मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २९ वा| श्लोक १ ते ५ अध्याय २९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४८ अध्याय २९ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - भगवानपि ता रात्रीः शरदोत्फुल्लमल्लिकाः । वीक्ष्य रंतुं मनश्चके योगमायामुपाश्रितः ॥१॥हेमंतीं गोपीव्रताचरण । करूनि कात्यायनीपूजन । लाधल्या जें हरिवरदान । तें संपूर्ण करावया ॥४१॥शरच्छर्वरी शशिभायुक्त । कुंज सकूजित कुसुमित । गोपीसुकृतोदय संप्राप्त । जाणोनि प्रकटित रतिरंगा ॥४२॥किंवा गोपी बाल्यवयसा । फेडून लेती यौवनदशा । तोंवरी केली काळप्रतीक्षा । होतां त्या निशा संप्राप्त ॥४३॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । असतांही श्रीभगवान । कां पां कालप्रतीक्षण । केलें म्हणोन शंकाल ॥४४॥योगमाया अंगीकारी । काय पां करूं न शके हरि । तो कां काळप्रतीक्षा कव्री । झणें अंतरीं हें माना ॥४५॥अकाळीं वनश्री प्रकटितां । बाल्या फेडूनि तारुण्य देतां । तत्काळ गोपीमनोरथा । काय पुरवितां अशक्य ॥४६॥तरी ऐकावें इये विशीं । अशक्य नाहीं भगवंतासी । परी भक्तांच्या सुकृतराशि । येती उदयासि तैं लाभ ॥४७॥गोपी तोषवूनि वरदानें । यज्ञपत्न्यांचीं उत्कटपुण्यें । त्यांच्या सप्रेम स्नेहबंधनें । पूर्ण कारुण्यें कळवळिला ॥४८॥काम असतां कृष्णाआंगीं । तरी अनुकूलवयस्का तन्वंगीं । करूनि रमता स्वेच्छाभोगीं । तेचि प्रसंगीं उताविळा ॥४९॥पूर्णकाम परमेश्वर । सप्रेम स्वजनाचें अंतर । जाणोनि क्रीडे तदनुसार । नानावतार नटनाट्यें ॥५०॥जाणोनि स्वभक्तमनोगता । स्वलीला प्रकटी बालचरिता । येरवीं कंस संहारितां । दुर्घटता त्या कोण ॥५१॥हिरण्यकशिपुनिर्दाळणा । स्तंभीं प्रकटवी आपणा । तो येथ कंससंहरणा । समरांगणा समर्थ ॥५२॥परंतु भक्ताचें वालभ । जाणोनि झाला पशुपडिंभ । अमरां दुर्लभ पंकजनाभ । तो क्रीडे स्वयंभ सुलभ्यत्वें ॥५३॥गोपीचीरापहरणकाळीं । भावूनि निजवयसा कोंवळीं । यथाकाळें श्रीवनमाळी । कंदर्पकेलिप्रद हो कां ॥५४॥जाणोनि त्यांच्या अभिवांछिता । कालप्रतीक्षा झाला करिता । येर्हवीं जो मायाभर्ता । त्या भगवंता न अशक्य ॥५५॥गोपीमनोऽनुकूला रात्री । शरदत्फुल्लमल्लिकापत्रीं । श्रीभगवंत लक्षूनि नेत्रीं । तच्चरित्रीं प्रवर्तला ॥५६॥योगमायेच्या अवलंबें । अभीष्टविभव आणूनि शोभे । रतिरहस्य पंकजनाभें । मनसिजक्षोभें मनीं धरिलें ॥५७॥हरिहरब्रह्मादि जिंकूनि कामें । कंदर्प दाटला दर्पभ्रमें । तो येथ जिंकूनि रासक्रमें । विजयसंभ्रमें हरि वर्ते ॥५८॥रासमंडळा जो मंडन । होऊनि कंदर्पर्पखंडन । करी आखंडलस्मयदंडन । पवनकृशानुवरुणेंशीं ॥५९॥येथ शंका कीजेल श्रोतां । परदारविनोद केला असतां । कंदर्प विजयाची योग्यता । श्रीभगवंता न शोभे ॥६०॥परस्त्रीविनोदें करून । कंदर्पजयाचें श्लाघ्यपण । भासे विपरीत कर्माचरण । न शोभे गौण भगवंतीं ॥६१॥ऐसी शंका झणें माना । योगमायाअवलंबना । करूनि नाट्यक्रीडा नाना । आत्मारामचि अभिरमें ॥६२॥‘ योगमायामुपाश्रितः ’ । भावार्थ याचि पदाआतौता । जों न शिवोनि परयोषिता । झाला रमता स्वाराम ॥६३॥‘ आत्मारामोऽप्यरीरमत ’ । वक्ष्यमाणोक्ति हें संमत । साक्षान्मन्मथाचा मन्मथ । परस्त्री किमर्थ ते ठायीं ॥६४॥जयाच्या स्वरूपा मन्मथ भाळे । द्वैत निवटूनि मावळे । तेथ परस्त्रीसुखसोहळे । म्हणतां काळे मुख नोहें ॥६५॥तस्माद्रासक्रीडाविडंबन । कामविजयप्रख्यापन । तेथींचें तत्व इतुकें पूर्ण । सकारण जाणिजे ॥६६॥एवं आपण आपुले ठायीं । सुरतक्रीडा शेषशायी । करूनि प्रवर्ते मन्मथविजयीं । ते ये नवायी कथेची ॥६७॥तेचि शृंगारकथामिषें । पंचाध्यायीं रासरसें । अध्यात्मपरनिवृत्तिदशे । आणूनि विशेषें उमजा हें ॥६८॥भगवत्प्रतिश्रुता ज्या रजनी । मनोऽनुकूला स्मरक्रीडनीं । त्या दो श्लोकीं श्रीशुक वर्णी । श्रोतीं सुकर्णीं परिसाव्या ॥६९॥तदोडुराजः ककुभः करैर्मुखं प्राच्या विलिंपन्नरुणेन शंतमैः ।स चर्षणीनामुदगाच्छुचो मृजन् प्रियः प्रियाया इव दीर्घदर्शनः ॥२॥योगमायाविभवें हरि । स्वेच्छा वनश्री अनुकूल करी । पंचभूतें सशर्वरी । कोणे परी तें ऐका ॥७०॥जाणोनि गोपींचा स्मरोदय । वनीं वाहूनि वनजाप्रिय । तत्प्रीतीस्तव अत्रितनय । प्रकट होय प्राग्भागीं ॥७१॥उडुगणेंशीं विराजित । ऐंद्रीदिङ्नायिकाकांत । जेंवि चिरकाळें प्रिय संप्राप्त । संल्लालित ललनांगा ॥७२॥कुंकुमरंगें मुख विलेपी । करलालनें विरहा लोपी । तेंवि अरुणभा मयंक वोपी । लावण्यरूपी दिग्वदनीं ॥७३॥शीतल संतम सुखतमकरीं । उदयरागें कुंकुमापरी । प्राचीदिग्वदना शृंगारी । स्वभा पसरी सर्वांगीं ॥७४॥सर्वजनाची तापलाग्नि । शीतळ करी परिहारूनी । ऐसा उडुपति उदेला गगनीं । प्रीतीकरूनि कृष्णाचे ॥७५॥दृष्ट्वा कुमुद्वंतमखंडमंडलं रमाननाभं नवकुंकुमारुणम् ।वनं च तत्कोमलगोभिरंजितं जगौ कलं वामदृशां मनोहरम् ॥३॥जें कृष्णाचें निजमानस । आनंदमय मयंकवेष । घेऊनि उगवे प्राक्ककुभेस । धवळी आकाश स्वतेजें ॥७६॥कुमुदें निजोदयें विकसित । करी म्हणोनि तो कुमुद्वंत । कमलावदना समान कांत । अखंडित प्रकाशला ॥७७॥अखंडमंडल जैवातृक । अरुण नवकुंकुमकिंजल्क । तैसा अरुणप्रभात्मक । रजनीनायक नभोगर्भीं ॥७८॥त्यातें लक्षूनि कमलारमण । कोमल तत्करप्रभेकरून । रंजित देखोनि वनजीवन । आदरी गायन गोगोप्ता ॥७९॥तें गायन म्हणाल कैसें । सुधा लाजवी माधुर्यरसें । श्रवणमात्रें वधूमानसें । बळें नेतसे हरूनिया ॥८०॥कामाक्तनेत्रा वामदृशा । श्रवणमात्रें केल्या पिशा । वनीं पहावया परेशा । धांवती कैशा तें ऐका ॥८१॥निशम्य गीतं तदनंगवर्धनं ग्रजस्त्रियः कृष्णगृहीतमानसाः ।आजग्मुरन्योन्यमलक्षितोद्यमाः स यत्र कांतो जवलोलकुंडलाः ॥४॥सुमनोहर भगवद्गान । सबाह्यनंगोद्दीपन । स्थावरजंगमीं स्मर मोदन । पावे ऐकोन अभिवृद्धि ॥८२॥घृतादिसिंचनें पावक वाढे । कां मर्मस्पर्शें क्रोध चढे । कीं गंधगुणपाशें आसुडे । कुसुमाकडे रोलंब ॥८३॥कीं विष्णुस्मरणें सुकृतवृद्धि । गुरुपदभजनें वाढे बुद्धि । तैसी कंदर्पा प्रवृद्धि । होय निरवधि ज्या गानें ॥८४॥ते प्रवृद्धि म्हणाल कैशी । अल्प सूचनें सुज्ञापाशीं । येरां मूर्खां प्राकृतांशीं । हृदयस्फोटेंशीं नुमजवे ॥८५॥ज्याचे पदरीं निष्क एक । तो सहस्र निष्क होय कामुक । सहस्र निष्कीं सर्वात्मक । वांछी कनक अभिवृद्धि ॥८६॥धनिक वांछी भूपमान । मानी वांछी भूपासदन । सार्वभौमत्व जें असपत्न । भूपसामान्य कामिती ॥८७॥सार्वभौम स्वाराज्यता । तो अभिलाषी वैराज्यता । पारमेष्ठ्यादि साम्राज्यता । सांडूनि परता स्मर वाढे ॥८८॥परी तीं नश्वर अवघीं सुखें । पुढती तितुकींच भोगिजे दुःखें । विषयकामीं इहामुष्मिकें । ठकती अल्पकें फळलोभें ॥८९॥याहूनि विशेष वाढे काम । तैं वांछिती अक्षय्य धाम । स्वसंवेद्य आत्माराम । विषयसंभ्रमवैरस्यें ॥९०॥ऐसे सनकादि आत्मरत । त्यांहूनि वाढे जैं मन्मथ । तैंभगवत्प्रेमा अत्यद्भुत । सबाह्य संतत वांछिती ॥९१॥तें बृहदारण्यींचें भगवद्गान । पूर्वोक्त अनंगप्रवर्द्धन । उपनिषत्श्रुतिरूप होतां श्रवण । साधनसंपन्न वेधल्या ॥९२॥साधनसंपन्न म्हणाल कैशा । कृष्णप्रगृहीतमानसा । व्रजस्त्रिया त्या भवसुखविरसा । कृष्णपरेशा कामिती ॥९३॥कात्यायन्यादिव्रताचरणें । रजतम क्षाळूनि शोधिलीं मनें । गृहीं वर्ततीं हरिआज्ञेनें । परी संलग्न ध्यानें हरिरूपीं ॥९४॥हरिवराचा उदयकाळ । भगवद्गगायन तदनुकूल । ऐकोनि झाल्या विरहाकुळ । धांवती विह्वल हरिप्रेमें ॥९५॥करणें विसरली प्रवृत्ति । कृष्णगानें हरिल्या स्मृति । पडली भगभानीं विस्मृति । झाली उपरति मानसा ॥९६॥नेनती पाउल पडलें कोठें । नादमार्गें धांवती नेटें । श्रवणीं कुंडलें लखलखाटें । तरळतां उमटे विद्युद्भा ॥९७॥विजनीं निकुंजी जो कां कांत । रमारमणीयएकांत । त्याप्रति जात्या झाल्या त्वरित । कळों नेदित परस्परें ॥९८॥विषयसुरतीं सपत्नभावें । रमतां त्रास पावल्या जीवें । यालागीं परस्परें न होतां ठावें । घेती धांवे परपुरुषीं ॥९९॥पूर्वाज्ञेनें त्रैवर्गिक । करितां कृत्यें प्रापंचिक । कृष्णगायनें सम्यक । झाल्या प्रत्यक्प्रवण त्या ॥१००॥कृष्णगीतें हरितां मन । कर्म मानिती जैसें वमन । भणगा जोडल्या भद्रासन । मग त्या कोरान्न जेंवि न रुचे ॥१॥‘ यदहरेव विरजेत् । तदहरेव प्रव्रजेत् ’ । जेव्हां हरिरत झालें चित्त । तैं संन्यस्त त्रैवर्ग्य ॥२॥अंतर रमतां अंतरंगा । मग तें विसरे सर्वसंगा । असोनि नेणे अंगींअंगा । भोगी अनंगा समरसें ॥३॥जितुकें जालें जें जें कृत्य । तें तितुकेंचि टाकूनि त्वरित । गोपी धांवती काननांत । कमलाकांतसुरतेच्छें ॥४॥दुहंत्योऽभिययुः काश्चिद्दोहं हित्वा समुत्सुकाः । पयोऽधिश्रित्य संयावमनुद्वास्यापरा ययुः ॥५॥कोण्ही गोपी गोदहनीं । बैसल्या जानुधृतभाजनीं । स्तननिष्पीडनीं हस्त दोन्ही । जवें तळपती अधोर्ध्व ॥१०५॥श्रवणीं भरलें हरिगायन । तेणें वेधिलें अंतःकरण । सवेग होतां मन उन्मन । प्रवृत्तिभान विसरल्या ॥६॥पुढें दोहन करणें ठेलें । नेणती पात्र रितें भरलें । नवचे चुल्हीवव्री ठेविलें । चित्ता कर्पिलें हरिगानें ॥७॥दोह विसरोनि घेती धांवा । गानध्वनीचा लक्षूनि अध्वा । सवेग ठाकिती वासुदेवा । कोण्ही गोवा नाठवतां ॥८॥कोण्ही गोधूमकणकंडना । करूनि बैसल्या असतां पचना । सुपक्क चुल्लिस्थ नुतारितां अन्ना । करिती धावना ध्वनिमार्गें ॥९॥अध्यात्मपरिभाषायोजना । अपरपर्यायव्याख्याना । निरूपितां ग्रंथरचना । नाटके गगना विस्तारें ॥११०॥यालागीं पदार्थप्रकाश मात्र । ग्रथनीं जाणिजे सूचनासूत्र । शंकापरिहारें सर्वत्र । विशेष वक्त्र वावरे ॥११॥ N/A References : N/A Last Updated : May 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP