रसवहस्त्रोतस् - ज्वर अभिषंगज

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.कामशोकभयक्रोधैरभिषक्तस्य यो ज्वर: ।
सोऽभिषड्गज्वरो ज्ञेयो यश्च भूताभिषड्गज: ॥
कामशोकभयाद्वायु:, क्रोधात्पित्तं, त्रयोमला: ।
भूताभिषड्गात् कुप्यन्ति भूतसामान्यलक्षणा: ॥
भूताधिकारे व्याख्यातं तदष्टविधलक्षणम् ।
विषवृक्षानिलस्पर्शात्तथाऽन्यैर्विषसंभवै: ॥
अभिषक्तस्य चाप्याहुर्ज्वरमेकेऽभिषड्गजम् ।
चिकित्सया विषघ्न्यैव स शर्म लभते नर: ॥
च. चि. ३-११४, ते ०१७ पान ९१०

ध्याननि:श्वासबहुलं लिड्गं कामज्वरे स्मृतम् ।
शोकजे बाष्पबहुलं त्रासप्रायं भयज्वरे ॥
क्रोधजे बहुसंरम्भं भूतावेशे त्वमानुषम् ।
मूर्च्छामोहमदग्लानिभूयिष्ठं विषसंभवे ॥
केषाञ्चिदेषां लिड्गानां संतापो जायते पुर: ।
पश्चात्तुल्यं तु केषांञ्चिदेषु कामज्वरादिषु ॥
कामादिजानामुद्दिष्टं ज्वराणां यद्विशेषणम् ।
कामादिजानां रोगाणामन्येषामपि तत् स्मृतम् ॥
च. चि. ३-१२२ ते १२५ पान ९१०

ग्रहावेशौषधिविषक्रोधभीशोककामज: ।
अभिषड्गात्
वा. नि. २-४० पान ४५४

गहादौ सन्निपातस्य भयादौ मरुतस्त्रये ।
कोप: कोपेऽपि पित्तस्य ॥
ग्रहादौ त्रये-ज्वरे ग्रहावेशौषधिविषसन्निपातस्य कोप: ।
भयादौ त्रये-ज्वरे ग्रहावेशौषधिविषसन्निपातस्य कोप: ।
भयादौ त्रये-भीशोककामजे ज्वरे, मारुतस्य कोप: । कोपे
पित्तस्य [कोप:] । अपिशब्दाद्‍वातस्यापि कोप इति ।
वा. नि. २-४३ स. टीकेसह पान ४५४

काम, शोक, भय, क्रोध, इत्यादि मानसिक विकार, विषप्रयोग व भूतबाधा या कारणांनीं उत्पन्न झालेल्या व्याधीस अभिषंगजज्वर असें म्हणतात. कामशोक भयामुळें वातप्रकोप होतो. क्रोधामुळें पित्तप्रकोप होतो. आणि (विषसेवन) व भूतबाधा यामुळें तीनहि दोषांच प्रकोप होतो.

कामज्वर

कामाद्‍भ्रंमोऽरुचिर्दाहो ह्रीनिद्राधीधृति क्षय:॥
वा.नि. २।४२, पान ४५४

प्रियकर वा प्रेयसी यांना परस्परांच्या मीलनाची उत्कट अपेक्षा असतांहि विरह सहन करावा लागल्यामुळें मन प्रक्षुब्ध होऊन ज्वर उत्पन्न होतो. या अवस्थेंत तोंडाला चव नसतें, दाह होतो, लज्जा, निद्रा, बुध्दी, धैर्य हे भाव नष्ट्प्राय होतात. इष्ट व्यक्तीचें स्मरण चिंतन करणें, निश्वास टाकणें अशीं लक्षणें असतात या स्थितीचें काव्यगंथांतून मोठें मनोरंजक वर्णन येत असते.

शोकज

प्रिय व्यक्तीचा मूत्यू किंवा दुर्धर आपत्ती यामुळें झालेल्या शोकानें मन प्रक्षुब्ध होऊन हा व्याधी उत्पन्न होतो. या मध्यें अश्रु वाहाणें, दैन्य असणें, बडबडणें हीं लक्षणें दिसतात.

भयज ज्वर

भीती उत्पन्न करणार्‍या कारणांनीं अतिशय भय वाटून मन प्रक्षुब्ध होतें. व ज्वर उत्पन्न होतो. लहान मुलांच्यामध्यें कांहीं वेळां या स्वरुपाचा विकार आढळून येतों. मधून मधून दचकणें, सारखे भयभीत असणें, अस्वस्थ वाटणें, बडबडणें हीं लक्षणें या व्याधींत असतात.

क्रोधज

क्रोधात् कंप: शिरोरुक् च । वा. नि. २-४२ क्रोधामुळें मन:क्षोभ होऊन पित्ताचा प्रकोप होतो व ज्वर येतों. त्यामध्यें कंप व शिर:शूल ही लक्षणें असतात.

विषज

ओषधीगन्धजे मूर्च्छा शिरोरुग्वमथु: क्षव: ।
विषान्मूर्च्छातिसारास्य श्यावतादाहहृद्गदा: ॥
वा. नि. २/४१ पान ४५४

या ज्वरामध्यें मूर्च्छा, मोह, मद, ग्लानी ही लक्षणें सामान्यत: असून विषाच्या प्रकार भेदानें इतरहि अतिसार, कंप, गात्रस्तंभ, दाह, अंग व तोंड काळे पडणें, हृदयामध्यें वेदना होणें डोळ्यांना विकृती येणें अशी लक्षणें होतात. विषयुक्त पुष्पांच्या गंधामुळें मूर्च्छा, शिर:शूल, छर्दी, शिंका ही लक्षणें उत्पन्न होतात.

N/A

References : N/A
Last Updated : July 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP