शब्दांच्या लिंगाविषयी मतभिन्नता

व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


(१) तो बाक इकडे नको. तीं सर्व बांकें बाहेर ठेवा. बाक शब्द पुल्लिंगी व नपुंसकलिंगी वापरतात. आपण बाक शब्द नपुंसकलिंगी समजू व त्यातील अनुस्वार त्यास काही व्याकरण नाही म्हणून गाळू. जसें :- हीं नवीं बांकें आंत ठेवा.
(२) आपल्या देशांत तंबाकू पुष्कळ पिकते. तंबाकू जितकी जून तितकी ओढण्यास उत्तम असें समजतात. तंबाकू शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी योजितात. आपण स्त्रीलिंगीच वापरू. जसें - आणलेली तंबाकू डब्यांत भरून ठेवा.
(३) आमचा गांव एथून दोन कोसांवर आहे. आणि आमचे गांव तर पुरें मैलभरही नसेल. गाव शब्द पुल्लिंगी व नपुंसकलिंगी वापरतात. आपण तो नपुंसकलिंगी समजून त्यावरील अनुस्वार व्याकरणास धरून नाही म्हणून सोडून देऊं. जसें - माझें गांव लहानसें खेडें आहे.
(४) टपाल आला, टपाल आली, टपाल आलें. याप्रमाणें टपाल शब्द तिन्ही लिंगी मानितात. आपण तो नपुंसकलिंगी योजण्याचें ठरवू. जसें - मीं टपाल पाहिलें व तें कपाटांत ठेविलें.
(५) काल तीन आण्यांस दोन नारळ मिळाले. पूर्वीं तीन आण्यांस तीन नारळें मिळालीं असतीं. नारळ शब्द पुल्लिंगी व नपुंसकलिंगी समजतात. आपण पुल्लिंगी समजू. जसें - ओले नारळ जसे जड असतात तसे कोरडे नसतात.
(६) सामान शब्द पुल्लिंगी व नपुंसकलिंगी योजितात. तो नपुंसकलिंगी समजावा हें मागें प्रस्तावनेंत सांगितलें आहेच. जसें - ज्याचें त्याचें सामान ज्यानें त्यानें जपून ठेवावें हे उत्तम.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP