मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७२ वा| श्लोक ४६ ते ४९ अध्याय ७२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ७२ वा - श्लोक ४६ ते ४९ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४६ ते ४९ Translation - भाषांतर एकपादोरुवृषणकटिपृष्ठस्तनांसके । एकबाह्वक्षि भ्रूकर्णे शकले ददृशुः प्रजा ॥४६॥एक चरण गुडघा मांडी । ऊध्व आसुडितां दोर्दंडीं । तडतडाटें चिरली गांडी । फूटली कांडी चक्राची ॥८७॥एक वृषण अर्ध शिश्न । एक कटी एक जघन । पृष्ठ नाभि समसमान । एक स्तन एक खांदा ॥८८॥एक बाहु अर्ध नासिक । कर्ण नयन भ्रू एकैक । ब्रह्मरंध्रांत शकलें देख । जालीं सम्यक सम तुल्य ॥८९॥बळें उधडूनि शकलें केलीं । विपरीत द्विभागीं टाकिलीं । जनपदप्रजा देखती झाली । म्हणती भंगली नृपपदवी ॥२९०॥उपचारप्रद किंकरजन । प्रजा पौर जनपद आन । तिहीं नृपशकलें देखोन । शंखस्फुरण आदरिलें ॥९१॥हाहाकारो महानासीन्निहते मगधेश्वरे । पूजयामासतुर्भीमं परिरभ्य जयाच्युतौ ॥४७॥मोठा माजला हाहाकार । म्हणती हा भंगला महावीर । जरासंध मगधेश्वर । खचला मंदरगिरि जैसा ॥९२॥एकीं हाक नेली नगरीं । बोंब जाहली राजमंदिरीं । शोक करिती मागधनारी । आल्या बाहेरी प्रेतापे ॥९३॥शकलें कवळूनि विलपती वनिता । म्हणती अहो मगधनाथा । नृपैश्वर्य कवणा माथां । घालूनि जातां परलोका ॥९४॥गुह्यवृत्तान्त आम्हांप्रति । सांगूनि रंजवा परम प्रीति । आजी सांडूनि आमुची रति । सायुज्यमुक्ति आलिंगिली ॥२९५॥शत्रु याचितां ब्राह्मणवेषीं । प्राणभिक्षा वोपूनि त्यासी । तुम्हीं वरिलें सायुज्यतेसीं । निजसत्त्वासी न टळूनी ॥९६॥प्रजा म्हणती मागधराया । आमुच्या पाळणा उबगूनियां । तूं गेलासि कवण्या ठायां । उपेक्षूनियां राष्ट्रातें ॥९७॥अमात्य सचिव मंत्रिवर्ग । सुहृद इष्टमित्र जिवलग । शेटे महाजन आप्त अनेग । ह्मणती प्रसंग संपादा ॥९८॥मागधाचें कवळूनि प्रेत । ऐसे रडती जन समस्त । तंव येरीकडे पार्थाच्युत । आलिंगिती भीमातें ॥९९॥धन्य धन्य भीमा म्हणती । तुझी अभंग प्रतापशक्ति । नागायुतबळ मागधनृपति । उघडूनि कीर्ति माजविली ॥३००॥वारंवार हृदयीं भीमा । कवळूनि प्रेमें देती क्षेमा । म्हणती तुझिया बळाची सीमा । सहसा आम्हां न वर्णवे ॥१॥जयजयकारें विजयलाभ । साहूनि पार्थपंकजनाभ । म्हणती आजि वीरश्रीकोंभ । समूळ स्वयंभ उन्मळिला ॥२॥एकच्छत्री भूमंडळ । लाधला युधिष्ठिर भूपाळ । निष्कंतक वसुधातळ । झालें केवळ येथूनि ॥३॥सिद्धी गेलाच राजसूय । येथूनि झाला दृढ निश्चय । युधिष्ठिराचे वंदिती पाय । नृपसमुदाय भूतळींचे ॥४॥भीमार्जुनकृष्ण ऐसे । विजय वरूनि वीरश्रीतोषें । निर्भर वदती परमोल्लासें । मागधेशा संहरतां ॥३०५॥तंव येरीकडे जनपदश्रेष्ठ । अमात्य राजवर्गी वरिष्ठ । येऊनि वंदिती वैकुंठपीटः । याचिती अभीष्ट राज्यातें ॥६॥म्हणती नृपति नसतां भद्रीं । दस्यु तस्कर मातती राष्ट्रीं । यालागीं तुम्हां तिथांमाझारी । मागधराष्ट्रीं अभिषेका ॥७॥तिघांमाजी एक राजा । करूनि त्यासि निरवा प्रजा । मागधपतीच्या धर्मभाजा । प्रेतकाजा प्रवर्तवा ॥८॥ऐसी ऐकोनियां प्रार्थना । कृपा उपजली जनार्दना । मग तो म्हणे नृपनंदना । भेटी आणा मंत्री हो ॥९॥अभय लाहूनि भगवत्प्रद । सवेग जाऊनि मंत्रिवृंद । सहदेवनामा नव मागध । आणिला प्रसिद्ध भेटीतें ॥३१०॥सहदेवनामा मागधतनय । नमिता झाला श्रीकृष्णपाय । येरे देऊनि पूर्ण अभय । केला राय तें ऐका ॥११॥सहदेवं तत्तनयं भगवान्भूतभावनः । अभ्यषिंचदमेयात्मा मागधानां पतिं प्रभुः ॥४८॥मागधतनय तो सहदेव । प्रजा जनपद अमात्य सर्व । आज्ञापूनि केला राव । देऊनि गौरव मागधाचें ॥१२॥पाचारूनि श्रेष्ठ बाह्मण । ब्रह्मनिष्ठ जे तपोधन । त्यांच्या मंत्रीं पट्टाभिषेचन । केलें विधानपूर्वक पैं ॥१३॥सहदेव मगधेश्वराच्या भद्रीं । स्थापूनि छत्र धरिलें शिरीं । मुकुट कुंडलें युग्मचामरीं । श्रेष्ठ नृपवरीं मिरवला ॥१४॥त्यानंतरें कव्यवाहना । नृपकलेवर होमिलें जाण । पट्टमहिषी सहप्रयाणा । करित्या झाल्या ते काळीं ॥३१५॥सहदेव करूनि मगधपाळ । त्यातें आज्ञापी गोपाळ । तेंही निरूपण अळुमाळ । ऐका सकळ श्रोतेहो ॥१६॥मोचयांमास राजन्यान्संरुद्धा मागधेन ये ॥४९॥कृष्ण म्हणे गा मगधेश्वरा । ऐकें जरासंधाच्या कुमरा । आजि दुर्दैवकारागारा । पासून नृपवरां सोडावें ॥१७॥माझी आज्ञा वंदूनि माथां । कारागारीं नृपां समस्तां । मुक्त करूनि निरसिजे व्यथा । मानूनि आप्तां गौरविजे ॥१८॥दोनी अयुतें बळिष्ठ नृपती । मागधें रोधूनि रक्षिले निगुती । त्यांतें सोडवी रुक्मिणीपती । आज्ञासंकेतीं क्षणमात्रें ॥१९॥परम प्रतापी जरासंध । वदान्य ब्राह्मनभक्त अगाध । परंतु दुर्वृत्ततेचा बाध । जे केला रोध नृपांचा ॥३२०॥राजे जिंकिलिया समरंगीं । त्यांची फेडोनि अपमानधगी । मान देऊनि सोडिजे वेगीं । ऐसी मागी श्रेष्ठाची ॥२१॥प्रतापें जिंकूनि भूतळ । मित्र करूनियां भूपाळ । होऊनि सर्वांसि स्नेहाळ । जनकातुल्य वर्तावें ॥२२॥ऐसें सांडोनियां सद्वृत्त । मागध झाला पैं दुर्वृत्त । म्हणोनि त्याचा केला घात । नाहीं राज्यार्थ निर्दळिला ॥२३॥प्रकट कळावें हें जनांसी । म्हणोनि राज्य सहदेवासी । देता झाला हृषीकेषी । रुद्धनृपांसी सोडवुनी ॥२४॥दोनी अयुतें प्रतापी राजे । समरीं जिंकोनि वीरश्रीतेजें । गिरिद्रोणीमाजि सहजें । कोंडिले होते चिरकाळ ॥३२५॥तयांचें करवूनियां मोक्षण । नृपोपचारीं गौरवून । बोळविले तें व्याख्यान । परिसा वक्ष्यमाण अध्यायीं ॥२६॥द्विसप्ततितम संपला येथ । त्रिसप्ततितमाचा निरूपणार्थ । होतां राजसूय समाप्त । पावेल अंत शिशुपाळ ॥२७॥बहात्तरावियामाझारी । इतुकी कथा शुक वैखरी । वदला तैसी भाषेवारी । श्लोकाक्षरीं प्रकाशिली ॥२८॥अधिष्ठानींचा जो परमेष्ठी । प्रतिष्ठानीं गोदातटीं । श्रीएकनाथ विदुषां मुकुटीं । कोटीरकोटिरत्नमणि ॥२९॥तयाचिया पादोदकें । जिह्वा तिंबतां केवळ मुकें । बृहस्पतीतें जिंकूं शके । वक्तृत्वकौतुकें प्रज्ञेच्या ॥३३०॥तया श्रीप्रभूचे चरण । क्षाळूनि गौतमीचें अर्ण । पिपीलिकेसि येतां पूर्ण । केलें प्राशन दयार्णवें ॥३१॥तो हा तद्रसवाग्व्यापार । श्रोते वक्ते प्राश्निक चतुर । सेवूनि होती अजरामर । कैवल्यभद्रपरमेष्ठी ॥३३२॥इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां जरासंधवधोनाम द्विसप्ततितमोऽध्यायः ॥७२॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४९॥ ओवी संख्या ॥३३२॥ एवं संख्या ॥३८१॥ ( बहात्तरावा अध्याय मिळून ओवी संख्या ३३३१९ ) बहात्तरावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP