मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७२ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ७२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ७२ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर जीवताब्राह्मणार्थाय कोऽन्वर्थः क्षत्त्रबंधुना । देहेन पतमानेन नेहता विपुलं यशः ॥२६॥क्षत्रुकुळीं जो जन्मला होय । पडणार जाणोनि नश्वर देह । विप्रकामनासाधनीं राहे । तो नर लाहे विपुल यश ॥१८५॥ब्राह्मणकारणीं जीवित ज्याचें । यावज्जन्म सर्वस्व वेंचे । याहूनि विशेष कोण अर्थाचें । जोदल्या यशाचें विपुलत्व ॥८६॥इत्युदारमतिः प्राह कृष्णार्जुनवृकोदरान् । हे विप्रा व्रियतां कामो ददाम्यात्मशिरोऽपि वः ॥२७॥इतुकें विवरूनि उदारमति । भीमार्जुनकृष्णांप्रति । म्हणे विप्र हो कामना चित्तीं । असेल मजप्रति ते मागा ॥८७॥तुह्मी दिसतां वेषधारी । छळनही करूं आलेंति जरी । तर्ही ब्राह्मणां न अव्हेरीं । विभवीं नश्वरीं भुलोनियां ॥८८॥छलनीं सत्व रक्षितां मरण । लाहतां पाविजे कैवल्यसदन । नश्वरलोभें विमुख ब्राह्मण । दवडितां पतन अंधतमीं ॥८९॥यालागिं अभीष्ट काम जो तुमचा । तुम्ही मागा तो प्रसन्नवाचा । मस्तकें सहित म्यां विभवाचा । सोडिला साचा संकल्प ॥१९०॥मस्तक मागाल ये अवसरीं । तोही देईन तुमच्या करीं । कार्यसिद्धीतें जाणोनि हरी । बोले वैखरी ते ऐका ॥९१॥श्रीभगवानुवाच - युद्धं नो देहि राजेंद्र द्वंद्वशोयदि मन्यसे । युद्धार्थिनो वयं प्राप्ता राजन्या नान्नकांक्षिणः ॥२८॥हरि म्हणे गा भो राजेन्द्रा । आम्हीं युद्धार्थ तुझिया भद्रा । पातलों जाणोनि द्वंद्वसंगरा । देईं उदारा मगधेशा ॥९२॥आम्ही अन्नार्थी न हों ब्राह्मण । द्वंद्व युद्धार्थी क्षत्रिय जाण । आम्हांसि द्वंद्वयुद्ध देऊन । म्हणवीं धन्य तिहीं लोकीं ॥९३॥जरी हें मानेल तुझिया मना । तरी पुरवावी युद्धकामना । इतुकें बोलूनि परिज्ञाना । करी अभिधाना प्रकटूनी ॥९४॥असौ वृकोदरः पार्थस्तस्य भ्रातार्जुनो ह्ययम् । अनयोर्मातुलेयं मां कृष्णं जानीहि ते रिपुम् ॥२९॥म्हणसी क्षत्रिय तुम्ही कोण । तरी हा भीम पृथात्मज जाण । त्याचा अनुज भ्राता अर्जुन । मातुळनंदन मी त्यांचा ॥१९५॥सतरा वेळा समराङ्गणीं । जिंकूनि सोडिलें तुजलागूनी । तो मी तव रिपु कृष्ण जाणोनी । युद्धदानीं दृढ होईं ॥९६॥कृष्णवचन ऐकोनि ऐसें । हास्य केलें मगधाधीशें । हांसोनि बोलिला जें संतोषें । तें तूं परिसें परीक्षिती ॥९७॥एवमावेदितो राजा जहासोच्चैः स्म मागधः । माह चामर्षितो मंदा युद्धं तर्हि ददामि वः ॥३०॥स्वनामें ऐसिये प्रकारीं । मागधा जाणवितां श्रीहरी । मग तो हांसोनि उच्चस्वरीं । सक्रोध उत्तरीं बोलतसे ॥९८॥अरे मंदहो द्वंद्वयुद्ध । तुम्हीं याचिलें मजविरुद्ध । तुम्हांसि दिधलें तें पसिद्ध । परि ऐका सावध ये अर्थीं ॥९९॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP