मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १० वा| आरंभ अध्याय १० वा आरंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते १८ श्लोक १९ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ अध्याय १० वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीगोविंदसद्गुरुपरब्रह्मणे नमः । चिन्मात्रैकसुखसुरवाड । फावोनि होय ज्याचेनि गोड । पुरे परमार्थाचें कोड । उपडे मोड भवाचा ॥१॥विषयाकारें सुखावभास । भावूनि भ्रमे चित्प्रकाश । तो उमजवूनि ने मूळास । सुख निर्दोष चाखवी ॥२॥चाखतां चाखणें चाखींव मुरे । केवळ सुखचि जें कां उरे । तें चिन्मात्रैकसुख निर्धारें । अमृतोद्गारें जो पाजी ॥३॥सुख आणि सुखभोक्तया । पैस नुरेचि नांदावया । चिन्मात्रैक नमितां पायां । भोगावया सोपें तें ॥४॥ज्याच्या लाभें दृश्य मरे । जेणें आसिलेनि हें स्फुरे । तो द्रष्टा तरी वेगळा उरे । माझा सुरे तद्दुःखें ॥५॥ज्याचें मरूनि उरोनि भोगणें । नुरोनि पुरोनि अवगमणें । कांहीं न होऊनि सर्व होणें । कीं न होणें सर्वहीं ॥६॥मरणाहूनि भोगणें कठिण । एवढें जयाचें अवघडपण । ऐसेंही भोगवी जी सघृण । गोडिसेपणें प्रकटूनि ॥७॥जेथिंची चवी चाखिल्या मनें । दिविवैभवें मानी वमनें । फलप्रलोभीं विश्वास नमनें । आथिलेपणें अपरोक्षें ॥८॥जें सर्वांगें आपण झालें । तया वियोगें प्रलोभिलें । तें वाचारंभणमात्र उरलें । कीं नाथिलें न घेतां ॥९॥जळासी मृगजळाचा रस । कथूनि उपजवितां हव्यास । सरस नाथिला न करी सोस । होय ते फोस वक्तृता ॥१०॥विरक्त परमार्थाचिये हांवे । भरूनि साधनीं घेती धांवे । तिही पावतां जेथींचे सिंवे । मग नाठवे स्मर्तृत्व ॥११॥ऐशियेही प्राप्तदशे । भवांकुरांचें विरूढणें असे । तेव्हां स्वप्नींचीं माणुसें । गजीं आकाशें नांगरिती ॥१२॥अग्निमाजि प्रेरिलें विरूढे । कीं समुद्रीं वरिखलें वेगळें निवडे । तरी दशा सिद्धिमंता न घडे । भवभयकोडें गोंवी हें ॥१३॥भ्रांत्या नाथिल्या पुष्पितवाणी । इहामुत्रार्थफलभोगकथनीं । झकविती स्थितप्रज्ञालागोनी । हे कहाणी केउती ॥१४॥ऐसें ज्याचें कृपेचें करणें । तो गोगोप्ता गोविंदपणें । प्रकट होतां अनाथकरुणें । तैं उद्धरणें मादृशीं ॥१५॥चरणस्पर्शमणीच्या संगें । जीवदशेचें लोहत्व भंगे । चिन्मात्र कांचन तेंचि वेगें । असे निजांगें संचलें ॥१६॥वाङ्मयामृताची सुरनिम्नगा । दृश्याभासकल्मषभंगा । ब्रह्मावबोधें उजळी जगा । अहं अघौघा ग्रासक ॥१७॥जयाचा अपांगभाभास्कर । अनेकतेचा अलंकार । नाशी शर्वरी सशार्वर । नित्य सन्मात्र प्रकाशी ॥१८॥ऐसा प्रभूचा अगाध महिमा । न सरे शताब्द कथितां ब्रह्मा । जिव्हा चिरल्या भुजंगमा । निखिल निगमा न वर्णवे ॥१९॥चंद्र पूर्णत्वें अंबरीं । बिंबे प्रकटुनि क्षीरसागरीं । आनंदाचें भरतें भरी । समर्थ करी हें तैसें ॥२०॥तेणें आज्ञापूनि मातें । सरतें केलें अपांगपातें । कृपामृताचें प्रज्ञाभरतें । भरलें पुरतें दयार्णवीं ॥२१॥तेचि कृपेचा कल्लोळ । वरदटीका हे रसाल । श्रवणादरें सुखसुकाळ । सप्रेम भोगिती ॥२२॥विग्रालागीं लावण्यमहिमा । पुंस्त्वरहिता सुरत वामा । न फावे तैसा तेथींचा प्रेमा । न रुचे अधमा विमुखातें ॥२३॥एथ अधिकारी गुरुभक्त । उभयभोगीं अनासक्त । नवपंकजीं षट्पद रत । तैसे निरत हरिचरितीं ॥२४॥तयेचेंचि हें श्रवणखाजें । येरां कुतर्कियां हें नसजे । ढेंकुणापरी रिघोनि शेजे । जे सुखनिजे भंगिती ॥२५॥ते अपानींए रोमांकुर । अपानवातचि त्यां रुचिकर । सुगंध तैल श्मश्रुपर । त्यां दुष्कर तो भोग ॥२६॥त्या क्षुरप्राय तीक्ष्णोत्तरें । वपनें त्यागिजे अंतरें । कीं आच्छादोनि अधोवस्त्रें । पार्ष्णिप्रहारें दडपिजे ॥२७॥मग बैसोनि स्वसुखासनीं । सज्जनांचिये सभास्थानीं । ज्याच्या श्रवणें संसृतिहानि । तें एथूनि परियेसा ॥२८॥भागवतींचा दशमस्कंध । त्यांतील दशमाध्याय हा विशद । षट्पद होऊनि विदुषवृंद । श्रवणोमोद अनुभविती ॥२९॥दशमाध्यायीं दशम रस । भक्तिप्रेमा जो कां सुरस । जेणें सौभाग्य नव रसांस । ज्यावीण ओस अवघे ते ॥३०॥दशमामाजीं श्रीकृष्णनाथ । बांधला रांगोनि उखळेंसहित । यमलार्जुन अंतर्गत । ते उन्मळीत तद्व्याजें ॥३१॥कृष्णस्पर्शें नलकूबर । शापविमुक्त दिव्य शरीर । करूनि कृष्णासि नमस्कार । गेले निर्जर निजलोका ॥३२॥ये अध्यायीं इतुकी कथा । शुक निवेदी जगतीकांता । श्रद्धापूर्वक परिसे श्रोता । तो अनंता प्रिय होय ॥३३॥नवमाध्यायीं दामोदरा । उखळीं बांधोनि नंददारा । विगुंतली गृहव्यापारा । नलकूबरां हरि लक्षी ॥३४॥नारदशापें नलकूबर । झाले यमलार्जुन तरुवर । हें ऐकोनि मात्स्यीकुमार । स्वयें सादर परिसावया ॥३५॥सादर भूपति प्रश्न करी । शापकार्ण मोक्षणपरी । ते हे कथा सविस्तरीं । दशमामाझारीं परियेसा ॥३६॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP