

यंत्रापीड

येन मुहुर्ज्वरे वेगाद्यन्त्रेणेवावपीडयते गात्रम् ।
रक्तं पित्तञ्च वमेद्यन्त्रापीड: स विज्ञेय: ।
भा. प्र. पान ३७१

सर्व शरीर चरकांत घालून पिळल्याप्रमाणें. वेदना वरचेवर होतात, रोग्याला रक्ताची व पित्ताची उलटी होते.

संन्यास

अतिसरति वमति कूजति गात्राण्यभितश्चिरं नर: क्षिपति ।
संन्याससन्निपाते प्रलपत्युग्राक्षिमंडलो भवति ।
भा. प्र. पान ३७१

अतिसार होतो, उलटी होते, रोगी कण्हतो, शरीर (हातपाय) झाडतो, बडबडतो. डोळे भयंकर दिसतात.

संशोपी

मेचकं वपुरतिमेचकलोचनयुगलो मलोत्सर्गात् ।
संशोषिणि सितपिडिकामण्डलयुक्तो ज्वरे नरो भवति ।
भा. प्र. पान १७१

शरीर काळवंडते, डोळें काळे पडतात, मलमूत्रांची प्रवृत्ति होते (त्यामुळें रसक्षयाचीं लक्षणें उत्पन्न होऊन संशोष होतो.) अंगावर श्वेतवर्ण पिडिका वा मंडलें उमटतात.

अमिश्रीभूत सन्निपात

वाग्भट व सुश्रुत यानी अमिश्रीभूत दोषज सन्निपात या प्रकारच एक सन्निपात विशेष वर्णिला आहे.

अन्यच्च सन्निपातोत्थो यत्र पित्तं पृथक् स्थितम् ।
त्वचि कोष्ठेऽथवा दाहं विदधाति पुरोऽनु वा ॥
तद्वद्वातकफौ शीतं, दाहार्दिर्दुस्तरस्तयो: ।

स: अन्यशब्दार्थोऽन्यदित्ययं निपात: । अपरोऽयं सन्नि-
पातोत्थो ज्वर: । यत्र सन्निपाते पित्तं वातकफाभ्यां पृथक्-
भिन्नं, स्थितं सत् त्वच्यथवा कदाचित् कोष्ठे दाहं करोति ।
कथम् ? पुरोऽनु वा-पूर्व पश्चाद्वा । अथवेति स्थानविशेषा-
भिधायिपदसमीपे श्रूयमाणं स्थानविशेषे विकल्पं करोति ।
पुरोऽनुवेत्यत्र कालविशेषाभिधायिपदसमीपे श्रूयमाणं कालं
विकल्पयति । तत्र त्वयं विशेष: त्वचि स्थितं बहिरधिकं
दाहं करोति अन्तरल्पम् । कोष्ठे तु स्थितमन्तरधिकम्
बहि: स्वल्पमिति । तदित्यनेन पित्तं परामृश्यते । [तद्वत्]
पित्तेन तुल्यम् । यथा पित्तं परापृथक् स्थितं त्वचि कोष्ठेऽ
थवा दाहं करोति पुरोऽनु वा तथैव वातकफौ त्वचि
कोष्ठेऽथवा पुरोऽनु वा शीतं विदधत:, इति द्विविधोऽयं
सन्निपात: । तयो: शीतादिदाहाद्यो: सन्निपातयोर्मध्ये, यो
दाहादि: सन्निपात: स दुस्तर: कृच्छ्रसाध्य: इत्यर्थ: ।
केचित्तु शीतादि: शीतार्तो दाहादिर्हाहार्त इति द्विधा
(चतुर्धा) सन्निपातं समगिरन् ।

आ. र. अमिश्रीभूतदोषजसन्निपातज्वरमाह अन्यच्चेति ।
स चतुर्धा त्वग्गतपित्तकोष्टगतवातकफज:, त्वग्गतवातकफ-
कोष्ठगतपित्तजश्चैति । तौ पृथक्द्विधेति । तयोर्मध्ये
दाहादि: पित्तकार्यपूर्वको दुस्तर: । तत्रापि कोष्ठगतपित्त
कार्यपूर्वक: इति ज्ञेयम् ।
सटीक (दोन्ही टीका) वा. नि. २-३५ पान ४५३

त्वक्स्थौ श्लेष्मानिलौ शीतमादौ जनयतो ज्वरे ।
तयो: प्रशान्तयो: पित्तमन्ते दाहं करोति च ॥
करोत्यादौ तथा पित्तं त्वक्स्थं दाहमतीव च ।
प्रशान्ते कुरुतस्तमिंश्छीतमन्ते च तावपि ॥
तावेतौ दाहशीतादी ज्वरौ संसर्गतौ स्मृतौ ।
दाहपूर्वस्तयो: कष्ट: कृच्छ्‍साध्यश्च स स्मृत: ॥

अत: परं सततादीनां शीतदाहपूर्वत्वेन द्वैविध्यमाहत्वक्स्था-
वित्यादि । तयो: श्लेष्मानिलयो:; प्रशान्तयो: स्वकालाप-
गमात् प्रत्यनीकप्राप्त्या वा । अन्ते दाहं करोति चेत्यत्र
चकारात् मोहमूर्च्छादय: । तस्मिन् पित्ते । तावपि श्लेष्मा-
निलौ; अपिशब्दात् वमथुतन्द्रादय: । यद्यप्येतौ ज्वरौ
दोषत्रयजौ तथाऽप्यत्र दोषद्वयोक्त्या संसर्गजावित्त्युक्तं, एक-
कार्यकरत्वात्कफवातयोरेकेन व्यपदेशाद्वेत्यन्ये । द्वयो: दाह-
पूर्वशीतपूर्वकयो: । कष्ट: कृच्छ्रसाध्यश्चेति विशेषेणद्वयो-
पादानादत्यर्थ: दु:साध्यत्वं दर्शित् दाहपूर्वोऽत्यन्तकष्टसाध्य:;
शीतपूर्व: सुखसाध्य इति कुत: ? रोगशक्तेरचिन्त्यत्वात् ।
सटिक सु. उ. ३९-५९ ते ६१ पान ६७६

पित्त व कफवात हे निरनिराळ्या ठिकाणीं राहून व निरनिराळ्या प्रकाराने ज्वराचा आरंभ करुन एक प्रकारचा सन्निपात उत्पन्न करतात. स्थिति भेदानें दोन आणि लक्षणारंभाने दोन असे या सन्निपाताचे चार उपप्रकार होतात. वातकफ दोष त्वचेमध्यें व पित्त हें कोष्ठांत असा एक प्रकार, पित्त त्वचेमध्यें आणि वातकफ कोष्ठांत असा दुसरा प्रकार, वातकफामुळें आधीं थंडी वाजते, मागून दाह होतो असा तिसरा प्रकार. पित्तामुळें आधीं दाह होतो व मागून थंडी वाजते असा चवथा प्रकार.

टीकाकारांनी वरील प्रमाणें चार उपप्रकार सुचविले असले तरी आम्हाला पहिल दोन प्रकार हेच या सन्निपाताचे खरे भेद होत असे वाटते. पित्त किंवा कफवात हे त्वचेत असतील त्याप्रमाणें प्रथम दाह होणें वा प्रथम थंडी वाजणें अशी लक्षणें या ज्वरांत असतात. वाग्भटानें द्विवचन वापरुन दोनच प्रकार सुचविलेले आहेत.

अरुणदत्तानेंहि `केचित्' या पदानें चार उपप्रकार मानणार्‍यांपेक्षां स्वत:चें मत निराळें असल्याचें सुचविले आहे.

शीतादौ तत्र पित्तेन कफे स्यन्दितहोषिते ।
शीते शान्तेऽम्लको मूर्च्छा मदस्तृष्णा च जायते ॥
शीतादौ तत्र-तस्मिन् सन्निपाते पित्तेन कर्त्रा कफे स्यन्दिते
स्त्राविते, शोषिते च ग्रीष्म इव खरदिनकरकरतापेन हिम
इव, तथा शीते शान्ते चार्थाद्दाह उपजायते । अम्लकादयश्च
चत्वार: स्यु: । पित्तेनेति कर्तरि तृतीया । अत एव च
बलतत्वेन प्राधान्यात् कफं स्त्रावयति शोषयति चेति ।
अम्लोद्गिरणं-अम्लक: ।
वा. नि. २-३६ स. टीकेसह पान ४५३

दाहादौ पुनरन्ते स्युस्तन्द्राष्टीववमिक्लमा: ।
दाह आदिर्यस्मिन् स दाहादि:। शीतावसान इत्यर्थाद्गम्यते ।
दाहादौ च सन्निपातेऽस्य दाहस्यान्ते अवसानें, तन्द्रादयो
भवन्ति । दाहकारिपित्तस्यनिद्तेनैव कफेन शमिते पित्ते
कफोद्रेकादेव कफजास्तन्द्रादयो भवन्ति ।
वा.नि. २-३७ स. टीकेसह पान ३५३

वातकफ़ त्वचेंत असणा‍र्‍या व थंडी वाजून आरंभ होणार्‍या ज्वरामध्यें कोष्ठांतील पित्ताच्या उष्णतेनें कफ़ाची लक्षणें बाधित होऊन थंडी वाजण्याचे थांबतांच दाह सुरू होतो. घशाशीं आंबट येणें, मूर्च्छा, मद, तृष्णा हीं लक्षणें उत्पन्न होतात. दाहाने आरंभ होणार्‍या ज्वरामध्यें कोष्ठांतील वातकफ़ानें पित्ताचीं लक्षणें बाधित होऊन शीत, तंद्रा. कफष्ठीवन, छर्दी, क्लम हीं लक्षणें उत्पन्न होतात. वाग्भटानें दाहादि सन्निपात शीतादि सन्निपातापेक्षां अधिक कष्टदायक मानला आहे. पित्तकोष्ठांतून बाहेर गेल्यामुळें आमाच्या वा दोषांच्या पचनाची शक्यता अधिकच कमी होते, त्यामुळें दुस्तरता वाढते असें म्हणतां येईल.

तृणपुष्पक

सुश्रुतावरील टीकेंत ज्वर प्रकरणीं डल्हणानें तृणपुष्पक या नांवाचा एक सन्निपात सुश्रुतांतील प्रक्षिप्तभाग या नांवानें उल्लेखिला आहे. पर्वतांच्या समीपते मुळें किंवा विषारी पुष्पगंधामुळें उत्पन्न होणार्‍या सन्निपाताचें हें एक वेगळें वर्णन आहे.

पुष्पेभ्यो गन्धरजसि तेजस्विभ्यो यदाऽनिल: ।
उपादाय मनुष्यस्य प्राणापानौ नियच्छति ।
सौक्ष्म्यादनुसृतौ धातून् मर्माण्यपि च तेजसा ।
कर्म चित्तं बलं ज्ञानं तदा‍ऽस्याभ्येति मारुत: ।
कर्मादिषु निरुद्धेषु स्वपितीति सुहृज्जन: ।
मन्यते हतचित्तत्वादोजस्युपरते सति ।
तस्यादित: शिरोरोग: ससंज्ञस्येव जायते ।
विगन्धं च सुगन्धं च दृष्टाऽकस्मात् स मूर्च्छति ।
तृणपुष्कमित्येवं ज्वरं विद्याद्विचक्षण: ।
टीका सु. उ. ३९-४२ पान ६७४

तेजयुक्त फुलांचें गंध वा रज:कण (उष्ण तीक्ष्ण गुणात्मक) वार्‍याबरोबर वाहात येऊन मनुष्याच्या श्वासोच्छ्‍वासामध्यें मिसळतात ते अत्यंत सूक्ष्म असे असल्यामुळें कर्म, चित्त, बल व ज्ञान यांचा उपरोध होतों. हालचाली नाहींशा झाल्यामुळें रोगी स्वस्थ झोपला आहे असें वाटतें रुग्ण जागा होतांच शिर:शूल व वैचित्य हीं लक्षणें दिसतात. कोणत्याहि प्रकारचा वास आला असता रोग्याला त्वरित मूर्च्छा येते. सन्निपाताच्या या प्रकाराला तृणपुष्पक असें म्हणतात.

सन्निपात ज्वरांचे हीन, मध्य, अधिक भेदानें, एकोल्बण द्‍व्युल्बण व सम अशा भेदानें जे तेरा प्रकार केले आहेत, तसेच योगरत्नाकर, वंगसेन, भावप्रकाश वा टीकाकारनें उल्लेखिलेले भालुकीतत्रं, यांतील विविध नाम भेदानें आलेले प्रकार, या सर्वांचा विचार करतां सन्निपातासंबंधीं एक प्रकारची दुर्बोध गूढता जाणवते. वर्गीकरणामागील कारणमीमांसा प्रत्यक्ष प्रमाणांच्या दृष्टीनें व अनुमानाच्या दृष्टीनेंहि न लक्षांत येणारी आहे.
या वर्गीकरणामध्यें विविध प्रकारचे लक्षणसमुच्चय सांगितले आहेत आणि ते मात्र फार महत्त्वाचें आहेत असें म्हटलें पाहिजे. या वर्गीकरणामध्यें प्रत्येक सन्निपात एक एक लक्षण तरी अत्यंत महत्त्वाचें म्हणून सांगितलें आहे. आणि सन्निपात ज्वरांत आढळणारी जी विविधता ती या प्रकाररुपानें स्पष्ट केली आहे. असें म्हणतां येतें. योगरत्नाकर, भावप्रकाश यामध्यें आलेली १३ नांवें तर त्या त्या प्रकारांत आढळणार्‍या विशिष्ट लक्षणावरुनच दिली गेलीं आहेत असें दिसतें. या व्यतिरिक्त इतर प्रकारामध्येंहि पक्षवध होणें, मुख आळता लावल्याप्रमाणें लाल होणें; आंत्र, फुफ्फुस यांचा पाक होऊन शोणित वा पूय यांची प्रवृत्ती होणें, मान ताठणें, डोळे हालणें, डोळे तारवटणें, शरीर ताठ गंभीर स्वरुपाचीं लक्षणें प्रत्यक्षांत अनेकवेळां आढळून येतात त्यांचें वर्गीकरण या ठिकाणीं झालें आहे. या महत्त्वाच्या लक्षणांच्या जोडीनें असणारी लक्षणेंहि कांहीं प्रमाणांत घडलेल्या संप्राप्तीला अनुकूल अशीच आहेत. निरनिराळ्या अनुभवी तज्ज्ञांनीं सन्निपातज्वर प्रकरणीं त्यांना आलेल्या अनुभवाची नोंद या वर्गीकरणाच्या रुपाने केली असलीं पाहिजे. ``विकृतौ नियमो नास्ति !'' या सिद्धांताप्रमाणें या विविधतेचें स्वरुप अनेक प्रकारचे संभवणें स्वाभाविक असेंच आहे.

आगंतु ज्वर

आगन्तुरष्टमो यस्तु स निर्दिष्टश्चतुर्विध: ।
अभिघाताभिषड्गाभ्यामभिचाराभिशापत: ॥
च. चि. ३-१११ पान ९०९

अभिघाताभिषड्गाभिचाराभिशापेभ्य आगन्तुर्हि व्यथापूर्वाऽ
ष्टमो ज्वरो भवति ।
आगन्तुज्वरमाह=अभिघातेत्यादि । अभिघातो=लगुडाद्य-
भिघात: । अभिषड्ग:=कामाद्यभिषड्ग: । अभिचारोऽथर्व-
मन्त्रादि: ज्वरकर: । अभिशापस्तु=गुरुसिद्धाद्यभिशपनम् ।
एतत् प्रधानत्वेन चतुर्विधं कारणमिहोक्तम् । तेन-ओषधि-
गन्धभूताभिषड्गदुष्टग्रहनिरीक्षणादयोऽप्यागन्तुज्वरहेतवो
बोद्धव्या: । किंवा, अभिघातग्रहणेन शरीराभिहननवाचिनोऽ
सात्म्यगन्धादयो ग्राह्या: अभिषड्गेण तु भूताभिषड्गादया:
व्यथापूर्वमिति-आगन्तौ प्रथमं व्यथा भवति पश्चाद्दोषानु-
बन्धकृतानि लक्षणानिति दर्शयति । किंवा-व्यथापूर्वम् इति-
वचनात् आगन्तौ ज्वरे व्यथैव पूर्वरुपमिति । रुपं तु यदेव
ज्वरस्य प्रत्यात्मिकं सन्तापरुपम्, तदेव वातज्वरादिलक्षण-
रहितं बोद्धव्यं प्रथमत:, उत्तरकालीनदोषानुबन्धे तु यथा-
वक्ष्यमाणदोषलिड्गान्येव भवन्ति । अष्टम इति वचनेना-
भिघातादिहेतुचतुष्टययोगप्राप्तं चातुर्विध्यं निषेध्य व्यथा-
पूर्वकत्वेनैकरुपयोगादेकविधत्वं चतुर्णां दर्शयति चातुर्विध्ये
ह्यागन्तोर्नाष्टमत्वम्, नवमत्वादयोऽपि स्यु: ।
सटिक च. नि. १-३४ पान ४२९

आगंतुकारणानें उत्पन्न होणारा ज्वराचा जो आठवा प्रकार त्यामध्यें अभिघातज, अभिषंगज, अभिचारज आणि अभिशापज असे चार उपप्रकार संभवतात. त्यांत व्यथा आधीं व मागून दोषानुबंध होतो. ``स किंचित्काल आगंतु: केवलो भूत्वा पश्चात् दोषै: अनुबध्यते ।'' असें चरकवचन आहे (च. नि. १.२५) यावर टीका लिहिताना चक्रपाणीनें कांहीं लोक `थोडा वेळ' याचा अर्थ तीन दिवस, सात दिवस असा करतात असें म्हटलें आहे. अर्थातच `किंचित्काल' याची व्याप्ती तीन दिवस वा सात दिवसापर्यंत लांविवणें विचित्र व मुळातच विसंगत वाटण्याची शक्यता आहे. तीन दिवस वा सात दिवस ही जास्तीत जास्त मर्यादा घ्यावी म्हणजे विसंगती न वाटतां प्रश्न सुटेल.

दोषानुबंध होण्याकरितां तीन दिवस व्हावेच लागतात असें नसून तीन वा सात दिवसानंतर कां होईना दोषानुबंध होतोच असा याचा अर्थ आहे. अभिघातासारख्या कारणामध्यें शोथ, शूलादि लक्षणें अभिघात झाल्यानंतर तत्क्षणींच उत्पन्न न होतां बर्‍याच उशीरा उत्पन्न होतात असा अनुभव आहे.

N/A

References : N/A
Last Updated : July 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP