मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७२ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ७२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ७२ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर ततश्चटचटाशब्दो वज्रनिष्पेषसन्निभः । गदयोः क्षिप्तयो राजन्दंतयोरिवं दंतिनोः ॥३६॥त्यानंतरें परम क्रूर । उभयतांचे गदाप्रहार । व्रजासारिखे कठोर । अतिनिष्ठुर पडताती ॥३६॥गदेवरी वोढिती गदाघाया । हस्तलाघवें चपळ राया । चटचटाशब्द उमटती तया । उपमावया गजयुद्धा ॥३७॥जैसे कुञ्जर मदोन्मत्त । निकरें भिडती अरण्यांत । चटचटाशब्दें वाजती दंत । हेही तद्वत गदाप्रहार ॥३८॥दोघेही न धरिती मरणभया । नागायुतबळिष्ठ काया । समान सदट दोघांचिया । इच्छिती विजया परस्परें ॥३९॥वीरश्री बाणली दोघां आंगीं । निर्भय निःशंक भिडती रंगीं । गदा प्रेरिती बाहुवेगीं । मर्मविभागीं तें ऐका ॥२४०॥ते वै गदे भुजजवेन निपात्यमाने अन्योऽन्यतोंऽसकटिपादकरोरुजत्रून् । चूर्णीबभूवतुरुपेत्य यथार्कशाखे संयुद्ध्यतोर्द्विरदयोरिव दीप्तमन्यवोः ॥३७॥तया दोघांच्या उभय गदा । बाहुवेगें ताडिती विशदा । एकमेकांच्या अवयवभेदा । करितां खेदा न पवती ते ॥४१॥एकमेकांच्या खांदियांवरी । निकरें ताडिती गदाप्रहारीं । घाय वोढिती वरिच्यावरी । कटितट प्रहारीं शितरिती ॥४२॥मस्तकीं दावूनियां घाय । वंचनमार्गें ताडिती पाय । तेणें जघन चूर्णित होय । परि न धरिती भय मरणाचें ॥४३॥बाहु कोंपर मणगटें मुष्टी । लक्षूनि ताडिती जगजेठी । एकमेकांच्या अंगयष्टी । झोडिती हठी गदाप्रहारें ॥४४॥मन्यु म्हणिजे क्रोधानळ । तेणें प्रदीप्त जाले प्रबळ । हिमाचळावरी वज्रकल्लोळ । तेंवि विशाळ गदाप्रहार ॥२४५॥मांडिया मोडिती गदाघातीं । जत्रु म्हणिजे कंठप्रान्तीं । अग्रभागींच्या उभय अस्थी । चूर्ण करिती परस्परें ॥४६॥असो ऐसिया अवयसंधी । लक्षूनि ताडिती महाक्रोधी । जेंवि अर्कतरूचे सन्निधी । भिडिजे द्विरदीं महाक्रोधें ॥४७॥द्विरदय्युद्धाचे संघटनीं । अर्कशाखांची भंगाणी । तेंवि अवयव दोघीं जणीं । गदाप्रहरणीं भंगिजती ॥४८॥मदोन्मत्त कुञ्जर वनीं । तेंवि संघटिजे दोघीं जनीं । दोघांमाजि विषादाग्नि । प्रज्वळलेनि आवेशें ॥४९॥इत्थं तयोः प्रहतयोर्गदयोर्नृवीरौ क्रुद्धौ स्वमुष्टिभिरयःस्पर्शैरपिष्टाम् । शब्दस्तयोः प्रहरतोरिभयोरिवाऽसीन्निर्घातवज्रपरुषस्तलताडनोत्थ ॥३८॥ऐसे सक्रोध मानववीर । हाणित असतां गदाप्रहार । स्वमुष्टीचे स्पर्श कठोर । तिहीं चकचूर उभयाङ्गें ॥२५०॥उभय गजांचे दंतखडके । तेंवि उभय गदांचे धदके । विद्युत्पातासारिखे कडके । उठती चपेट घाताचे ॥५१॥तळताडनें उठती ध्वनी । जेंवि तडिद्वान मेघ गगनीं । तेंवि चपेटें मुष्टीच्या प्रहरणीं । भूमि दणाणी सशैल ॥५२॥एवं दोघे समान बळी । समान गदाशिक्षाशाळी । दोघे अभंग रणमंडळीं । हें परीक्षितीजवळी शुक सांगे ॥५३॥तयोरेवं प्रहरतोः समशिक्षाबलौजसोः । निर्विशेशमभूद्यूद्धमक्षीणजवयोर्नृप ॥३९॥ऐसिया भिडतया दोघांचे । बळप्रभाव समान साचे । शिक्षाअभ्यासशीळतेचे । समान वीर दोघेही ॥५४॥( येथे २५५ नं. नाही. ) कोण्ही कोण्हा न मेजती । कोण्हा कोण्ही न भंगती । समान वीरश्रीइंगितीं । आवेशवृत्ती समसाम्य ॥५६॥म्हणोनि निर्विशेष युद्ध । अक्षीण शक्ती अत्यंत क्रुद्ध । आवेश वेग अतिसुबद्ध । समान सन्नद्ध समरंगीं ॥५७॥कोण्ही कोण्हा न येती हारी । यालागिं युद्ध चिरकाळवरी । चपेटमुष्टिगदाप्रहारीं । करिती समरीं सावेश ॥५८॥राया म्हणसी किती दिवस । द्वंद्वयुद्धी केले त्यांस । ऐक कथितों तो विशेष । जें वदला व्यास मम जनक ॥५९॥एवं तयोर्महाराज युद्ध्यतोः सप्तविंशतिः । दिनानि निरगंस्तत्र सुहृद्वन्निशि तिष्ठतोः ॥४०॥सत्तावीस दिवसवरी । द्वंद्वंयुद्धाचिया कसुरी । ऐसे भिडतां महावीरीं । न येती हारीं परस्परें ॥२६०॥जिवलग सोयरे परम आप्त । तैसे निर्वैर रात्रीं सुप्त । कापट्यमळें न होती लिप्त । सदा सतृप्त स्वानंदें ॥६१॥निर्दोषयशाची करणें जोडी । धरूनि मानसीं हेचि आवडी । दिवसां भिडती प्रतापप्रौढी । निर्वाणगुढी उभयावया ॥६२॥भिडतां या रीती अजस्र । लक्षूनि एकान्तीं श्रीधर । तयाप्रति वृकोदर । बोले उत्तर तें ऐका ॥६३॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP