मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८९ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ८९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६६ अध्याय ८९ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर एवं द्वितीयं विप्रर्षिस्तृतीयं त्वेवमेव च । विसृज्य स नृपद्वारि तां गाथां समगायत ॥२६॥प्रथमा समचि द्वितीय तृतीय । सुतकुणपातें विप्रवर्य । नवमपर्यंत सशोकहृदय । ठेवूनियां नृपद्वारीं ॥५४॥पूर्वोक्तवाक्यें दीर्घस्वरें । हाका मारूनि आक्रोशभरें । वारंवार सम्यक्प्रकारें । जाला तीव्रें बोलता ॥३५५॥परंतु तयासी प्रत्युत्तर । कोणीं न केलें अल्पमात्र । तंव शेवटीं वर्तलें विचित्र । तें कौतुक समग्र परिसिजे ॥५६॥तामर्जुन उपसृत्य कर्हिचित्केशवान्तिके । परेते नवमे बाले ब्राह्मणं समभाषत ॥२७॥मेला असतां नवम बाळ । मृत ततुलाय जवनशीळ । ठेवूनि नृपद्वारीं शोकाकुळ । बोलिला प्राञ्जळ ते गाथा ॥५७॥कीं भूपतीच्या दुष्कर्मदोषें । मृत्युसदनीं मत्संतान वसे । प्रायशा दुराचारी भूप ऐसे । तत्प्रजा विशेषें सीदती ॥५८॥ऐसी उच्चरवें विलापगाथा । यदुपुङ्गव बैसले असतां । पूर्ववत् गायिली द्विजें तत्त्वता । अति आर्तता प्रकटूनी ॥५९॥तंव अवचटें पाण्डववीर । धनंजयनामा महा शूर । यदुसंसदीं स्नेहप्रचुर । होता सादर हरिनिकटीं ॥३६०॥तो तये गाथेतें सकळ । परिसूनियां प्रतापशीळ ॥ब्राह्मणातें कृपावत्सल । बोलिला यदुकुळउपहासें ॥६१॥किंस्विद्ब्रह्मंस्त्वन्निवासे इह नास्ति धनुर्धरः । राजन्यबन्धुरेते वै ब्राह्मणाः सत्रमासते ॥२८॥अरे ब्राह्मणा व्यर्थ कां रुदसी । ग्रीष्मनिदाघीं निवों पाहसी । अश्मकीं मार्दवातें इच्छिसी । तरी केंवि होसी कृतार्थ ॥६२॥दंदनीं इच्छाफळ याचिलें । तें कल्पतरूवीण लाभे वहिलें । अर्कीं अमृता अभिलाषिलें । तरी वृथा गमलें मनोगत ॥६३॥तेंवि तूं आपुल्या दुःखहरणा । क्षितिधर क्षत्री म्हणोनि रुदना । येथें करिसी शोकें विलपना । मोहें परीक्शणा न करूनी ॥६४॥इये तुझिये निवासनगरीं । कोणी नाहींच धनुर्धारी । क्षतापासूनि रक्षी क्षेत्री । तो निर्धारीं मज न दिसे ॥३६५॥जेथ धनुर्धारीच नसे पुसता । तेथें ब्राह्मणाची कैंची वर्ता । जो प्राणासमान विप्रा आर्त्ता । रक्षी तत्वता धार्मिक ॥६६॥म्हणसी येथ हे सभेमाजी । बैसली इतुकी राजन्यराजी । तरी हे क्षत्रिय नव्हती जाण तूं आजी । जे ब्राह्मणकाजीं उपकरती ॥६७॥जेव्हां झाला स्वधर्मलोप । जातिवैगुण्या तैं आरोप । यास्तव तुजसारिखें हे भूप । दीनस्वरूप ब्राह्मण ॥६८॥हे इतुके ही क्षत्रकुलीन । जेंवि सत्रीं मिळाले ब्राह्मण । येथ तूं इच्छिसी प्रजारक्षण । तरी तें कोठूण घडेल ॥६९॥क्षत्रिय असोनि कैसे नव्हती । ऐसें मानिसी जरी तूं सुमती । तें ही कथितों मी तुजप्रती । संशयनिवृत्तीकारणें ॥३७०॥धनदारात्मजापृक्ता यत्र शोचन्ति ब्राह्मणाः । ते वै राजन्यवेषेण नटा जीवन्त्यसुम्भराः ॥२९॥राजपदवी जयांसी प्राप्त । तयांसि राजन्य हा संकेत । तयांचे राज्यीं शोकाभिभूत । जरी क्लेशयुक्त ब्राह्मण ॥७१॥न मिळे ब्राह्मणातें अन्न । व्यवहारार्थ काञ्चन धन । वर्षातपहिमवारणा सदन । वसनावीण पीडती ॥७२॥जायातनयावांचूनि श्रम । पावती केवळ द्विजोत्तम । त्यांचें न वारिती दुःख विषम । ते नटासम वेषधारी ॥७३॥जेंवि सोंगें घेऊनि जगीं नट । निर्ल्लज्जपणें भरिती पोट । तैसे प्राणपोषक राजे नष्ट । वृथापृष्ट अन्यायी ॥७४॥शोकें आक्रंदती ब्राह्मण । जीविका संपादिती आपण । ते नटांहूनि ही केवळ हीन । कीं रंजवूनि तेजिती ॥३७५॥यास्तव ऐसियां पुढें हाका । मारूनि वृथा कष्टसी तूं कां । जेंवि प्रेतापुढें करितां शोका । सान्तवी लोकां रडतयां ॥७६॥मज देखूनि तुझें दुःख । कळवळा आला असे देख । सामर्थ्य आसोनि जो वंचक । तोही एक पापात्मा ॥७७॥ऐसें बोलूनियां अर्जुन । भगवन् संबोधनें ब्राह्मण । संबोधूनि पुढें वचन । वदला संपूर्ण तें परिसा ॥७८॥अहं प्रजां वां भगवन्रक्षिष्ये दीनयोरिह । अनिस्तीर्णप्रतिज्ञोऽग्निं प्रवेक्ष्ये हतकल्मषः ॥३०॥तुम्ही स्त्रीपुरुषें अत्यंत दीन । मृतसंतानें शोकायमान । तुमचा भवतरु प्रजावीण । निष्फळ तो करीन मी सकळ ॥७९॥मी आपुल्या सामर्थ्यबळें । निधनीम रक्षीन तुमचीं बाळें । हीं प्रतिज्ञोत्तरें माझीं अचळें । तुवां सुशीळें जाणावीं ॥३८०॥जरी हे प्रतिज्ञा मी न निस्तरें । तरी पावकीं प्रवेशेन निर्धारें । करीन हे तूं जाण खरे । होईन तेणें निष्पाप ॥८१॥ब्राह्मणाचे विलापध्वनी । क्षत्रियें ऐकावे आपुले कानीं । वरिष्ठपातक ययाहूनि । नाहीं अवनीवरी कांहीं ॥८२॥आणि बोलिला बोल न कीजे साच । हेंही एनस त्याहूनि नीच । तें मी सेवूनि ज्योतिर्वर्च्च । अनृत वचन निस्तरीन ॥८३॥राया कुरुभूमंगळसूत्र । तव पितामह यदु सर्वज्ञ । देखता ब्राह्मण पवित्र । त्या वाग्निस्तारा बोलिला ॥८४॥तें ऐकोनि तो ब्राह्मण । धनंजयातें विचक्षण । देता जाला प्रतिवचन । तें तूं श्रवण करीं पां ॥३८५॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP