मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३ रा| श्लोक ५४ अध्याय ३ रा आरंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ अध्याय ३ रा - श्लोक ५४ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५४ Translation - भाषांतर यशोदा नन्दपत्नी च जातं परमबुध्यत । न तल्लिङ्गं परिश्रान्ता निद्रयापगतस्मृतिः ॥५४॥द्वैपायनि म्हणे राया । प्रसूति होतां नंदजाया । तिची श्रांत झाली काया । योगमायाप्रभावें ॥३३॥बोलती नगरींच्या गौळणी । वयातीत हे गुर्विणी । प्रसूतिकाळीं प्राणदानी । हो निर्वाणीं जगदंबा ॥३४॥ऐशी सचिंत सर्व नगरी । प्रसूति झाली मध्यरात्रीं । गोळा पडतांचि बाहेरी । भरली शरीरीं योगनिद्रा ॥७३५॥नाहींच खंडिलें जों नाळ । न पाहतां पुरतें बाळ । न करितां लिंगसांभाळ । केली विव्हळ निद्रेनें ॥३६॥उदराबाहेर पडला गोळा । इतुकेंची जाणे यशोदा बाळा । लिंगनिर्देश याचेवेगळा । नाहींच कळला ते काळीं ॥३७॥विचार करावा जों पुढतीं । तों योगनिद्रेनें हरिल्या स्मृति । सहित प्रसूति उपसूति । आली सुषुप्ति सर्वांसी ॥३८॥एवं यशोदेपुढें घातला कृष्ण । देवकीपुढें कन्यारत्न । वसुदेवाचें पदबंधन । इतुकें कथन तुज केलें ॥३९॥संकर्षण दोघीं पोटीं । कैसा म्हणूनि पुशिली गोठी । तरी कंसें केली आटाआटी । तें यादवसंकटीं हें केलें ॥७४०॥आला दीनांचा कळवळा । देव झाला उताविळा । योगमायेची अघटित कळा । हे कथिली लीला द्वितीयाध्यायीं ॥४१॥एवं कथिला प्रथम प्रश्न । द्वितीय प्रश्नाचें हें वचन । हरीसि कंसाचें भय कोण । कां व्रजभुवन सेविलें ॥४२॥तरी देवकीनें चक्रपाणि । स्तवितां केली हे विणवणी । तुझें जन्म मजपासूनि । कंसालागूनि न कळावें ॥४३॥तें मातेचें मनोगत । पुरवावया रमाकांत । गोकुळा गेला हा वृत्तांत । इत्थंभूत तुज कथिला ॥४४॥अष्टम हा तुझा प्रश्न । त्यांत दोहींचें प्रतिवचन । षट्प्रश्नांचें निरूपण । क्रमेंचि श्रवण करीं पुढें ॥७४५॥आणि उपप्रश्न जेर जे असती । पुढें पुढें जे करिजेती । त्या त्या प्रश्नांची निवृत्ति । ग्रंथसमाप्तीपर्यंत ॥४६॥ऐसें श्रीमद्भागवत । जें निगमगर्भींचें परमामृत । महापुराण विख्यात । संहितासंकेत पारमहंस्य ॥४७॥संख्या अठरा सहस्र विशद । त्यामाजीं हा दशमस्कंध । शुकपरीक्षित्संवाद । तृतीयाध्याय हरिजन्म ॥४८॥एकाजनार्दनप्रसादगंगा । चिदानंदें स्वानंदओघा । लोटतां गोविंदकृपागंगा । दयार्णवचि सांठवण ॥४९॥त्या कृपापीयूषग्रंथकथनें । श्रोते सुस्नात होती श्रवणें । आत्मसायुज्यप्राप्तिपुण्यें । कृतार्थ होणें सप्रेमें ॥७५०॥दृष्टादृष्टार्थफलप्राप्ति । अभीष्टवरद रुक्मिणीपति । माझी सेवेसी हेचि विनती । कीजे संतीं सनाथ ॥५१॥पुढिले अध्यायीं निरूपण । ऐकोनि योगमायेचें वचन । कंस भेणें करी कथन । दुष्ट प्रधान मिळवूनि ॥५२॥जो जो विचार कथिला मंत्रीं । तो ऐकावया पवित्र श्रोत्रीं । अवधान देइजे सत्पात्रीं । हे सर्वत्रीं प्रार्थना ॥५३॥गोविंद सद्गुरूचा किंकर । श्रीकृष्णदयार्णवानुचर । घाली श्रोतयां नमस्कार । श्रवणीं सादर व्हावया ॥५४॥इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां परमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां श्रीकृष्णजन्मगोकुलाभिगमनं नाम तृतीयोऽध्यायः ॥३॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५४॥ टीका ॥७५४॥ एवं संख्या ॥८०८॥ ( तीन अध्याय मिळून ओवीसंख्या २७१५ ) तिसरा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : April 26, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP