मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २९ वा| श्लोक १६ ते २० अध्याय २९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४८ अध्याय २९ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर न चैवं विस्मयः कार्यो भवतां भगवत्यजे । योगेश्वरेश्वरे कृष्णे यत एतद्विमुच्यते ॥१६॥यदर्थी विस्मय न कीजे तुवां । कृष्णा परेशा देवाधिदेवा ॥१९॥ऐक्यभावें भजतां जीवां । मोक्ष न मनावा अघटित ॥२२०॥कीं अचिंत्यैस्वर्यपरिपूर्ण । योगेश्वरांचा ईश्वर पूर्ण । याच्या सन्निधिमात्रें जन । तृणपाषाणही उद्धरती ॥२१॥गोपिकांचा विस्मय किती । कृष्णसान्निध्यें सर्वजाति । स्थावरजंगमां पावल्या मुक्ति । पुढें उद्धरती तत्स्मरणें ॥२२॥येरिं घडे न घडे ऐसा । विस्मय उचित कौरवेशा । तो येथ श्रीकृष्णीं सहसा । विस्मयावेशा असंभव ॥२३॥ऐसी कृष्णाची अगाधशक्ति । शुकें बोधिली रायाप्रति । करूनि आशंकानिवृत्ति । निरूपी पुढती हरिलीला ॥२४॥ता दृष्ट्वांऽतिकमायाता भगवान्व्व्रजयोषितः । अवद्द्वदतां श्रेष्ठो वाचःपेशैर्विमोहयन् ॥१७॥भूतभविष्यद्वर्तमान । सर्व हृद्गत अभीष्टाभिज्ञ । निकट गोपी येतां देखोन । बोले वचन विमोहक ॥२२५॥सर्व बोलकियांमाजि श्रेष्ठ । सत्यलोकपति वरिष्ठ । तो ज्यापुढें नुमली वोष्ठ । बोलोनि वाणी । गोपरमणी विमोही ॥२७॥त्या भगवदुक्तीचें निरूपण । दहा श्लोकीं शुकभगवान । वाखाणील तें भाषा कथन । श्रोते सुज्ञ परिसोत ॥२८॥श्रीभगवानुवाच :- स्वागतं वो महाभागाः प्रियं किं करवाणि वः । व्रजस्यानामयं कच्चिद्ब्रूताऽगमनकारणम् ॥१८॥अकस्मात निकटवर्ती । वनीं देखोनि गोपयुवति । परमाश्चर्यें तयां प्रति । बोले श्रीपति सस्मित ॥२९॥अहो तुम्ही सभाग्य रमणी । सुखरूप आला कीं पथ क्रमूनी । सफळ यात्रा मद्दर्शनीं । अंतःकरणीं काय इच्छा ॥२३०॥अकस्मात गोपी सकळा । नधरत येथें धावोनि आलां । तरी कुशल आहे कीं गोकुळा । सहित सकळां गोगोपां ॥३१॥अस्ताव्यस्त विस्मृततनु । धाविलां कोण्या भयेंकरून । तुम्हांसि देखोनि माझें मन । भयें उद्विग्न बहु झालें ॥३२॥धांवतां धापां दाटलीं पोटें । श्वास न लोटें नासापुटें । नकळे पाऊल पडिलें कोठें । अतिजविष्ठें उद्योगें ॥३३॥आगमनाचें कारण बोला । परमप्रियकर काय तुम्हांला । तुमची अभीष्टवांछा मजला । सांगा काय करूं तें ॥३४॥यावरि मंदस्मितानना । सलज्जापांगी मृगलोचना । देखोनि त्यांच्या मनमोहना । त्रैलोक्यराणा बोलतसे ॥२३५॥रजन्येषा घोररूपा घोरसत्त्वनिषेविता । प्रतियात व्रजं नेह स्थेयं स्त्रीभिः सुमध्यमाः ॥१९॥अहो तुम्ही वामदृशा । भ्रमरकांतिसदृशकेशा । परम घोर विपिनीं निशा । ईमाजी कैशा पातलां ॥३६॥रीस व्याघ्र वृक सूकर । सर्प वृश्चिक प्राणी क्रूर । घोर रजनी भयंकर । वनसंचार कां केला ॥३७॥भीरु ऐसें स्त्रियांचें नाम । आणि येसणें वन दुर्गम । विशेष रजनी घोरतम । किमर्थ उद्यम हा येथें ॥३८॥तथापि आलां केलें बरवें । आतां मद्वाक्य मानावें । व्रजाप्रति परतोनि जावें । वनीं न वसावें वनितांहीं ॥३९॥तुम्ही नधरत पातलां वना । तेणें हृद्रोग जाकळी स्वजनां । ते हुडकिती स्थानें नाना । म्हणोनि स्वस्थाना जा वेगीं ॥२४०॥मातरः पितरः पुत्राः भ्रातरः पतयश्च वः । विचिन्वंती ह्यपश्यंतो मा कृध्वं बंधुसाध्वसम् ॥२०॥तुमचे माता पितर पुत्र । बंधु भर्तार इष्टमित्र । सक्लेश धुंडिती सर्वत्र । श्रमाचें पात्र त्यां न कीचे ॥४१॥वनीं उपवनीं यमुनापुलिनीं । गुहागह्वरीं दुर्गमस्थानीं । धुंडितां श्रमित होइजे स्वजनीं । तुम्हां लागूनि अनुचित हें ॥४२॥ N/A References : N/A Last Updated : May 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP