मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८ वा| आरंभ अध्याय ८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३९ श्लोक ४० ते ५२ अध्याय ८ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीगोविंदसद्गुरवे नमः । जयजयसद्गुरु गोविंदराया । अनन्यभावें शरण पायां । मनें वाचासहित काया । कुरवंडूनि सांडणें ॥१॥नाथिलें नाशूनि केला जय । म्हणोनि विप्सार्थीं जयजय । तुझा सर्वत्र ऊर्जित विजय । वरी अपजय तव विमुखां ॥२॥सन्मात्र न देखती रवीचे नयन । सन्मात्र कल्पूं न शके मन । सन्मात्र बोलावया वदन । सरस्वतीचें कुंठित ॥३॥तया सन्मात्रा प्रकाशक । तुझा प्रकटे जैं बोधार्क । तैं शास्त्रज्ञखद्योतक । तर्कप्रमुख लोपती ॥४॥सर्वां असाध्य जें नानाश्रमें । तें सुगम साध्य ज्याचेनि नामें । म्हणोनि कोणी न पवती सीमे । गुरुत्वगरिमे जयाचे ॥५॥यालागीं सद्गुरु म्हणणें घडे । येर गुरुत्वें तितुकीं जडें । ब्रह्मादिकांचेनि पाडें । पडे पालडें प्रलयांतीं ॥६॥स्वप्रभेच्या तीव्रकिरणीं । सूर्यकांतीं प्रकटूनि वह्नि । दहनपचनादि अलिप्तपणीं । तुझी करणी रवि शिकला ॥७॥इंद्रियद्वारा निजात्मज्ञानें । प्रकाशलेनि विषयभानें । भवसंभवादि पापपुण्यें । अलिप्तपणें प्रकटिसी ॥८॥तेणें भवस्वर्गादि परिभ्रमण । द्यूतक्रीडा हे दुजेवीण । क्रीडसी हें तव विंदानें । अभिन्नभिन्न तुज साजे ॥९॥गोविंद म्हणणें याचिसाठीं । इंद्रियां विषयां देऊनि गांठी । स्वयें प्रकटूनि ते राहटी । तूं शेवटीं अलिप्त ॥१०॥सकळसाधनीं साध्य जें धन । तयासी राय हें अभिधान । मोक्षा वरुतें जें निधान । तें चरणसेवत पैं तुझें ॥११॥विजातीय जें असन्मात्र । तें अनन्यतेचें नोहे पात्र । निरसूनि विपरीतभ्रघचि मात्र । अनन्य एकत्र कवळिसी ॥१२॥परंतु सप्रेमसंभ्रमाचें उचित । कृपावरें वोपी बहुत । जरी तूं करिसी भ्रमातीत । दास्यसुखामृत मग कैचें ॥१३॥दास्यें विशुद्ध मनोदर्पण । लाहे बोधार्काचें सन्मुखपण । तैं प्रत्यगात्मत्वें सूर्य आपण । होतां कोण अवघड ॥१४॥काठिण्य निरसे विजातीय । मग उभय बिंबा ऐक्य होय । तें म्हणों तरी भेदभय । होतें काय सत्कुलें ॥१५॥चित्तमिडगणें इतुकें करणें । दास्यें बोधार्का सन्मुख होणें । स्वात्मपत्ययप्रभाकिरणें । मग मागणें किमर्थ ॥१६॥प्रेमसंभ्रमीं अनन्यभाव । उपजे एवढें लाहिजे दैव । याही वरौता अप्राप्य ठाव । म्हणणें माव अवघी हो ॥१७॥शरण म्हणिजे प्राप्तिस्थान । तें तंव स्वामीचे श्रीचरण । त्या वेगळें भासे आन । तोचि भजनव्यभिचार ॥१८॥काया वाचा आणि मन । ये त्रिपुटीचें जन्मस्थान । केवळ जें कां विपरीतज्ञान । कुरवंडून सांडणें ॥१९॥तया सांडणया पोटीं । इहामुत्रादि अवघी सृष्टि । गेली ओंवाळणिच साठीं । ब्रह्मांडकोटीं समवेत ॥२०॥आतां अभेद किंवा भेद । ज्ञान विज्ञान किंवा बोध । भजनानंद दशेचा शोध । कीजे विशद डोळसीं ॥२१॥असो ऐसेनि सप्रेमभजनें । श्रीगुरुपादप्रसादांजनें । मनीषानयनीं प्रमेयधनें । गोप्यें तितुकीं प्रकटती ॥२२॥क्षेत्र पंचक्रोशात्मक । वाराणसी अवघी एक । त्यामाजीं मणिकर्णिका मुख्य । क्षेत्रनायक विशेष ॥२३॥तैसें चिन्मात्रैक सद्गुरुरूपडें । परी शिष्यें पाहावें चरणांकडे । हेंचि कथिलें चंद्रचूडें । जें पूजामूलं गुरोः पदं ॥२४॥ध्यानमूल श्रीगुरुमूर्ति । मंत्रमूल श्रीगुरु उक्ति । गुरुकृपेवीण सायुज्यमुक्ति । प्रशंसिती ते मूर्ख ॥२५॥यालागीं आमुचें पूजास्थळ । तें स्वामीचें श्रीपादकमळ । जेथींचें अनुमात्र लाहतां जळ । सिद्धि सफळ वोळगती ॥२६॥इतुकेंचि भांडवल आमुचे गांठीं । एरव्हीं न सरों तृणासाठीं । येणें बळें पृथक सृष्टि । करणें गोष्टी केतुली ॥२७॥तंव सद्गुरु कृपामूर्ति । आनंदोनि आत्मस्थिती । मौळ स्पर्शोनि अमृतहस्तीं । आज्ञापिती कृपेनें ॥२८॥ग्रंथव्याख्यान असे फार । न कीजे स्तुतीचा विस्तार । न वाढवूनि अलंकार । कथा सत्वर वाखाणीं ॥२९॥स्वामीचें हें अनुशासन । करूनि परमादरें मान्य । चंद्रा उजु चकोरनयन । तैसे चरण लक्षिले ॥३०॥दंडप्राय करूनि नमन । नमिले श्रोते कृपाघन । अवधानजीवनें सिंचून । जे वक्तृत्ववन वर्धविते ॥३१॥मागां शकट तृणावर्त । सप्तमाध्यायें पावले अंत । नामकरण परम गुप्त । नंद करवीत गर्गाज्ञा ॥३२॥तया रसाचें भोजन । करावया हें निमंत्रण । ज्यांशी परीक्षिती समान मान । सप्रेमश्रवणपंक्तीसी ॥३३॥नलगे चातुर्य काव्यव्युत्पत्ति । न लगे अनेक शास्त्रीं गति । एक पाहिजे सप्रेमभक्ति । जे करी श्रीपति स्वाधीन ॥३४॥आठवा सप्रेमें आठवा । नकरूनि प्रपंच आठवा । अध्याय परियेसा आठवा । जेणें ठावा हरि होय ॥३५॥जांभईमाजि विश्वरूप वदनीं । देखोनि सचिंत यशोदा जननी । शंका ऐकतां नंदामनीं । नामकरणीं ते निरसे ॥३६॥आणि बालक्रीडामिसें जाण । हरि करील मृद्भक्षण । धर्षण करितां पसरूनि वदन । दावील पुन्हा विश्वरूप ॥३७॥अष्टमाध्यायीं इतुकी कथा । शुकें निरूपिली जगतीनाथा । श्रवणें सकळ खंडूनि व्यथा । वरपुरुषार्थ स्वीकरणें ॥३८॥ N/A References : N/A Last Updated : April 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP