मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २९ वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय २९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४८ अध्याय २९ वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर व्यक्तं भवान्व्रजभयार्तिहरोऽभिजातो देवो यथाऽदिपुरुषः सुरलोकगोप्ता ।तन्नो निधेहि करपंकजमार्तबंधो तत्पस्तनेषु च शिरःसु च किंकरीणाम् ॥४१॥जैसा आदिपुरुष भगवान । सुरलोकाचें करी गोपन । तो तूं येथ व्रजरक्षण । दुःखनिरसन करावया ॥८८॥व्रजींच्या समस्त जनांप्रति । जितुकीं दुःखें प्राप्त होती । त्यांची करावया निवृत्ति । तुझा श्रीपति अवतार ॥८९॥नाना संकटांचिये काळीं । आदिपुरुष सुरमंडळीं । सुरसंकल्पें करूनि केली । कृपेनें पाळी निजशरणां ॥५९०॥तो तूं येथ सर्वांपरी । व्रजंजनार्तिहर्त्ता हरि । असतां आम्ही तव किंकरी । मन्मथशरीं जाचतसों ॥९१॥आर्ति हरूनि तोष करणें । आर्त्तबंधु या अभिधानें । गोपी करिती विज्ञापनें । अभीष्टप्रार्थने सुचवूनी ॥९२॥स्मरसंतप्ता तव किंकरी । निजकरपद्मा आमुचे शिरीं । ठेवूनि निववीं स्मरातुरी । उदास न करीं विज्ञप्ति ॥९३॥स्तनीं आननीं आपादमौळीं । मर्दीं चुंबीं आणि कुरवाळीं । आपुल्या शंतमपाणीकमळीं । श्रीवनमाळी सर्वज्ञा ॥९४॥आम्हां किंकरींचिये शिरीं । कृपेनें स्पर्शें अमृतकरीं । जेंवि शशांक सुधाधारीं । चकोरांवरी अभिवर्षे ॥५९५॥तव गानश्रवणें कामाग्नि दीप्त । तेणें सर्वांग जालें व्याप्त । करसरोजें कुच संतप्त । निववीं त्वरित पुंभावें ॥९६॥कुरुपुंगवा बादरायणि । म्हणे समस्तव्रजकामिनी । कृष्णा कथिती मन्मथग्लानि । बहुतां वदनीं बहुविधा ॥९७॥श्रीशुक उवाच :- इति विक्लवितं तासां श्रुत्वा योगेश्वरेश्वरः ।प्रहस्य सदयं गोपीरात्मारामोऽप्यरीरमत् ॥४२॥तया गोपींचें विक्लवित । एका वदनें इत्थंभूत । कथनीं साकल्यें असमर्थ । तस्मात्संकेत बोलिलों ॥९८॥कृष्णवेधें करणगति । आचरों न शकेच प्रवृत्ति । यालागीं तिहीं केली विनति । परवशमतिवैकल्यें ॥९९॥परतोनि जा हें आज्ञापिलें । चित्त श्रीकृष्णीं गुंतलें । आज्ञाभंगें शरीर ठेलें । या वैकल्यें विक्लवित ॥६००॥वेणुश्रवणें कामज्वर । लावण्यवेधें अस्वतंत्र । निषेध ऐकोनि विरहातुर । विकळ अंतरें जल्पती ॥१॥कृष्णवेधें न शकती जाऊं । आज्ञाभंगें न शकती राहूं । तथापि अभीष्टाभिप्रायो । वदल्या स्वमेव विफलत्वें ॥२॥त्या गोपींचें विक्लवित । ऐकोनि श्रीकृष्ण रमाकांत । हास्य करूनि आनंदभरित । स्वयें रमवीत गोपींतें ॥३॥एकला कृष्ण बहुत गोपी । झणें कोण्हाचें मानस कल्पी । तरी तो परमात्मा विश्वव्यापी । योगेश्वरांचा ईश्वर ॥४॥योगी योगसिद्धीच्या बळें । भोगिती ऐश्वर्यसोहळे । श्रीकृष्ण योगें मायापटलें । निर्मी स्वलीले ब्रह्मांडें ॥६०५॥परिपूर्णत्वें आत्माराम । तेथ कैंचा विषयकाम । जाणोनि गोपीमानसधर्म । रमता झाला स्वच्छंदें ॥६॥प्रतिबिंबेंशीं बालक क्रीडे । तेंवि बल्लवींमाजिवडे । आत्मप्रियत्व प्रकटूनि फुडें । क्रीडे निवाडे जगदात्मा ॥७॥ताभिः समेताभिरुदारचेष्टितः प्रियेक्षणोत्फुल्लमुखीभिरच्युतः ।उदारहासद्विजकुंददीधितिर्व्यरोचतैणांक इवोडुभिर्वृतः ॥४३॥भवीं विरक्ता स्वपादनिरता । गोपी जाणोनि नान्यासक्ता । प्रेमोत्कर्षें श्रीअच्युता । आली द्रवता कारुण्यें ॥८॥मग धर्मधुरीणतेचा पट । ठेवूनि जैसा स्मरलंपट । उदारहासावलोकें वाट । प्रकटीं औद्भट भौजंगी ॥९॥सांडूनि प्रशस्त मोकळी दृष्टि । स्मराक्त सस्मित वक्र भृकुटी । जाणोनि गोपी यथेष्ट तुष्टि । कृष्ण जगजेठी वेष्टिती ॥६१०॥सर्वावस्था सर्वां देहीं । सर्वकाळ सर्वांविषयीं । आत्मप्रियत्वें भवाच्या ठायीं । प्राणी सर्वही अभिरमती ॥११॥तो प्रियतम आत्माचि वास्तव । लीलालालस वासुदेव । सस्मित ईक्षिता गोपी सर्व । उत्फुल्ल अवयवीं टवटविल्या ॥१२॥राकाग्लौदर्शनें ग्लानि । सांडूनि उत्फुल्लिता कुमुदिनी । तेंवि गोपी प्रसन्नवदनीं । कृष्णा वेष्टूनि तिष्ठल्या ॥१३॥जैसा उडुपति उडुगणभारीं । मंडित मिरवे गगनोदरीं । तैशा गोपी फुल्लारवक्त्रीं । वेष्टिती रात्रीं हरिगात्रा ॥१४॥मन्मथामिश्रित उदार हास्य । करितां कमलामानसहंस । दशनदीधितींचा प्रकाश । जेंवि कुमुदांस शरदिंदु ॥६१५॥भवविरक्ता आत्ममिळणी । आल्या तिहींशीं चक्रपाणि । चटुल चेष्टा उदार करणी । शोभता जाला रतिरंगीं ॥१६॥अच्युतप्रताप अच्युतरति । अच्युतैश्वर्य अच्युतशक्ति । यालागीं अच्युत हे शुकोक्ति । जाणोनि श्रीपति अस्खलित ॥१७॥ऊर्ध्वरेता पूर्णकाम । विषयास्पृष्ट आत्माराम । तोही पुरवी अभीष्ट प्रेम । स्वजनाभिराम होऊनि ॥१८॥त्या गोपींशीं रतिरंजन । करीत होत्साता श्रीकृष्ण । कैसा क्रीडे तें व्याख्यान । नृपालागून शुक सांगे ॥१९॥उपगीयमान उद्गायन्वनिताशतयूथपः । मालां बिभ्रद्वैजयंतीं व्यचरन्मंडन्वनम् ॥४४॥गोपी लावण्यललितवामा । कृष्णरतिरंगीं सकामा । अभीष्ट सुरतें पूर्णकामा । नधरत प्रेमा हरि गाती ॥६२०॥षड्ज ऋषभ आणि गांधार । कंठहृदयनाभिस्वर । ज्यांच्या गानें अनंग स्मर । करी संचार सर्वांगीं ॥२१॥कित्तेक गोपी यशें गाती । कित्तेक लावण्यललितोक्ति । कित्तेक चाटुल चटुल गती । हरिइंगितीं व्युत्पन्ना ॥२२॥रसाळ वेणूद्गायन । करीत होत्साता श्रीकृष्ण । गोपीगान अनुलक्षण । अमृतासमान स्मररुचिर ॥२३॥कृष्णगायनीं गोपीगान । मिश्रित सुस्वर तानमान । लास्यमूर्च्छनारागज्ञान । भाव दावून प्रकटिती ॥२४॥कृष्णावेगळें दुसरें नाहीं । ऐसा एकांत साधिला तिहीं । कृष्ण लेऊनि आपुल्या देहीं । शंका कांहीं न ठेविली ॥६२५॥मग निःशंक निरभिमानें । कृष्णमयचि गोपीगानें । कृष्णीं विरोनि गेलीं मनें । तनुक्रीडनें तदधीन ॥२६॥ऐसीं अनेक गोपीशतें । त्यांमाजि यूथप श्रीकृष्ण तेथें । नानाविलासमन्मथचरितें । बहुविध सुरतें विचरतसे ॥२७॥अम्लान उत्फुल्ल वैजयंती । कंठीं मिरवीतसे श्रीपति । सादृश्यगर्भित हे शुकोक्ति । विशद श्रोतीं परिसावी ॥२८॥हेमोत्पलिनी वैजयंती । तेंवि गोपींच्या आननपंक्ति । प्रशस्त फुल्लारविंदाकृति । मघमघिताती सप्रेमें ॥२९॥कीं वैजयंतीसी लावूनि कर । गोपी निबिडमाळाकार । कृष्णासभोंवता प्राकार । प्रेमें सादर स्मररसिका ॥६३०॥वैजयंती धरिलीं करी । त्यांची कृष्णाभंवती भवरी । त्याच्या स्कंधावरूनि येरी । वनिताचक्रीं हरि गाती ॥३१॥एकी सांडूनि सापत्नभावा । तळवट घेती चरणसेवा । समरसें करिती माजी रिगावा । मग केशवा कवळिती ॥३२॥एकी करितां मंडपघसणी । अवसर न फवे कृष्णमिळणीं । मग त्या हरिरूप प्राशूनी नयनीं । स्वेच्छा ध्यानीं कवळिती ॥३३॥तंव तें सप्रेमध्यान भरे । बाहीर अंतरींचें अवतरे । बाह्य भीतरीं भेद न सरे । मग एकसरें हरिसुरत ॥३४॥एवं श्रीकृष्णरति लालसा । नवयौवना विगतक्लेशा । अवघ्या सप्रेम सुरतरसा । भोगिती डोळसा वनगर्भी ॥६३५॥एवं त्रिजगासी मंडन । करूनियां तें क्रीडावन । स्वयें क्रीडे श्रीभगवान । वनीं जीवनीं उभयत्र ॥३६॥वनीं म्हणिजे यमुनातटीं । निबिडनिकुंजीं तरुवरथाटीं । जीवनीं म्हणिजे वाळवंटीं । जळानिकटीं मृदुपुलिनीं ॥३७॥नद्याः पुलिनमाविश्य गोपीभिंर्हिमवालुकम् । रेमे तत्तरलानंदकुमुदानंदवायुना ॥४५॥नृत्य गीत हास विलास । गोपींसहित परमपुरुष । वनीं क्रीडतां परमोल्हास । पावोनि पुलिनीं प्रवेशला ॥३८॥यमुनापुलिनीं रम्य मृदुळ । जेथ शर्करा सुशीतळ । मंदानिळें कुमुदें तरळ । परिमळबहळ जे ठायीं ॥३९॥यमुनाजळीं कुमुदावळी । तरळ डोलती मंडानिळीं । तया वायूनें पुलिनपाळीं । तुहिनाचळीं उपमूं ये ॥६४०॥गंधर्वसुरसिद्धकिन्नरीं । अंगनांसहित मन्मथसमरीं । सुगंध शीतळ वनोदरीं । जेंवि हिमगिरीमाजि रमिजे ॥४१॥तैसा पुलिनीं प्रवेशोन । गोपींसहित मनमोहन । रमता झाला आनंदोन । लब्धानंद सप्रेमें ॥४२॥तिये क्रीडेचीं इंगितें । चाटुचटुल रतिचेष्टितें । कामशास्त्रोक्त कामतातें । दाविलीं उचितें विचरोनी ॥४३॥तीं नृपातें बादरायणि । ऊर्ध्वरेताही सप्रेम वर्णी । जेणें भंगती कलिमलश्रेणी । परिसा श्रवणीं तें आतां ॥४४॥ N/A References : N/A Last Updated : May 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP