मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १० वा| श्लोक ४ अध्याय १० वा आरंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते १८ श्लोक १९ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ अध्याय १० वा - श्लोक ४ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४ Translation - भाषांतर अंतः प्रविश्य गंगायामंभोजवनराजिनि । चिक्रीडतुर्युवतिभिर्गजाविव करेणुभिः ॥४॥उत्फुल्लपद्माचिया हारी । मल्लिका शतपत्रिका कल्हारी । रोलंबांच्या झंकारगजरीं । स्मर शरीरीं अवतरे ॥८४॥ऐशी फुल्लारविंदश्रेणी - । मंडित मिरवे मंदाकिनी । माजीं क्रीडती गुह्यक दोन्ही । रहितवसनीं वनितांशीं ॥८५॥अप्सरांचा सुरतमहिमा । रमतां हव्यस चढे कामा । भ्रमर भुलोनि गुंते पद्मा । तेंवि वामा स्मरकदनीं ॥८६॥नवपल्लवांचिया अशनीं । उन्मत्त होती कुंजरकरिणी । स्वेच्छा क्रीडती अगाध जीवनीं । तेंवि हे दोन्ही गुह्यक ॥८७॥जलमैथुनें बाहुतरणें । न्युब्ज उत्तान गात्रां करणें । विपरीतसुरतीं आलिम्गनें । पाहती नयनें अवयवां ॥८८॥चंद्रानना मृगलोचना । विद्रुमाधरी सुकुंदरदना । भ्रूकटाक्षें समता नयना । शरसंधाना शराच्या ॥८९॥भ्रमरभासुर केशपाश । शुभ्र गुंफिले सुमनघोंस । भांगीं सिंदुर ओघ विशेष । सरस्वतीचा प्रयागीं ॥९०॥त्रिवेणिसाम्य ऐशा वेणी । माजीं झळकती रत्नलेणीं । ज्यांच्या मूर्ति स्मरोनि ध्यानीं । हांव यज्ञीं याज्ञिकां ॥९१॥तप्तचामीकराभगौरा । नवयौवना विलासचतुरा । ज्यांचे अंगप्रभेचा वारा । सुरां असुरां मोहक ॥९२॥शृंगी केला जिहीं गृहस्थ । श्वान केला गाधिसुत । पुरूरवा ऐल गीत । जगद्विख्यात पुराणीं ॥९३॥ज्यांच्या रूपांचा संबंधु । होतां सुंदोपसुंद बंधु । परस्परें पावले वधु । ऐसा विनोदु जयांचा ॥९४॥त्या या प्रत्यक्ष निर्जरवनिता । अस्त्रसामग्री जे मन्मथा । त्यांच्या लावण्याची कथा । गिरा बोलतां मौनावे ॥९५॥विद्युल्लता चमकती घनीं । तैशा तळपती जीवनीं । तन्मैथुनें गुह्यक दोन्ही । मंदाकिनी डहुळितां ॥९६॥कर्णभूषणाचिया कांति । गंडस्थळीं प्रतिबिंबती । कुटिल कुंटल तरळताती । नेत्र पंक्ति साञ्जिता ॥९७॥नितंब पृथुल कुच वर्तुळ । नाभी गंभीर तनु मवाळ । नासा सरळ मुक्ताफळ । अतिसुढाळ शोभविती ॥९८॥हनुभृकुटीमध्यभागीं । गोंदिल्या सुंदर पाचरंगीं । कुंकुमरेखेची झगमगी । पाहतां दृगीं अनिमेष ॥९९॥गौर सरळ बाहुयुगलें । करतळें जैशीं रातोत्पळें । कोंपर कळाविया अंगुळें । अतिकोमळें सुरेखें ॥१००॥कंठउदरहृदयशोभा । मध्य सूक्ष्म लावण्यगाभा । मन्मथसदनीं हेमप्रभा । वरी पक्ष्माभा विखुरली ॥१॥कर्दळिस्तंभासारिखे ऊरू । पदतळ आरक्तविद्रुमाकारु । मन्मथशस्त्रांचें शरीर । तो प्रकार त्या मूर्ति ॥२॥प्रत्यक्ष लक्ष्मीच्या बहिणी । असाम्य नसती चंचळपणीं । गरळसहोदरा म्हणोनी । कटाक्षबाणें मारिती ॥३॥मादक मदिरेचीं भावंडें । दावूनि मोहिती गात्रभांडें । शंखभगिनी लावूनि वेडें । शंख तोंडें करविती ॥४॥कल्पतरू समान पोटीं । खवळिती कामसंकल्पकोटी । कौस्तुभातुल्य अंगयष्टि । पाहतां दृष्टीं भासती ॥१०५॥ऐरावतासारिख्या गति । भ्रूव्यंकटा शार्ङ्गाकृति । कामज्वराची निवृत्ति । साम्य करिती सुरवैद्यां ॥६॥चंद्रानुजा चंद्रानना । अर्पिती क्षयाची दक्षिणा । अमृतोपम संभाषणा । भावगायना दाविती ॥७॥उच्चैःश्रव्याची हे पदवी । रथा जुंपिला सूर्य भ्रमवी । मानसरज्जु बांधोनि जीवीं । सुरनर तेंवि फिरविती यां ॥८॥कामधेनू समान कामें । दुभती कामुकां नित्य नेमें । वत्सापरी वेधवर्में । भोगप्रेमें वेधिती ॥९॥वरी निर्मळ पोटीं गरळ । क्षीराब्धि ऐशा हृदयीं कुटिळ । मंदरप्राय काठिण्य बहळ । जैसा व्याळ कृतघ्न ॥११०॥ऐशिया ज्या देवांगना । गुह्यकीं करूनि मद्यपाना । भुलले त्यांचिये मैथुना । तेणें नयना अनोळखी ॥११॥निर्जनीं चिखलीं रुतली गाय । दैवें दयाळ तेथें जाय । मग ते जैसी निर्गम लाहे । तेणें न्यायें मुनि आला ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP