मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २९ वा| श्लोक ६ ते ११ अध्याय २९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४८ अध्याय २९ वा - श्लोक ६ ते ११ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते ११ Translation - भाषांतर परिवेषयंत्यस्तद्धित्वा पाययंत्यः शिशून्पयः । शुश्रूषंत्यः पतीन्काश्चिदश्नंत्योऽपास्य भोजनम् ॥६॥भोक्तयांच्या बैसल्या पंक्ति । त्यांसि वाढितां गोपयुवति । कृष्णगीतें हरिल्या स्मृति । त्यागूनि जाती तत्कर्में ॥१२॥पय पाजितां निजलेंकरें । गायनीं रमलीं अभ्यंतरें । टाकूनि धांवत्या झाल्या त्वरें । प्रेम बावरें हरिवेधें ॥१३॥सुखशेजारीं असतां भर्त्ता । तत्सेवनीं ज्या अभिरतां । तिहीं ऐकतां कृष्णगीता । टाकूनि स्वकांतां धांविल्या ॥१४॥रुचतां कृष्णध्वनीची गोडी । कांत न रुचती जैसीं मडीं । उन्मन मानसें जालीं वेडीं । बाह्यपरवडी विसरलीं ॥११५॥एकी भोजना बैसल्या ताटीं । कोण्ही जेविल्या अर्धपोटीं । कोण्ही ग्रास मोडिले बोटीं । कोण्ही वोठीं स्पर्शिले ॥१६॥तंव कृष्णाचें मधुर गान । श्रवणमार्गें झडपी मन । सवें विसरल्या देहभान । टाकूनि भोजन धाविन्नल्या ॥१७॥लागतां कृष्णगीताची गोडी । रसना विसरली रसपरवडी । भोज्यभोजनभोक्तृत्व सोडी । वेधें आवडी उपरमे ॥१८॥लिंपंत्य प्रमृजंत्योऽन्या अंजंत्यः काश्च लोचने । व्यत्यस्तवस्त्राभरणाः काश्चित्कृष्णांतिकं ययुः ॥७॥एकीं सारवितां गृहाजिरें । वेधिल्या कृष्णगीतस्वरें । धांवत्या जाल्या तैशाच करें । स्मृति न स्मरे । तनुभावा ॥१९॥डोई चिकटली जाणोनि नारी । कृष्णमृत्तिका मर्दिती शिरीं । तंव कृष्णगीताची माधुरी । भरे अंतरीं वेधक ॥१२०॥कृष्णगीतें हरितां मना । तनु न स्मरती नग्नानग्ना । मृत्तिका लेपिली कचकुदवदना । धांवती वना ध्वनिपंथें ॥२१॥कित्तेक अभ्यंगीं स्नेहाक्ता । उद्वर्त्तनीं उद्वर्तितां । नग्नाअनग्ना तद्द्रव्यलिप्ता । भूषणरहिता धांवती ॥२२॥अंजनवर्तिका घेऊनि करीं । अंजन रेखिलें अर्धनेत्रीं । तंव कृष्णगीत मानसां हरी । भुलल्या नारी तद्वेधें ॥२३॥अंजनशलाका तैसीच हस्तीं । सांडूनि हंसगति गजगति । पवनवेगें धांवती पंथीं । विवशस्मृति देहभावीं ॥२४॥एकी नेसणी पांघुरल्या । एकी प्रावरणें नेसल्या । एकीं विपरीत भूषा केल्या । हस्तपादादि अवयवीं ॥१२५॥एकीं मेखळा घातल्या कंठीं । कंठभूषणें मणगटीं । चरणांगुळीं एकांची दाटी । घालिती मुकुटीं वेणिये ॥२६॥एकीं पुष्पें घातिलीं मुखीं । तांबूल तुरंबिलें मस्तकीं । करणाभरणाअनोळखी । श्रीकृष्णसुखीं स्मृति रमली ॥२७॥पंकजगंधा वाहे पवन । तेणें मार्गें भ्रमरागमन । तेंवि ऐकोन कृष्णगान । करिती धावन तत्पथें ॥२८॥एवं तनुमनभावीं विवशा । कृष्णगायनवेधवशा । कृष्णापाशीं मीनल्या कैशा । भवदुराशा नुरवुनी ॥२९॥ऐशा विवश धांवतां नारी । कोण्ही निषेधक नव्हते घरीं । ऐशा संदेह धरूनि चतुरीं । शंका अंतरीं हें न कीचे ॥१३०॥बाह्य कृष्णार्थ करितां कर्म । अंतर वेधी तद्गुणप्रेम । वेधे विह्वळ इंद्रियग्राम । तैं कर्मसंभ्रम व्यत्यस्त ॥३१॥कृष्णभजनीं विपरीतता । कृष्णप्रेम त्यां सांगतां । गोपी वेधूनि कृष्णगीता । विवशसंकेता सूचिलें ॥३२॥कृष्णभजनीं ज्या सस्निग्धा । त्यांसि विघ्नाची न बाधी बाधा । यालागीं गोपींच्या निषेधा । कोण्हा निरोधा न करवे ॥३३॥ता वार्त्यमाणाः पतिभिः पितृभिर्भ्रातृबंधुभिः । गोविंदापहृतात्मानो न न्यवर्तंत मोहिताः ॥८॥इहामुत्रीं ज्या विरक्तमना । भवसुखसंमान मानिती वमना । त्यांसि निषेध करवे कोणा । आप्तां स्वजनां कां इतरां ॥३४॥आकाश तुटोनि पडल्यावरी । विरोनि ठिकर्या होय धरित्री । कां उपडोनि गडबडां लोटल्या गिरी । विरक्त अंतरीं न डंडळिती ॥१३५॥लोटतां प्रळयसिंधुजळ । कीं वरी पडतां वज्रकल्लोळ । कोपें खवळतां कृतांत काळ । विरक्त निश्चळ निर्मम ॥३६॥देहस्मृतीचें अस्तमान । कोण सांभाळी प्रपंचभान । मान अपमान कीं सम्मान । इत्यादि ज्ञान कोण मनी ॥३७॥गोपी हरिरंगीं होऊनि सक्ता । इहामुष्मिकीं ज्या विरक्ता । विवश भुलोनि कृष्णगीता । वना धांवत निशिगर्भीं ॥३८॥गृहासक्तीची सबळ काठी । घेऊनि भर्तार लागती पाठीं । त्यांस न गणितां देऊनि पाठीं । दाटोदाटीं निघाल्या ॥३९॥मातापितरें अतिसवेग । शीळभंगभयाची डांग । घेऊनि पाठीं करिती लाग । पळती आंग चुकवुनी ॥१४०॥बंधु लोकलज्जेच्या दोरें । कवळोनि बांधों धांवती निकरें । कृष्णानुरक्ता सप्रेमभरें । निजनिर्धारें धांवती ॥४१॥गोत्राभिमानें भ्रातृगण । वृत्तिक्षेत्रादि धान्यधन । इत्यादि रज्जूंचें बंधन । त्या रोधन करूं पाहती ॥४२॥परी त्या उमरडूनि तयांसी । गोपकांता कांतारासी । सप्रेमवेधें कृष्णापाशीं । धांवती निशी न गणूनी ॥४३॥पैशून्यादि मर्मस्पर्श । कुटिलोक्तीचे घालूनि पाश । बांधों पाहती सुहृद अशेष । परी त्या उदास नावरती ॥४४॥स्नेहपाशें कुमरी कुमरें । बांधों धांवती अभ्यंतरें । परी त्या लोटूनि ममतासूत्रें । बलात्कारें निघाल्या ॥१४५॥इत्यादि सर्व ईषणात्यागें । सवेग धांवती त्या विरागें । ममता लोभ घालूनि मागें । श्रीरंगरंगें रंगल्या ॥४६॥गोपी जेवीं सुपक्कदळें । झगटतां श्रीकृष्णगीतानिळें । सोडूनि द्रुमाचीं डाहाळे कुळें । निर्मम चपळें वावडती ॥४७॥कीं भास्करोदयीं अंडजगण । प्रपंचद्रुमींचें सांडूनि स्थान । हरिसुखचारा अभिलक्षून । करिती धावन निःशंका ॥४८॥ऐशा निराट गोपनारी । भगवन्निरत विरता घरीं । भरल्या निशीगर्भीं कांतारीं । मधुरस्वरीं गुंतोनी ॥४९॥गीतध्वनीचा लक्षूनि मार्ग । हरिप्राप्तीचा करिती लाग । भवसुखवैरस्यें अभंग । श्रीरंगसंगसकामा ॥१५०॥राया अपूर्व याहीवरी । परिसें हरिविरहाची थोरी । एकी बल्लवीं बळात्कारीं । गृहामाझारीं कोंडिल्या ॥५१॥अंतर्गृहगताः काश्चिद्गोप्योऽलब्धविनिर्गमाः । कृष्णं तद्भावनायुक्ता दध्युर्मीलितलोचनाः ॥९॥कृष्णप्रेमासक्त रामा । परी कोंडल्या माजि धामा । न लाहती हरिगीतवर्त्मा । कीं निबद्ध कर्मामाजिवड्या ॥५२॥बृहदारण्यीं हरिनिश्वसित । उपनिषच्छुतिरूप कृष्णगीत । ज्यांसि नव्हेचि श्रवणागत । अलब्ध पथ यालागीं ॥५३॥निरुद्ध प्रारब्धकर्मधामीं । कोंडूनि ठेल्या इंद्रियग्रामीं । परी प्रेमा अभंग निष्कामकामीं । मेघश्यामीं जयांचा ॥५४॥श्रवण न होतां साधनपथ । विरक्तिनिर्गम कैंचा प्राप्त । यालागीं कोंडल्या प्राक्तनांत परी आसक्त हरिरूपीं ॥१५५॥मेघश्याम भगवन्मूर्ति । प्रतीतिगोचर जैसी होती । निरतिशयें ते चिंतूनि चित्तीं । ध्यानस्थिति कवळिली ॥५६॥मग त्या अर्धोन्मीलितदृष्टि । तुरीयेपोटीं बाह्यसृष्टीं । सांठवूनियां उठाउठीं । ते केली पैठी चित्स्वरूपीं ॥५७॥अचिंत्यैश्वर्यभगवान । त्याचें लागतां तीव्र ध्यान । निर्गुण हो कां अथवा सगुण । दृढभवबंधनच्छेदक तें ॥५८॥दुःसहप्रेष्ठविरहतीव्रतापधुताशुभाः । ध्यानप्राप्ताच्युताश्लेषनिर्वृत्त्या क्षीणमंगलाः ॥१०॥तमेव परमात्मानं जारबुद्ध्याऽपि संगताः । जहुर्गुणमयं देहं सद्यः प्रक्षीणबंधनाः ॥११॥तीव्रध्यानें भगवन्निरता । कृष्णसुखीं ज्या संप्राप्ता । देहादित्रिगुणात्मक अहंता । त्यागूनि निर्मुक्ता त्या जाल्या ॥५९॥आशंकाद्वय येथें स्फुरे । श्लोकद्वयें तें परिसंहरे । क्षणैक निश्चळ अभ्यंतरें । तीं उत्तरें परिसावीं ॥१६०॥जारबुद्धी सगुणप्रेम । धरूनि भजतां पुरुषोत्तम । त्यांसि कैसें कैवल्यधाम । निर्गुण परब्रह्म नुमजतां ॥६१॥येथ समर्थ वस्तुमहिमा । पंगिस्त नोहे ज्ञानधर्मा । अमृत सेवितां मरणकामा । नापी आत्मा मृत्यूतें ॥६२॥संचित प्रारब्ध आणि क्रियमाण । त्रिविध कर्म जें पापपुण्य । भोगें न होतां पुरतें क्षीण । गुणबंधन केंवि तुटे ॥६३॥निष्कामकर्में चरमदेहीं । सविराम अपरोक्षज्ञानें पाहीं । देहअहंता विरतां नाहीं । संचित आणि क्रियमाण ॥६४॥संचितनाहें ज्ञानोदयें । क्रियमाणही अहंतालयें । भोगावेगळां प्रारब्धक्षय । कोण्या अन्वयें बोलिला ॥१६५॥प्रारब्धक्षय जाला नसतां । शुभाशुभ सुखदुःख न भोगितां । कैंची गुणबंधा क्षीणता । बंधुनिर्मुक्तता केंवि वदा ॥६६॥न साहती क्लेश बहळ । यालागीं दुःखभोगीं काळ । बहुत लागे तये वेळे । विरहें केवळ भोगिले ॥६७॥प्रियतमभगवव्द्विरहक्षोभें । तिहीं सर्वां जाळिलें उभें । कोटियुगांचीं निमेषगर्भें । गगनें अशुभें भोगिलीं ॥६८॥सप्रेमभगवत्तनुचिंतनें । सुख भोगितां तदालिंगनें । त्रिविधें सुकृतात्मकबंधनें । तीं तत्क्षणें तूटलीं ॥६९॥विरहजदुःखाश्लेषसुख । गोपी भगवद्ध्यानोन्मुख । भोगूनि देह त्रिगुणात्मक । तिहीं सम्यक त्यागिलें ॥१७०॥एवं गुणबंधनिर्मुक्ता । निर्विकार सप्रेमभरिता । कृष्णस्वरूपीं सायुज्यता । निजएकांता पावल्या ॥७१॥ऐसें ऐकतां निरूपण । संशयवातें दोलायमान । नृपाचें मानसपंकज पूर्ण । झालें म्हणोन पुसतसे ॥७२॥ N/A References : N/A Last Updated : May 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP