मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १० वा| श्लोक १९ ते २५ अध्याय १० वा आरंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते १८ श्लोक १९ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ अध्याय १० वा - श्लोक १९ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १९ ते २५ Translation - भाषांतर तदहं मत्तयोर्माध्व्या वारुण्या श्रीमदांधयोः । तमोमदं हरिष्यामि स्त्रैणयोरजितात्मनोः ॥१९॥आधींच श्रीमदें मातलें । वरी वारुणी मधुर मदिरा प्याले । मनामागें धाविन्नले । स्त्रैण झाले सकाम ॥८६॥ऐसे अजितात्मे श्रियोन्मत्त । माध्वी मदिरा पिऊनि भ्रांत । स्त्रैण स्त्रीकामीं आसक्त । जें दुष्कृत अज्ञान ॥८७॥तो तयांचा मदांधकार । श्रीमदाचा भूतसंचार । आजि नाशीन मी समग्र । म्हणोनि मुनिवर कोपला ॥८८॥यदिमौ लोकपालस्य पुत्रौ भूत्वा तमःप्लुतौ । न विवाससमात्मानं विजानीतः सुदुर्मदौ ॥२०॥कैसें दैव पैं विचित्र । लोकपाळाचे होऊनि पुत्र । ज्या कारणास्तव झाले पात्र । अज्ञानप्रचुरतमाचें ॥८९॥जया अज्ञानाचिये भ्रांतीं । आपणा नग्न हें नेणती । सुदुर्मद गुह्यकजाती । त्या मदाची शांति करीन ॥२९०॥रजतमें हे भ्रांत झाले । म्हणोनि स्वहितीं जे वंचले । त्यांच्या कारुन्यें कळवळिलें । मन कोंवळें मुनीचें ॥९१॥ अतोऽर्हतः स्थावरतां स्यातां नैवं यथा पुनः । स्मृतिः स्यान्मत्प्रसादेन तत्रापि मदनुग्रहात ॥२१॥कोणा न करिती सन्मान । नेणती विनय अभ्युत्थान । वृक्षा ऐसें उद्धटपण । आपणा नग्न नेणती ॥९२॥स्थावरा ऐसा ताठा आंगीं । तरी स्थावरयोनिचि पैं गा जोगी । पुन्हा क्रिया ही बाउगी । जियेचा भोग या यां न घडे ॥९३॥ज्या कारणास्तव हे योनि । पावलो ऐशी अंतःकरणीं । माझ्या प्रसादें करूनि । यांलागोनि स्मृति असो ॥९४॥पुन्हा ऐसें न घडे आम्हां । जेणें पाविजे योनि अधमा । माझ्या अनुग्रहें ऐसा प्रेमा । त्यांसि निःसीम असो पैं ॥२९५॥वासुदेवस्य सान्निध्यं लब्ध्वा दिव्यशरच्छते । वृत्ते स्वर्लोकतां भूयो लब्धभक्ती भविष्यतः ॥२२॥ऐसें विवरूनि गुह्यकांसी । शाप बोलिला तपोराशि । मदपराधें स्थावरतेसी । वृक्षयोनीसि पावाल ॥९६॥आणि माझिया अनुग्रहें । स्मरण असेल मागील जें हें । स्थावरयोनि वृक्षदेहें । शताब्द मोहें भोगाल ॥९७॥दिव्यशताब्द क्रमिल्या पुढें । स्वर्गलोकाची प्राप्ति घडे । विष्णुभजनीं प्रेमा जडे । जेणें विघडे रजतम ॥९८॥अतिक्रमिलिया शताब्द । पावाल वासुदेवसान्निध्य । यथापूर्व होऊनि विबुध । भजनानंद भोगाल ॥९९॥शीतोष्णादि सहनशील । श्रांतालागीं सुशीतळ । अर्जुनवृक्ष होआल यमल । फल दल मूल अवंचक ॥३००॥येणें मदाचें क्षाळण । होतां भेटेल जनार्दन । लाहोनि पूर्वील विबुधपण । भगवद्भजन घडो तुम्हां ॥१॥शाप किंवा अनुग्रहो । क्षोभ किंवा म्हणिजे स्नेहो । नारदकृपेचा नवलाहो । नाशोनि मोहो सुखदानी ॥२॥श्रीशुक उवाच - एवमुक्त्वा स देवर्षिर्गतो नारायणाश्रमम् । नलकूबरमणिग्रीवावासतुर्यमलार्जुनौ ॥२३॥शुक म्हणे गा पुण्यश्लोका । ऐकें जनमेजयाच्या जनका । ऐशा विवरूनियां विवेका । नारदें गुह्यकां शापिलें ॥३॥दीनदयाळ नारद पूर्ण । नव्हे क्रोधाचें भाजन । तिहीं प्रश्नाचें विवरण । तुज हें पूर्ण निरूपिलें ॥४॥सर्वज्ञ देवर्षि नारद । ऐसा बोलूनि शापशब्द । बदरीवना तो कोविद । गेला मुकुंद चिंतूनि ॥३०५॥नलकूबर बृहद्वनीं । जन्म पावले तमो योनीं । यमलार्जुन झाले दोन्ही । शापवचनीं मुनीच्या ॥६॥ऋषेर्भागवतमुख्यस्य सत्यं कर्तु वचो हरिः । जगाम शनकैस्तत्र यत्रास्तां यमलार्जुनौ ॥२४॥कैसें शापाचें कारण । तें इतिहासें केलें कथन । पुढें काय करी कृष्ण । तें व्याख्यान अवधारा ॥७॥भगवद्भक्तां अग्रगणी । त्या मुनीची सत्य वाणी । करावया चक्रपाणि । अर्जुन दोन्ही अवलोकी ॥८॥अलूखलरज्जुनिबद्धजठर । उद्धरावया धनदकुमार । जाता झाला कमलाधर । जेथें तरुवर ते होते ॥९॥हळूहळूच रांगे खुरडे । कांहीं स्फुंदे कांहीं रडे । जेथ गुह्यक यमलझाडें । गेला निवाडें ते ठायीं ॥३१०॥क्रमिलें दिव्य वत्सरशतक । शापदग्ध हे गुह्यक । यथोक्त मुनीचें करावया वाक्य । यदुनायक प्रवर्तला ॥११॥देवर्षिर्मे प्रियतमो यदिमौ धनदात्मजौ । तत्तथा साधयिष्यामि यद्गीतं तन्महात्मना ॥२५॥माझा प्रियतम देवर्षि । तेणें शापिलें कौबेरांसी । त्याची गाथा जैशी जैशी । ते ते विधीसि साधीन ॥१२॥हे तों धनदाचे उभय कुमार । विशेष रुद्राचे अनुचर । नारदाचें कृपापात्र । यांचा उद्धार आवश्यक ॥१३॥अनित्यात्मकत्वें कवळून । परिणमें तें जीवचैतन्य । जो वास्तव नित्यात्मज्ञ । त्या अभिधान महात्मा ॥१४॥ज्ञानसंपन्न भक्तियोग । अनित्यावबोधें सविराग । ब्रह्मान्वयात्मकत्व जग। सानुराग चिदैक्यें ॥३१५॥ऐसा महात्मा ब्रह्मसुत । तेणें जैसा गाइला गीत । तैसा साधीन मी कार्यार्थ । ऐसा हेतु स्मरोनि ॥१६॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP