मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३ रा| आरंभ अध्याय ३ रा आरंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ अध्याय ३ रा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीकृष्णपरमात्मने नमः ॥ गोविंदसद्गुरुचरणस्मरण । करितां विस्मरणासि ये मरण । तेणेंचि चुकलें संसरण । कार्यकारणसमवेत ॥१॥इंद्रियवर्गासि जो अविदित । गोविंदनामाचा संकेत । तो सत्प्रकाश्मूर्तिमंत । सद्गुरु म्हणिजे तया हेतु ॥२॥ज्याचिया गुरुत्वाचिया पोटीं । अनंतब्रह्मांडांचिया कोटी । होऊनि लपती उठाउठीं । स्वप्नसृष्टीसारिख्या ॥३॥अणूहूनि जें अणुतर । गुरुहूनि गुरुत्वें थोर । जेणें व्यापिलें चराचर । करितां निर्धार अस्पष्ट ॥४॥सर्वगतत्वें विद्यमान । सर्वीं सर्वग तुझे चरन । विश्वतस्पात् हे जाणोनि खूण । श्रुति सज्ञान प्रबोधी ॥५॥सर्वगताचा जों विसर । तोंवरी सर्वाचा विस्तार । सर्वातीत अगोचर । स्मरणादर भव नाशी ॥६॥सर्वगताचें विस्मरण । तंववरी यथार्थ जन्ममरण । विस्मरणासि येतां मरण । निराकरण विवर्त्ता ॥७॥स्मार्य स्मरण आणि स्मर्ता । एथ इतुकेंचि रूप विवर्त्ता । त्रिपुटी तेथ अनेकता । बीजा आतौता जेवीं तरु ॥८॥बीज विरूढोनि होय झाड । झाडीं लगडती बीजघड । येणें विस्ताराचि होय वाड । मूर्ख घडामोड मानिती ॥९॥उगमींहूनि निघे पाणी । तें प्रवाहीं करी धांवणी । तों तों वाढे अनंतगुणीं । उपसंहरणीं तें नव्हे ॥१०॥जंव जंव उगमा अंतरणें । तंव तंव प्रवाहीं बहुवस होणें । उपरतौनि उगमा नेणें । नाहीं होणें ज्यापरी ॥११॥शेंडाहूनि वृक्ष रस । परतोनि टाकी जैं मूळास । तैं झाडचि पडे ओस । बीज ना भूस समरसीं ॥१२॥तैसा विस्मरणेंचि विवर्त्त रूढ । विवर्ते विसर गाढ मूढ । येणें इहामुत्र दृढ । भव अवघट इतुकाची ॥१३॥एथ सर्वगतत्वें तुझें चरण । स्मरतांचि उडें विस्मरण । सहित सगर्भ संसरण । कार्यकारणसमवेत ॥१४॥जेव्हां विसराचा निरास । तेव्हांचि स्मरणाचा प्रकाश । जेवीं रात्रि आणि दिवस । एकत्र वास न करिती ॥१५॥विद्युल्लतेचें जें विस्फुरण । फांकोनि उजळी अवघें भुवन । कां शब्दाचें संवेदन । अंतःकरण क्रमें घे ॥१६॥सुषुप्ति उजळी जैं जागरा । क्रमेंचि फांकें इंद्रियद्वारा । तैसा उपसंहार होय विसरा । तो अवधारा क्रमरीति ॥१७॥हें सांगतांचि लागे उशीर । होतां क्रम तो अतिसत्वर । उपाधिपोटीं वेगवत्तर । बिंबे भास्कर ज्यापरी ॥१८॥परी शब्द स्पर्श रूप रस गंध । विषय अवघा पंचविध । येणें विश्वाभास प्रसिद्ध । दृश्य विविध उपजविलें ॥१९॥सविश्वासें सद्गुरुवचनें । दुःखदोषादिदर्शनें । इहामुत्रार्थीं विरक्त होणें । तेव्हां करणें उपरमती ॥२०॥मनपवनाच्या पक्षवेगें । आत्मप्रकाश बाहेरी निगे । तो इंद्रियोपरमेंचि मागें । फिरोनि निजांगें उपरमे ॥२१॥मनचि जालिया उन्मन । प्रकाश विसरे जगृतिभान । ते सुषुप्ति म्हणती शून्य । परी तें ज्ञान घनगर्भित ॥२२॥मन लपालें अंधकारीं । जागृति बुडूनि गेली विसरीं । चैतन्य ठेलें अगोचरीं । मग निर्धारीं शून्यत्व ॥२३॥मन निर्बुजोनि आपुल्या ठायीं । कल्पूनि रची सर्व कांहीं । इंद्रियें नेणती स्थूल देहीं । स्वप्न पाहीं या नांव ॥२४॥ऐशी मनाची लपिटपी । सर्वां विदित आणि सोपी । म्हणोनि सत्यत्व जग आरोपी । विषयरूपी सुखाचें ॥२५॥एथ सविश्वासें सद्गुरुबोधें । अवस्थात्रयात्मकविवर्तरोधें । चिन्मात्रैक उरे नुसधें । प्रत्यगात्मत्व प्रतिबिंब ॥२६॥दुग्धामाजीं असे लोणीं । परी तें लाभे निर्मथनीं । तैशी चित्प्रभा विपरीत ज्ञानीं । कालवली ते निवडणें ॥२७॥सत्य सत्यत्वें निवडलें । मिथ्या मिथ्यत्वें बहुडलें । सर्वगतत्वें श्रवण जालें । विपरीत गेलें विस्मरण ॥२८॥कार्य तितुकें प्रपंचभान । याचें कारण मूळ अज्ञान । दोहींचेंही अस्तमान । श्रीगुरुचरणस्मरणेंची ॥२९॥ऐशिया चरणस्मरणसेवा । कृपा उपजली सद्गुरुदेवा । द्वैत उपजवूनि अद्वैत ठेवा । म्हणती बोल ममाज्ञा ॥३०॥तेथ अकिंचन म्हणियारा । ये आज्ञेचा दयांबुझरा । सांठवणें ओडवी शिरा । दयार्णव खरा या हेतु ॥३१॥ऐसें स्वामींहीं वरदप्रेमें । गौरवूनि आपुल्या नामें । राबविती स्वेच्छाकामें । आज्ञानियमें निजसत्ता ॥३२॥आरब्ध श्रीमद्भागवत - । व्याख्यान चालवीं अतंद्रित । विश्वात्मकत्वें आपुले आर्त्त । श्रोते होऊनि बैसले ॥३३॥द्वितीयाध्यायीं गर्भस्तुति । समर्थिली जे यथामति । तिच्या श्रवणें सुखविश्रांति । अंतर्वृत्ति श्रोतयां ॥३४॥आतां श्रीकृष्णजन्मकथन । रसाळ चालवीं व्याख्यान । बसवूनि श्रोतयांचें मन । श्रोते सुरगण तिष्ठती ॥३५॥ऐसें स्वामीवरवैभव । वर्षतां भरला दयार्णव । प्रज्ञापाणियाची धांव । गिरा गौरव पावली ॥३६॥वरानंदें उचंबळोन । नयनें लक्षूनियां श्राचरण । हृदयपीठीं प्रतिष्ठून । मग व्याख्यान आदरिलें ॥३७॥शुक म्हणे गा कौरवभूपा । श्रवणसुखाच्या घेऊनि मापा । कृष्णकीर्तीचा सांटपा । करितां सोपा अपवर्ग ॥३८॥तरी दशमामाजीं तृतीयाध्याय । जेथ पूर्णब्रह्म देवकीतनय । होऊनि तोष्गे लोकत्रय आनंदमय करील ॥३९॥वसुदेव देवकीसि निजध्यान । दावूनि सांगेल जन्मकथन । प्रेरितां वसुदेव कंसाभेणें । गोकुळीं स्थापन करील ॥४०॥इतुकी कथा अध्यायांत । राया ऐकें सावचित्त । शौनकादिकांप्रति सूत । अवधानार्थ संबोधी ॥४१॥साधनसंपन्न मुमुक्षु श्रोते । तिहीं सादर होआवें चित्तें । सुकृताभीष्टफळाचे भोक्ते । सत्वर त्यांतें पाचारा ॥४२॥भाविकाचा कल्पतरु । परमामृताचा सागरु । भगवत्कथेचा उद्गारु । कृष्णावतार परियेसा ॥४३॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP