मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २३ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय २३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५३ अध्याय २३ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर तं ब्रह्म परमं साक्षाद्भगवंतमधोक्षजम् । मनुष्यदृष्ट्या दुप्प्रज्ञा मर्त्यात्मानो न मेनिरे ॥११॥ओं तत्सन्निर्देशवचन । ब्राह्मण देव आणि यज्ञ । त्रिविध ब्रह्म जें अभिन्न । तो श्रीभगवान अधोक्षज ॥३१॥साक्श्झात्परब्रह्म निर्गुण । प्रणवाकृति तेंचि सगुण । ब्राह्मण वेद आणि यज्ञ । त्रिधा अभिन्न त्रयीचर्या ॥३२॥जो हा नंतगुणपरिपूर्ण । ज्याहूनि अध अक्षजज्ञान । ब्रह्मादि देवता अक्षगण । नेणती म्हणोन अधोक्षज ॥३३॥ज्याचिया ऐश्वर्यसत्तायोगें । माया अजडजडात्मक जागे । तेथें त्रैगुण्य यथाविभागें । विविधा रंगें गुजबुजी ॥३४॥त्या परब्रह्मा भगवंतातें । ब्राह्मण नाहींच झाले मानिते । मनुष्यबुद्धि जाणोनि चित्तें । गोरक्ष म्हणोनि हेळिले ॥१३५॥जन्मले असती वैश्ययोनी । असंस्कृत गोरक्षपणीं । अन्नें याचिती मध्याह्नीं । क्षुधेची ग्लानि निरसावया ॥३६॥आम्ही वेदशास्त्रसंपन्न । पात्रनिर्णयविचक्षण । यज्वे त्रैविद्याभिज्ञ । श्रेष्ठ सर्वज्ञ महंत ॥३७॥श्रेष्ठत्वगर्वें प्रज्ञा दुष्ट । म्हणोनि नेणती ब्रह्म प्रकट । मानूनि सामान्य फलफट । नेदिती स्पष्ट उत्तरही ॥३८॥न ते यदोमिति प्रोचुर्न नेति च पंरतप । गोपा निराशाः प्रत्येत्य तथोचुः कृष्णरामयोः ॥१२॥कृष्णसंवगडियां लागुनी । ऐशिया बुद्धी अनादरूनी । आहे नाहीं या प्रतिवचनीं । मौन धरूनि राहिले ॥३९॥ऐकोनिही कृष्णमहिमान । न अंगीकरिती गोपवचन । नाहीं म्हणोनि प्रतिवचन । ते ब्राह्मण न देती ॥१४०॥शत्रुतापना परीक्षिति । याज्ञिक सगर्व दुर्मति । गोवळांशीं न बोलती । मग ते जाती निराश ॥४१॥भणगापरी वाढवेळ । तिष्ठत राहिले पशुपाळ । मग निराश क्षुधाकुळ । गेले बेंबळ हरीपाशीं ॥४२॥जाऊनि ते रामकृष्णापुढें । वृत्तांत सांगती संवगडे । ते ऐकोनिया निवाडे । हास्य गाढें हरी करी ॥४३॥तदुपाकर्ण्य भगवान् प्रहस्य जगदीश्वरः । व्याजहार पुनर्गोपान् दर्शयन् लौकिकीं गतिम् ॥१३॥सकळजगाचा ईश्वर । म्हणोनि जाणे सर्वांतर । भगवान् षड्गुणऐश्वर्य धर । बोले उत्तर गोपेंशीं ॥४४॥अहो ऐशी लौकिक गति । प्रवर्तलीया याचक वृत्ति । कोणा नव्हे लघुत्वप्राप्ति । महत्त्वोपहती न पवतां ॥१४५॥श्रीराम समुद्रां याचितां मार्ग । तो उपेक्षी मानोनि उबग । तेणें होऊनी महत्त्व भंग । लघुत्व आंगा शिवतलें ॥४६॥द्रोणाद्रीतें अंजनीसुता । रामाज्ञेनें औषधी याचितां । महत्त्व जावोनी पावे लघुता । परी न कळे पर्वता कपिमहिमा ॥४७॥तथापि निजकार्या कारणें । महत्त्वहानीहि न गणूनि मनें । पुन्हा प्रवर्तती शाहाणे । विरक्तपणें नुबगति ॥४८॥ऐशी बोधूनि लौकिकी गति । संवगडीयांतें कमलापति । कथोनियां रहस्ययुक्ति । पाठवी पुढती याच्ञेतें ॥४९॥मां ज्ञापयत पत्नीभ्यः ससंकर्षणमागतं । दास्यन्ति काभमन्नं वः स्निग्धा मय्युषिता धिया ॥१४॥ऐका गडीहो रहस्यखूण । तुम्हीं पत्नीशाळे जाऊन । माझें करावें परिज्ञान । गुणवर्णन करूनी ॥१५०॥संकर्षणेशीं चक्रपाणी । पातला आहे ये वनीं । ऐसे यज्वपत्न्यांचे कानीं । मंजुळ वचनीं निवेदा ॥५१॥तुम्हांस पूर्वीं जेविं ब्राह्मणी । उपेक्षिले अवगणूनि । तैशा झणें मानाल पत्नी । त्या मद्भजनीं अनुरक्ता ॥५२॥धन्य यज्वपत्न्यांचें प्रेम । स्वमुखें वर्णीं पुरुषोत्तम । सनकादि विरक्त जे निष्काम । तेही सकाम ज्या प्रेमा ॥५३॥संवगडियांतें म्हणे हरी । यज्वपत्न्यांची भजनपरी । त्या देहमात्र वर्तती घरीं । येर मजमाझारीं सर्वस्वें ॥५४॥अंतःकरणें मजमाजीं लीन । तेणें समाधि सुखसंपन्न । मनें चिंतितां मनमोहन । त्या उन्मन मद्रूपीं ॥१५५॥बुद्धि करोनि सदाचारीं । वर्ततां दिसती घरोघरीं । परि त्या मजमाजी प्रेमभरीं । साक्षात्कारीं समरसल्य ॥५६॥मनःकल्पित हा संसार । तन्निश्चयीं बुद्धिचतुर । तिनें केलें मजमाजीं घर । नुसधें शरीर गृहकृत्यीं ॥५७॥मुख्य मनबुद्धि या दोन्ही । वसिन्नली माझ्या ठाईं । प्राणेंद्रियादि तत्प्रवाहीं । वर्ततां देहीं अनोळख ॥५८॥मातें लक्षोनि पदार्थमात्रीं । बुद्धि निश्चयातें जैं करीं । चित्त अनुसंधाना धरी । तदनुसारी अहंता ॥५९॥ प्राणप्रवाह मांदूळती । तन्मय इंद्रियाच्याही वृत्ति । प्रतीतिरूढ मदात्मस्थिति । रिती भ्रांति भवभानीं ॥१६०॥ऐशा मदात्मवेधेंकरूनि । माझ्या ठाईं यज्वपत्नी । राहिल्या होत्सात्या बाह्य सदनीं । प्रपंचभानीं कलिवरें ॥६१॥यालागिं स्नेहाळा माझ्या ठायीं । त्या मजवेगळें प्रियतम नाहीं । माझें नाम ऐकतां पाही । सर्वस्वही अर्पिती ॥६२॥यथापेक्षित जें जें अन्न । तुम्हांसी अर्पिती संपूर्ण । ऐसें ऐकतां भगवद्वचन । गडी तोषोन चालिले ॥६३॥यज्वपत्न्या पाहों नयनीं । ऐशी आवडी अंतःकरणीं । अन्नयाच्ञा भगवद्वचनीं । आनंदोनी चालले ॥६४॥गत्वाऽथ पत्नीशालायां दृष्ट्वाऽऽसीनाः स्वलंकृताः । नत्वा द्विजसत्तीर्गोपाः प्रश्रिता इदमब्रुवन् ॥१५॥यज्वयुवती प्रेमकथन । भगवन्मुखें करूनी श्रवण । त्यानंतरें गोपगण । पत्नीभुवन पावला ॥१६५॥जावोनि पत्नीशाळेप्रति । देखते झाले यज्वयुवति । हरीनें वर्णिल्या जैशा रिती । त्या ते स्थिती पूर्णत्वें ॥६६॥श्रवण रंगले हरिकीर्तनीं । हरिगुणकथनीं रंगल्या वाणी । नेत्र गुंतले हरिरूपध्यानीं । कृष्णालिंगनीं त्वगिंद्रियें ॥६७॥कृष्णप्रेमरसाची गोडी । घेऊनि रसना झाली वेडी । मोडली बाह्य विषयांची आवडी । दिधली बुडी हरिनामीं ॥६८॥कृष्ण नामामृतस्वादें । जीवशिवाशीं निघती दोंदें । नाचो लागलीं परमानंदें । पूर्णत्व स्फुंदे घडमोडी ॥६९॥कृष्णपादपद्मामोद । तेणें घ्राणासि लागला वेध । कर्मेंद्रियां प्रवृत्तिच्छंद । ज्या गोविंदमय रुचला ॥१७०॥अलंकरणीं सुमंडिता । करणव्यापारीं पूर्णत्वा । बैसल्या असती स्वानंदभरिता । भगवन्निरता सौभाग्यें ॥७१॥देखोनि निवाले अंतरीं । नमस्कारोनि विप्रनारी । परम नम्र मधुरोत्तरीं । वृत्तांत कथिते जाहले ॥७२॥ N/A References : N/A Last Updated : May 02, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP