मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७२ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ७२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ७२ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर भीमसेनोऽर्जुनः कृष्णो ब्रह्मलिंगधरास्त्रयः । जग्मुर्गिरिव्रजं तात बृहद्रथसुतो यतः ॥१६॥कृष्णार्जुन भीमसेन । क्षत्रियवेष पालटून । ब्राह्मणचिह्नें अवलंबून । झाले ब्राह्मण पट्कर्मी ॥१४॥वत्सें वत्सप वत्सहरणीं । होऊनि मोहिल्या गोगौळणी । त्या तेथें विप्राची अवगणी । अशक्य नतनीं कायसें ॥११५॥तिघीं धरूनि ब्राह्मणवेष । सवेग ठाकिला मागध देश । बृहद्रथसुताचा जेथ वास । त्या गिरिव्रजपुरास पातले ॥१६॥तेथ जाऊन केलें काय । तोही कथितो अभिप्राय । परिसावया सावध होय । म्हणे तनय व्यासाचा ॥१७॥ते गत्वातिथ्यवेलायां गृहेषु गृहमेधिनम् । ब्रह्मण्यं समयाचेरन्राजन्या ब्रह्मलिगिनः ॥१७॥गृहमेधी जे गृहस्थाश्रमी । वर्तत असतां नित्य स्वधर्मीं । त्यांचिये अतिथिवेळानियमीं । मागधसद्मीं प्रवेशले ॥१८॥क्षत्रिय असतां ब्राह्मणवेशीं । याचिते झाले मागधासी । अतिथिसमयाच्या विशेषीं । तें नृपासि शुक सांगे ॥१९॥राजन्विद्ध्यतिथीन्प्राप्तनर्थिनो दूरमागतान् । तन्नः प्रयच्छ भद्रं ते यद्वयं कामयामहे ॥१८॥राया असो तुज कल्याण । आम्ही दूरस्थ अतिथि जाण । अतिथिसमयातें ठाकून । प्राप्त झालों धर्मज्ञा ॥१२०॥आम्ही जिया अर्थाचे अर्थी । तो तूं देईं आम्हांप्रति । संकल्पधारा सोडितां क्षिती । मागूं तुजप्रति अभिलषित ॥२१॥विमुख होऊं नये ये काळीं । यालागीं संकल्पजळाञ्जली । वदान्य होऊनियां भूतळीं । सोडितां सकळी काम वदों ॥२२॥जरी तूं राया वदसी ऐसें । आधीं गोवितां संकल्पपाशें । पुढें याञ्चा दुर्घट असे । शंका मानसें हे धरिजे ॥२३॥तुम्ही गोवूनि संकल्पजाळीं । अदेय याञ्चा दुर्घट केली । देऊं न शकतां वृथा गेली । तरी काळिमा लागली दातृत्वा ॥२४॥तुम्ही ब्राह्मण याञ्चापर । नृपाभरणें वरिष्ठतर । मुकुट कुंडलें श्वेत चामर । अदेय साचार हें तुमचें ॥१२५॥अत्यंत दुस्सह पुत्रवियोग । कीं धनरत्नभंडारही अनेक । जो पुत्राचा दायभाग । म्हणसी निलाग याञ्चा हे ॥२६॥तरी ऐकें गा मगधपाळा । परम वदान्य धर्मशीळा । हे मति अल्पका दीला कुटिळा । नोहे निर्मळा तुजयोग्य ॥२७॥यदर्थी अवधारीं दृष्टान्त । जेणें नोहे धर्मोपहत । सत्त्वधीराचा वृत्तान्त । असेल विदित पुन्हा ऐक ॥२८॥किं दुर्मर्ष तितिक्षूणां किमकार्यमसाधुभिः । किं न देयं वदान्यानां कः परः समदर्शिनाम् ॥१९॥असाधु जे नर दुर्जन । त्यांसि अकार्य ऐसें कर्म कोण । छळन परपीडन हिंसन । सर्व त्यालागून करणीय ॥२९॥तैसे क्षमस्वी तितिक्षु साधु । त्यांसि न सोसवे कोणता खेदु । सहनशीळांप्रति दुःखद । कोण संबंध दुस्त्यज पैं ॥१३०॥अत्यंत वदान्य जे उदार । कोण पदार्थ त्यां अदेयतर । येथिंचें वैभव सर्व नश्वर । जाणोनि धीर सर्वार्पणीं ॥३१॥सर्वज्ञ जाणती एकात्मता । तेचि समदर्शी तत्त्वता । त्यांसि स्वपरभेदवार्ता । म्हणतां वक्तृता मोघ गमे ॥३२॥यालागीं राया तुझ्या ठायीं । सर्वसद्गुण वसती पाहीं । अतिथियाञ्च्या भंगितां कांहीं । लाभ कीं हानि हें विवरीं ॥३३॥योऽनित्येन शरीरेण सतां गेयं यशो ध्रुवम् । नाचिनोति स्वयं कल्पः स वाच्यः शोच्य एव सः ॥२०॥मनुष्यलोकीं जन्मूनि प्राणी । अनित्य शरीरादि जाणोनी । अढळ उज्ज्वळ यशःसाधनीं । जो प्रयत्नीं न प्रवर्तें ॥३४॥शरीरारोग्य बळ पाटव । इंद्रियव्यापार पटुतर सर्व । तेज ऐश्वर्य बुद्धिगौरव । असतां यश ध्रुव न साधी जो ॥१३५॥वाच्य म्हणिजे त्रिजगीं निन्द्य । तो नर पामर अभाग्य मंद । शोकदुःखांचा सजीव कंद । कल्मषहृद कुटिळात्मा ॥३६॥म्हणसी यश तें कैसें काये । ध्रुव होत्सातें कोठें राहे । नाक डोळे हात पाये । त्रिजगीं जाय केंवि पां तें ॥३७॥यदर्थीं ऐकें मागधपाळा । सारासारविचारकुशळा । पय प्राशूनि सांडी जळा । बुद्धि मराळसम विवरीं ॥३८॥सज्जन गाती जें यश वदनीं । शीतळ उज्वळ शशिसम गगनीं । भूतभविष्यद्वर्तमानीं । त्रिजगीं कोंदूनि ध्रुव राहे ॥३९॥भाट बंदिजन गायक । वेतनें भक्षूनि यशाचे घोषक । पठती सादरता सन्मुख । होती विमुख अवेतनें ॥१४०॥महिमा वदती तोंडावरी । वेतन न पावतां छीथू करी । ऐसे यशस्वी घरोघरीं । नरीं पामरीं गाइजती ॥४१॥संतत गाती ऐसियांतें । अविरत पढती भगबच्चरितें । जें यश वसवी सद्वदनातें । त्रिजगीं त्यातें ध्रुव म्हणिजे ॥४२॥संतीं गाइजे तेंचि संत । येर वैभव तें असंत । क्षणिक दृश्य नाशवंत । जाणोनि महंत उपेक्षिती ॥४३॥म्हणसी संतीं हरिगुण गावे । कासया नृपयश तिंहीं पढावें । तरी जे अर्पूनि नश्वरविभवें । हरिगौरवें नर तुळती ॥४४॥त्यांची सत्कीर्ति मंदाकिनी । प्रवाहरूहें संतां वदनीं । कलिमळ क्षाळी श्रवणीं पठनीं । अढळ त्रिभुवनीं विस्तृत जे ॥१४५॥यालागीं तोचि बुद्धिमंत । जो नश्वरदानें यश शाश्वत । जोडूनि मिरवे त्रिजगाआंत । याञ्चा उपहत न करूनि ॥४६॥कुटुंबें प्राणेंसिं अवंचक । राया पाहें मुद्गलादिक । याञ्चाभंगाचाकळंक । न शिवोनि शशाङ्कयश साजे ॥४७॥पूर्वीं गाती ज्यां पुराणें । वर्तमानीं ऐकिजे श्रवणें । पुधें तरती श्रवणें पठनें । यशें विस्तीर्णें जयांचीं ॥४८॥राया म्हणसी ऐसे कोण । ऐक संक्षेपें करितों कथन । कावल देऊनि कैवल्यसदन । साधूनि यशोधन ध्रुव जें का ॥४९॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP