मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३९ श्लोक ४० ते ५२ अध्याय ८ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर एष वः श्रेय आधास्यद्गोपगोकुलनंदनः । अनेन सर्वदुर्गाणि यूयमंजस्तरिष्यथ ॥१६॥जातकफळ उत्तमोत्तम । बाळ केवळ पुरुषोत्तम । तुम्हांसि करील कल्याणधाम । दुःख दुर्गम निरसील ॥१७५॥गोपी गोप वत्स गायी । परमानंद याच्या ठायीं । नित्य नूतन सांगों काई । तोषदायी होईल ॥७६॥त्याच्या लालनें पोषणें । प्रेमें हास्यें संभाषणें । महादुर्गमें दारुणें । तुम्ही संपूर्ण निस्तराल ॥७७॥पुराऽनेन व्रजपते साधवो दस्युपीडिताः । अराजके रक्ष्यमाणा जिग्युर्दस्यून्समेधिताः ॥१७॥गर्ग म्हणे गा व्रजपति । पूर्वीं अराजकी होती क्षिति । तस्करांचे जे भूपति । दस्यु त्यांप्रति म्हणावें ॥७८॥सर्व प्रजांसि पीडाकर । भुमे पुंड पाळेगार भंगूनि साधूंचा आचार । दुःख दुर्धर ओपिती ॥७९॥पथिकांचीं नग्नीकरणें । कुलस्त्रियांचीं वस्त्रहरणें । देशोदेशींचीं गोग्रहणें । करिती पीडणें गृहस्थां ॥१८०॥नाहीं साधुसंरक्षिता । नाहीं प्रजांतें पाळिता । नाहीं धर्मातें स्थापिता । अराजकता जे काळीं ॥८१॥तेव्हां तुझ्या या नंदनेम । केलीं दस्यूंचीं कंदनें । स्वधर्मकर्मसंस्थापनें । साधु सन्मानें वाढविले ॥८२॥य एतस्मिन् महाभागाः प्रीतिं कुर्वन्ति मानवाः । नारयोऽभिभवन्त्येतान्विष्णुपक्षानिवासुराः ॥१८॥नंदा न म्हणे पूर्वींच ऐसें । आतां तेंचि सामर्थ्य असे । कळों येईल दिवसेंदिवसें । तैं विश्वासें उमजसी ॥८३॥ज्याच्या सुकृता चढली सीग । ऐसे मानव जे सभाग्य । तयांसीच प्रेम साङ्ग । एथ अव्यंग उपजेल ॥८४॥या कुमाराचे ठायीं जे जे । स्नेहें मानव भजती बोजें । ते ते रक्षिले गरुडध्वजें । ऐसें तुझें मन जाणे ॥१८५॥त्यांसि शत्रूंचें नाहीं भय । ऐसें विशेष बोलणें काय । निर्जर विष्णूचिये छाये । तेंवि निर्भय ते होती ॥८६॥बैसतां सिंहाचिये पाठीं । काय करिती कुंजरथाटी । तेंवि याची झालिया भेटी । हरिली गोठी शत्रूंची ॥८७॥तस्मान्नंदात्मजोऽयं ते नारायणसमो गुणैः । श्रिया कीर्त्यानुभावेन गोपायस्व समाहितः ॥१९॥ऐसा अनंतगण परिपूर्ण । नंदा तुझा हा नंदन । याचे समतेसि नारायण । किंवा जाण तोचि हा ॥८८॥नारायणाचे समान कीर्ति । नारायणाचे समान कांति । नारायणाचे समान शक्ति । लक्ष्मीपति किंबहुना ॥८९॥म्यां हें रहस्य कथिलें तुज । परी तूं हृदयीं ठेवीं गुज । पुढें पुढें देखसी चोज । तेव्हां उमज पडेल ॥१९०॥परम एकाग्र करूनि चित्त । हें रहस्य करीं गुप्त । ऐसा कथूनि वृत्तांत । गर्ग त्वरित निघाला ॥९१॥बहुत सन्मानिला नंदें । उचंबळला तेणें मोदें । सर्वां गौरवोनि आशीर्वादें । गेला आनंदें स्वाश्रमा ॥९२॥श्रीशुक उवाच - इत्यात्मानं समादिश्य गर्गें च स्वगृहं गते । नंदः प्रमुदितो मेने आत्मानं पूर्णमाशिषाम् ॥२०॥ गर्ग स्वाश्रमा गेलियावरी । नंद आपुले अभ्यंतरीं । परमानंदें निर्भर भारी । म्हणे संसारीं धन्य मी ॥९३॥विश्व देखिलें जांभईमाजी । ते निरसिली शंका आजी । गर्गवचनीं निष्ठा माझी । गरुडध्वज सुतसाम्य ॥९४॥आशीर्वादाचें पूर्णत्व । आपणाप्रति हें मुख्य तत्त्व । कथूनि गेला शुद्ध सत्त्व । मुनि गुप्त ययाचें ॥१९५॥आजि सदैव आपन । आशीर्वादाचें भाजन । आजि मुनिकृत कल्याण । आज्ञापून मुनि गेला ॥९६॥शुक म्हणे गा परीक्षिती । नंद तोषला ऐसिये रीति । जैसी निर्दैवा नृप संपत्ति । होय अपैति अदृष्टें ॥९७॥कृष्णदयार्णवानुचर । करी संतांसी नमस्कार । नामकरण हें सविस्तर । परिसें एकाग्र अंतरें ॥९८॥पुढें एकात्र कीजे चित्त । बालक्रीडा अत्यद्भुत । श्रवण करितां मनोरथ । पुरती भावार्थ धरिलिया ॥९९॥बालक्रीडा अमृतलहरी । जो सद्भावें श्रवण करी । तेणें पुरुषार्थ साधिलें चारी । घरिंचे घरीं हरिप्रेमें ॥२००॥संकर्षणासमवेत । बालक्रीडा अत्यद्भुत । करिता झाला रमाकांत । आनंदभरित व्रजभुवनीं ॥१॥नंदयशोदेचें अंतर । करिती आनंदें निर्भर । बालक्रीडाचमत्कार । नाना प्रकार दाऊनि ॥२॥नंदयशोदा केतुली काय । अवघें गोकुळचि तन्मय । जेथ ब्रह्मही मुग्ध होय । तेथ कैंची सोय सुरनरां ॥३॥पूर्णब्रह्मा स्वयें कृष्ण । त्या पूर्णत्वाचेंचि लक्षण । बालक्रीडामिसें जाण । करी वर्णन शुकयोगी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP