मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|निरंजन माधव|श्री ज्ञानेश्वरविजय|समाधि प्रकरण| अध्याय दहावा समाधि प्रकरण अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा उपसंहार समाधि प्रकरण - अध्याय दहावा निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे. Tags : niranjan madhavpoemsongकवितागाणीनिरंजन माधव अध्याय दहावा Translation - भाषांतर जातां निवृत्ति गुणसागर मूळपंथेंसोपान खंतियुत बोलत विठ्ठलातें ।सप्रेम गद्गद निजांतर आर्द्र झालें तैं सात्विकांकुर उदेजुनि वाक्य बोले ॥१॥’जे रामकृष्ण जन भाविसि तूंचि होसी तूं रामकृष्ण ह्मणतां भवबंध नासी ।तूं तोडिसी हृदय दीप घडोनि त्याचा तूं दाविसी परम मोक्ष-निधी सुखाचा ॥२॥तूंतें हरी नरहरी भवकेसरी रे प्रल्हाद भक्त वरदा ह्नणवोनि जे रे ।गातील ताळकर - दिव्य - मृदंग-घोषें त्यांचे अनंत जननोद्भव पाप नाशे ॥३॥त्यालागि मुक्ति वरिते हरि याच देहींहे भक्त नेच्छिति कदापि सुसुक्ति तेही ।तूझ्याचि दिव्यचरणांबुजरेणुला हें त्यामाजि मुक्तिशतसौख्य यथार्थ आहे ॥४॥यावीण मोक्ष गणिती नर तेचि मिथ्या येना जरी असल मोक्ष तयांसि पथ्या ।हा धन्य देश अपुल्या पदरेणुयोगें केला निवास सुख पाउनि पांडुरंगें ॥५॥दिल्ही समाधि अपुली निज ज्ञानदेवा केला स्वकीय तरि वासचि वासुदेवा ।गेले निवृत्ति गुरुनाथ पदासि तेही मी मात्र येक उरलों तव दास पाही ॥६॥म्यां या क्षितीवरि तयांविण काय कीजे सेवा असेल तरि सांगुनि धन्य कीजे ।सांगा विचार पुढती कवण्या प्रकारीं म्यां कंठिजे नरहरी तुमच्या विचारीं ॥७॥तैं बोलती त्रिजगतीपति विष्णु यातें ’सोपान तूंचि जगतीपति बा यथार्थे ।तूं तों चराचर - पिता प्रतितामहा तूं तूं वेदमार्ग-परिरक्षक नान्य बा तूं ॥८॥तूं गा विराट असतील हिरण्यगर्भ सारें चराचर दिसेचि तुझेंच गर्भ ।हें सर्व त्वांचि धरिलें सुतपप्रभोंव सामर्थ्य सर्वहि तुझेंचि असे स्वभावें ॥९॥तूं व्यापला पटसूत्र तसेंचि लोकीं त्यातें कळे जरि तुला निगमें विलोकी ।जे अंधबुद्धि भवपंकनिमग्न झाले त्यांचे कदां नुघडतील मदांध डोळे ॥१०॥धर्मा घडे क्षय तदां निरखोनि तीघे आह्मीच घेत अवतार पुन्हा विभागें ।मारुनि दुष्ट परिहारुनि पापकृत्या स्थापोनि सज्जन महापथधर्मसत्या ॥११॥हा खेळ सर्व करणेंचि अह्मांसि लोकीं आह्मी त्रिवर्ग तरि एकपणें असों कीं ।त्या पूर्ण एकचि चिदंबुधिचे तरंग तीघे असों स्वसुख केवळ अंतरंग ॥१२॥दावोनियां त्रिगुणभाव जनाचसाठी भिन्नत्व दावुनि करुं बहुलोकसृष्टी ।गंगा जरी त्रिविधमार्ग धरोनि गेली लोकत्रयी तदपि ते ह्मणिजे निराळी ॥१३॥तैसाचि मीं हरि सदाशिव तूं विधाता झालों त्रिवर्ग परि नाहिंच भेदवार्ता ।केलेंचि सर्व अवतार धरोनि कृत्या बौद्धादि दुष्टमत मोडुनियां असत्या ॥१४॥ऐशी हरीनिगदिताक्षरपंक्ति कानीं सोपान ऐकुनि मनीं अतिहर्ष मानी ।सप्रेमयुक्त मग पूर्णसुखें निवाला ।नाहीं दिसे स्थळ पुढें मग भाषणाला ॥१५॥तदां मुक्ताबायी नमुनि हरिपायी दृढमती करी स्तोत्रा ऐशा मधुरवचनीं प्रेमळवती ।’दयाळा तूं सत्यात्मक अससि सत्यव्रत हरी तदां सत्यानंदी विलससि परा तूं नरहरी ॥१६॥अगा सच्चिद्रूपा सकळ्धन तूं सत्य अमुचें ।जगीं सत्याकारें तुज निरखितां पातक खचे ।अहो विश्वाकारा अजित विभु नारायण हरी सदां सत्याब्धी तूं तुज सकळ हें सत्य लहरी ॥१७॥तुझ्या सत्यत्वीं हा सकळ रचला लोक दिसतो घडोनी सत्यात्मा दिनकरकरीं सत्य दिसतो । नभीं येकाचक्रें रथ फिरवितो सप्ततुरगें जगा स्थापी कर्मी पुनरपि समुद्रीं मग रिघे ॥१८॥महाकूर्मा पृष्टीवरि धरिसि हे शेष अवनी नये तूला कैसा शिण न मनिसी वीट अझुणी ।असा तूं सत्यातें अससि अवलंबोनि सुमना न देतां स्तंभातें रचिसिल विरिंच्यांडसदना ॥१९॥धरापृष्ठीं स्वर्गी अससि गगनीं ब्रह्मसदनीं सदां सत्याकारें म्हणुनि जग वर्ते दृढ गणी ।जधीं सत्याचा हा पथ विघडतो त्याच समयीं धरोनी देहातें वसविसिल सत्यें मग मही ॥२०॥पथीं सत्याचा या बहु तुज असे पक्ष जनका महाविषणू देवा अखिलजगभांगारकनका ।जगन्नाथा नाथा तुजविण जगा काय म्हणिजे तुझ्या रुपीं सारें रविकिरण तैसेंचि गणिजे ॥२१॥तुला ध्याती योगी परम वितरागी स्वविषयीं तुला प्रेमें गाती भजत अनुरागी स्वनिलयीं ।तुझी पूजा सारे करिति गणगंधर्व सुमनें सुराळी ते काळी वरुषति शिरीं दिव्यसुमनें ॥२२॥शिवाचा तूं आत्मा अससि सुरविश्राममठिका समस्तां योग्यांतें हरि सतत कल्पद्रुम तुका ।व्रतां सर्वांतेंही तुजविण नसे ठाव दुसरा तपस्व्यांचा स्वामी पुरविसि शिराणी सुखकरा ॥२३॥तुझ्या योगें तीर्थे सकळ घडलीं पावन जगीं समस्तां लोकांची हरोत कलुषें ते प्रतियुगी ।पुराणीं हे वाणी सकळ परिसों देव समुदे असे गाती देवा प्रकट महिमा हे श्रुति वदे ॥२४॥स्वभक्तांचा होसी परम कणवाळू गुणनिधी म्हणोनी तो झाला हरि तनय तूझा तरि विधी ।भवाब्धीचा तारुं परम गति तूं साधक जना म्हणोनी हें सारें जग अनुसरे पादभजना ॥२५॥जया वाटे देवा अतिकठिण संसार तरिजे तयांनीं निर्द्वंद्वें करुनि अमळा तूज भजिजे । महालक्ष्मीनाथा करिं मज अनाथावरि दया नुपेक्षी दातारा करिं धरिं परानंद उदया ॥२६॥अशा मुक्तायीच्या वदनकमळीं हे स्तुतिसुधा झरे वणीं तेव्हां हरिख हारचित्तासि बहुधा ।म्हणे ‘धालों बायी वदसिल अगायी ममगुणा वरा देतों घेयीं पुरविन तुझ्या येइल मना ॥२७॥’ म्हणे तैं मुक्तायी ‘तुजविण हरी कांहिच नसो तुझें घेणें देणें सकळ तुजपासींच निवसो ।तुझ्या पायीं राहो अचळ अमुचें प्रेमचि हरी तुझ्या दासासंगीं अमुप सुख देयीं नरहरी ’ ॥२८॥म्हणे मुक्तायीतें ‘परिस अमये गोष्टि वदतों पदीं माझ्या लागे नर तरि वरी मुक्तिपद तो ।न ये जन्मा कांही घडति शतकल्पें तरि पुन्हा अशा पावे माझ्या भजक सुख धामासि गहना ॥२९॥सुखें तूं मत्संगीं निवस जंव तारा मणि रवी असे पृथ्वी भूतें चरअचर घेवोनि अतनू ॥३०॥तुझ्या स्तोत्रा कोणी पढतिल तया मुक्ति सुजना त्वरें मी देता हें परमपद सारुप्य सगुणा ।’असा देवें केला बहुत परिचा लोभ सुकरें करें स्पर्शी गात्रें सुख निरखिलें तोषनिकरें ॥३१॥शालिनी.पुंडलीक तंव बोलति देवा । हात जोडुनि करी पदसेवा ।‘ऐकिजे ममवरें विनवीतों । वेदवेद्य अससी विभु तूं तों ॥३२॥नेणती श्रुति तरी तव पारा । शास्त्र - सज्जन -सुरांसि अपारा ।जाणवेल तरि काय वदावें । ज्यासि कंठगत हें भवदावें ॥३३॥तूं गुणार्णव हरी तुझ गातां । मौन येत वचनासि महंता ।वेद नेति ह्मणती मग कैंचा । शाहणा अणिक वर्णिल वाचा ॥३४॥शेष एक जगिं फार मुखांचा । भागला मग असा पर कैंचा ।कोण जाणल तुला जगदीशा । तूं अपार गुणनिर्गुण ईशा ॥३५॥भक्तकाज करुणाधन होसी । दिव्य देह असले बहु घेसी ।पावलासि मज या सुजनाथीं । पंढरीसि करिसी शुभवस्ती ॥३६॥भक्त सर्व भजती तुज देवा । ते अहर्निश तुझी पदसेवा ।इच्छिती अतुळ ते महिमेचे । तो असे कवण कीं तुज वंचे ॥३७॥तूं समान महिमा हरि ज्यांच्या । वर्णनीं न सकती मन वाचा ।वश्य तूज करिताति गुणानें । प्रेमबंध न घडे तुज तेणें ॥३८॥भीमरा सुखकरा शशिभागा । वेणुनाद-निकटीं निजरंगा ।लक्षिती तुजचि दृष्टि भरोनी । तिष्टसी कटितटावरि पाणी ॥३९॥गोपबाळक गडी हरि तूझे । बिणुनाद करिती अतिभोजें ।नाचती उडति कीर्तनरंगीं । तूजसी च रतले तवसंगी ॥४०॥दीनपाळ हरि एकचि होसी । वांछितार्थ सुजनांप्रति देशी ।तू जगत्त्रय गुरु भवतारु । सज्जनार्थचि तुझा अवतारु ॥४१॥अष्टविंशति युगें मजसाठीं । पंढरीस वससी जगजेठी ।भावलुब्ध भगवंत असा तूं । तूं अनादिनिघना जगहेत् ॥४२॥तूंचि होसिल त्रिलोकनियंता । स्वामि तूंचि सकळांसि अनंता ।तारिले बहुत लोक कळीचे । आपुल्या निजगुणें हरि साचे ॥४३॥क्षीरसिंधुतनयापति होसी । तूंविना अणिक मी गुणरासी ।कोण दैवत असे तरि नेणें । गातसें मममुखें तव गाणें ॥४४॥सांवळे सगुणतत्व दिसाया । जाहलासि जगिं पंढरिराया ।ब्रह्म तूंचि गुणहीन विठोबा । तूं अरुप अपरंपरतो बा ’ ॥४५॥यापरी स्तुति करी निजदास । पुंडलीक अतिभक्तिविलास ।त्या प्रसन्ननयनें हरि पाहे । प्रेमसिंधु कुरवाळित बाहे ॥४६॥धन्य धन्य ह्नणती हरि त्यातें । धन्य तूं भजक तूं प्रिय मातें ।या जगीं तुज असा दुसरा तो । भक्तिवंत गुणसाम्य न येतो ॥४७॥यापरीं बहुत भक्तगुणाची । वर्णना करिति श्रीधर वाचीं ।भक्तप्रेमळ हरीच ह्नणावा । अन्य कोण मग साम्य गणावा ॥४८॥भुजंगप्रयात.पुन्हां त्या स्थळीं सर्व भक्तोत्तमांतें । दिल्हीं भोजनें प्रेमयुक्तें अनंतें ।मनीं प्रेम तत्रापि ज्ञानेश्वराचें । निघेना तया सांडुनी चित्त याचें ॥४९॥तदां उद्भवें हात जोडोनि देवा । बरें प्रार्थिलें ऐकिजे वासुदेवा ।समाधीस देवोनि सोपानदेवा । पुढें पंढरी जायिजे देवदेवा ॥५०॥जसी ज्ञानदेवा दिल्ही हे समाधी । तसी यासि दीजे विभू वेदशब्दीं ।अशा प्रार्थनेलागिया चित्त द्यावें । पुढें तिष्ठत्या वैनतेया पहावें ॥५१॥अशी ऐकतां उद्धवाची सुवाणी । तदां संकटें दाटले चक्रपाणी ।ह्मणे एक अंशें वसे या ठिकाणीं । यया ज्ञानदेवार्थ तूं सत्य माने ॥५२॥तदां वेदघोषें महाप्रेमतोषें । ऋषी देवसद्भक्तमेळें विशेषें ।दिल्ही ज्ञानदेवासि देवें समाधी । जगत्कारणें विठ्ठलें तुर्यशब्दीं ॥५३॥पुढें पाहिला भक्त तो पन्नगारी । तदां स्वार झाला विभू दानवारी ।फडात्कार पक्षाचिया रम्यवातें । उडे फार तोषें गरुत्मा समर्थं ॥५४॥तदां पुंडलीकादि तो भक्तमेळा । बसे पुष्पकीं नादघोषें निघाला तुरें वाजती शंख भेरी नफेरी । सुरां किन्नरांच्या अनेकाप्रकारीं ॥५५॥तदां देव तेत्तीसकोटी विमानीं । ऋषी चालिले बैसले व्योमयानीं ।मिळाला जसा तो अळंदीस मेळा । तसा सर्व संवत्सरग्रामयाला ॥५६॥जवें पातले सर्व संवत्सरासी । हरी उत्तरे त्याक्षणीं भूमिदेशीं ।समस्तां सुरांसी समारंभ केला । जसा ज्ञानदेवीं तसा येथ झाला ॥५७॥दिठीं देखिली भूमि ते लक्षणोक्ता । कर्हा उत्तरेच्या तटीं ते प्रशस्ता ।खणाया समाधीस आरंभ केला । स्वयें विश्वकर्मा तदां सिद्ध झाला ॥५८॥बरीं शुद्ध सम्मार्जनें कुंकुमानें । सडे घातले गंधतोयें सुजाणें ।त्वरें जाण पीयूषसंप्रोक्षणातें । करी इंद्र संतोषवी श्रीहरीतें ॥५९॥तदां ब्राम्हणीं वेदपारायणांतें । सुतोषेंचि आरंभिलें प्रेमचित्तें ।महासामगानें उदंडाप्रकारीं । अतीसुस्वरें रंजवीती मुरारी ॥६०॥सुभेरी महाकिन्नरांच्या नरांच्या । बहू वाजती घोष गाजे सुरांचा ।जयोक्ती वदे सर्व तो भक्तमेळा । तदां थोर उत्साह तेथें उदेला ॥६१॥॥ इति श्रीज्ञानेश्वरविजयमहाकाव्ये समाधिवर्णने संवत्सरप्रवेशो नाम दशम:सर्ग: ॥ N/A References : N/A Last Updated : February 28, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP