मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४ था| श्लोक ६ ते १० अध्याय ४ था आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २८ श्लोक २९ ते ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४७ अध्याय ३ रा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर नन्वहं ते ह्यवरजा दीना हतसुता प्रभो । दातुमर्हसि मन्दाया अङ्गेमां चरमां प्रजाम् ॥६॥दादा निश्चयात्मक तुझी अनुजा । परमदीन मी मृतप्रजा । तूं तो समर्थ भोजराजा । मजलागीं तुझा आधार ॥६४॥भाग्यमंद मी अदृष्टहीन । दीनाहूनि परमदीन । तुझे कृपेचें भाजन । तरी इतुकें वचन पाळावें ॥६५॥धीर उदार भोजवंशीं । मी याचितें तुजपाशीं । तूंही समर्थ द्यावयासी । तरी एवढें प्रजेसि मज ओपीं ॥६६॥सर्वांहूनि कनिष्ठ प्रजा । म्हणोनि जीव कळवळी माझा । तथापि कन्या हे महाराजा । नोहे अष्टम तुझा हा वैरी ॥६७॥श्रीशुक उवाच - उपगुह्यात्मजामेवं रुदत्या दीनदीनवत् । याचितस्तां विनिर्भर्त्स्य हस्तादाचिच्छिदे खलः ॥७॥जैसीं रुदती अनाथें दीनें । तयांहूनि कोटिगुणें । देवकी आक्रंदें दुःखानें । नयनीं जीवनें पाझरती ॥६८॥ओंटींमाजीं धरूनि कन्या । दीर्घ स्वरें करी रुदना । दीनाहूनि परमदीना । अतिकृपणा अनाथा ॥६९॥ जाणोनि पराविया बाळा । न करी मावेचा कळवळा । गुह्यप्रदेशीं धरूनि बाळा । परमस्नेहाळा देवकी ॥७०॥बाळ कवळूनि ऐसें पोटीं । करुणा भाकीतसे ओंठीं । कंस द्रवेना अनुमात्र पोटीं । दुष्ट कपटी दुर्जन ॥७१॥ऐसा प्रार्थितां बहुत परीं । तीतें झिडकारी दुराचारी । हस्तापासोनिया कुमारी । बळेंचि हरी दुरात्मा ॥७२॥नक्र आंसुडी गजेंद्रचरण । कां निषादपाशीं गुंततां हरिण । नाना जलचरादि गळीं मीन । तेंवि दुर्जन आंसुडी ॥७३॥तां गृहीत्वा चरणयोर्जातमात्रां स्वसुः सुताम् । अपोथयच्छिलापृष्ठे स्वार्थोन्मूलितसौहृदः ॥८॥गर्भापासूनि मात्र पडिलें । प्रसूतिस्रावें गिरबडलें । दुष्टें तैसेंचि आंसुडिलें । स्नेह सोडिला निष्ठुरें ॥७४॥देह पाहिजे वांचविला । एवढाचि स्वार्थ पाहिला । सुहृद्भाव उन्मळिला । जेवीं पहिला संवचोरें ॥७५॥ते भगिनीतनया ओढूनि हठीं । दोन्ही चरण धरूनि मुष्टीं । भवंडूनिया शिलापृष्ठीं । जंव आपटी सक्रोधें ॥७६॥सा तद्धस्तात्समुत्पत्य सद्यो देव्यम्बरं गता । अदृश्यतानुजा विष्णोः सायुधाष्टंमहाभुजा ॥९॥तंव देवी जगज्ज्योति । जी परमात्म्याची प्रकृति । जे शिवाची संभूति । परा म्हणती जयेतें ॥७७॥विश्वव्यापकाची अनुजा भगिनी । म्हणूनि व्याप्तीसी नव्हे उणी । जे वस्तूची गवसणी । फेडूं कोणी न शकती ॥७८॥वेगळी काढूनि कोणी दावी । ऐसा समर्थ गोसांवी । नाहीं म्हणोनि इची पदवी । वेदही न दावी पृथक्त्वें ॥७९॥दुधा आंतूनि आली साय । ती दुधावेगळी होते काय । दूधपणाची फोडूनि त्राय । ते न जाय निवडले ॥८०॥दुग्धसारा साय नांव । दुग्धें तयेचा सद्भाव । तेवीं जें वस्तूचें वास्तव । परी स्वभाव वस्तूचा ॥८१॥ऐशी अघटितघटनापटीं । रची ब्रह्मांडाचिया कोटी । तयेतें कंस जंव आपटी । तंव पिळोनि मुष्टि निसटली ॥८२॥सवेग केलें उत्प्लवन । ठेली देवता होऊन । प्रकटविलें मुळींचें ध्यान । तें पहाती नयन कंसाचे ॥८३॥अष्टमहाभुज सायुध । देवीरूप धरिलें सद्य । प्रकट ठेली उदायुध । जे अगाध योगिनी ॥८४॥दारोयंत्रीं अग्निस्पर्श । होतां गगनीं करी प्रवेश । तैसा दावी चंडावेश । पाहे कंस भयभीत ॥८५॥तया चक्रबाणाचियेपरी । गगनीं संचरे खेचरी । ऊर्ध्ववदनें अगोचरी । कंस अंतरीं निरीक्षी ॥८६॥दिव्यस्रगम्बरालेपरत्नाभरणभूषिता । धनुःशूलेषुचर्मासिशङ्खचक्रगदाधरा ॥१०॥अष्टमहाभुजा खेचरी । अष्टायुधें धरिलीं करीं । योगमाया परमेश्वरी । अलंकारें मंडितां ॥८७॥धनुष्य बाण शूल चर्म । चक्र गदा खङ्गोत्तम । शंख धरिला जैसा सोम । प्रभे साम्य बंधुत्वें ॥८८॥चैत्रवनादि नंदनवनें । तेथील देवीं वेंचूनि सुमनें । माळा निर्मूनि चंद्रानने । सप्रेम भजनें अर्पिल्या ॥८९॥विश्वात्मकाचिया आवरणें । वर्ते तयेची प्रावरणें । कैशीं काय वर्णिजे कोणें । जीं चित्सुवर्णें निर्मिलीं ॥९०॥मलयमातेचा सुरभिगंधु । तेणें मिश्रित केला इंदु । तोचि सर्वांगीं लेपनानंदु । पैं विशुद्ध अवतरला ॥९१॥ब्रह्माविष्णुरुद्राकृति । नाना सुरनरादि सर्व व्यक्ति । जडित केले त्या रत्नपंक्ति । वोप देती सुढाळें ॥९२॥ऐसें चराचरात्मक लेणें । लेइली चिच्छक्ति भूषणें । सच्चित्सुखाचीं आभरणें । कंसें पुण्यें देखिलीं ॥९३॥कैशीं देखिलीं ऐसें म्हणसी । तरी तूं नृपवरा परियेसीं । सांगेन सविस्तर ते तैशी । निजमानसीं अवलोकीं ॥९४॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP