शुद्धलेखन - र्‍हस्व - दीर्घ विचार

व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


उच्चारावरून र्‍हस्व दीर्घ लिहिण्याचा आरंभापासून सराव ठेवावा. र्‍हस्व दीर्घ लिहिण्यासंबंधें पुष्कळ नियम आहेत. ते समजून घेणें हें काम बरेंच अवघड आहें. तें सवयीनेंच सुलभ होतें. तरी नेहमी लिहिण्यांत येणार्‍या काही शब्दांचा थोडक्यांत विचार करूं.
[१] कवि, रवि, शक्ति, बुद्धि, संपति, आकृति, पद्धति, कीर्ति, मूर्ति, ऋषि, मुनि, प्राप्ति, स्थिति, स्तुति.
रिपु, शत्रु, बंधु, अणु, बिंदु, तनु हे शब्द नेहमीं र्‍हस्व लिहावेत; परंतु त्यांना विभक्ति - प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडतांना ते दीर्घ लिहावे.
जसें - कवीला, रवीस, शक्तीनें, बुद्धीशीं, संपत्तीहून, आकृतीचा, पद्धतीची, कीर्तीचें, मूर्तीत, ऋषींनो, मुनीसाठीं, प्राप्तीमुळें, स्थितीप्रमाणें, स्तुतीनें.
रिपूनें, शत्रूला, बंधूंना, अणूंनीं, बिंदूंत, तनूला, जंतु - जंतूमुळें; तंतु - ज्ञानतंतूंचें; शंकु - शंकूस; चक्षु - चक्षूपुढें.
[२] इक या युक्तार्थी प्रत्ययांतील इ र्‍हस्व आहे. म्हणून हा प्रत्यय लागून होणारे शब्दही तसेच लिहावेत.
जसें - बुद्धि+इक=बौद्धिक, इतिहास+इक=ऐतिहासिक, परमार्थ+इक=पारमार्थिक, शारीरिक, मानसिक, नैतिक, व्यावहारिक, ऐहिक, लौकिक, वार्षिक, मासिक, साप्ताहिक, दैनिक इ.
[३] मी, ती, ही, जी, तूं हीं सर्वनामें स्वतंत्र असतां दीर्घ लिहावीं. पण त्यांना स, त, यांशिवाय इतर प्रत्यय लावतांना ते र्‍हस्व लिहावे.
तिला, हिचा, जिनें, तुझा, हिजला, तिचें, जिला, तुला, तुझ्यानें, जीस, तींत, जीस, जीत.
[४] अकारांत क्रियापदाचें उपांत्याक्षर दीर्घ लिहावें
मी - करीन, मी - लिहीन, मी - जाईन, मी - पाहीन.
तो - करील, ती - लिहील, तें - जाईल, जो - पाहील.
[५] इतर क्रियापदांएं उपांत्याक्षर र्‍हस्व लिहावें.
आणितो, आणिला, आणिले, आणिल्या, आणिले, चारिला,
करिते, काढिला, काढिली, काढिल्या, काढिते, दिला, लिहितो.
[६] ऊन प्रत्ययान्त अव्ययें नेहमीं दीर्घ लिहावीं.
जसें (१) जेव - जेवून, लाव - लावून, घाव - घावून, ठेव - ठेवून,
(२) दे - देऊन, घे - घेऊन, पी - पीऊन, खा - खाऊन.
यावरून ‘ ऊ ’ व ‘ वू ’ केव्हां योजावा हेंही ध्यानांत येईल.
(३) करून, पाहून, चालून, आणून, बोलून, उठून, म्हणून.
[७] साधारणपणें मराठींत अकारान्त शब्दाचें उपांत्याक्षर दीर्घ व इतर वेळीं र्‍हस्व लिहावें.
(१) अ - जमीन, बहीण, पाटील, सिंहीण, पाटील, माहीत, देऊळ, पाऊल, चाऊल, चाबूक, कारकून.
ब - खीर, मीठ, पीठ, दीर, धीट; चूल, मूल, फूल, सूप, तूप.
(२) खिळा, दिवा, जिना, कविता, महिना, दागिना, माहिती, पाहुणा, नमुना.
(३) बहुतेक मूळ शब्दांतील पहिलें अक्षर र्‍हस्व व शेवटचें अक्षर दीर्घ लिहावें :- खिडकी, पिशवी, मिरची, शिवाजी, दिवाळी, दिवस, तुळस, पुजारी, पिसू, निळू, चाकू, पुरी, सुटी, तराजू, माहिती, दुकान, सुकाणूं.

(१) झाडापासून पानें, फुलें, फळें मिळतात.
(२) शिक्षणाचें लोण खेड्यापर्यंत पोंचलें पाहिजे.
(३) रात्रीं झाडाखाली निजू नये.
(४) भाताची लावणी चिखलामध्ये करितात.
(५) मनुष्याचा मोठेपणा त्याच्या संपत्तीपेक्षा त्याच्या मनावर जास्त अवलंबून आहे.
(६) घरामागे परसू व दारापुढे आंगण असणें चांगलें. मुलग्याप्रमाणे मुलीसुद्धां सुशिक्षित होणें जरूर आहे. यांत शब्दयोगी अव्ययें शब्दांस जोडून लिहिलें आहेत. पुष्कळ वेळां तीं सुटी लिहिलीं जातात. तसें होऊ नये. ज्यावेळीं त्यांचा क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणें उपयोग केला असेल तेव्हां तीं सुटीं लिहावीं; जसें :- १ गोविंदा वर किंवा खालीं बसला असेल पहा. २ मागे युद्ध झालें तें युरोपपुरतें होतें. सध्याचें युद्ध जगभर पसरलें आहे. राम पुढे, सीता मध्ये व लक्ष्मण मागे अशा रितीनें तीं तिघें वनांत हिंडत असत.


N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP