मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८९ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ८९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६६ अध्याय ८९ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर ब्राह्मण उवाच - संकर्षणो वासुदेवः प्रद्युम्नो धन्विनां वरः । अनिरुद्धोऽप्रतिरथो न त्रातु शन्कुवन्ति यत् ॥३१॥ब्राह्मण म्हणे रे अविचक्षणा । बोलसी गोष्टी अप्रमाणा । पाहूनि आप्ली संभावना । चतुरें वचना बोलावें ॥८६॥जें भास्वता तम अलोट । तेथ खद्योता कें हुटहुट । अमृतें जो गद नव्हे नष्ट । त्या ओषधि पालट काय करी ॥८७॥तेंवि संकर्षण ईशावतार । श्रीकॄष्ण साक्षात् परमेश्वर । धनुर्धारांचा जो महेन्द्र । त्रिजगीं वीर प्रद्युम्न ॥८८॥अनिरुद्धहि अप्रतिरथ । ज्या सम कैसा सुभट समर्थ । ऋक्षीं अप्रतिम निशानाथ । शौर्यें तद्वत आगळा ॥८९॥हे जे न शक्ती रक्षण करूं । क्तेथ तूं कोठें सामान्य नरू । बोलसी तितुकें बालिशपर । तेंहि सादर अवधारीं ॥३९०॥तत्कथं नु भवान्कर्म दुष्कर जगदीश्वरैः । चिकीर्षसि त्वं बालिश्यात्तन्न श्रद्दध्महे वयम् ॥३२॥राम वासुदेव पद्युम्न । अनिरुद्ध ऐश्वर्यपूर्ण । सर्व जगाचें ईश्वर जाण । स्थितिभवनिधनकारक हे ॥९१॥ययांचेनि जें दुष्कर परम । यांसिं जे घडे अत्यंत विषम । तें तूं करूं इच्छिसी कैसें कर्म । प्रायशा भ्रम तुज जाला ॥९२॥बाळक जैसें बुद्धिरहित । चंद्रबिम्बा धरूं धांवत । तेंव मूर्खत्वें विचाररहित । बोलसी पुष्पवत् विहायसीं ॥९३॥गरुडा न घडे अतिक्रमण । तेथ कुक्कुटा कवण मान । विश्वास तव वाक्यीं म्हणोन । सर्वथा जाण मज नये ॥९४॥ बोलतां अधिकारानुसार । विश्वासती तेथ चतुर । प्रतीतिगत हा वाग्व्यापार । नव्हे असार आम्हांसी ॥३९५॥ईश्वरा दुष्कर जे कर्मसिद्धी । ते करूं म्हणसी बालिशबुद्धीं । तेथ न विश्वासूं आम्ही कधीं । मूर्खावादीं निश्चयेंसीं ॥९६॥यापरी तेजोभंगकर । ब्राह्मणाचीं वाक्यें उखर । ऐकूनि बोले सुभद्रावर । तें परिसें क्षितिधरशिरोमणि ॥९७॥अर्जुन उवाच - नाहं संकर्षणो ब्रह्मन्नकृष्णः कार्ष्णिरेव च । अहं वा अर्जुनो नाम अस्य वै गाण्डिवं धनुः ॥३३॥म्हणे रे ब्राह्मणा नासाबोंडी । धरूनि बुटबुटावें तांतोडीं । तुज काय कळे सुभटप्रौढी । शोकें वेढी तव बुद्धि ॥९८॥नेणोनि माझा पराक्रम । तूं वल्गना करिसी विषम । जाणसी घडतां परिणाम । पूर्ण काम जैं होसी ॥९९॥मी नव्हें सहसा संकर्षण । जो पळाला मागधा भेण । किंवा नव्हे रुक्मिणीरमण । कालयवनभयभीरु ॥४००॥कीं मी न होय तो प्रद्युम्न । शिवें जाळिला प्रक्षोभूत । कामुकीं ग्राम्यीं संचरून । युवति पुन करी कलुषी ॥१॥ना मी निश्चयें अनिरुद्ध । जो बाणासुरें केला बद्ध । मी अर्जुननामा वीर प्रसिद्ध । ज्याचें धनुष्य विजयद गाग्डीव ॥२॥मावमंस्था मम ब्रह्मन्वोर्यं त्र्यम्बकतोषणम् । मृत्युं विजित्य प्रवने आनेष्ये ते प्रजां प्रभो ॥३४॥म्यां शंकरेंसीं करूनि समर । जिंकिलें त्यातें प्रतिज्ञापर । तेणें तोषला तो मजवर । कृपा अपार करूनियां ॥३॥तें त्र्यंबकतोषणकर मम वीर्य । नको अवमानूं सांडोनि धैर्य । अवश्य करीन तुझें कार्य । जेणें आर्य मानवती ॥४॥अंतक जिंकूनि रणाङ्गणीं । तव प्रजा आणीन सत्य मानीं । तुझे हृद्भूवरी सुखलावणी । करीन जनीं भो द्विजवरा ॥४०५॥एवं विश्रंभितो विप्रः फाल्गुनेने परंतप । जगाम स्वगृहं प्रीथ पार्थवीर्यं निशामयन् ॥३५॥राया परंतपा भगवन्निष्ठा । एवं फाल्गुनें ब्राह्मणाभीष्टा । प्रौढ बोलूनि स्वप्रतिष्ठा । ब्राह्मणीं निष्ठा प्रकटिली ॥६॥यदुपुङ्गचां निराकरून । स्वपराक्रमा अभिवादून । विश्वासविला सुब्राह्मण । प्रजारक्षण आकाङ्क्षु ॥७॥मग तो पार्थवीर उद्दाम । ऐकत होत्साता तपोधाम । पार्थें होऊनि प्रीतिकाम । गेला सत्तम निजसदना ॥८॥यावरी पुढें उत्तरातनया । यथाकाळें ब्राह्मणजाया । पूर्ववत गुर्विणी जालिया । वर्तली चर्या ते ऐक ॥९॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP