मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३९ श्लोक ४० ते ५२ अध्याय ८ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - एवं संप्रार्थितो विप्रः स्वचिकीर्षितमेव तत् । चकार नामकरणं गूढो रहसि बालयोः ॥११॥शुक म्हणे गा परीक्षिती । ऐशी दृढाविली नंदमति । एरव्हीं गर्गाची प्रवृत्ति । गोकुळाप्रति एतदर्थ ॥१३०॥गर्ग संप्रार्थिला नंदें । ऐकोनि भरला परमानंदें । रुग्ण हर्षे प्रिय औषधें । तेंवि मोदें स्वीकारी ॥३१॥मग गोप्याहूनि गोप्य स्थान । परम निगूढ एकांतस्थान । दोहीं कुमारांचें नामकरण । केलें नेउनि ते ठायीं ॥३२॥नंद यशोदा रोहिणी । निजकुमरांतें घेऊनि । बैसलीं पुण्याहवाचनीं । विधिविधानीं गर्गाज्ञा ॥३३॥गर्गें जाणोनि अभ्यंतर । नंदासि कळों नेदितां मंत्र । क्षात्रविधानें उभय कुमार । केले सत्वर संस्कृत ॥३४॥नंदयशोदापुरस्कृत । गर्गेंचि सारिलें सर्वकृत्य । क्षात्रविधानें वृष्णिसुत । गुप्त संस्कृत करावया ॥१३५॥शतपळात्मक तुळामान । दिव्यजांबूनदसुवर्ण । पात्र आणिलें भरून । वेधहीन सुमुक्तीं ॥३६॥गर्गें हस्तें समान केलें । नामाष्टक वरी लिहिलें । नामकरणीं जें बोलिलें । तें श्रवण केलें पाहिजे ॥३७॥प्रथम श्रीमन्मंगलमूर्ति । द्वितीय लिहिली सरस्वती । तृतीय गुरु तो गर्गमूर्ति । श्रीप्रकृति कुलदेवी ॥३८॥वैकुंठ ऐसें मासनांव । नक्षत्रचरणें वासुदेव । गुप्त नाम श्रीकेशव । प्रकट स्वमेव श्रीकृष्ण ॥३९॥प्रथम कुलदेवताभक्त । द्वितीय मासक्रमें प्राप्त । तृतीय नक्षत्र तेंचि गुप्त । प्रकट चतुर्थ एक म्हणती ॥१४०॥सुवर्णशलाका घेऊनि हातीं । लेखन करी गर्ग सुमति । मुक्ताफळांवरी अक्षरपंक्ति । मुक्ताफळांचि सारिख्या ॥४१॥ऐसें नामाष्टकलेखन । करूनि षोडशोपचारें पूजन । वर्णसंख्या निष्कसुवर्ण । तत्पूजनीं अर्पिलें ॥४२॥नामचतुष्टयमंगलाचरण । प्रथम नंदें केलें पठण । त्यानंतरें नामकरण । उच्चारण आदरिलें ॥४३॥जन्मलासी श्रावणमासीं । मधुक्रमेण वैकुंठोऽसि । नंद म्हणतां गर्गऋषि । दीर्घायुर्भव म्हणतसे ॥४४॥नक्षत्रनामाचा अनुवाद । वासुदेवोऽसि म्हणे नंद । गर्गें दिधला आशीर्वाद । दीर्घायुर्भव म्हणोनि ॥१४५॥मनाचि माजीं नाम गुप्त । त्वं केशवोऽसि नंद म्हणत । आशीर्वाद गर्ग देत । दीर्घायुर्भव म्हणोनि ॥४६॥नंद पढे प्रकट नामासी । श्रीकृष्णवर्मा त्वमेवासि । दीर्घायुर्भव गर्गऋषि । मंत्राक्षतांसि ओपित ॥४७॥मग वेदोक्त मंत्राक्षता । गर्गें ओपिल्या सकळां माथां । रामपूर्वक कृष्णनाथा । केलें तत्त्वतां नामकरण ॥४८॥गंधाक्षता कुसुममाला । सुगंधचूर्णाचा वरी उधळा । वस्त्रें भूषणें सुवर्णतुळा । दक्षिणेसि ओपिल्या ॥४९॥हस्तमात्रा कर्णमात्रा । कौशेयपट्कुलादिका वस्त्रां । सालंकृता धेनु पवित्रा । नंदें सत्पात्रा अर्पिल्या ॥१५०॥अक्षवाणें गर्ग करी । अहेर वाहिला घरींचें घरीं । नामकरण ऐसे परी । गूढागारीं संपविलें ॥५१॥भूत भविष्य वर्तमान । बाळकाचें गुणलक्षण । गर्ग नंदासे करील कथन । तें सर्वज्ञ परिसोत ॥५२॥गर्ग उवाच - अयं हि रोहिणीपुत्रो रमयन्सुहृदो गुणैः । आख्यास्यते राम इति बलाधिक्याद्बलं विदुः । यदूनामपृथग्भावात्संकर्षणमुशंत्युत ॥१२॥रमवील सुहृदां समस्तां । यालागीं नाम रोहिणीसुता । राम म्हणोनि ठेविलें आतां । ऐक संकेता दूसर्या ॥५३॥पृथ्वीचाही घातल्या भार । याच्या बळाचा न कळे पार । यालागीं नाम हें बलभ्रम । ऐक उच्चार तिसरा ॥५४॥कोणाएका निमित्तासाठीं । यादव लागती बारा वाटीं । ते हा स्वसत्ता एकवटी । बोधूनि गोठी निजगुह्य ॥१५५॥सम्यक् म्हणजे बरवेपरी । यदुकुळाचें कर्षण करी । समस्त आणि एके हारीं । तें नाम निर्धारीं संकर्षण ॥५६॥आतां तव पुत्राचें कथन । नंदा ऐकें सावधान । भूत भविष्य वर्तमान । बहु थोडें न सूचिजे ॥५७॥आसन्वर्णास्त्रयो ह्यस्य गृह्णतोऽनुयुगं तनूः । शुक्लो रक्तस्तथा पीत इदानीं कृष्णतां गतः ॥१३॥नंदा अपूर्व सांगों कायी । तुझिया पुत्राची नवाई । हा प्रतियुगाच्या ठायीं । देही विदेही होतसे ॥५८॥युगीं युगीं तनु धरी । चहूं युगीं वर्ण चारी । तीन मागील अवधारीं । चौथा निर्धारीं हा कृष्ण ॥५९॥कृतयुगीं शुक्लवर्ण । त्रेतायुगीं होय अरुण । द्वापरीं पीतप्रभापूर्ण । आतां श्रीकृष्ण कलिकाळीं ॥१६०॥शुक्ल रक्त पीतवर्ण । तिहीं युगीं होऊनि पूर्ण । आतां कलीचा जाणोनि गुण । झाला श्रीकृष्ण तव सदनीं ॥६१॥प्रागयं वसुदेवस्य क्कचिज्जातस्तवाऽऽत्मजः । वासुदेव इति श्रीमानभिज्ञाः संप्रचक्षते ॥१४॥कोणे एके काळीं स्थळीं । पूर्वीं जन्मला यदुकुळीं । तुझा पुत्र हा महाबळी । भूमंडळीं विख्यात ॥६२॥वसुदेवाचा झाला पूर्वीं । म्हणोनि वासुदेव बोलिजे सर्वीं । तुझा तनय हा बहुतां नांवीं । बहुकाळींचा बहुकाळा ॥६३॥वासुदेव ऐसें अभिज्ञ म्हणती । श्रीमान् म्हणिजे हा श्रीपति । ज्ञात्यांमुखें याची ख्याति । सर्व त्रिजगतीं विस्तृत ॥६४॥गर्गमुखें हें ऐकोनि नंद । मनीं पावला परमानंद । जन्मांतरार्थ कथिला विशद । म्हणे हा अगाध दैवज्ञ ॥१६५॥प्रत्यक्ष हाचि वसुदेवतनय । नंद नेणे हा अभिप्राय । भावें ऋषीचे धरी पाय । पुन्हा काय बोलिला ॥६६॥बहूनि सन्ति नामानि रूपाणि च सुतस्य ते । गुणकर्मानुरूपाणि तान्यहं वेद नो जनाः ॥१५॥नंदा तुझिया कुमाराप्रति । नामें बहुसाल आसती । तीं समग्र कथनशक्ति । कुंठितमति होतसे ॥६७॥जेथ माझी मति कुंठित । तेथ सामान्य जनाची कोण मात । तथापि सांगेन किंचित । शास्त्रसंकेतविचारें ॥६८॥सर्वज्ञ आणि सर्वकर्ता । सर्वसाक्षी सर्वनियंता । सर्वव्यापक सर्ववेत्ता । सर्वात्मकता सर्वगत ॥६९॥ऐशीं गुणनामें अपार । कर्मानुसारें जें जें अपर । ऐकें तयाचा विचार । सत्य साचार । मद्वाक्यें ॥१७०॥गोपीमानसविमोहन । कृष्ण पूतनाशोषण । बालकृष्ण व्रजाभरण । शकटभंजन दैत्यारि ॥७१॥तृणावर्तविध्वंसन । यमलार्जुनउन्मूलन । राधारमण बकदारण । अरिष्टघ्न गोपति ॥७२॥अघमर्दन श्रीमुरारि । मेघश्याम ईश शौरि । गोरसतस्कर गिरिवरधारी । दुग्धापहारी विश्वदृक् ॥७३॥ऐशी अनंत नामावळि । प्रकट होईल ते ते काळीं । भविष्यगोष्टि गुप्त कथिली । हे हृत्कमळीं असों दें ॥७४॥ N/A References : N/A Last Updated : April 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP