काही वाक्यांचें व्याकरण

व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


[१] शेणाचे ढीग करण्यापेक्षा तें खड्ड्यांत घालून कुजविणें अधिक फायदेशीर आहे. शेतकीखात्याचें हें सत्य म्हणणे शेतकर्‍यांनीं लक्षांत ठेवावें.
शेणाचे - शेण, सा. नाम, नपुंसकलिंग, षष्ठी एकवचन.
ढीग - ढीग, सा. नाम, पुल्लिंग, प्रथमा अ. वचन.
करण्यापेक्षा - करणें, धा. सा. नाम, न. लिं. पेक्षा श. यो. अ. मुळें सा. रू.
तें - तें, तृ. प. वा. सर्वनाम, न. लिं., प्रथमा, ए. वचन.
खड्ड्यांत - खड्डा, सा. नाम. पुल्लिंग, सप्तमी, ए. वचन.
घालून - धातुसाधित अव्यय.
कुजविणें -  कुजविणें, धा. सा. नाम, न. लिं., प्रथमा, ए. वचन.
अधिक - क्रियाविशेषण अव्यय.
फायदेशीर - क्रियाविशेषण, आहे या क्रियापदाचें.
आहे - मूळ धातु अस, अकर्मक, स्वार्थ, वर्तमानकाळ, न. लिं., तृतीय पुरुष, एकवचन.
या वाक्यांत कुजविणें हा कर्ता, आहे हें क्रियापद, हा अकर्मक कर्तरि प्रयोग.
शेतकीखात्याचें - शेतकीखातें, सा. नाम, नपुंसकलिंग, षष्ठी, ए. वचन.
हें - सर्वनामात्मक विशेषण, न. लिं., प्रथमा, एकवचन.
सत्य - सत्य विशेषण म्हणणें या धा. सा. नामाचें, न. लिं., प्रथमा, एकवचन.
म्हणणे - धा. सा. ना., नपुंसकलिंग, प्रथमा, एकवचन.
शेतकर्‍यांनीं - शेतकरी, सा. नाम, पुल्लिंगी, तृतीया, अ. वचन.
लक्षांत - लक्ष, सा. नाम, नपुंसकलिंग, सप्तमी, ए. वचन.
ठेवावें - ठेव सकर्मक, विध्यर्थ, वर्तमानकाळ, नपुम्सकलिंग, तृ. पुरुषाचें एकवचन.
या वाक्यांत - शेतकर्‍यांनीं हा कर्ता, म्हणणें हें कर्म, ठेवावें हें क्रियापद, हा कर्मणि पयोग.

[२] शेतकी सोसायट्यांनींच शेतकर्‍यांचें खरें हित साधेल; म्हणून शेतकर्‍यांच्या प्रत्येक हितचिंतकानें सहकार्याचें हें लोण प्रत्येक खेड्यापर्यंत नेऊन पोंचवावें.
शेतकी - विशेषण सोसायट्या या विशेष्याचें ( व्याकरण सोसायट्या या नामाप्रमाणें )
सोसायट्यांनींच - सोसायटी सा. नाम, स्त्रीलिंग, तृतीया, अ. वचन.
शेतकर्‍यांचें - शेतकरी सा. नाम, पुल्लिंगी, षष्ठी, अनेकवचन.
खरें - खरें विशेषण, न. लिंग. प्रथमा, एकवचन.
हित - हित सा. नाम, न. लिंग, प्रथमा, एकवचन.
साधेल -  मूळ धातु साध, अकर्मक, भविष्यकाळ, न. लिंग, तृ. पुरुष, एकवचन.
म्हणून - कारणबोधक उभयान्वयी अव्यय.
शेतकर्‍यांच्या - शेतकरी सा. नाम, पुल्लिंगी, षष्ठीचें अनेक वचनी सायान्यरूप.
प्रत्येक -विशेषण हितचिंतक या नामाचें ( व्याकरण त्याप्रमाणेंच )  
हितचिंतकानें - हितचिंतक सा. नाम, पुल्लिंगी, षष्ठी, एकवचन.
सहकार्याचें - सहकार्य सा. नाम, न. लिंगी, षष्ठी, एकवचन.
हें - हें सर्वनामात्मक विशेषण, न. लिंग, प्रथमा, एकवचन.
लोण - लोण सा. नाम, न. लिंग, प्रथमा, एकवचन.
प्रत्येक - विशेषण खेडें नामाचें (  व्याकरण त्याप्रमाणेंच )
खेड्यापर्यंत - खेडें सा. नाम, न. लिंग, प्रथमा, एकवचनी सामान्यरूप  - पर्यंत या शब्दयोगी अव्ययाच्या योगानें.
नेऊन - धातुसाधित अव्यय.
पोंचवावें - पोंचव सकर्मक, नपुंसकलिंग, वर्तमानकाळ, तृ. पुरुष, एकवचन.
(१) हित हा कर्ता, साधेल हें क्रियापद, हा अकर्मक कर्तरि प्रयोग.
(२) हितचिंतकानें हा कर्ता, लोण हें कर्म, पोंचवावें हें क्रियापद, हा कर्मणि प्रयोग.

[३] शेतकर्‍यांचे दारिद्र्याचीं त्यांस शिक्षण नसणें, व्यापारांत पारवालंबन, सावकारांचें जबर व्याज इ. कारणें सांगितलीं जातात. त्याबरोबर शेतकर्‍यांतील व्यसनें, भांडण - तंटे, लग्न - उत्तरकार्यें यांत होणारा अनाठायी खर्च ह्या गोष्टीसुद्धां आम्हीं विचारांत घेतल्या पाहिजेत.
शेतकर्‍यांचे - शेतकरी सा. नाम, पुल्लिंग, षष्ठीचें अनेकवचनी सामान्यरूप ( पुढील दारिद्र्याचीं या सविभक्तिक शब्दाशीं संबंध आल्यामुळें. )
दारिद्र्याचीं - दारिद्र्य भाववाचकनाम, न. लिंग, षष्ठी, एकवचन.
त्यांस - तो तृ. पु. वा. सर्वनाम, पुल्लिंग, चतुर्थी, अनेकवचन.
शिक्षण - सा. नाम, नपुंसकलिम्ग, प्रथमा, एकवचन.
नसणें - धा. सा. नाम, न. लिंग, प्रथमा, एकवचन.
व्यापारांत - व्यापार सा. नाम, पुल्लिंग, सप्तमे, एकवचन.
पारवालंबन - सा. नाम, नपुंसकलिंग, प्रथमा, एकवचन.
सावकारांचें - सावकार पुल्लिंग, षष्ठी, अनेकवचन.
जबर - विशेषण व्याज या नामाचें ( व्याकरण व्याज शब्दाप्रमाणें. )
व्याज - सा. नाम, नपुंसकलिंग, प्रथमा, एकवचन.
इत्यादि - विशेषण कारणें या नामाचें.
कारणें - करण सा. ना., नपुंसकलिंग, प्रथमा, अनेकवचन.
सांगितलीं -मू. धा. सांग, सकर्मक, भूतकाळ, स्त्रीलिंग, तृ. पुरुष, अनेकवचन.
जातात - हं सांगितलीं या क्रियापदाचें सहाय क्रियापद आहे.
त्याबरोबर - तें तृ. पु. वा. सर्वनाम, नपुंसकलिंग, प्रथमा, अनेकवचनी सामान्यरूप, बरोबर या शब्दयोगी अव्ययाच्या योगानें.
शेतकर्‍यांतील - शेतकरी ( वरप्रमाणें ) आंतील या शब्दयोगी अव्ययाच्या योगानें सामान्यरूप.
व्यसनें - व्यसन सा. नाम, नपुंसकलिंग, प्रथमा, अनेकवचन.
भांडण - तंटे - भांडण - तंटा सा. नाम, पुल्लिंग, प्रथमा, अनेकवचन.
लग्न - लग्न सा. नाम, नपुंसकलिंग, प्रथमा, अनेकवचन.
उत्तरकार्यें - उत्तरकार्य सा. नाम, नपुंसकलिंग, प्रथमा, अनेकवचन.
यांत - हें दर्शक सर्वनाम, नपुंसकलिंग, सप्तमी, एकवचन.
होणारा - हो या धातूवरून होणारा हे धातुसाधित विशेषण खर्च या विशेष्यांचें ( व्याकरण खर्च या शब्दाप्रमाणें. )
अनाठायी - विशेषण खर्च या नामाचें.
खर्च - सा. नाम, पुल्लिंग, प्रथमा, एकवचन.
ह्या - ही दर्शक सर्वनाम, स्त्रीलिंग, प्रथमा, अनेकवचन.
गोष्टी - गोष्ट सा. नाम, स्त्रीलिंग, प्रथमा, अनेकवचन.
सुद्धा - शुद्धशब्दयोगी अव्यय.
आम्हीं - मी प्र. पु. वा. सर्वनाम, पुल्लिंग, तृतीया, अनेकवचन.
विचारांत - विचार सा. नाम, पुल्लिंग, सप्तमी, एकवचन.
घेतल्या - मूळ धातु घे सकर्मक, भूतकाळ, स्त्रीलिंग, तृतीयपुरुष अनेकवचन.
पाहिजेत - सहाय्य क्रियापद.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP