मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ७ वा| अध्याय १२ वा स्कंध ७ वा सप्तम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा स्कंध ७ वा - अध्याय १२ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ७ वा - अध्याय १२ वा Translation - भाषांतर ९६गुरुगृहीं वास ब्रह्मचार्याप्रति। सर्वभावें त्यासी गुरुसेवा ॥१॥गुरु, अग्नि, सूर्य, विष्णुउपासना । गायत्रीचा जाणा जप तया ॥२॥मौनव्रतें संध्या त्रिकाल करावी । विद्या संपादावी नम्रभावें ॥३॥पाचारिती यदा तदा पाठ घ्यावा । आदि अंतीं व्हावा नमस्कार ॥४॥दंड कमंडलु कटिसूत्र जटा । बाणा आश्रमाचा सांभाळावा ॥५॥भिक्षा मागूनियां अर्पावी गुरुतें । आज्ञेवीण नसे भोजन त्या ॥६॥स्वस्वरुप साक्षात्कार न जोंवरी । स्वतंत्र तोंवरी नसे जीव ॥७॥आभासनिश्चय होतां अंतरांत । स्त्री-पुरुषभेद निघूनि जाई ॥८॥वासुदेव म्हणे गृहस्थ यतीही । हितार्थचि राही बंधनीं या ॥९॥९८यथाशक्य अध्ययनोत्तर अंतीं । दक्षिणा शक्य ती अर्पूनियां ॥१॥गुर्वाज्ञेनें अन्य आश्रमस्वीकार । करुनि उद्धार निज साधावा ॥२॥नैष्ठिकचि किंवा व्हावें ब्रह्मचारी । नित्य गुरुगृहीं करणें वास ॥३॥अग्नि, गुरु तेंवी भूतमात्रीं देव । पाहूनि सद्भाव वाढवावा ॥४॥कोणीही या धर्मे वर्ततां सद्भक्त । अंतीं मोक्षपद संपादील ॥५॥वासुदेव म्हणे ब्रह्मचर्यधर्म । ऐकूनियां धर्म मोद पावे ॥६॥९९वानप्रस्थ धर्म ऐकें आतां राया । महर्लोक तया सुलभ तेणें ॥१॥वनधान्यचि वा सूर्यतापें पक्व । कंद-मूळ फळ अन्न त्याचें ॥२॥गुहा कुटीवास द्वंद्वसहिष्णुत्व । नख रोम केश छेदूं नये ॥३॥देहशुद्धीस्तव कृत्रिम उपाय । योजूं नये देहसौंदर्यार्थ ॥४॥स्त्रुक् स्त्रुवा दंडकमंडलु आदि । स्वीकारुनि बुद्धि करणें स्थिर ॥५॥एक दोन वार्धक्यें वा मार्गी येतां विघ्न । करावें निरशन ऐशा वेळीं ॥७॥तत्तदिंद्रियांचा लय त्या त्या भूतीं । करुनियां शांति संपादावी ॥८॥वासुदेव म्हणे ऐसा शांतचित्त । होई शुद्धचित्त निजानंदें ॥९॥ N/A References : N/A Last Updated : November 19, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP