मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड पहिला|रसवहस्त्रोतस्| ध्वसंक-विक्षय रसवहस्त्रोतस् रसाचें स्वरुप लक्षणें व कारणें ज्वर ज्वर अभिघातज ज्वर अभिषंगज ज्वर भूताभिषंगज ज्वर अभिचार अभिशापज विधिभेदानें ज्वरभेद आलस्य पांडुरोग आमवात ऊरुस्तंभ धमनीप्ररिचय सिरागत वात जनपदोध्वंस मदात्यय ध्वसंक-विक्षय त्वग्गतवात पलित दग्धव्याधी कोष्टक रसवहस्त्रोतस् - ध्वसंक-विक्षय धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते. Tags : ayurvedmedicinevyadheeआयुर्वेदव्याधी ध्वसंक-विक्षय Translation - भाषांतर ध्वसंक-विक्षयमुक्त्वा मद्यं पिबेत्तु य: ।सहसाऽनुचितं वाऽन्यत्तस्य ध्वंसकविक्षयौ ॥भवेतां मारुतात्कष्टौ दुर्बलस्य विशेषत: ।ध्वंसके श्लेष्मनिष्ठीव: कंण्ठशोषोऽतिनिद्रता ।शब्दासहत्वं तन्द्रा च ॥विक्षयेऽड्गशिरोतिरुक् ।हृत्कण्ठोरोग: सम्मोह: कासतृष्णा वमिर्ज्वर: ॥वा. नि. ६-२० ते २२असात्म्य अनुचित असे मद्य अधिक प्रमाणांत प्राशन केल्यामुळें दुर्बल व्यक्तीच्या ठिकाणी ध्वंसक व विक्षय असे दोन व्याधी उत्पन्न होतात असे वाग्भटानें सांगितले आहे. ध्वंसकामध्ये कफनिष्ठीवन कंठशोष, अतिनिद्रा तंद्रा शब्दासहत्व हीं लक्षणें असतात. विक्षयामध्ये अंगमर्द, अतिशिर:शूल हृद्कंठरोध, संमोह कास तृष्णा छर्दि आणि ज्वर लक्षणें असतात. उपद्रव हिक्काज्वरो वमथुवेपथुपार्श्वशूला: कासभ्रमावपि च पानहतं भजन्ते ॥सु. उ. ४७-२३ पान ७४३हिक्का ज्वर छर्दि कम्प पार्श्वशूल कास भ्रम हे उपद्रव मदात्ययामध्यें होतात. उदर्क विद्रधी, अभ्यंतर विद्रधि (विशेषत: यकृताचे) अभ्य़ंतर विद्रधीच्या कारणामध्यें चरकानें बहुमद्यपानाचा उल्लेख केलेला आहे. (च. सू. १७-९२) बहुमद्यपान हे रक्तप्रदूषण ही आहे त्यामुळें रक्तवहस्त्रोतसाचें मूळ जे यकृत त्याची विकृति मद्यपानानें विशेषकरुन होते. साध्यासाध्यविवेक हीनोत्तरौष्ठमतिशीतममन्ददाहं तैलप्रभास्यमति (पि) पानहतं विजह्यात् ।जिह्वौष्ठदन्तमसितं त्वथवाऽपि नीलंपीते च यस्य नयने रुधिरप्रभे च ॥इदानीमसाध्यलक्षणमाह-हीनोत्तरौष्ठमित्यादि । हीनोत्तरौष्ठ: स्वभावौष्ठादल्प्ष्ट: । अमन्ददाहं तीव्रदाहम् । कदाचिदति-शीतं कदाचित्तीव्रदाहम् । पानहतं पानपीडितम् । विजह्यात् त्यजेत् । असितं कृष्णम् । पीते पीतवर्णे ।सटीक सु. उ. ४७-२२ पान ७४३वरचा ओठ लहान होणे (खालचा ओठ लोंबणे) अंग गार पडणें अतिशय आग होणे तोंडावर तेलकटपणा दिसणें. जीभ ओठ दांत निळेकाळे होणें डोळे पिवळे वा तांबडे होणें या लक्षणानी युक्त असा रोगी असाध्य समजावा. चिकित्सासूत्रेंयथा नरेन्द्रोपहतस्य कस्यचिद् -भवेत् प्रसादस्तत् एव नान्यत: ॥ध्रुवं तथा मद्यरतस्य देहिनो भवेत् प्रसादस्तत एव नान्यत: ।सु. उ. ४७-४८ पान ७४६रसवन्ति च भोज्यानि यथास्वमवचारयेत् ।पानकानि सुशीतानि हृद्यानि सुरभीणि च ॥सु. उ. ४७-५३ पान ७४६तस्य मद्यविदग्धस्य वातपित्ताधिकस्य च ।ग्रीष्मोपतप्तस्य तरोर्थधा वर्षा तथा पय: ॥म. वि. २४-१९७ पान १३७८मदात्ययाचे विकार नाहीसें करण्यासाठीं निराळ्या प्रकारचे मद्यच औषधीयुक्त करुन वापरावे लागते. मद्याचा वेग कमी झाल्यावर रुचकर मधुर रसात्मक तत् तत् दोषप्रत्यनीक अशी आहार द्रव्यें - द्राक्ष डाळींब यांच्यापासून तयार केलेली पानके वापरावीत. मदात्ययासाठीं केवल दुग्धपान करावे त्यामुळें वातपित्त दोष व मद्यविकार यांचे शमन होते. दोष व लक्षणें यांचा विचार करुन मदात्ययामध्यें वमन द्यावे. (च. चि. २४-१६४)तीक्ष्ण उष्ण विदाही पदार्थ वर्ज्य करावे. द्रव, शर्करा घृतयुक्त आहार द्यावा. N/A References : N/A Last Updated : July 24, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP