मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७२ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ७२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ७२ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर न कश्चिन्मत्परं लोके तेजसा यशसा श्रिया । विभूतिभिर्वाऽभिभवेद्देवोऽपि किमु पार्थिवः ॥११॥ऐसिया मत्पर तूतें धर्मा । पराभवूं न शके ब्रह्मा । येरां अमरां कायसी गरिमा । नृपां अधमां कोण पुसे ॥८३॥ऐसिया तुझी पराभवशंका । असो परती कुरुनायका । परि अपरां मत्परां अकिंचन रंकां । कोण्ही न शके पराभवूं ॥८४॥तेजःप्रभावें करूनि कोण्ही । मत्परा पराभवूं न शके जनीं । अथवा प्रबळ चतुरंगिणी । सन्नद्ध रणीं न जिंकवे ॥८५॥अथवा केवळ उज्ज्वळ यशें । कीं तुंगैश्वर्यलक्ष्मीवशें । कीं विभवें महत्वें चातुर्यलेशें । गुणें अशेषें न लोपवें ॥८६॥मत्परां जिंकूं न शके देव । तेथ केवुते नर पार्थिव । तो मी वशवर्ती केशव । असतां भेव मग काय ॥८७॥कोण्हां एका आंगें भवीं । मत्परातें पराभवी । ऐसा न देखें सुरमानवीं । दैत्यीं दानवीं असुरींही ॥८८॥ऐसें वदतां जगदीश्वर । परमानंदें युधिष्ठिर । उचंबळला जेंवि सागर । पूर्ण गंभीर सुधामय ॥८९॥शुक म्हणे गा कुरुमंडना । राया परीक्षिति सर्वज्ञा । धर्में परिसोनि भगवद्वचना । केली योजना ते ऐका ॥९०॥श्रीशुक उवाच - निशम्य भगवद्गीतं प्रीतः फुल्लमुखाम्बुजः ।भ्रातृन्दिग्विजयेऽयुङ्क्त । विष्णुतेजोपबृंहितान् ॥१२॥जें जें वदला अधोक्षज । धर्में विवरूनि तद्गत बीज । फुल्लारमान वदनाम्भोज । झालें सहज शरदिन्दुवत ॥९१॥भगवद्वचनें धर्मानुजीं । देवांश ऐसी ऐकोनि वाजी । वीरश्री आवेश भरला भुजीं । वैष्णव तेजीं भ्राजिष्ठ ॥९२॥विष्णुतेजें आप्यायित । भीमार्जुन माद्रीसुत । त्यांतें युधिष्ठिर नियोजित । दिग्विजयार्थ तें ऐका ॥९३॥सहदेवं दक्षिणस्यामादिशत्सह सृंजयैः । दिशि प्रतीच्यां नकुलमुदीच्यां सव्यसाचिनम् । प्राच्यां वृकोदरं मत्स्यैः केकयैः सह मद्रकैः ॥१३॥ते विजित्य नृपान्वीरा आजर्हुर्दिग्भ्य ओजसा । अजातशत्रवे भूरि द्रविणं नृप यक्ष्यते ॥१४॥सहदेवनामा माद्रीसुत । दक्षिणे प्रेरिला दिग्विजयार्थ । सवें सृंजय सेनेसहित । प्रतापवंत प्रयोजिला ॥९४॥पश्चिमदिशे नकुळ वीर । सवें देऊनि मत्स्य नृपवर । प्रबळ चतुरंग दळभार । प्रेरी युधिष्ठिर योजुनि ॥९५॥उदीचीप्रति सव्यसाची । प्रबळ सेना कैकयांची । देऊनि प्रेरिता तो युधिष्ठिर । आज्ञा वंदूनि निघाला ॥९६॥पूर्व दिशेतें वकोदर । सवें देऊनि मद्रकभार । प्रेरिता झाला युधिष्ठिर । तोही सत्वर चालिला ॥९७॥कोणे दिशे कोण कोण नृपती । प्रबळ सेनासंभार किती । युद्धें झालीं त्यांची गणती । महाभारतीं सविस्तर ॥९८॥येथ समासें बादरायणि । सूत्रप्राय वदला वाणी । यालागीं संक्षेप व्याख्यानीं । भारत श्रवणीं अनुगमिजे ॥९९॥इतुकीं श्रोतीं जाणिजे सूजना । यथाविभागें कुरुनंदना । पाण्डवीं जिंकिले देश नाना । युधिष्ठिराज्ञा ते नमिती ॥१००॥ऐसे प्रतापी पाण्डववीर । नृपांतें जिंकूनि वश भूचक्र । करूनि आणिलें धन अपार । यज्ञसंभारसिद्ध्यर्थ ॥१॥ऐकें राया परीक्षिति । अजातशत्रु धर्मनृपति । दीक्षित जाणोनि धनसंपत्ति । राजे वोपिती जिंकिले ते ॥२॥सर्वं भूमंडळ केलें वश । राजे वर्त्तती होऊनि दास । त्रैलोक्यविभव इंद्रप्रस्थास । जैं राजसूयास धर्म यजी ॥३॥यज्ञकर्त्या धर्माप्रति । अनुजीं भूचक्रजयसंपत्ति । समर्पिली संभारार्थी । हें ऐकूनि परीक्षिति पुसों पाहे ॥४॥दिक्चक्र जिंकूनि वसुधा वश । भूपमात्र केले दास । म्हणतां मागधजय विशेष । पुसावया नृप इच्छी ॥१०५॥जाणोनि नृपाचें अंतर । मागधवधाचा प्रकार । कथिता झाला व्यासकुमर । सविस्तर तो ऐका ॥६॥श्रुत्वाऽजितं जरासंधं नृपतेध्ययितो हरिः । आहोपायं तमेवाऽद्य उद्धवो यमुवाच ह ॥१५॥शुक म्हणे गा परीक्षिति । मागधवधानंतर क्षिति । पाण्डवीं जिंकिली हें तुजप्रति । सांगों सुमति विसरलों ॥७॥जेव्हां धर्में विचार पुसिला । तेव्हांचि कृष्ण त्यातें वदला । जंववरी मागध नाहीं वधिला । तंव न वचे केला राजसूय ॥८॥मागधवधाचें दुर्घट कार्य । पुसतां धर्मराय । कृष्णें कथिता अभिप्राय । ऐकोनि राहे स्तब्ध मनीं ॥९॥जरासंध अजिंक रणीं । राजा सचिंत हें ऐकोनी । त्यासि आद्य जो चक्रपाणी । सांगे श्रवणीं कृत मंत्र ॥११०॥यादवसभेमाजि उद्धवें । उपाय कथिला कौशल्यविभवें । त्या मंत्राचें रहस्य आघवें । धर्मां देवें प्रकाशिलें ॥११॥धर्म ऐकोनि उपायरचना । पाचारूनि भीमार्जुनां । समर्पूनि जनार्दना । म्हणे या यत्नां सफळ करीं ॥१२॥कृष्णें ऐकूनि धर्मवचन । सवें घेऊनि भीमार्जुन । निघतां झाला तें व्याख्यान । सावधान अवधारा ॥१३॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP