मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २३ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय २३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५३ अध्याय २३ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर यमुनोपवनेऽशोकनवपल्लवमंडिते । विचरंतं वृतं गोपैः साग्रजं ददृशुः स्त्रियः ॥२१॥शांतियमुनेच्या उपवनीं । अशोकद्रुमांची दाटणीं । अकामअलोभ पुष्पीं पर्णीं । नानावृक्ष लगडले ॥१८॥भूतदयेच्या रसाल वेली । विनयतेचि दाट साउली । संवादाच्या मंदानिलीं । सज्जन मौळि डोलविती ॥१९॥सत्कीर्तीचा सुमनगंध । वनीं प्रवाहे जो अमंद । द्विरेफांचा कीर्तनानंद । ब्रह्मानंद मंदावी ॥२२०॥नवपल्लवां डोलवी वारा । तेचि समता गमे चामरां । स्वानुभवाच्या सुखसंभारा । अच्युतमहुरा दाविती ॥२१॥ध्यानस्थ कोकिला मौनव्रतीं । शब्द न करितीच हेमंतीं । कृष्णस्मरणें घुमघुमिती । पारापतें तन्निष्ठें ॥२२॥ऐसिये स्वानंदभरीत वनीं । शांतियमुनेच्या उपपुलिनीं । साग्रज सगोप चक्रपाणि । देखती नयनीं मुनिवनिता ॥२३॥वनीं विहरतां श्रीकृष्णातें । देखत्या झाल्या मुदितचित्तें । तथा लावण्यनटवेषातें । बोधी नृपातें शुकयोगी ॥२४॥भवविभवातें घालूनि मागां । कृष्णदर्शनीं सानुरागा । आल्या तैशा त्या श्रीरंगा । देखत्या झाल्या मुनिपत्न्या ॥२२५॥श्यामं हिरण्यपरिधिं वनमाल्यबर्हधातुप्रवालनटेवेषमनुव्रतांसे । विन्यस्तहस्तमितरेण धुनानमब्जं कर्णोत्पलालककपोलमुखाब्जहासम् ॥२२॥कनकखेवणीं इंद्रनील । कीं चंपकप्रसूनीं अलिउळ । विद्युत्प्रभेमाजि सजल । मेघसुनीळ ज्यापरी ॥२६॥तेवीं मन्मथनयनाञ्जन । प्रभारंगीं मनमोहन । राजस पीत परिधान । कंजलोचन कलुशारी ॥२७॥गंडमंडितकुंदलप्रभा । वरी कुरकुळीत कुंतळशोभा । श्यामसुंदर गगनगाभा । जेवीं चित्प्रभा पांघुरला ॥२८॥सरळ नासिका सुरंग अधर । वदन वर्तुळ स्वसुखागार । सुकुंदरदन शशिभास्कर । कंदर्पेंशीं कुरवंडी ॥२९॥विशाळ भाळ बर्हावतंस । कर्णोत्पळीं शोभाविशेष । विचित्ररंगीं नटवरवेश । मिरवी अशेषदृग्द्रष्टा ॥२३०॥सुंदर हनुवटी कंबुकंठ । श्रीवत्सांक हृदयकपाट । विश्वनिवासीं पटुतर पोट । त्रिवळीमंडित प्रशस्त ॥३१॥पंकजनाभ श्रीवैकुंठ । परिवेष्टित पुरटपट । नितंब ऊरु जानु निघोंट । जंघा गुल्फा पदकमळें ॥३२॥वनसुमनांची विचित्र माळा । वरिष्ठ शोभा नवप्रवाळां । धातु नवरंग तेजाळा । रविशशिकळा लोपवी ॥३३॥धातु नटनाट्यें चर्चिल्या । प्रसूनपंक्ति तुरुंबिल्या । लाजविती रत्नमूल्या । गुंजापुंज सुतेजें ॥३४॥गडियांमाजी अनुव्रत । त्यांचें स्कंधीं वाम हस्त । दक्षिणहस्तें जलज धृत । तें भ्रमवीत कौतुकें ॥२३५॥लीलेंकरूनि भंवडी कमळ । हासयुक्त वदनोत्पल । सर्वसाक्षी सकोमल । नयनीं निहाळ कृपेचा ॥३६॥ऐशिया कृष्णातें मुनिपत्नी । देखत्या झाल्या सप्रेम नयनीं । आनंदनिर्भर अंतःकरणीं । कवळिती मनीं उल्हासें ॥३७॥प्रायः श्रुतप्रियतमोदयकर्णपूरैर्यस्मिन्निमग्नमनसस्तमथाक्षिरंध्रैः ।अंतः प्रवेश्य सुचिरं परिरभ्य तापं प्राज्ञं यथाऽभिमतयो विजहुर्नरेंद्र ॥२३॥भव्यशरिरे घेवोनि धांवा । सवेग पावल्या त्या माधवा । वृत्ति मिनल्या ऐक्यभावा । तें तूं भूधवा अवधारी ॥३८॥परमप्रियतम जो परमात्मा । त्याच्या उत्कर्षाची गरिमा । चिरकाळ श्रवणें हृदयपद्मा - । माजीं रुचोनि राहिल्या ॥३९॥भक्तकैपक्षें अभ्युदय । प्रत्यवतारीं ऊर्जित विजय । बहुकाळश्रवणें करितां प्रिय । हृदयीं सदय ठसावला ॥२४०॥तया प्रियतमाच्या विजयकीर्ति । तिहीं केली श्रवणपूर्ति । श्रवणभूषणाची आयति । त्या शोभविती सप्रेमें ॥४१॥प्रथमयौवनीं रतिरहस्य । कीं धनिकामुका जेंवि परिस । तेंवि मुनिवधूंसी सगुणवेश । ध्यानगर्भींचा प्रकटला ॥४२॥मग त्या हरिगुनकर्णभूषणीं । मनें निमग्न झालिया कृष्णीं । पुढतीं लावण्य विग्रह नयनीं । नेती प्राशोनि हृत्कमळीं ॥४३॥मग त्या उत्सुका प्रेमबाहीं । निश्चल आलिंगूनि हृदयीं । अनेक जन्मींचा तापत्रयीं । शून्य घालूनि निवाल्या ॥४४॥जैशा कर्णोन्मुखा अहंमति । परतोनि प्रज्ञा आळंगिती । सुषुप्तिमाजीं लीन होती । ताप सांडूनि भवजनित ॥२४५॥कीं प्रज्ञावंत सुशीलगुरु । सदय सुविचार प्रबोधचतुर । ताप सांडोनि साक्षात्कार । लाहोनि निवती सच्छिष्य ॥४६॥तेंवी परमात्मप्राप्तिसुखें । अनेकजन्मींचीं संसारदुःखें । सांडोनि विश्रांती पावल्या हरिखें । द्वैत पारिखें दवडूनी ॥४७॥एवं श्रीकृष्णर्दशनसिद्धि । पावल्या मुनिपत्न्या समाधि । हें जाणोनि कृपानिधि । प्रेमसंवादीं प्रवर्ते ॥४८॥तास्तथा त्यक्तसर्वाशाः प्राप्ता आत्मदिदृक्षया । विज्ञायाखिलदृग्द्रष्टा प्राह प्रहसिताननः ॥२४॥निजात्मदर्शनाकारणें । सर्व कामना त्यजिल्या मनें । तैशा जाणोनि त्या श्रीकृष्णें । हास्यवदनें बोलत ॥४९॥शीतोष्णादि क्षुधातृषा । सांडिली स्थूळतनूची आशा । करणमार्गें तृष्णावळसा । तेवि आशा सांडिली ॥२५०॥प्राणत्यागें विषया व्याप्ती । कीं धन वेंचुनि जोडणें स्फीति । ते दंभाशा सांडूनि परती । मुनींच्या युवती पातल्या ॥५१॥भावी जन्मादि सांसारिक । कीं स्वर्गादि पारत्रिक । अथवा मोक्षश्रीदायक । हे त्यजिली पृथक पुण्याशा ॥५२॥एवं आत्मप्रियत्वें निष्मामप्रेम । निजात्मअभेदें मेघश्याम । पहावया ससंभ्रम । आला उत्तम सद्भावें ॥५३॥भक्त कामना धरूनि पोटीं । देवा अर्पी उपचार कोटि । भेदें अपान मुटमुटी । कैसें शेवटीं होईल ॥५४॥देव पावेल किंवा न पावे । भक्त धाके येणें भावें । तो भावाचि देवतानावें । काय या द्यावें म्हणतसे ॥२५५॥भाजी अर्पोनि मागे केंचे । तैशिया भजना देवचि लाजे । देव मानी भजनवोझें । भेदें नुमजे देवत्व ॥५६॥तैसे नोहे अभेद भजन । परस्परें अभिनंदन । जेंवि बाळ आंधळें मातेविण । माता त्याविण आंधळी ॥५७॥तीर्थगादि अनेक योनी । निष्कामप्रेमा बाळपाळणीं । तैशी अवंचक आवडी मनीं । अभेदभजनी निसर्गें ॥५८॥सांडोनिया विषयगोवा । करणसमुच्चय आघवा । सुषुप्तिगर्भीं घेऊनि धांवा । प्राज्ञ खेंवा कवळिती ॥५९॥त्या तैशिया मुनिकामिनी । सर्व आशा विसर्जूनी । प्राप्त झाल्या मुनिकामिनी । हें जाणोनि हरि बोले ॥२६०॥सर्वबुद्धीचा जो साक्षी । स्वप्रकाशें विश्व लक्षी । पूर्णकरुणेच्या कटाक्षीं । हास्यवक्त्रें वदतसे ॥६१॥श्रीभगवानुवाच - स्वागतं वो महाभागा आस्यतां करवाम किम् ।यन्नो दिदृक्षया प्राप्ता उपपन्नमिदं हि वः ॥२५॥महाभागा हें संबोधन । करूनि आळवी श्रीभगवान । म्हणाल यांचें भाग्य कोण । तें विवरून पहा हो ॥६२॥चोरापासूनि सूटला । अक्षत वांचूनि सदना आला । तयासि म्हणती सभाग्य झाला । काय तो वांचला चिरकाळ ॥६३॥विषयासारिखे तस्कर । ज्यांचेनि षड्वैरी कठोर । त्यांपासूनि वैराग्यपर । होऊनि सत्वर निघाल्या ॥६४॥भगवान स्वमुखें सभाग्य म्हणे । त्यांच्या भाग्यासि काय उणें । अक्षयामृतप्रापकपणें । त्या श्रीकृष्णें संबोधिल्या ॥२६५॥भाग्यवंत हो म्हणे हरि । तुमच्या आगमनाची परी । कल्याणवंत सर्वप्रकारीं । सुष्ठु आहे कीं सती हो ॥६६॥सांडूनि मोहाचें अटव्य । आला म्हणोनि झालां स्तव्य । ऐसें तुमचें भाग्य भव्य । कीं झालों सुसेव्य मी तुम्हां ॥६७॥आतां बैसा वो स्वस्थासनीं । काय प्रियतम अंतःकरणीं । तें निरूपा मजलागूनि । चक्रपाणि म्हणतसे ॥६८॥काय करूं तें मज सांगा । जें जें अपेक्षित तें तें मागा । मत्प्राप्तीनें तुम्ही सुभगा । निजात्मलिंगा दिदृक्षु ॥६९॥आमुचे दर्शनेच्छेंकरूनी । सर्वप्रतिबंध निवारूनी । प्राप्त झालां हें मद्भजनीं । संतत रंगोनि साधिलें ॥२७०॥हेंचि तुम्हांसि संपादलें । जें निर्विघ्न मम दर्शन झालें । काय करूं तें सांगा वहिलें । संपन्नत्वें जाणोनी ॥७१॥ N/A References : N/A Last Updated : May 02, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP