मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २९ वा| आरंभ अध्याय २९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४८ अध्याय २९ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीकृष्णस्वामिने नमः ॥कैवल्यसुखाचें पारणें । प्रणता जयाच्या पादस्मरणें । तो गोविंद सद्गुरु अंतःकरणें । सप्रेमध्यानें कवळिला ॥१॥स्वस्वरूपाच्या विमुखपणें । जीवा कैवल्यसुख नेणणें । बाह्यविषयांचेनि भानें । संतत शिणणें सुखलाभा ॥२॥लक्षचौर्यांशीं योनीप्रति । वाहतां विषयांची सुखावाप्ति । इच्छूनि भवोद्भवें भरती । दुःखदुर्गतीमाजिवडे ॥३॥सर्वयोनींमाजि ज्ञान । सांचलसूचकध्वनिबोधन । तैसेंचि स्पर्श तें वेदन । खेद मोदन परस्परें ॥४॥तैसेचि सर्वांठायीं चक्षु । रूपमात्र शकती लक्षूं । जातिविषयें सुखोत्कर्षु । क्लेशविशेषभय बोधें ॥५॥तैसीच नैसर्गिक रसना । जातिवैशिष्ट्यें रसज्ञा । जाणे आणि अवघ्राणा । घ्राणकोविद निसर्गें ॥६॥आहार निद्रा भय मैथुन । सर्वेंद्रियीं इतुकेंचि ज्ञान । भूत भविष्य वर्तमान । पाप पुण्य अनोळख ॥७॥इहामुष्मिक पारावार । वेदशास्त्र कुलाचार । वृत्ति व्यवसाय अहंकार । दीर्घतर संग्रह ॥८॥इत्यादि बोध नाहीं त्यांसी । विमुख तुरीयेच्या प्रवेशीं । जागृतिस्वप्नसुषुप्तींपाशीं । निबद्ध जालीं गुणकर्में ॥९॥सर्पीं नेत्रेंचि ऐकावें । पश्वादी घ्राणें वोळखावें । मयूरीं नेत्रेंचि रमावें । पदीं सेवावें उद्भिज्जें ॥१०॥ऐसिया अनेक योनीप्रती । विपरीत अनेकि इंद्रियवृत्ति । नैसर्गिक विषयप्रवृत्ति । साधनसंपति त्यां कैंची ॥११॥बहुत पशु होऊनि एक । आदरें घेती काय श्रवणसुख । वक्ता बैसवूनि सम्मुख । ज्ञाता सम्यक पशुवर्य ॥१२॥जाणोनि आयुर्दायविशेष । सर्प न करिती योगाभ्यास । चिरायु क्रमिती गगनास । परी यात्रा वायस न करिती ॥१३॥हस्तपादादिसंपन्न । म्हणोनि रीसवानरगण । न करिती वेद्शास्त्रपठण । कर्माचरण श्रौतादि ॥१४॥एवमादि सर्वजाति । तुरीयबोधेंचिं वर्तती । अनुपरमें तुरीयास्थिति । दुर्लभ त्यांप्रति सर्वत्र ॥१५॥म्हणोनि न खंडे जन्ममरण । आणि न वाढेचि क्रियमाण । प्रारब्ध मात्र होय क्षीण । वर्ष्मपतनपर्यंत ॥१६॥ऐसे अनेक जन्म घेतां । वेंचिती आगळ्या संचिता । पापपुण्या ये तुल्यता । तैं लाभे तत्त्वता नरदेह ॥१७॥ऐसा नरदेह अवचट जोडे । तेथही विषयसुखाचे चाडे । कर्माचरण करूनि पुढें । भोगिती बापुडे दुर्योनि ॥१८॥लाहोनियां नरदेह सार । निर्दय हिंसक ढीवर । निषादादि परमक्रूर । पुन्हा अघोर नारकी ॥१९॥एक तृणकाष्ठाछेदक । एक कृषीवळ भूकर्षक । शिल्पिक नापिक कारुक । वार्धुषिक नटकादि ॥२०॥पोषिती व्याघ्र सर्प वृश्चिक । काढिती अमंगल मूत्रनरक । ऐसे व्यवसाय अनेक । दुर्विवेक पोटार्थ ॥२१॥जन्मापासूनि मरणपरी । विषयांवेगळी गोष्ठी दुसरी । नुमजों देतां षड्विकारीं । ज्यां षड्वैरि जाचिती ॥२२॥ऐशा नरदेहाचिया प्राप्ति । लाहोनि वृथा नरका जाति । त्यांसि दुर्लभ तव पदप्रणति । ते भवभ्रांतिवरपडे ॥२३॥दुर्लभनरदेहाची प्राप्ति । त्याहूनि दुर्लभ सत्संगति । तेथही दुर्लभ सत्प्रवृत्ति । जे दे रति सत्संगीं ॥२४॥सत्संगतीं वेधतां मन । प्रवृत्ति निवृत्ति होय श्रवण । सारासार कळतां पूर्ण । करी प्रयत्न सारार्थ ॥२५॥तेव्हां असारीं होय विरत । सप्रेमनिष्कामभजनीं रत । सारांश जाणोनि निजात्मस्वार्थ । अतिंद्रित शमषट्कीं ॥२६॥इत्यादि साधनीं भगवान । द्रवे कारुण्यें कळवळून । तेव्हां सद्गुरुसन्निधान । करूनि भजन प्रमोदे ॥२७॥भगवत्प्रसादजानितभक्ति । तरीच निर्विघ्न गुरुपदराति । येरां मृगजलाचिये स्थिती । बाह्यप्रवृत्ति नाथिली ॥२८॥एवं भगवद्वरदप्रणतां । कैवल्यपारणें गुरुपदभक्तां । अनेककल्प योनि करूनि साधनांची पाउटी । साधनांमुकुटीं गुरुभक्ति ॥२९॥गुरुपदभजकां मोक्षासाठीं । न लगे साधनीं आटाआटी । करूनि साधनांची पाउटी । साधनांमुकुटीं गुरुभक्ति ॥३०॥यालागीं प्रणतीं चरणस्मरण । करितां कैवल्यसुख संपूर्ण । भोगूनि निवविती ते निजशरण । मिथ्या भवभान उमजवूनी ॥३१॥तो गोमतीआनंदकंद । मजमाजि नांदे श्रीगोविंद । सबाह्य सप्रेम ध्यानानंद । अनन्य अभेद प्रकटला ॥३२॥आतां वक्ता आणि वदविता । एकात्मतेची लाहती सत्ता । तथापि श्रीचरणापरौता । लाभ तत्वता मज नुमसो ॥३३॥ऐसें ऐकोनि अभेद स्तवन । वशी करूनि अंतःकरण । कृपेनें दिधली आठवण । ग्रंथ निर्माण करावया ॥३४॥अठ्ठाविसाव्या अध्यायांतीं । वैकुंठदर्शन गोपांप्रति । देऊनि पुढती पूर्वस्थिति । यथाप्रवृत्ति आणिले ॥३५॥यावरी गोपींच्या वरोत्तीर्णा । कामक्रीडाविडंबना । देऊनि करील मन्मथमथना । त्रैलोक्यराणा तें ऐका ॥३६॥आतां एकोणतिसावा । अध्याय आरंभिला बरवा । येथूनि रासरसाब्धिहेलावा । तेतिसावापर्यंत ॥३७॥या अध्यायीं कृष्णगीता । ऐकोनि गोपी विरहतप्ता । वनीं वनमाळी संप्राप्ता । तेणें धर्मता वारिल्या ॥३८॥तिहीं प्रत्युक्तिभाषण । अभेदप्रेमा दर्शवून । सूचिलें दुस्त्यज भगवचरण । मग झाला रमोन हरि गुप्त ॥३९॥इतुकी कथा ये अध्यायीं । परिसे परीक्षिति प्रायोपशासी । मुनिनिर्वाणसुखनवायी । नृपा ये ठायीं निरूपी ॥४०॥ N/A References : N/A Last Updated : May 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP