मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४ था| श्लोक १ ते ५ अध्याय ४ था आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २८ श्लोक २९ ते ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४७ अध्याय ३ रा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - बहिरन्तः पुरद्वारः सर्वाः पूर्ववदावृताः । ततो बालध्वनिं श्रुत्वा गृहपालाः समुत्थिताः ॥१॥राया कृष्णगमनापूर्वीं । द्वारें पिहित सर्वत्र सर्वीं । तैशी यथापूर्व आघवीं । माया लावी कपाटें ॥३२॥महाद्वारादि बहिर्द्वारें । कारागारादि अभ्यंतरें । मध्यें पण्यवीथी चौबारें । पूर्वानुसारें अडकिलीं ॥३३॥पलायितांचीं जैशीं निलयें । कां मूर्च्छागताचीं सर्वेंद्रियें । भास्करेंवीण कुशेशयें । तेणें न्यायेंच नुघडती ॥३४॥एथ नवल न कीजे भूपा । सदनाबाहेर नेलिया दीपा । माजील प्रकाश पावे लोपा । मग होय सोपा अंधकारा ॥३५॥तैसा परमात्मा होतां दूरी । मायाच स्वयंभ भरली घरीं । टाळी बैसली इंद्रियद्वारीं । वाट विचारीं चालेना ॥३६॥ऐशीं लागलिया कपाटें । तव बाळें किंकाळी मारिली नेटें । रक्षण होतें क्रूर मोठें । कडकडाटें चेयिलें ॥३७॥ऐकोनि रुदित बालध्वनि । होते कारागृहरक्षणीं । अवघे उठिले तत्क्षणीं । मनीं दचकोनी साशंक ॥३८॥ते तु तूर्णमुपव्रज्य देवक्या गर्भजन्म तत् । आचख्युर्भोजराजाय यदुद्विमः प्रतीक्षते ॥२॥एक रक्षणीं सावधान । शस्त्रास्त्रादि सांभाळून । एक वातवेगें धांवून । नृपा कथन करूं गेले ॥३९॥राजद्वारींच्या रक्षकां । पूर्वीच आज्ञा ऐशी देखा । जे कारागारींचिया वार्त्तिकां । न कीजे शंका प्रवेशीं ॥४०॥द्वास्थीं उघडितां सवेग खिडकी । पुढें धांवती दूत दुडकी । रायापाशीं तडकाभडकीं । गोष्टी थोडकी बोलिले ॥४१॥म्हणती राया भोजपति । अष्टमगर्भाची प्रसूति । झाली तुमचिये भगिनीप्रति । सेवेसि विनति जाणविली ॥४२॥ज्याच्या भयें अतिउद्विग्र । अहोरात्र तुमचें मन । तो हा अष्टम गर्भ म्हणून । केलें निवेदन सेवेसी ॥४३॥ऐसें सवेग जाऊनि दूतीं कथिलें भोजरायाप्रति । ते देवकी अष्टमगर्भप्रसूति । उद्विग्रचित्तीं ज्यालागीं ॥४४॥उद्विग्न होऊनि प्रतीक्षा करी । त्याची वार्त्ता कथिली हेरी । ऐकोनि दचकला अंतरीं । म्हणे हा वैरी प्रत्यक्ष ॥४५॥स तल्पात्तूर्णमुत्थाय कालोऽयमिति विहूवलः । सूतीगृहमगात्तूर्णं प्रस्खलन्मुक्तमूर्धजः ॥३॥दचकोनि उठिला सत्वर । कोपें झाल अत्यंत क्रूर । न सांवरितां स्वशरीर । अतिसत्वर निघाला ॥४६॥उठिला मंचकापासून । धांवतां पडला अडखळोन । मुकुट गेला गडबडून । केश सुटून विखुरले ॥४७॥पुढें धांवला मोकळे केशीं । आला प्रसूतिमंदिरासी । दूत धांवती चौपाशीं । शस्त्रास्त्रांशीं सन्नद्ध ॥४८॥गगनवाणीचा वृत्तांत । ऐकोनि होतों साशंकित । आजि याचा करीन घात । मग निवांत पहुडेन ॥४९॥ऐसा मंदिरीं संचरला । जैसा कृतांत खवळला । देवकी विनवी तये वेळां । तें नृपाळा अवधारीं ॥५०॥तमाह भ्रातरं देवी कृपणा करुणं सती । स्नुषेयं तव कल्याण स्त्रियं मा हन्तुमर्हसि ॥४॥देवकी म्हणे कंसाप्रति । दादा ऐकें एवढी विनंती । अनाथ येत्यें मी काकुळती । कल्याणमूर्त्ति तूं राया ॥५१॥तुझी धाकुटी मी बहिणी । तुवां आपुलिये प्राणरक्षणीं । आम्हां घालूनिया बंधनीं । दुःखश्रेणी भोगविल्या ॥५२॥बाळें मारिलीं सकोमळ । तया दुःखाचे कल्होळ । आठवितां मन व्याकुळ । सदा तळमळ करितसें ॥५३॥तुझा चुकवाचा कालमृत्यु । मनीं धरूनि हाचि हेत । पुत्रशोकाचें आवर्त्त । म्यां अद्भुत सोशिलें ॥५४॥परमदीन मी दुःखित । तूं बंधु स्नेहाळ करुणावंत । माझें एवढें पुरवीं आर्त्त । म्हणुनि प्रार्थित घाबरी ॥५५॥तुवा ऐकोनि गगनवाणी । प्रवत्तलासि माजेह हननीं । स्त्रीवधाच्या पापाचरणीं । कंटाळोनि सोडिलें ॥५६॥जेव्हां होतें गर्भिणी । ते काळींही अंतःकरणीं । तुवां पाहिलें विचारूनि । पापकरणी न केली ॥५७॥आतां तेंचि पुन्हा आलें । तुवां पाहिजे विचारिलें । मज दीनेतें सुखी केलें । वायणें बोलें दयाळा ॥५८॥हननीं अयोग्य तुझी स्नुषा । न करीं स्त्रीवधअघोरदोषा । बालहत्या करितां यशा । नराधीशा मूकसी ॥५९॥आठवा नोहे हे आठवी कुमारी । म्हणोनि सहसा इसी न मारीं । पुत्र नव्हे मा त्याचें समरीं । भय अंतरीं आगविसी ॥६०॥माझी कन्या तुझी स्नुषा । योग्य नव्हेसि हननदोषा । एवढी रक्षूनि घेईं यशा । वाक्य सहसा न मोडीं ॥६१॥बहवो हिंसिता भ्रातः शिशवः पावकोपमाः । त्वया दैवनिसृष्टेन पुत्रिकैका प्रदीयताम् ॥५॥अग्निसमान बहुत बाळ । तुवां मारिले होऊनि काळ । तुज हा शब्द नाहीं केवल । दैव सबळ प्रेरक ॥६२॥आतां एवढी कनिष्ठ प्रजा । मज देईं गा भोजराजा । एकुलती हे आत्मजा । दादा तुझा प्रसाद ॥६३॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP