मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७२ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ७२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ७२ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर हरिश्चंद्रो रंतिदेव उंछवृत्तिः शिबिर्बलिः । व्याधः कपोतो बहवो ह्यध्रुवेण ध्रुवं गताः ॥२१॥राजा हरिश्चंद्र सूर्यवंशीं । विश्वामित्रें छळितां त्यासी । राज्यदानाचे दक्षिणेसी । जो कुटुंबेंसिं विकूनि घे ॥१५०॥विकूनि घेतलें चाण्डालसदनीं । परंतु सत्त्व न संडी छळूनी । अयोध्याजनेंसीं स्वर्गभुवनीं । बैसूनि विमानीं प्रवेशला ॥५१॥अठ्ठेचाळिस दिवसवरी । सकुटुंब निर्जळ निराहारी । किंचित प्राप्त झाल्या तदुपरी । याचक अवसरीं ते आला ॥५२॥त्याचा न करूनि यांचा भंग । रंतिदेव धार्मिक चांग । तदन्नोदकें तो पूजूनि साङ्ग । पावला अभंग ब्रह्मलोक ॥५३॥कुटुम्बेसहित मुद्गलमुनि । उंछवृत्ति अवलंबूनी । षण्मासपर्यंत उपोषणीं । धान्य संग्रही पारणया ॥५४॥तंव त्या पारणयाचे काळीं । दुर्वासा मुनि येऊनि छळी । परि तो सत्त्वधीर न डंडळी । अर्पूनि सकळीं व्रत रक्षी ॥१५५॥ऐसा चिरकाळ छळितां मुनि । मुद्गल न करी सत्त्वहानि । कुटुम्बेंसहित ब्रह्मसदनीं । बैसोनि विमानीं प्रवेशला ॥५६॥तैसेंचि शिबिनृपाचें करणें । कपोता श्येन घेतां प्राणें । मखमंडपीं शिबीतें तेणें । प्राणरक्षणें याचिलें ॥५७॥रायें धर्षितां श्येनाप्रति । श्येन म्हणे मी परम क्षुधार्ति । माझा भक्ष्य माझे हातीं । न देतां अपकीर्ति तव माथां ॥५८॥यज्ञमंडपीं मज निराश । जातां वरील तुज अपयश । ऐसें ऐकूनि शिबी नरेश । बोले श्येनास मृदुवचनें ॥५९॥कपोतकाच्या भारंभार । तुजला अर्पीन मांस अपर । श्येन म्हणे तूं सत्त्वधीर । तरी स्वशीर खंडूनी ॥१६०॥शरणागता रक्षावया । शिबीनें सोलूनि दिधली काया । सत्त्वप्रतापें त्रिदशालया । गेला अन्वयासह नगरा ॥६१॥बळीतें विष्णु वामनवेशें । त्रिपादभूदानाच्या मिषें । विष्णुकापट्या भार्गवाधीशें । कथितां मानसें न डंडळी ॥६२॥त्रिपादभूदानाचे भरीं । बळि सर्वस्व अर्पण करी । आत्मनिवेदनें बटुवेषधारी । सत्त्वें श्रीहरि जिंकियला ॥६३॥अद्यापि होऊनि द्वारपाळ । बळीतें रक्षूनि गोपाळ । पुढें करीन आखंडळ । प्रतिज्ञा अढळ हे ज्याची ॥६४॥असोत नरवरांच्या गोठी । ऐकें सामान्य जीवकोटी । माजि सत्त्वधीर जे जगजेठी । ते मम पाठीं अवधारीं ॥१६५॥कपोतपक्षी तिर्यग्योनी । क्षुधित व्याध अतिथिस्थानीं । पत्नीसहित स्वमांसदानीं । होऊनि विमानीं मिरविले ॥६६॥व्याधें देखूनि कपोतधैर्य । पश्चात्तापें तापला होय । दावानळीं होमूनि देह । मग निष्पाप राहे सुरभुवनीं ॥६७॥ऐसें सांगूं आणिक किती । अध्रुवशरीरलोभनिवृत्ति । करूनि अपवर्गातें भजती । धन्य त्रिजगतीं तुज ऐसें ॥६८॥राया ऐकें ब्रार्हद्रथा । कायशा पूर्वनृपांच्या कथा । अतिथियाञ्चा न करीं वृथा । होयीं परुता सत्त्वस्थ ॥६९॥ऐसें ऐकूनि ब्राह्मणवचन । मगधेन्द्र झाला सावधान । चिह्नें लक्षूनि करी विवरण । बोले वचन तें ऐका ॥१७०॥श्रीशुक उवाच - स्वरैराकृतिभिस्तांस्तु प्रकोष्ठैर्ज्याहतैरपि । राजन्यबंधून्विज्ञाय दृष्टपूर्वानचिंतयत् ॥२२॥शुक म्हणे गा कुरुसत्तमा । ऐसा ब्राह्मणीं सत्त्वमहिमा । कथितां ऐकूनि मागधनामा । हृदयपद्मामाज विवरी ॥७१॥वर्णिती पूर्वील सत्त्वधीर । दिसती ब्राह्मणवेषधर । यथार्थ नसती हे द्विजवर । क्षत्रिय साचार अवगमती ॥७२॥शस्त्रास्त्रशिक्षितवर्ष्माकृति । भैरवकंठीरवस्वर गमती । ज्याहतप्रकोष्ठ मज अवगमती । देखिले वाटती पूर्वीं हे ॥७३॥द्रौपदीस्वयंवरादिकांच्या ठायीं । देखिले वाटती हे ब्राह्मण तयीं । असो आणिकही कोठें कहीं । लक्षिलें ऐसें वाटतसे ॥७४॥ब्राह्मण नव्हती हे क्षत्रिय । हे जाणोनि मानसीं कृतनिश्चय । करिता झाला मागधराय । तो मुनिवर्य निरूपी ॥१७५॥राजन्यबंधवो ह्येते ब्रह्मलिंगानि बिभ्रति । ददामि भिक्षितं तेभ्य आत्मानमपि दुस्त्यजम् ॥२३॥ब्राह्मण म्हणती हे क्षत्रियबंधु । इहीं ब्रह्मचिह्नें धरिलीं विविधु । मायिक छळूं आले प्रसिद्धु । तर्ही सत्त्व विशुद्ध मी न टाकीं ॥७६॥मज ये काळीं जे मागती । तें मी देईन तयांप्रति । धनसुतवनितादि संपत्ति । हो कां दुस्त्यज स्वतनूही ॥७७॥वचन गोवूनि वदती काम । तैं तो अदेय दुस्त्यज परम । ऐसें जाणोनिही मी नियम । सत्त्व निःसीम नुलंघीं ॥७८॥बलेर्नु श्रूयते कीर्तिर्वितता दिक्ष्वकल्मषा । ऐश्वर्याद्भ्रंशितस्यापि विप्रव्याजे न विष्णूना ॥२४॥अकल्मष निर्मळ बळीची कीर्ति । विस्तीर्ण विस्तारली दिगंतीं । तें काय अविदित आम्हांप्रति । जाणों निश्चिती अवघेंच कीं ॥७९॥श्रीविष्णूनें ब्राह्मणमिषें । बळीचें ऐश्वर्य छलनावशें । भ्रंशिलें असतां सत्त्वविशेषें । उज्ज्वल यशें मिरवे तो ॥८०॥श्रियं जिहीर्षतेंद्रस्य विष्णवे द्विजरूपिणे । जानन्नपि महीं प्रादाद्वार्यमाणोऽपि दैत्यराट् ॥२५॥ब्राह्मणभजनें इंद्रसंपत्ति । जिंकूनि हरितां बळीनें निगुती । वामनवेषें तयाप्रति । छळी श्रीपति याञ्चेनें ॥८१॥तया बटुरूपा विष्णूतें । छळक अंतरीं जाणोनि निरुतें । शुक्रें वारितांही बळीतें । तथापि महीतें तो त्या दे ॥८२॥यास्तव द्वारपाळ श्रीपति । त्रिजगीं विस्तृत उज्ज्वल किर्ति । वामन इंद्रपदाची सूती । घेऊनि सुतळीं संरक्षीं ॥८३॥छळना साहूनि सर्वस्वदानें । यश ऐश्वर्य साधिलें बळीनें । नश्वरलोभें विमुखपणें । अतिथि दवडणें धिक् तेव्हां ॥८४॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP