रसवहस्त्रोतस् - आमवात

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


तृष्णा, छर्दि, भ्रम, मूर्च्छा, हृद्रोग, मलावष्टंभ, जडता, आंत्रकूजन, आनाह, खंजत्व हे विकार आमवातामध्यें उपद्रव म्हणून होतात. कफस्थानें व्यापणें हा आमवाताचा विशेषस्वभाव असल्यानें आमवाताचा उपद्रव म्हणून हृद्रोग अनेक वेळा आढळतो. यासाठीं आरंभापासूनच काळजी घेतली पाहिजे.

उदर्क

संधिसंकोच, वक्रता, हृद्‍व्यथा.

व्याधिमुक्तीची लक्षणें

सांध्याच्या हालचाली पुर्णपणें प्रकृत होणें, अवघडल्यासारखे मुळीच न वाटणें, दौर्बल्य नाहीसें होणें ही व्याधिमुक्त्तीची लक्षणें समजावीत.

साध्यासाध्य विवेक

एकदोषानुग: साध्यो द्विदोषो याप्य उच्यते।
सर्वदेह्चर: शोथ: स कृच्छ्र: सान्निपातिक:॥
मा. नि. १२-पान २२१

एकदोषज आमवात साध्य असतो, द्विदोषज याप्य वा कष्टसाध्य असतो व त्रिदोषज वा ज्यामध्यें सर्व शरीरांतील सांधे सुजले आहेत असा सान्निपातिक आमवात कष्टसाध्य वा असाध्य होतो. ज्या आमवातांत हृद्‍ग्रहादि गंभीर लक्षणें उत्पन्न झाली आहेत तो व्याधी याप्य समजावा. वा असाध्य समजावा.

रिष्ट लक्षणें

हृद्रोग उत्पन्न होऊन श्वासादि लक्षणें दिसूं लागणें हें रिष्ट लक्षण मानावें.

चिकित्सा सूत्रें

लंघन स्वेदनं तिक्तदीपनानि कटूनि च ।
विरेचनं स्नेहपानं बस्तयश्चाममारुते ॥
यो. र. पान ४८६

रूक्ष: स्वेदो विधातव्यो वालुकापोटलैस्तथा ।
उपनाहाश्च कर्तव्यास्तेऽपि स्नेहविवर्जिता: ॥
यो. र. पान ४८६

आमवातगजेन्द्रस्य शरीरवनचारिण: ।
एक एवाग्रहणीर्हन्ता एरण्डस्नेहकेसरी ॥
यो. र. पान ४९९

`लंघन स्वेदन कटुतिक्तरसाची दीपनपाचन द्रव्यें, विरेचन आणि शेवटी सिद्धघृत तैले देऊन बस्ती, या क्रमानें उपचार करावे.' आमवातावर वालुकापोटलीनें रुक्षस्वेद करावा. किंवा स्नेहवर्जित उपनाह बांधावे. विरेचनासाठीं एरंडस्नेह वापरावा. एरंडस्नेह हे आमवातावरील प्रभावी औषध आहे. विरेचनासाठीं एरंडस्नेह वापरावा. एरंडस्नेह हे आमवातावरील प्रभावी औषध आहे.

कल्प

सहचर, रास्ना, गुळवेल, सुंठ, देवदार; एरंडमूळ, पुनर्नवा, गोखरुं, हरीतकी, अतिविषा, वत्सनाभ, ओवा, दशमूळ एरंडेल, सर्पगंधा खुरासनी ओवा. सिंहनादगुग्गुळ सहचरगुग्गुळ, महारास्नादिकाढा आमवातविध्वंसन रस वातविध्वंस वसंतकल्प.

अन्न

कुलत्थयूष - पेया - विलेपी. (त्रिकटु सिद्ध) बाजरीची भाकरी लसूण.

विहार

विश्रांति

यवा: कुलस्था: श्यामाका: कोद्रवा रक्तशालय: ।
वास्तुकं शिग्रु वर्षाभू; कारवेल्लं पटोलम् ॥
आर्द्रकं तप्तनीरं च लशुनं तक्रसंस्कृतम् ।
जाड्गलानां तथा मांसं सामवातगदे हितम् ॥
यो. र. पान ४९२

दधिमत्स्यगुडक्षीरोपोदिकामाषपिष्टकम् ।
दुष्टनीरं पूर्ववातं विरुद्धान्यशनानि च ॥
असात्म्यं वेगरोधं च जागरं विषमाशनम् ।
वर्जयेदामवातार्तो गुर्वभिष्यन्दकानि च ॥
यो. र. पान ४८२

पथ्य अपथ्य

यव, कुलित्थ, वरी, नाचणी, तांबडया साळी, शेवगा, कारली, पुनर्नवा, पडवळ, जांगलमांस, आलें, लसूण, उष्णजल हे आमवातांत पथ्य आहे. दही, मासे, गूळ, दूध, तळलेले अनारसे असे पदार्थ, उडीद पिठाचे पदार्थ, खसखस, नासलेल्या दुधाचे पदार्थ विरुद्ध, असात्म्य गुरु अभिष्यंदी पदार्थ जागरण, वेगावरोध, विषमाशन, अंगावर वारा घेणें ही अपथ्ये समजावी.

N/A

References : N/A
Last Updated : July 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP