मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १० वा| श्लोक २६ ते ३० अध्याय १० वा आरंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते १८ श्लोक १९ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ अध्याय १० वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर इत्यंतरेणार्जुनयोः कृष्णस्तु यमयोर्ययौ । आत्मनिर्वेशमात्रेण तिर्यग्गतमुलूखलम् ॥२६॥ऐसा वृत्तांत चिंतून । दोहीं यमलार्जुनांमधून । जाता झाला श्रीभगवान । तो श्रीकृष्ण जगदात्मा ॥१७॥द्रुमांमधूनि स्वशरीर । संकोचूनि प्रवेशमात्र । करितां उलूखल वक्र । झालें सत्वर ओढितां ॥१८॥बालेन निष्कर्षयताऽन्वगुलूखलं तद्दामोदरेण तरसोत्कलितांघ्रिबंधौ ।निष्पेततुः परमविक्रमितातिवेपस्कंधप्रवालविटपौ कृतचंडसब्दौ ॥२७॥वृक्षीं गुंतलें वक्र उखळ । बाळें आकर्षितां तें प्रबळ । कपिकर्षणें द्रोणाचळ । तेंवि यमल थरारिले ॥१९॥दामरज्जु सूक्ष्मतर । बळें ओढितां दामोदर । कैसेनि रज्जु झाली सधर । तो प्रकार अवधारा ॥३२०॥माया अघटितघटनापटीं । ज्याच्या योगें विश्व प्रकटी । जो ते लेऊनि नटला नटीं । त्याच्या गोठी त्या योग्य ॥२१॥सूर्यसमान तपेषाठी । भूगोलअग्रीं वाहे काठीं । मुखीं दाखवी ब्रह्मांडकोटी । ऐशा गोठी त्या योग्य ॥२२॥निर्बळा हातींचा सुटतां शर । भेदूं न शके वस्त्रमात्र । बलिष्ठ विंधितां कडतर । फोडि शरीर कवचेंशीं ॥२३॥इच्छामात्रें ब्रह्मांडकोटी । दावूनि लपवी मायेपोटीं । तो हा श्रीकृष्ण जगजेठी । मनुष्यनटीं नटलासे ॥२४॥तेणें ओढितां तें उखळ बळें । युग्मार्जुनांचीं उपडलीं मूळें । विक्रमें कर्षितां गोपाळें । झाले डाहाळें सकंप ॥३२५॥चंडशब्दें कडकडूनि । उन्मळूनि पडिले दोन्ही । नाद भरला दिशागगनीं । पतनें अवनि दणाणिली ॥२६॥तत्र श्रिया परमया ककुभः स्फुरंतौ सिद्धावुपेत्य कुजयोरिव जातवेदाः । कृष्णं प्रणम्य शिरसाऽखिललोकनाथं श्रद्धांजली विरजसाविदमूचतुः स्म ॥२८॥दिशा प्रकाशी देदीप्यमान । त्यांचे आंगींची शोभा पूर्ण । ते सिद्ध निघाले वृक्षांतून । जेंवि कृशान निर्मथनीं ॥२७॥रजतमाचे गेले मळ । झाले सबाह्य निर्मळ । पाळी अखिल ब्रह्मांडगोळ । तो गोपाळ ते नमिती ॥२८॥मग जोडूनि अंजलिपुट । स्तविला सप्रेम वैकुंठ । त्याचा यथार्थ स्तोत्रपाठ । शुक वरिष्ठ वाखाणी ॥२९॥गुह्यकावूचतुः - कृष्ण कृष्ण महायोगिंस्त्वमाद्यः पुरुषः परः । व्यक्ताव्यक्तमिदं विश्वं रूपं ते ब्राह्मणा विदुः ॥२९॥गौळियाचें मी लेंकरूं । मज कां करितां नमस्कारु । तरी हें न बोलें उत्तरु । तूं योगीश्वर जगदात्मा ॥३३०॥तुझें ऐश्वर्य अचिंत्य । मायानियंता अनंत । तुझा प्रवाह अव्याहत । तूं जगन्नाथ जगद्रूप ॥३१॥म्हणसी विश्व मायामय । तें प्रकृतिपुरुषापासूनि होय । तरी तूं आदिपुरुष अव्यय । ब्रह्मान्वय विश्वात्मा ॥३२॥प्रकृतिपुरुषें इयें दोन्ही । प्रकाशिलीं ज्यापासूनी । यास्तव आद्यकारण म्हणूनि । तुजलागोनि बोलिजे ॥३३॥म्हणसी कारण निमित्तभूत । तरी उपादानही तूंचि एथ । व्याप्य व्यापक व्यक्ताव्यक्त । तूं सतत अद्वितीय ॥३४॥स्थूळ सूक्ष्म एकानेक । अवघाचि अन्वयव्यतिरेक । मायाकृत तूं तिचा जनक । हा जाणती विवेक ब्रह्मनिष्ठ ॥३३५॥त्वमेकः सर्वभूतानां देहास्वात्मेंद्रियेश्वरः । त्वमेव कालो भगवान् विष्णुरव्यय ईश्वरः ॥३०॥गुह्यक म्हणती जी अनंता । तूंचि नियम्य आणि नियंता । नियम्यनियंतृविभागता । त्या वृत्तांता अवधारीं ॥३६॥पृथ्वी आप तेज पवन । पांचवें व्यापक केवळ गगन । अष्टधा प्रकृतीचा भगवान । नियंता सर्वज्ञ ईश्वर तूं ॥३७॥एवं कथिलीं अविकृतें । आतां सूक्ष्में विकारवंतें । ऐक तयाच्या विस्तारातें । तुझेंचि त्यांतें ईशत्व ॥३८॥शुक्रशोणित मिथुनीभूत । समरसोनि तें परिणमत । पांचभौतिक देह होत । कर्मजनितसंस्कारें ॥३९॥तेथ गोचर पंच प्राण । अगोचरही पंचधा भिन्न । एवं असु हें अभिधान । दशविध जाण वायूचें ॥३४०॥आत्मा म्हणिजे अहंकार । अंतःकरणादि प्रकार । संकल्प निश्चयादि अनुकार । सर्व एकत्र अभिमान ॥४१॥इंद्रियें म्हणिजे जीवचैतन्य । विषयोन्मुख करी स्फुरण । जिहीं मार्गीं प्रकाशोन । विपरीत ज्ञान अभ्यासी ॥४२॥वास्तव विसरे मागिलीकडे । विवर्त साच मानी पुढें । त्याच्या प्रेमें होय वेडें । भोगी निवाडें भवदुःख ॥४३॥बाह्य महाभूतांचें भान । विषयरूपें परिणमोन । भ्रांत करी जीवचैतन्य । तो हा करणसमुच्चय ॥४४॥श्रोत्र त्वचा आणि नयन । चौथी जिव्हा पांचवें घ्राण । इहीं उपजे विषयज्ञान । ज्ञानकरण पंचविध ॥३४५॥शब्दविषय पडतां श्रवणीं । तो विवरूनि अंतःकरणीं । परिहरणीं कां अंगीकरणीं । विचरे वाणी ते वाचा ॥४६॥स्पर्श त्वगिंद्रियासि झगटे । त्याची जाणीव मानसीं उमटे । त्यागा दानीं प्रवर्ते नेटें । तें गोमटें प्राणेंद्रिय ॥४७॥चक्षु दावी पदार्थरूप । बुद्धि जाणे तें क्रूर सकृप । संयोगवियोगीं गतिसाक्षेप । करी साटोप पदेंद्रिय ॥४८॥चित्ता मानले जिव्हारस । सेवितां होय धातुविशेष । शिश्नेंद्रियें तो स्मरोत्कर्ष । रतिविलास अपेक्षी ॥४९॥उच्चा नाकें साभिमानी । होऊनि प्रर्वततां विषयाचरणीं । पुढें सुगंध मागें घ्राणी । पायु घाणी प्रकाशी ॥३५०॥वाचा पाणि पाद शिश्न । गुह्यें सहित पांचही जाण । कर्मेंद्रियें या अभिधान । विषयाचरणक्रिया या ॥५१॥देह अहंता आणि प्राण । तैसाचि उभयेंद्रियांचा गण । चाळक नियंता सर्वज्ञ । ईश्वर पूर्ण तूं यांचा ॥५२॥स्वामी ऐसें तूं जरी म्हणसी । एवं कथिलिया प्रपंचासी । निमित्तकारण काळ त्यासी । उपादान प्रकृति हे ॥५३॥प्रकृतीपासूनि महत्त्वें झाला । विश्वात्मकत्वें जो परिणमला । कर्ता नियंता पुरुष बोलिला । तेथ मजला कां स्तविजे ॥५४॥मी गौळियाचें अज्ञानबाळ । अनावरत्वें अपराधशीळ । म्हणोनि उदरीं बांधलें उखळ । त्या स्तुतिरोळ हा कां ह्या ॥३५५॥सहसा स्वामी ऐसें न म्हण । जो कां विश्वात्मा सर्वज्ञ । तो तूं विष्णु सनातन । गुणपरिपूर्ण परमात्मा ॥५६॥काळचेष्टा ही तुझी लीला । तुझी शक्ति हे प्रकृति अबळा । पुरुष तवांश गोपाळा । तुज वेगळा तो कैंचा ॥५७॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP