मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १० वा| श्लोक ८ ते १० अध्याय १० वा आरंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते १८ श्लोक १९ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ अध्याय १० वा - श्लोक ८ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ८ ते १० Translation - भाषांतर नारद उवाच - न ह्यन्यो जुषतो जोप्यान् बुद्धिभ्रंशो रजोगुणः । श्रीमदादाभिजात्यादिर्यत्र स्त्रीद्यूतभासवाः ॥८॥नारद म्हणे आपुल्या मनीं । मदोन्मत्ता केवढी हानि । स्वहित भंगे नुपजे ग्लानि । वृथा जन्मोनि मरताती ॥३२॥दृष्ट अष्ट मदांची मांदी । बळें ओळंघली ज्यांचिये खांदीं । ते पुरुष तिहीं घातले बंदी । असाध्य द्वंद्वी हे त्यांचे ॥३३॥ कुल शील आंगीचें बळ । विद्या वयसा लावसा लावण्य अष्ट मदांची थाटी । जगाचे झोंबोनि कंठी । स्वहितगोष्टी विसरवी ॥३४॥एका रजोगुणाचिये पोटीं । ऐशी अष्ट मदांची थोटी । जन्मोनि जगाचे झोंबोनि कंठीं । स्वहितगोष्टी विसरवी ॥१३५॥केवळ रजोगुणें । ज्याचेनि प्रपंची जग शाहणें । त्यामाजीं कामें घालूनि ठाणें । निजांगवणें जग झोडी ॥३६॥ कामिल्या ऐसें जोडे आमिष । तेथ लोभाचा होय प्रवेश । जेथ कामना होय फोंस । क्रोधावेश ते ठायीं ॥३७॥पूर्णकामें खवळे मद । अपूर्ण काम शोकप्रद । ऐसें मोहसंतानवृंद । अवघें विशद रिपुषट्क ॥३८॥प्राणप्रवृत्ति शरीर । दीपें प्रकाशें मंदिर । तेंवि श्रीमदें हे दुर्विकार । दुष्ट अघोर खवळती ॥३९॥राग तृष्णा संग लोभ । इत्यादि रजोगुणांचा क्षोभ । देहाभिमानाचें करी थोंब । दृश्यदंभ दृढावी ॥१४०॥पंचप्राण दशविधकरणें । प्रकाशूनि रजोगुणें । साच दृश्याचें केले जिणें । विषयभानें भुलवूनी ॥४१॥झालिया दृश्याचा उभारा । काम वावरे इंद्रियद्वारां । विषयलोभें द्वेष खरा । भेदासि थारा जगभरी ॥४२॥एक मध्यस्थ एक द्वेष्य । एक इतर एक पोष्य । एक बंधु एक वंश्य । तोष्य पोष्य ज्योष्यादि ॥४३॥एक सुहृदय एक मित्रु । एक उदास एक शत्रु । एक पापात्मा एक पवित्रु । भेद विचित्र हा ऐसा ॥४४॥आपणा मानूनि शरीरमात्र । माझें म्हणे कलत्र पुत्र । आप्त स्वजन कुल गोत्र । वृत्तिक्षेत्र दृढममता ॥१४५॥संपादल्याचा रक्षणलोभ । संपादावया वृत्तिक्षोभ । तोचि स्वार्थाचा समारंभ । देहवालभ रूढवी ॥४६॥मजचि असावें वृत्तिक्षेत्र । माझे विजयी व्हावे पुत्र । विश्वीं व्हावे महत्त्वपात्र । पदार्थमात्र मज व्हावे ॥४७॥गाणें नाचणें वाचणें । ऐशीं अनेक चतुरपणें । स्वार्थें कवळिला रजोगुणें । आपणा होणें अभिलाषी ॥४८॥नाना व्यवसायदक्षता । मजचि असावी तत्त्वता । वीर्यशौर्यविख्यातता । विश्वपूज्यता मज व्हावी ॥४९॥घवघविता विष्ठा देखे बिदीं । तेथ परावे पशु येऊं नेदी । आपुल्या भक्षावें चतुष्पादीं । स्वार्थबुद्धि एथवरी ॥१५०॥अनेकपरीचा स्वार्थविशेष । अष्टमदाचा हव्यास । करूनि वाढवी रागद्वेष । रजें पुरुष कवळिला ॥५१॥मंदिरें करावीं पाचबंदी । स्रक्चंदनभोगसमृद्धि । स्वयें भोगावया शत्रुमांदीं । मर्दूनि द्वंद्वी प्रतिकूळ ॥५२॥ऐशी उदंड करिती हांव । परी ईश्वराची अगाध माव । ज्या प्राण्याचें जैसें दैव । तितुकें वैभव तो भोगी ॥५३॥तस्मात् सर्वांमाजि क्रूर । श्रीमदचि परम थोर । याच्या बळें अवघे येर । होती सधर दुर्मद ॥५४॥सर्वही दुर्मदांचा भार । सेव्य मानूनि कवळी नर । तथापि बुद्धीचा अंकुर । विचारपर तेथ उरे ॥१५५॥तेथ श्रीमदाचा आवेश । तत्काळ करा बुद्धिभ्रंश । म्हणाल त्याचाचि कां उत्कर्ष । तो विशेष अवधारा ॥५६॥एक श्रीमदाच्या पोटीं । स्त्री मद्य द्यूत हे त्रिपुटी । जीमाजीं अपार विकारकोटी । जेणें उठाउठी बुद्धि भ्रंशे ॥५७॥तेथें बुद्धिभ्रंशतेची थोरी । स्वयें देवर्षि जेंवि विवरी । एथ जाणोनि विवेक चतुरीं । पुन्हा ते परी न करावी ॥५८॥हन्यन्ते पशवो यत्र निर्दयैरजितात्मभिः । मन्यमानैरिमं देहमजरामृत्युनश्वरम् ॥९॥श्रीमदांध झालिया बुद्धि । तैं विसरती स्वहितशुद्धि । जरामरण आधिव्याधि । हे त्रिशुद्धि न गणिती ॥५९॥अजर अमर मानूनि देह । स्वैराचरणीं धरिती मोह । विषयभोगांचा प्रवाह । तेणें निर्वाह मानिती ॥१६०॥परांचीं हरिजती दारा सदनें । जीवें घेऊनि धनापहरणें । निर्दयपणें पशु मारणें । दुष्टीं करणें हीं तीन्ही ॥६१॥पिंडपोषणाचिये चाडे । मन सैराट धांवे जिकडे । दुष्टीं तिहीं तें कीजे कोडें । सहसा कुडें न म्हणोनि ॥६२॥दिविभोग अप्सरामैथुन । वांछूनि अनावर धांवे मन । निर्दयें करूनि पशूंचें हनन । म्हणती यज्ञ विधिप्रणीत ॥६३॥प्रवृत्तिज्ञानें वेद पढले । दिविभोगार्थ स्वर्गीं चढले । ऐसे भवार्णवीं जे पडले । ते नाडले श्रीमदें ॥६४॥देवसंज्ञितमप्यन्ते कृमिविड्भस्मसंज्ञितम् । भूतध्रुक् तत्कृते स्वार्थं किं वेद निरयो यतः ॥१०॥जाणोनि देहमात्र स्वयमेव । नृपति म्हणविती मनुष्यदेव । दीक्षित म्हणविती भूदेव । ऐसें वैभव ज्या देहा ॥१६५॥ऐसाही देह पडतां अंतीं । ऐका तयाची परिणामगति । श्वानजंबुकादिक भक्षिती । ते हागती तैं विष्ठा ॥६६॥अथवा अग्नि क्रव्याद नाम । दग्ध करी तैं ते भस्म । हें द्विविध चुकल्या वर्म । कृमीचें धाम दुर्गंधि ॥६७॥ऐसा कुत्सित देह आपण । मानूनि धरिती देहाभिमान । भूतद्रोही होती पूर्ण । यथेष्टाचरण करूनी ॥६८॥भोगावया स्वैर भोग । हिम्साचरणें द्रोहिती जग । ऐसा श्रीमदाचा प्रसंग । विवेकमार्ग विसरवी ॥६९॥जिव्हालोभें वधिती पशु । द्रव्यलोभें हिंसादोषु । जारकर्माचा हव्यासु । आणि विशेष मद्यादि ॥१७०॥ऐसे केवळ देहाभिमानी । भूतद्रोही मद्यपानी । भूतद्रोहें निरयश्रेणी । घडे निदानीं भोगणें ॥७१॥ऐसा श्रीमदांध जो झाला । तो काय जाणें स्वार्थ आपुला । नेणे म्हणोनि द्रोह केला । नरक जोडिला देहलोभें ॥७२॥देह कोणाचा न विचारूनी । अहंतादात्म्यें कौटाळूनी । श्रीमंदांधावीण हे करणी । इतर कोणी नाचरती ॥७३॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP