अनुच्चारित अनुस्वार - विशेषणविचार

व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


नामाबद्दल जास्त माहिती सांगणारे शब्द

विशेषण

(१) हुशार मुलगा सर्वांस आवडतो.
(२) मारकी गाय दूर बांधा.
(३) बाजारांतून नवें पुस्तक आण.
(४) मळके कपडे धोब्याकडे द्या.
(५) बारा वस्तु म्हणजे एक डझन.
(६) सोनें बाहत्तर रुपये तोळा आहे.
(७) पांच पांडव वशंभर कौरव यांच्यांत फार मोठें युद्ध झालें.
या वाक्यांत मुलगा हा शब्द नाम आहे. मुलगा कसा ? हुशार. हुशार या शब्दानें मुलगा या नामाबद्दल जास्त ( विशेष ) माहिती मिळाली. मारकी या शब्दानें गाय या नामाबद्दल गाय कशी ? मारकी अशी जास्त ( विशेष ) माहिती समजली.
ज्या शब्दांवरून नामाबद्दल विशेष माहिती कळते, त्यांना विशेषणें म्हणतात. हुशार, मारकी हे शब्द विशेषणें होत.
तसेंच नवें, मळके, या शब्दावरून वर्तमानपत्र, कपडे या नामांबद्दल जास्त माहिती कळते; म्हणून नवें, मळके हे शब्द विशेषणें होत.
वस्तु किती ? बारा. रुपये किती ? बाहत्तर. पांडव किती ? पांच. कौरव किती ? शंभर. यांत बारा, बाहत्तर, पांच, शंभर या शब्दांवरून पदार्थ किती अशी संख्या कळते. अशा संख्या दाखविणार्‍या शब्दांनाही विशेषणें म्हणतात.
विशेषणाचे दोन प्रकार आहेत. (१) ज्या विशेषणांवरून पदार्थाबद्दल कसा अशी माहिती कळते ती गुणविशेषणें. उदा. सुंदर, उंच, ठेंगणा, फाटकी इ. (२) ज्या विशेषणांवरून पदार्र्थ किती अशी संख्या कळते त्यांस संख्याविशेषणें म्हणतात. उदा. एक, नऊ, पन्नास, हजार, लक्ष इ.
सुंदर - फूल; उंच - मनुष्य; ठेंगणा - घोडा; नवा - बैल; खट्याळ - गोर्‍हा यांत सुंदर, उंच, ठेंगणा, नवा, खट्याळ या विशेषणांवरून फूल, मनुष्य, घोडा, बैल, गोर्‍हा या नामांबद्दल विशेष माहिती कळते.
विशेषण ज्या नामाबद्दल जास्त माहिती देतें त्या नामास विशेष्य म्हणतात. सुंदर या विशेषणाचें फूल हें विशेष्य, उंच हा विशेषणाचें मनुष्य हा शब्द विशेष्य. याप्रमाणें ठेंगणा, नवा, खट्याळ या विशेषणांचीं घोडा, बैल, गोर्‍हा हे शब्द विशेष्यें होत.
गाईला एक तोंड, दोन शिंगें, चार पाय असतात. यांत एक या संख्याविशेषणाचें तोंड या शब्द विशेष्य होय. त्याप्रमाणेंच दोन, चार या संख्याविशेषणाचीं शिंवें, पाय हे शब्द विशेष्यें होत.

----------------------

(१) आंधळा - मुलगा; आंधळी - मुलगी; आंधळें - मूल.
  आंधळे - मुलगे; आंधळ्या - मुली; आंधळीं - मुलें.
(२) चांगला - कागद; चांगली - दौत; चांगलें - अक्षर.
   चांगले - कागद; चांगल्या - दौती; चांगलीं - अक्षरें.
   मुलगा - विशेष्य पुल्लिंगी; आंधळा - विशेषण पुल्लिंगी.
   मुलगी - विशेष्य स्त्रीलिंगी; आंधळी - विशेषण स्त्रीलिंगी.
   मूल - विशेष्य नपुंसकलिंगी; आंधळें - विशेषण नपुंसकलिंगी.
   मुलगे - विशेष्य अनेकवचन; आंधळे - विशेषण अनेकवचन.
   मुली - विशेष अनेकवचन; आंधळ्या - विशेष्य अनेकवचन.
या उदाहरणांत आंधळा, चांगला हीं विशेषणें त्यांच्या विशेष्याच्या लिंगवचनांप्रमाणें बदललीं आहेत. म्हणजे विशेष्याच्या लिंगवचनांप्रमाणें विशेषणाचें लिंगवचन असतें असें ठरतें.
(१) खट्याळ - घोडा; खट्याळ - घोडी; खट्याळ - घोडें;
   खट्याळ - घोड्या; खट्याळ - घोड्या; खट्याळ - घोडीं.
(२) मळकट - तांब्या; मळकट - लोटी; मळकट - भांडें;
   मळकट - तांबे; मळकट - लोट्या; मळकट - भांडीं.
मळकट व खट्याळ हीं विशेंषणें त्यांच्या विशेष्यांच्या लिंगवचनाप्रमाणें बदललीं नाहींत.
(१) धोरणी - शिवाजी; धोरणी - ताराबाई; धोरणी - सैन्य.
  धोरणी - मराठे; धोरणी - फौजा; धोरणी - मुलें.
(२) चालू - काळ; चालू - घटका; चालू - युद्ध.
यावरून बहुतेक विशेषण लिंगवचनांप्रमाणें बदलत नाहींत असे दिसतें. फक्त पांढरा, हिरवा अशीं आकारांत विशेषणें त्यांच्या विशेष्याप्रमाणें बदलतात. उदा. शहाणा - मुलगा; शहाणी - मुलगी; शहाणें - मूल.

---------------------------

(१) एक - पर्वत; सात पर्वत; एक - नदी, पांच - नद्या; एक  - सरोवर; नऊ - सरोवरें.
(२) एक, दोन - समुद्र; एक, दोन खाड्या; एक, दोन - भूशिरें.
या उदाहरणांवरून संख्याविशेषणें त्यांच्या विशेष्यांप्रमाणें बदलत नाहींत हें दिसून येईल.
(१) मुलांनीं नियमितपणें अभ्यास करावा. म्हणजे वर्गांत पहिला नंबर आला नाहीं तरी दुसरा खास येईल.
(२) वर्गांतील तीस विद्यार्थ्यांत विसावा - एकविसावा नंबर असणें हें शहाण्या विद्यार्थ्यास शोभत नाहीं.
यांत पहिला दुसरा, विसावा, एकविसावा या संख्याविशेषणांवरून नंबराचा क्रम समजतो. अशा विशेषणांत क्रमवाचक संख्याविशेषणें म्हणतात.
सोळावे नंबर, सोळाव्या मुली, सोळावीं मुलें.
पांचवा मुलगा, पांचवी ईयत्ता, पांचवें वर्ष.
या उदाहरणांवरून क्रमवाचक संख्याविशेषणें त्यांच्या विशेष्यांच्या लिंगवचनाप्रमाणें बदलतात असें ठरतें.

-----------------------------

पाठ ३ व ४ यांवरील शुद्धलेखन.

सर्वनामें व विशेषणें यांवरील अनुस्वार

शुद्धलेखन १ लें

“ जो दुसर्‍याच्या फायद्यासाठीं स्वतांचा फायदा सोडतो तो सत्पुरुष समजावा. जे आपला फायदा साधून दुसर्‍यांचेंही हित साधतात ते मध्यम प्रतीचे पुरुष होत. जी व्यक्ति आपल्या फायद्याकरितां दुसर्‍याचें नुकसान करिते ती राक्षस समजावी; आणि जीं माणसें आपला फायदा झाला नाहीं तरी चालेल, पण दुसर्‍याचें मात्र नुकसान करतात तीं माणसें समजावीं कीं नाहींत; किंवा अशा दुष्टबुद्धीच्या माणसांस काय नांव द्यावें हेंच मला समजत नाहीं. ” असें एका थोर कवीनें म्हटलें आहे. कवीनें मनुष्याचे जे हे चार वर्ग दिले आहेत त्यांपैकीं आपण कोणत्या प्रकारांत येतो याचा प्रत्येकानें आपलें अंतःकरण प्रांजलपणें शोधून विचार करावा.
जो, तो सत्पुरुष पुल्लिंगी; जे, ते पुरुष पुल्लिंगी; जी, ती व्यक्ति स्त्रील्लिंगी; जीं, तीं माणसें नपुंसकलिंगी; जे, हे वर्ग पुल्लिंगी. हें ( नांव देण्याचें काम ) नपुंसकलिंगी.

शुद्धलेखन २ रें

शेजारधर्म पाळणें हें प्रत्येकाचें कर्त्यव्य आहे. शेजार्‍यापासून आपणांस त्रास होऊं नये अशी इच्छा असल्यास, आपणही त्याला त्रास देऊं नये, ही गोष्टं सर्वांनीं ध्यानांत घ्यावी. शेजारच्या घरीं आजारी मनुष्य दुःखानें कण्हत असतां आपण पत्ते खेळतांना आरडाओरड करावी हें निंद्य कृत्य होय. सुखदुःखें ही सर्वांनाच असतात. आज शेजारीं जें दुःख भोगीत आहेत तें भोगण्याची पाळी आपणांवर उद्यां येणार नाहीं कशावरून ? ही दूरदृष्टि ठेवून वागण्यांत सर्वांचेंच हित आहे. या नैतिक वागणुकीलाच नाकरिक - शास्त्र म्हणतात.
हें - दुःख; हें - कृत्य; हीं - सुखदुःखें, जें तें - दुःख नपुंसकलिंगी. ही गोष्ट, दूरदृष्टि स्त्रीलिंगी.
हा, जो, तो या सर्वनामांचीं नपुंसकलिंगी एकवचनी रूपें हें, जें, तें आणि अनेकवचनी रूपें हीं, जीं, तीं यांवर अनुस्वार द्यावा.

शुद्धलेखन ३ रें

यमू म्हणाली, “ बाबा, मला एक नवें पातळ आणा. पातळ जांभळे पाहिजे. उद्यां सर्व मुली नवीं जांभळीं पातळें आणणार आहेत. नवी पातळें नेसून आम्ही समारंभांत एक मजेदार कवाईत करणार आहोत. आपल्या घरांतील लाभ लुगडें चालणार नाहीं. पांचवारी आंखूड पातळ पाहिजे. सगळ्या मुलींना बाईनीं पांढरें पोलकें आणावयास सांगितलें आहे. पोलकी जुनीं चालतील पण तीं स्वच्छ मात्र असलीं पाहिजे. समारंभांत चांगलीं गाणीं म्हणणार्‍या मुलींना बाई सुंदर पुस्तके बक्षीस देणार आहेत. समारंभाला आपली धाकटी यमू माझेबरोबर येणार आहे. ती पिवळा परकर नेसून अंगांत रेशमी पोलकें घालणार आहे.
नवें, जांभळें पातळ नपुंसकलिंगी एकवचन. लांब लुगडें नपुंसकलिंगी एकवचन.
नवीं, जांभळीं पातळें नपुंसकलिंगी अनेकवचन. स्वच्छ पोलकें नपुंसकलिंगी एकवचन.
पांचवारी, आंखूड पातळ नपुंसकलिंगी एकवचन. मजेदार कवाईत स्त्रीलिंगी एकवचन.
पांढरें पोलकें - न. लिंगी ए. व.; जुनीं पोलकीं - न. लिंगी अ. व.
चांगलीं गाणीं - न. लिंगी ए. व.; सुंदर पुस्तकें - न. लिंगी अ. व.
धाकटी यमू - स्त्रीलिंगी ए. व.; रेशमी पोलकें - न. लिंगी एक. व.
या शब्दांचें निरीक्षण केलें असतां दिसून येईल कीं, नवें, जुनें पांढरें, नवीं, जुनीं, चांगलीं या विशेषणांवर अनुस्वार आहेत.
पांचवारी, आंखूड, लांब, स्वच्छं, सुंदर या विशेषणांवर अनुस्वार आलेले नाहींत. ही सर्वविशेषणें नपुंसकलिंगी आहेत; कारण त्यांची विशेष्यें नपुंसकलिंगी आहेत.
नवा, जुना, चांगला, जांभळा - कोट; नवे, जुने, चांगले, जांबळ-कोट.
नवी, जुनी, चांगली, जांभळी - टोपी; नव्या जुन्या, चांगल्या, जांभळ्या टोप्या.
नवें,  जुनें, चांगलें, जांभळें - पातळ; नवीं, जुनीं, चांगलीं, जांभळीं पातळे.
लांब, आंखूड, सुंदर, स्वच्छ, पांचवारी फेटा.
लांब, आंखूड, सुंदर, स्वच्छ; पांचवारी साडी.
लांब, आखूड, सुंदर, स्वच्छ, पांचवारी - धोतर.
या शब्दांचा विचार केला तर आपल्या लक्षांत येईल की आकारान्त पुल्लिंगी विशेषणें त्यांच्या विशेष्यांच्या लिंगवचनाप्रमाणें बदललीं आहेत व इतर विशेषणें त्यांच्या विशेष्यांच्या लिंगवचनाप्रमाणें बदललीं आहेत व इतर विशेषणें त्यांच्या विशेष्यांप्रमाणें बदलली नाहींत.

आकारांत विशेषणंच्या नपुंसकलिंगी एकवचनी व अनेकवचनी रूपांवर अनुस्वार द्यावा.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP